पैशांचं व्यवस्थापन आयुष्याच्या आनंदाची चावी

* धीरज कुमार

आभाचे पती आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. तिच्या पतींचा कार अपघात झाला. अचानकपणे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. हॉस्पिटलमध्ये सर्वात अगोदर पैशाची गरज लागली. तिने पैसे तसे कधी स्वत:जवळ ठेवलेच नव्हते. सर्व गरजेचं सामान पतीच आणत असत. पैसा पतीच्या बँक खात्यामध्ये होते. तेच सर्व व्यवहार करत होते. परंतु त्यांच्या ऑपरेशनसाठी गरज लागली तेव्हा स्वत: जवळ पैसे असूनदेखील अनेक नातेवाईकांच्या पुढे हात पसरावे लागले.

आभा स्वत:च्या पतीवर एवढी अवलंबून असायची की पतीचा एटीएम कार्डचा पिन क्रमांकदेखील तिला माहीत नव्हता. त्या दिवसात जेव्हा पैशाची खरोखरंच गरज होती,  तेव्हा फोन करून नातेवाईकांना विनंती करून हात पसरावे लागले होते. कसबसं करून पैशांची व्यवस्था झाली आणि त्यानंतर पतींचे ऑपरेशन झालं.

मेहुल सरकारी कंपनीत कंम्प्यूटर इंजिनियर (आऊटसोर्सिंग) या पदावर कार्यरत होते. जवळजवळ ८ वर्षे नोकरी करत होता. अचानक तपासणी केल्यानंतर समजलं की पत्नीला कॅन्सर झाला आहे. घाईगडबडीत पत्नीला इस्पितळात दाखल करावं लागलं. नोकरीच्या दरम्यान कधी बचतीबद्दल विचारच केला नव्हता. जेव्हादेखील पगार मिळत असे पत्नी,  मुलं,  भाऊ,  भाचे आणि आपल्या आई-वडिलांवर मोकळया हाताने पैसे उधळले होते. तसं त्यांचं आयुष्य खूपच समाधानी होतं. जेव्हा पत्नीला कॅन्सरच्या आजाराबद्दल समजलं,  तेव्हा पैसे जुळविण्यात हातपाय कापू लागले. अनेक मित्रांकडून उधार घ्यावे लागले,  काही मित्रांनी उधार देण्यास नकार दिला. जवळच्या नातेवाईकांकडून उधार पैसे घेऊन उपचार करण्यात आले. परंतु पैसे काही वेळेवर जुळवता न आल्यामुळे पत्नीला चांगल्या इस्पितळात उपचार करू शकले नाही. शेवटी तो काही त्यांच्या पत्नीला वाचवू शकला नाही.

मेहुलला या गोष्टीची कायमच रुखरुख लागून राहिली की त्याने मिळालेल्या पगारातून कधी बचतीचा विचारच केला नव्हता. तो व्यवस्थित बचत करू शकला असता. त्याच्याजवळ स्वत:च्या बचतीचे पैसे असते तर पत्नीला चांगल्या इस्पितळात आणि योग्यवेळी उपचार करू शकला असता.

मेहुलला महिन्याला पगारा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नव्हती. अगदी त्याचा पीएफदेखील कापला जात नव्हता. त्यामुळे कर्जदेखील मिळू शकत नव्हतं, कारण कंपनी महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त कोणतीही इतर सुविधा देत नव्हती. तो भविष्याच्या चिंतापासून दूर राहिला आणि कधी कल्पनादेखील केली नव्हती की भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आजदेखील अशा प्रकारची अनेक जोडपी आहेत, जी आपल्या नकारात्मक स्थितीकडे कानडोळा करून मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशाचं व्यवस्थापन करत नाही आहेत. ते कधी विपरीत परिस्थितीबद्दल विचारच करत नाहीत. ते विचारच करत नाहीत की आयुष्यात एकसारखं कधीच काही चालत नाही. आयुष्यात कधीही उतार-चढाव येऊ शकतात. अशा या काळासाठी तयार राहायला हवं. आपण आयुष्य तर बदलू शकत नाही परंतु सावधानता नक्कीच बाळगू शकतो. पैशाची भविष्यासाठी योग्य व्यवस्था तसेच त्यांच अगोदरच प्लॅनिंग करून जीवन सरळ बनवू शकतो.

आपल्या पार्टनरला आर्थिक माहिती नक्की द्या

पती असो वा पत्नी जर तुम्ही नोकरी करत असाल तर आपल्या साथीदाराला घरची आर्थिक माहिती नक्की द्या. काही चेक एकमेकांसाठी सहीदेखील करून ठेवायला हवे. एकमेकांच्या एटीएमच्या पिन इत्यादीची माहिती पती-पत्नीना नक्कीच असायला हवी. फक्त पतीपत्नीच नाही तर आपल्या मोठया होणाऱ्या मुलांनादेखील याची माहिती द्यायला हवी,  म्हणजे कोणत्याही संकटाच्या दिवसात मुलं येतील त्या संकटाचा सामना सहजपणे करू शकतील. अशा प्रकारे परिवारातील सर्व सदस्यांनी तयार राहायला हवं. शक्य असल्यास पतीपत्नी व मुलांचे जॉइंट अकाउंटदेखील उघडायला हवं,  म्हणजे गरज लागल्यास कोणीही पैसे काढू शकतात.

बचतीची सवय ठेवा

तुम्ही भलेही कितीही कमावत असाल व खर्च करत असाल, तर तेदेखील कमी पडू शकतं. परंतु जर तुम्हाला बचत करायची असेल तर थोडयाशा कमाईतदेखील बचत करता येऊ शकते. थोडे थोडे पैसे साठवून भविष्यासाठी जमा करता येतात. माणसाला आपल्या भविष्याबद्दल काहीच माहिती नसतं, की ते पुढे काय होईल. संकटं काही सांगून येत नाही ती अचानकपणे येतात. म्हणून जसं तुमचं इन्कम आहे तशीच बचत असायला हवी. बचत भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी,  घर बनविण्यासाठी, भविष्यात मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी,  मुलांचं लग्न करण्यासाठी अगोदरपासूनच विचारपूर्वक करायला हवी. या व्यतिरिक्त काही पैसे आकस्मिक खर्चासाठीदेखील ठेवायला हवेत. बचतीची अजूनदेखील अनेक कारणं असू शकतात.

जीवन विमा आवश्यकता

तुम्ही नोकरदार आहात, गृहिणी आहात, शिक्षक आहात वा तुम्ही एखाद्या पदावर कार्यरत असाल तेव्हा तुमचा जीवन विमा नक्कीच काढा. जीवन विमा आयुष्याच्यासोबत आणि आयुष्याच्यानंतरदेखील तुमच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा देतं. जर तुमच्या दरवाजावर विमा विकणारी व्यक्ती आली तर त्यांना फालतू समजून टाळू नका, उलट त्यांच्याजवळ तुमच्या ऐपतीनुसार विमा घेण्याबद्दल बोलणं करा. विमा हा तुम्ही नसताना तुमच्या आश्रित कुटुंबाला सुरक्षा प्रदान करतं. एवढंच नाही तर  आता अनेक प्रकारचे विमादेखील उपलब्ध आहेत. जसं घर, गाडी, आरोग्य इत्यादींसाठी तुमच्या गरज आणि सुविधेनुसार नक्कीच घ्यायला हवं.

तुमच्या गरजा थोडया कमी ठेवा

घरातील जेष्ठ जेव्हा सांगतात की मोकळया हाताने पैसे खर्च करु नका. भविष्यासाठी थोडी बचत करत जा. आताच्या तरुणांना हे आवडत नाही. परंतु त्यांचं असं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे. भविष्यासाठी पैसे साठवणं खूपच गरजेचे आहे. तुम्ही व्यापारी असा वा नोकरदार व्यक्ती, तुमचा व्यापार वा तुमची नोकरी ज्या दिवशी सुरू होते त्याच दिवसापासून बचतीचादेखील विचार करायला हवा. तुमच्या गरजांना थोडी आवर घाला. तुमच्याकडे जर दोन-चार चांगले कपडे असतील तर विनाकारण डझनभर कपडे ठेवल्याने काय फायदा. जर १-२ खोल्याच्या भाडयाच्या घरात तुमचं चालू शकतं तर उगाच दिखाव्यासाठी मोठा फ्लॅट घेऊन समाजात तुम्ही काय दिखावा करणार आहात.

इन्वेस्टमेंट गरजेची आहे

आजकाल अनेक कंपन्या इन्वेस्टमेंटसाठी काम करत आहेत. शेअर मार्केट, इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड, ईपीएफ, नॅशनल पेन्शन सिस्टम, रियल इस्टेट, गोल्ड इत्यादींमध्ये इन्वेस्टमेंट तुमच्या सुविधानुसार केली जाऊ शकते. इन्वेस्टमेंटमध्ये चांगला परतवा मिळतो. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून योग्य माहिती घ्यायला हवी. इन्व्हेस्टमेंट अशी असायला हवी की बचत इत्यादीवर त्याचा कोणताही परिणाम होता कामा नये.

तुमच्या गरजा प्राथमिकता द्या

शेवटी  एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपली जशी गरज आहे त्यानुसार बचत आणि खरेदीसाठी प्राथमिकता द्यायला हवी. जर तुम्ही भाडयाने राहात असाल तर गरजेचं आहे की तुम्ही फ्लॅट घेण्याबाबत विचार करा. जर नोकरी व बिझनेससाठी येण्या जाण्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही कार खरेदी करण्याबद्दल विचार करत असाल तर घर आणि काम ज्याची पहिली गरज आहे त्यालाच प्राथमिकता द्यायला हवी. समजा मुलाचं लग्न करायचं आहे आणि घरदेखील घ्यायचं असेल तर अगोदर मुला-मुलींचे लग्न करण्याला प्राथमिकता द्यायला हवी. घर बनविणे या गोष्टी नंतर होतील. प्राथमिकता आपल्या गरजेनुसार व्हायला हवी.

फायनान्शियल अॅडव्हायरचा सल्ला

इन्शुरन्स अॅडव्हायझर राजेश कुमार सिंह सांगतात की मनी मॅनेजमेंट खूपच हुशारीने करायला हवं. यामध्ये लहान मोठी चूकदेखील खूप मोठे नुकसान करू शकते. दुसरीकडे हुशारीने पैशाची बचत होईल आणि तेदेखील योग्य जागी इन्वेस्टमेंट केलं तर चांगला लाभदेखील मिळू शकेल. मनी मॅनेजमेंटमध्ये खूपच हुशारीची गरज असते. योग्य प्रकारे केलेलं मनी मॅनेजमेंट कुटुंब आणि स्वत:च्या आयुष्याला आर्थिक सुरक्षेची हमी देतं. मनी मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक व्यवस्थेसाठी आर्थिक सल्लागाराची मदत नक्कीच घ्यायला हवी. मनी मॅनेजमेंट खूपच विचारपूर्वक करायला हवं, म्हणजे भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हे सुखद भविष्यासाठी खूपच गरजेचं आहे. जर याचं प्लॅनिंग योग्यप्रकारे केलं तर भविष्याची आधारशीला मजबूत राहील. कुटुंब तसेच स्वत:चे भविष्य सुरक्षित राहील.

मुलांसाठी कशी बनवाल गुंतवणूक योजना

* रायसा काजी

ज्या क्षणाला एखादी स्त्री आई बनते, तेव्हा त्याच क्षणापासून तिचे मूल तिच्या संसारातील मुख्य घटक बनते. रोज आपल्या मुलाच्या लहानसहान गरजांपासून ते त्याच्या सुरक्षित भवितव्यापर्यंत, ती त्याला सगळे उत्तम देऊ इच्छिते. तसेही आता मुलांना उत्तम शिक्षण आणि उत्तम भवितव्य देण्याची जबाबदारी केवळ वडिलांची राहिली नाही, आईसुद्धा यात आपले संपूर्ण सहकार्य देऊ लागली आहे.

या संदर्भात अनिता सहगल नामक एका महिलेचे उदाहरण घेऊ या. तिचे वय ३५ वर्ष आहे आणि ती आपल्या पती आणि २ मुलांसोबत पुण्यात राहते. तिचा मोठा मुलगा १२ व लहान ६ वर्षांचा आहे. सध्या एका मुलाचे पालनपोषण करण्यात होणाऱ्या खर्चाची यादी भयभीत करते, मग अशावेळी अनितालासुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणाची योजना आत्तापासून तयार करण्याची गरज आहे.

भारतात शिक्षणावरील खर्च अतिशय वेगाने वाढत चालला आहे. उच्च शिक्षणाच्या खर्चाचा महागाई दर खूप जास्त आहे. हा दर आर्थिक वर्ष २०१२ पासून २०१८ दरम्यान सरासरी ६.४२ असा होता, पण आता वार्षिक १० टक्के आहे. आपण पुढील २० वर्षात ७ टक्क्यांच्या अपरिवर्तित दराबाबतसुद्धा विचार केला तर ४ वर्षांचा बी. टेक. अभियांत्रिकी पाठयक्रम ज्याचा सध्याचा खर्च साधारण ८ लाख आहे, तोही ३० लाखात बदलू शकतो. अशाचप्रकारे सध्या एमबीए कोर्सवर एकूण जवळपास १२ लाख खर्च होतो, पण भविष्यातील २० वर्षात हा खर्च अंदाजे ४६ लाख होईल. हे लक्षात घेता अनितासारख्या प्रत्येक महिलेने लवकरात लवकर आपल्या मुलाच्या शिक्षणाची एखादी योजना बनवणे अनिवार्य आहे.

गुंतवणुकीची योजना बनवा

सर्वात आवश्यक हे आहे की अनिताने आपले लक्ष्य लिहून काढावे, जेणेकरून या गोष्टीची जाणीव होईल की केव्हा, कोणत्या कारणांसाठी आणि किती खर्च करावा लागेल. उदाहरणार्थ प्री प्रायमरी एज्युकेशनच्या खर्चासाठी उच्च शिक्षणाच्या तुलनेत कमी गुंतवणूकीची गरज आहे. अशाच प्रकारे पदवीच्या तुलनेत पदव्यूत्तर अध्ययनासाठी जास्त पैसे लागतील. केवळ ट्युशन फीजसुद्धा लक्षात ठेवण्याऐवजी एका आईने होस्टेल फी, स्टेशनरी व प्रिंटिंग वगैरे यासंबंधित खर्चाचासुद्धा विचार करण्याची गरज आहे. तिला हेसुद्धा ठरवावे लागेल की मुलाचे शिक्षण भारतात होईल की परदेशात.

या सर्व बाबी चार्टमध्ये लिहिल्याने आवश्यक रकमेचा अंदाज घेऊन आणि त्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास मदत होईल. तिला बजेटची एक अशी पायाभूत योजना बनवायची गरज आहे जी, वायफळ खर्च कमी करणे आणि अतिरिक्त पैसे वाचवण्यास सहाय्यक ठरेल. हे जास्तीचे पैसे मुलाच्या ध्येयासाठी गुंतवले जाऊ शकतात.

मुलाचा वाढदिवस आणि उत्सवांमध्ये नातेवाईकांकडून  भेटवस्तूरूपात जे पैसे मिळतात, त्याची एकरकमी  गुंतवणूक करायला हवी. जेव्हा मुलाला पैसे मिळतील, त्याचा उपयोग व्यवस्थित विचार करून गुंतवणुकीला प्राधान्य देत करा.

गुंतवणूक करण्याचा प्रभावी मार्ग

मुलाशी संबंधित ध्येयासाठी गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. ८.५ टक्के व्याज दराने (आर्थिक वर्ष २०१९ची तिसरी तिमाही) देणारी सुकन्या समृद्धी योजना अथवा एकाच वेळी ९-१० टक्के परतावा देणारे युनिट लिक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन (यूलिप) आदर्श गुंतवणूक ठरू शकतात.

तसे पाहता एक डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा सगळयात प्रभावी मार्ग आहे. एका ठराविक वेळेत हा लहान बचत योजनांच्या तुलनेत जास्त मोठी रक्कम देण्यात सहायक ठरतो.

एखाद्या मुलाचे उच्च शिक्षण घेण्याचे दीर्घकालीन ध्येय असेल तर यासाठी नातेवाईकांकडून दर २० वर्षांपर्यंत वार्षिक १०,००० रुपये जरी मिळाले तरी ते एकंदरीत १७ लाख रुपयांची रक्कम बनू शकते. म्युच्युअल फंडात गुंतवलेला पैसा १८ टक्के दिला तरी शक्य आहे. म्हणून अनितासारख्या अधिकांश महिलांनी असा दीर्घकालीन फायदा लक्षात ठेवून चांगल्याप्रकारे डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करावी आणि खूप पैसे जमा करावे.

दीर्घकाळासाठी केली जाणारी गुंतवणूक

कुटुंबाकडून कधीकधी जो पैसा मिळतो, त्याशिवायसुद्धा त्यांनी एसआयपीसारख्या इक्विटी योजनांमध्ये आपल्या बचतीतील गुंतवणूक करायला हवी. नियमितपणे दीर्घकाळापर्यंत केली जाणारी ही गुंतवणूकसुद्धा भरपूर रक्कम देऊ शकते.

उदाहरणार्थ १५ वर्षांसाठी एसआयपीमध्ये दरमहिन्याला १५ हजार रुपये गुंतवल्यास तर वार्षिक १८ टक्के परतावा गृहीत धरल्यास शेवटी साधारण ४० लाख गोळा होतील.

शेवटची बाब, नियम कायद्याशी आणि संचलनाशी निगडीत अनावश्यक चिंतांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या नावाने गुंतवणूक करावी. मुलांना नॉमिनी बनवले जाऊ शकते.

एक चांगली आई बनण्यासाठी आपल्या मुलाला उज्ज्वल भवितव्य देणारी प्रत्येक जूबाबदारी पूर्ण करणं जरूरी आहे. तुमच्या आयुष्यापेक्षा चांगले आयुष्य मुलांना देण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें