Diwali Special: त्यांना आपल्या भेटवस्तू आणि भरपूर प्रेमाची आवश्यकता आहे

* गरिमा पंकज

आपुल्या जीवनात एखादी व्यक्ति किती महत्त्वाची आहे याचे आपण शब्दांत वर्णन करू शकत नाही, कारण भावनांची भाषा नसते. त्यांना तर फक्त एकमेकांवरील प्रेम आणि विश्वासाने जाणून घेतले जाते, आपण एखाद्याची किती काळजी घेत आहात, आपण त्यास किती जोरकसपणे आठवत आहात, हे व्यक्त करण्याची एक सुंदर संधी असते ती म्हणजे उत्सव. विशेषत: दिवाळी ही अशी वेळ असते, जेव्हा आपण प्रेमाच्या प्रकाशाने हृदयाच्या नातेसंबंधांना सजवू शकता.

संपूर्ण वर्ष तर घरगृहस्थीच्या जबाबदाऱ्या एवढा वेळच देत नाहीत की आपल्या प्रियजनांना खूष करण्यासाठी काहीतरी केले जाऊ शकेल, परंतु दिवाळीत प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार खरेदी करण्याची योजना आखतो. अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला बजेटमध्ये कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू घ्याव्यात हे सांगत आहोत जेणेकरून आपल्या प्रियजनांच्या गरजाही पूर्ण होतील आणि भेटवस्तू पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही तरळेल.

फटाके आणि दिव्यांच्या आरासींबरोबरच हृदयाला जोडणाऱ्या भेटवस्तुंसाठी दिवाळी ओळखली जाते, भेटवस्तू नसल्यास मजा येत नाही. दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्र, शेजाऱ्यांना भेट देऊन आपल्या नात्याचा पाया भक्कम करतो. दिवाळीची भेट देताना समोरच्या व्यक्तिच्या गरजेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

जेव्हा भेटवस्तू निवडायची असेल

बजेट ठरवा : भेटवस्तू निवडण्यापूर्वी त्याकरिता तुमचे बजेट निश्चित करणे महत्वाचे आहे. हे आवश्यक नाही की अत्यंत मौल्यवान भेटवस्तूच चांगली असेल. देणाऱ्याची भावना अधिक महत्त्वाची असते. म्हणूनच आपल्याला परवडणारीच भेट निवडा. भेट म्हणून निरुपयोगी वस्तू देऊन केवळ औपचारिकता निभावण्यापेक्षा २-३ लोकांचे बजेट एकत्र करून एक चांगली आणि उपयुक्त भेट देणे चांगले.

वयानुसार भेट असावी

लहान मुलांना मऊ खेळण्यांशी तर थोडया मोठया मुलांना इलेक्ट्रॉनिक खेळण्यांशी खेळायला आवडते. त्याचप्रमाणे, एखादे मेकअप उत्पादन, कृत्रिम दागिने, स्टॉल किंवा सनग्लासेस महाविद्यालयीन मुलींना भेटवस्तू म्हणून देता येतात, तर एखाद्या विवाहित मित्राला परफ्यूम सेट, पिक्चर फ्रेम किंवा घरातील कोणतीही सजावटीची वस्तू भेट देणे चांगले असेल. प्रत्येक वयाची स्वत:ची आवड आणि आवश्यकता असते.

त्याच्या आवडीत आमचा आनंद

प्रत्येक व्यक्तिची स्वत:ची वेगळी निवड असते. आपली भेट विशेष बनविण्यासाठी, समोरच्या व्यक्तिच्या आवडी-निवडीनुसारच आपण भेट निवडावी. त्याला बऱ्याचदा कोणते रंग घालायला आवडतात, त्याच्या आवडीच्या क्रिया काय आहेत, त्याची घर-सजावट कशी आहे, त्याचे आवडते साहित्य किंवा खेळ कोणता आहे, त्यानुसार आपण त्याच्यासाठी एखादी भेट निवडायला हवी हे लक्षात घ्या.

आपली आवश्यकता समजतो

जर आपणास नात्यात गोडवा आणि प्रेम वाढवायचे असेल तर दिवाळीपेक्षा चांगला दिवस कोणताही नाही. बायको-मुले, पालक, मित्र किंवा नातेवाईक, कोणाचीही समस्या किंवा काही उणीव जर आपण दीर्घकाळापासून जाणत असाल तर दिवाळीच्या दिवशी ती वस्तू भेटवस्तू म्हणून देऊन आपण नात्यात नवीन प्रकाश पसरवू शकता. यामुळे समोरची व्यक्ति, आपल्याला त्याची किती काळजी आहे हे समजून घेण्यास सक्षम असेल आणि त्याला भावनिक जोडलेले वाटू लागेल.

आरोग्यवर्धक भेट

जर कुटूंबातील एखादा सदस्य आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही रियल ट्रॉपिकानासारख्या कंपन्यांचे ज्यूस पॅक घेऊ शकता. ३ लिटर गिफ्ट पॅक रूपये ४०० च्या जवळपास मिळेल. त्याचप्रमाणे बास्केट गिफ्टमध्ये २०-३० वस्तू असतात- लस्सी, कोल्ड ड्रिंक, ज्यूस, खमंग, कुरकुरीत, चॉकलेट, चिप्स, बिस्किट इ. हा पॅक घरातील प्रत्येक सदस्याची चव लक्षात घेऊन तयार केला जाऊ शकतो.

साखर मुक्त भेट

दिवाळीच्यावेळी ज्येष्ठांना भेटवस्तू देताना त्यांच्या आवडीसह आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे असते. हे सर्वज्ञात आहे की ज्येष्ठांना गोड पदार्थ खूप आवडतात. परंतु त्याचबरोबर, बऱ्याचदा त्या व्यक्तिस मधुमेहासारख्या समस्येचा त्रासदेखील होतो. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यासाठी साखर फ्री मिठाई घेऊ शकता. आपण त्यांना मुरांबा पॅक किंवा फ्रुट्स पॅक इत्यादी देऊ शकता. यामुळे त्यांचे तोंड गोड होईलच शिवाय आरोग्यदेखील बनेल.

खोडकरांसाठी

फक्त रूपये १००, रूपये २०० च्या पॅकमध्ये मुलांसाठी पीठाचे नूडल्स, पास्ता आणि मसाला नूडल्स किंवा मग चॉकलेट आणि बिस्किटचे पॅक घेऊ शकता. दिवाळीत हळदीराम, क्रोनिका, सनफीस्ट, प्रिया गोल्ड या सर्व मोठया कंपन्या विविध प्रकारचे स्नॅक्स बाजारात आणतात.

गिफ्ट कार्ड गिफ्ट करा

दिवाळीच्यावेळी जर तुम्हाला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना गिफ्ट्स द्यायचे असतील तर गिफ्ट कार्ड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. आपण कोणत्याही बँकेची शाखा किंवा नेटबँकिंगद्वारे गिफ्ट कार्ड खरेदी करू शकता. याचा उत्तम फायदा म्हणजे याद्वारे आपल्या इच्छेनुसार कोणीही खरेदी करू शकतो. हे कार्ड मूव्हीची तिकिटे, रेस्टॉरंट बिल, ऑनलाइन शॉपिंग इत्यादींसाठी वापरले जाऊ शकते.

एचडीएफसी बँक गिफ्ट प्लस कार्ड, आयसीआयसीआय बँक गिफ्ट कार्ड, अॅक्सिस बँक गिफ्ट कार्ड, येस बँक गिफ्ट कार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा अनेक बँकांचे गिफ्ट कार्ड उपलब्ध आहेत.

मेणबत्ती स्टँड

दिवाळीनिमित्त मेणबत्ती स्टँड भेट देणे हा एक चांगला पर्याय आहे. आता लोक सामान्य दिवसांतही मेणबत्त्या वापरत आहेत. या आता सजावटीच्या वस्तू म्हणून मोजल्या जातात. जर घराच्या कोपऱ्यात मेणबत्ती स्टँड ठेवला असेल तर तो खोलीला खूप छान लुक देईल. मेणबत्ती स्टँड ऑनलाइनदेखील मिळतात. याची किंमत रूपये २५० ते रूपये १० हजारपर्यंत असू शकते.

ड्रायफ्रुट्स

मावा, बेसनाच्या मिठाईमध्ये भेसळ करण्याच्या वाढत्या घटनांमुळे, बेकरी उत्पादने, मोठ-मोठया कंपन्यांचे गिफ्ट पॅक्स आणि ड्रायफ्रुटचा ट्रेंड वाढला आहे. सामान्यत: दिवाळीनिमित्त ड्रायफ्रुटचे पॅकेट किंवा बॉक्स भेट म्हणून देण्याची प्रथा सर्वात जास्त असते. आपणही आपल्या जवळच्या लोकांना ड्रायफ्रुटच्या पॅकच्या स्वरूपात आरोग्य वचनदेखील देऊ शकता. यांची किंमत रूपये १ हजार ते रूपये ५ हजारपर्यंत असू शकते. या भेटवस्तू ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत.

चित्रांची संस्मरणीय भेट

दिवाळी गिफ्टचा हादेखील एक उत्तम पर्याय आहे. दिवाळीच्यावेळी स्वच्छता होते तेव्हा जुनी पेंटिंग्ज काढून टाकली जातात. अशा परिस्थितीत आपण एखाद्या सुंदर चित्रकलेची भेट दिली तर ती देखील कौतुकास्पद भेट ठरेल. पेंटिंगप्रमाणेच, एक चांगला आर्टपीसदेखील भेट म्हणून देऊ शकता जेणेकरून ती भेट त्या व्यक्तिच्या घराच्या इंटेरियरमध्ये सामील होईल. आपण ईकॉमर्स वेबसाइट, ओपन मार्केट किंवा एखाद्या आर्ट गॅलरीमधून अशी चित्रे खरेदी करू शकता. फक्त हेच नाही तर आपण हाताने बनवलेल्या वस्तूही देऊ शकता, ज्या मनाच्या भावना दर्शवितात, आपल्या स्वत:च्या हातांनी बनवून किंवा खरेदी करून भेटवस्तू म्हणून देऊ शकता. अशा भेटवस्तूंमुळे तुमचे नाते अधिक गोड होते.

या भेटवस्तूंबरोबरच, आपण आपल्या प्रियजनांना आणखी एक मौल्यवान भेट अवश्य द्या. ही भेट म्हणजे तुमचा वेळ. आपल्या प्रियजनांबरोबर बसा, काही त्यांचे म्हणणे ऐका, काही आपले सांगा आणि मग पुढच्या दिवाळीपर्यंत हे क्षण आपले हृदय कसे टवटवीत ठेवतात ते पहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें