Diwali Special: यासाठी पाहुणचार लक्षात असेल

* नीरा कुमार

हे खरे आहे की भारतीय सण-उत्सवात आणि लग्नांमध्ये धार्मिक विधी मोठया थाटामाटात साजरे केले जातात. पाहुणेसुद्धा यायला आवडतात. जर पाहुण्यांसाठी खाण्या-पिण्याची आणि राहण्याची काही खास व्यवस्था असेल तर ते परत जाऊन तुमचा पाहुणचार खूप चांगला होता असे सांगताना थकणार नाहीत. जबरदस्त आदरातिथ्य होते. अतिथींना हे सांगण्यास भाग पाडण्याच्या काही टीप्स येथे आहेत :

राहण्याची व्यवस्था

आपण प्रथम येणाऱ्या अतिथींची यादी तयार करा. तसेच तिच्यात किती ज्येष्ठ नागरिक आहेत आणि किती तरुण आहेत हेदेखील पहा. वृद्ध अतिथींना बसण्या-झोपण्यासाठी बेड, खुर्च्या इत्यादींची व्यवस्था असावी. त्यांच्याकडे सामान ठेवण्यासाठी एक लहान टेबल असावा, जेणेकरून त्यांना वाकावे लागणार नाही, तरुण लोक गादी वगैरे टाकून जमिनीवरदेखील राहू शकतात.

जर उन्हाळयाचा ऋतू असेल तर एअर कंडिशनर किंवा कूलर भाडयाने घ्या जेणेकरुन अतिथींना उष्णतेमुळे त्रास होऊ नये.

खाण्या-पिण्याची व्यवस्था

सुरूवात चहाने होते. म्हणून गोड आणि फिकट चहाची व्यवस्था असावी. बिस्किटेसुद्धा बरोबर असले पाहिजेत. ज्यांची मुले लहान, दूधपिते आहेत त्यांच्यासाठी दूधही हवे. या सर्वांबरोबरच निंबूपाण्याची व कोमट पाण्याचीही व्यवस्था असावी.

त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाचीही वेळ योग्य ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्नाला जास्त मसालेदार बनवू नका. आपल्या कुटुंबातील पाहुण्यांबद्दल जाणून घेत हलक्या मीठाच्या १-२ भाज्या अवश्य ठेवा. उकडलेले बटाटे, दही, कोशिंबीर फ्रिजमध्ये ठेवा. दही आंबट असू नये. ताक, नारळ-पाणी वगैरे जरूर ठेवा.

जेव्हा-जेव्हा पाहुणे येतात तेव्हा पाण्याबरोबरच मिठाईही द्या. प्रत्येकाशी भेटत रहा आणि त्यांची एकमेकांशी ओळख करून द्या, जेणेकरुन पाहुणे एकमेकांशी मिसळत राहतील.

स्पर्धा आयोजित करा

लग्नात फक्त गप्पा-गोष्टींनी काम चालत नाही. म्हणूनच लग्नाचे वातावरण मनोरंजक आणि संस्मरणीय बनविण्यासाठी, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात अंत्याक्षरीसारखी स्पर्धा आयोजित करा. पुरुषांमध्ये साडी पटकन कोण दुमडतो, तर स्त्रियांमध्ये कोण पटकन साडी बांधते यासारख्या स्पर्धा ठेवा. एखाद्या महिलेच्या पोस्टरवर स्त्री-पुरुष दोघांपैकी कपाळावर योग्य ठिकाणी कोण टिकली लावतो स्पर्धा ठेवा.

या हंगामात फळे भरपूर प्रमाणात येतात. म्हणून मुली आणि स्त्रिया यांच्यात त्वरित फळ कापण्या-सोलण्यासाठी स्पर्धा ठेवावी. याचा आणखी एक फायदा म्हणजे सर्व पाहुण्यांना फळे खायला मिळतील आणि ते कापलेही जातील. स्पर्धा जिंकणाऱ्यासाठी अगोदरच बक्षीसे ठरवा. तंबोराही वाजवू शकतात. नृत्यदेखील आयोजित केले जाऊ शकते.

लग्न आणि सण संस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येक अतिथीबरोबर जास्तीत जास्त गुणवत्तेचा वेळ घालविण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकास समान भेट द्या. अशा प्रकारे, अतिथींना हे जाणवते की ते खरोखरच खास आहेत. ते आपली यजमानी कधीही विसरणार नाहीत.

भेटवस्तू दिली की पुन्हा आठवण करू नये

* प्रियदर्शिनी

महान जर्मन तत्ववेत्ते आणि कवी फ्रेडरिक नित्शे म्हणतात, ‘‘ज्याने देण्याची कला शिकली असेल त्याने जीवन जगण्याची कलादेखील समजून घेतली आहे. देणे ही एक साधना आहे, जी आपल्या अंगी रुजवण्यासाठी शेकडो वर्ष व्यतीत होतात.’’

आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये देण्याचा हा क्रम सतत चालू राहतो, विशेषत: सण-उत्सवांमध्ये आणि लग्नाच्या समारंभात देण्याचा हा वेग अजून वाढतो. पण देण्याघेण्याच्या या वेगात, बऱ्याच वेळा आपले विचार, आपले मन स्वत:च एक अडथळा बनते. जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी देतो, तेव्हा आपलं प्रेम आणि आपुलकी त्यात दडलेली असते, पण जेव्हा अधूनमधून समोरच्या व्यक्तिला आपण अशी आठवण करून देतो की मी तुम्हाला अमुक गोष्ट दिली होती, आठवते ना? तेव्हा तेच प्रेम आणि आपलेपणा गायब होऊन जातो.

अशा परिस्थितीत समोरचा माणूस स्वत:ला गरीब समजू लागतो आणि जेव्हा हा टोमणा जाहीरपणे सुनावला जातो तेव्हा ही निराशा आणखीच तीव्र होते.

नुकत्याच झालेल्या विवाहसोहळयाच्या कार्यक्रमात माझी सर्वात चांगली मैत्रीणही काही जुन्या मैत्रीणींसह भेटली. कमलेश आणि ज्योती एकेकाळी जिवलग मैत्रीणी होत्या. ज्योती अचानक बोलली, ‘‘अरे व्वा कमलेश, तू तोच नेकपीस घातला आहेस ना, जो मी तुला तुझ्या मागच्या जन्म दिनानिमित्त दिला होता?’’

भरल्या मैफलीत कमलेश काही बोलू शकली नाही, बस्स स्मितहास्य करत राहीली. पण तिच्या मनावर झालेली जखम ती विसरू शकली नाही.

आपल्या सभोवताली, कुटुंबात किंवा समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपण दिलेल्या गोष्टीची चर्चा करण्यात कंटाळा येत नाही. बऱ्याच वेळा भेटवस्तूपेक्षा चर्चाच अतिरंजक असते. जेव्हा घेणारा एखाद्या दुसऱ्याच्या तोंडून अशा गोष्टी ऐकतो, तेव्हा त्याचा स्वाभिमान दुखवाला जातो.

अशी शिका देण्याची कला

* तुम्ही कितीही महागडी भेट दिली असली तरीही मनात हे दु:ख ठेवू नका की मी एवढी महागडी वस्तू का दिली.

* भेटवस्तू किंवा कोणतीही वस्तू देताना किंमतीचा टॅग काढलाच पाहिजे किंवा जर छापिल किंमत असेल तर त्यावर शाई किंवा पांढऱ्या कागदाने झाका.

* दिल्यानंतर अगदी चुकूनही कधीही आठवण करू नका किंवा एखाद्या पार्टीत किंवा मेळाव्यात अनावश्यक स्मरण करून देऊ नका.

* एकाच वेळेस एकसमान भेटवस्तू आपल्या कोणत्याही जवळच्या व्यक्तिंना देण्याची चूक करू नका. योगायोगाने ते एखाद्या कार्यक्रमात सेम आइटमसह दिसू शकतात, तेव्हा लज्जास्पद पेचप्रसंग येऊ शकतो.

* आपण कुणालाही काहीही देताना मनापासून द्या.

* चांगली पॅक केलेली भेटवस्तू बंद डब्यात देण्याचा प्रयत्न करा. यावरून आपली छाप पडेल.

* देणे आपल्याला आतून विशाल बनवते, म्हणून या परंपरेचे वाहक व्हा.

हे फार मोठे काम नाही

देण्याच्या कलेत स्वत: प्रभुत्व मिळवणे हे खूप मोठे काम वा जड काम नाही. थोडयाशा प्रयत्नातून आपण हे कौशल्य अधिक चांगल्याप्रकारे विकसित करू शकतो.

अखेरीस आपण अल्बर्ट आइनस्टाइन, ग्रॅहम बेल, क्रॉल्बस, जॉर्ज वॉशिंग्टन, वॉल्टडिज्णी, बिलगेट्स, एपीजे कलाम यासारख्या महान लोकांकडून आपण काहीतरी का शिकत नाही, ज्यांनी या जगाला आयुष्यभर काहीतरी देण्याचे काम केले, परंतु त्याचे नाव घेतले नाही.

देणे जर गुप्त असेल तरच यशस्वी होते. याचे प्रदर्शन आपल्याला संकुचित बनवते. देणे आपल्याला मोठे बनवते. महानता यात आहे की कोणालाही दिले जाण्याची जाणीव करून देऊ नका. जड आणि दु:खी मनाने न देता खुल्या व हलक्या मनाने देण्याची सवय लावा. सहर्ष देण्याचा कॉम्बो पॅक आपल्या प्रतिमेला आयुष्याहून मोठे बनवू शकतो.

अनपेक्षित भेटवस्तू जिंकेल मन

* सोमा घोष

सुभाष आणि स्नेहाचं लग्न होऊन ८ वर्षं झाली. त्यांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले की, ज्यावेळी त्यांनी एकमेकांना अनपेक्षितपणे भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित केलं होतं. ते दिवस अजूनही त्यांना आठवतात. सुभाषला तो दिवस अजून आठवतो, ज्यावेळी त्याच्याजवळ त्याच्या नातेवाइकाच्या लग्नाला जाण्यासाठी नवे कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते. सुभाषने निराश होऊन जुने कपडेच घालून जाण्याचं मनात ठरविलं होतं. परंतु लग्नाचा दिवस जवळ आल्यावर स्नेहाने आपल्या जमवलेल्या पैशांतून त्याच्यासाठी नवे कपडे खरेदी केले व त्याला भेट दिले. हे सुभाषला अनपेक्षित होतं व ही गोष्ट आजही आठवल्यानंतर सुभाषच्या डोळ्यांत पाणी येतं. अशी अनपेक्षित भेटवस्तू परस्परांतील प्रेम द्विगुणित करते. भेटवस्तू देणाऱ्यात व घेणाऱ्यात एक प्रकारचा नवा उत्साह संचारतो आणि एकमेकांतील स्नेहबंध अधिकच दृढ बनतात.

भेटवस्तू देणंघेणं

भेटवस्तू देण्याघेण्यामुळे आपल्या जीवनात अधिक आनंद येतो. आपापसांतील नाती दृढ होण्यामध्ये तिची प्रमुख भूमिका असते. भेटवस्तू एकमेकांविषयीचं प्रेम, आदर व सद्भावना व्यक्त करतात. त्यातसुद्धा जर अनपेक्षित भेटवस्तू मिळाली तर मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन काय करावं? कारण यामुळे व्यक्तिला अपूर्व सुख मिळतं. रंगमंचांवर काम करणारी मंजुळा म्हणते, ‘‘माझ्या पतीकडून मला नेहमीच अनपेक्षित भेटवस्तू मिळाली आहे, जिचं मोल माझ्या दृष्टीने खूपच अधिक आहे. कारण यावरूनच त्यांची माझ्याविषयीची आत्मीयता दिसून येते.’’

तुम्हाला तुमचा पती जर अनपेक्षित भेटवस्तू देत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्ही तुमच्या पतीला मनापासून आवडता.

उद्योजिका लीना सांगते, ‘‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मला माझ्या पतीने ज्वेलरीच्या दुकानात नेऊन एक सोन्याचं ब्रेसलेट खरेदी केलं, पण त्याची ऑर्डर त्यांनी आधीच नोंदविली होती. त्यावेळी मी आश्चर्यचकित झाले. मला असं वाटतं की, अनपेक्षित भेटवस्तू देऊन तुम्ही आपल्या रागावलेल्या जोडीदाराला मनवू शकता किंवा जोडीदाराचा गैरसमजही दूर करू शकता.

भेटवस्तू निवडताना

एका पाहाणीत दिसून आलं की, अनपेक्षित भेटवस्तू केवळ एक साधी वस्तू नसते, तर तुमच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेचं ते प्रतीक असतं. परंतु तुम्ही जेव्हा जोडीदाराला अनपेक्षित भेटवस्तू द्याल त्यावेळी पक्कं लक्षात घ्या की, ती वस्तू त्याच्या उपयोगाची आहे की नाही व तुम्हा दोघांची अधिक जवळीक त्याने साधेल की नाही?

काही वेळेला अगदी विचार करून दिलेली वस्तूसुद्धा त्यावेळी तुमच्या जोडीदारास जरुरीची वाटत नाही अथवा त्याला ती तितकीशी पसंत पडत नाही. अशा वेळी तुमचे पैसेही अनाठायी खर्च होतात व जोडीदारास वस्तूही आवडत नाही. यासाठी जोडीदाराच्या आवडीनिवडीकडे नीट लक्ष द्या.

अनपेक्षित भेटवस्तूमध्ये किमतीला तितकंसं महत्त्व नसतं. फक्त प्रेम व आत्मीयतेला महत्त्व असतं म्हणून गिफ्ट खरेदी करणाऱ्याला गिफ्ट घेताना पूर्ण उत्साहाने खरेदी करावी लागते आणि हेसुद्धा दर्शवायला हवं की ही भेटवस्तू त्याच्या दृष्टीने कशी अनमोल आहे.

एका कंपनीत काम करणाऱ्या पूनमला तिचा पती ती प्रत्येक वेळी रागावल्यानंतर अनपेक्षित भेटवस्तू देऊनच खूष करतो.

भेटवस्तू अनमोल आहे हेच खरं. पण कोणती भेटवस्तू व त्याची निवड कशा तऱ्हेने करावी हे जाणून घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही एखादी भेटवस्तू जोडीदाराला देता तेव्हा त्याची प्रतिक्रिया तुम्हाला लगेचच दिसून येते. यामुळे आपला जोडीदार पती असो अथवा पत्नी तिची अथवा त्याची पसंती वा नापसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यानुसारच भेटवस्तूची निवड केली पाहिजे.

काही अनपेक्षित भेटवस्तू

* फोटो अल्बम : जोडीदाराच्या बालपणीच्या फोटोंसह, मित्रमैत्रिणींबरोबरचे फोटो (एखाद्या घटनेशी संबंधित) अशा तऱ्हेने एकत्र केलेले फोटो लावलेला अल्बम.

* ग्रीटिंग कार्ड : जे तुम्ही स्वत: बनवलेलं अथवा खरेदी केलेलं असेल. त्यामध्ये चांगलं चित्रसुद्धा तुम्ही लावू शकता.

* सोन्याचांदीच्या वस्तू तर सर्वांनाच आवडतात. परंतु जोडीदाराच्या आवडीनिवडीकडे विशेष लक्ष पुरवून त्यांची खरेदी करावी.

* प्रवासाचं ट्रॅव्हल वाउचर.

* जरुरीचं सामान, रेसिपी बुक, पुस्तकं, घरसजावटीच्या वस्तू किंवा काही अशा वस्तू ज्याची अपेक्षा तुमच्या जोडीदाराने कधीच केली नसेल. सरळच आहे की, त्यायोगे तो अगदी संतुष्ट होईल व त्याचा अंशत: फायदा तुम्हालाही मिळेल.

जेव्हा भेटवस्तू द्यायची असेल

* एखादं नवपरिणीत जोडपं एखाद्या नव्या शहरात जाणार असेल तर त्यांना त्यांच्या नव्या घरासाठी उपयुक्त वस्तू जशा की, टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव, इस्त्री, फूड प्रोसेसर याप्रमाणे गृहोपयोगी उपकरणं भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

* फर्नीचरसुद्धा एक उत्तम भेटवस्तू होऊ शकते. त्यांच्या घरासाठी डायनिंग सेट, सोफा सेट इत्यादी सामान देऊ शकता. त्यांचं घर किती मोठं आहे याचा विचार करूनच निर्णय घ्या.

* क्रॉकरी व कटलरीसुद्धा नवदाम्पत्यांसाठी चांगल्या भेटवस्तू होऊ शकतात.

* नवदाम्पत्यांसाठी काही वेगळं म्हणून, घड्याळ, परफ्यूमसुद्धा देऊ शकता.

* याव्यतिरिक्त सजावट म्हणून काचेच्या वस्तू, अॅण्टिकपीस, ऑइलपेंटिंग, नाइट लॅम्प, फोटोफ्रेम इत्यादी भेटवस्तूंचासुद्धा तुम्ही विचार करू शकता.

* प्रवासी सामान नवदाम्पत्यांसाठी चांगली भेटवस्तू होऊ शकते. कित्येक प्रकारच्या सूटकेसेस, व्हॅनिटी केस यामधून तुम्ही निवड करू शकता.

* ब्लँकेट, ब्रेडशीट इत्यादी वस्तूसुद्धा भेट म्हणून देऊ शकता. हवामानानुसार या वस्तूसुद्धा योग्य वेळी देऊ शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें