फ्लर्टमुळे येते जीवनात मजा

* सुधा कसे

‘‘कशी आहेस निधी? तुझी तब्येत कशी आहे? लवकर बरी हो… मी तुझ्या आवडीची भाजी आणली आहे. तुला पडवळ आवडते ना?’’ निधीची शेजारी चित्रा घरात येत म्हणाली.

‘‘अगं, किती दिवस तू माझ्या आवडीचे पदार्थ बनवून आणत राहशील. आता मी बरी आहे, मी स्वयंपाक करेन. आता माझी काळजी करू नकोस,’’ निधी पलंगावरून उठत हसत म्हणाली.

‘‘चित्रा, मी तुझ्या मैत्रिणीच्या हातचे बेचव खाऊन कंटाळलो आहे. काहीही कर, पण निधीला अजून २ दिवस आराम करू दे, म्हणजे मी तुझ्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ शकेन,’’ निधीचा नवरा निर्मल चित्राला बसण्याचा इशारा करत म्हणाला.

‘‘भावोजी, हे काय बोलताय? सकाळपासून कोणी भेटले नाही का? मी निधीच्या हातचे कधी खाल्ले नाही का…? तिच्या हातचे खाल्ल्यानंतर किटी पार्टीत सर्वजणी बोटे चाटत राहतात.’’

हे ऐकून निर्मल मोठयाने हसला, पण निधीच्या चेहऱ्यावरचा राग चित्राने पहिला. निर्मल जेव्हा कधी चित्रासोबत अशी थट्टा-मस्करी करायचा तेव्हा निधीच्या चेहऱ्यावरचे हावभाव असेच व्हायचे, निर्मलच्या अशा वागण्यामुळे तिला असुरक्षित वाटायचे, हे चित्राला गेल्या १० दिवसांत जाणवले होते.

थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, त्यानंतर चित्रा तिच्या घरी गेली. निधीच्या चेहऱ्यावरचे तणावपूर्ण भाव पाहून तिला वाईट वाटले. निधी आता बरी झाली आहे आणि स्वत: जेवण बनवू शकते. निधीलाही तेच हवे आहे, त्यामुळे तिला जेवण न देणेच बरे, असे चित्राने ठरवले.

ती निघून जाताच निधी पतीवर रागावत म्हणाली, ‘‘माझ्या आजाराचा फायदा घेऊन तू चित्रासोबत फ्लर्ट का करतोस? प्रत्येकाला दुसऱ्याची पत्नी आवडते, पण वेळेला माझेच बेचव जेवण उपयोगी पडेल, तिचे चविष्ट जेवण नाही,’’ तिने एका दमात तिचा सगळा राग काढला.

‘‘अगं, तू उगाच मनाला लावून घेतेस. मी फक्त यासाठी बोललो, जेणेकरून ती जेवण देत राहील आणि तुला आणखी २ दिवस विश्रांती मिळेल, तू किती संकुचित विचार करतेस? तुमच्या बायकांच्या ईर्षेला काय म्हणायचे…?’’ निर्मलने निधीला प्रत्युत्तर देत तिलाच दोषी ठरवले. नेहमीप्रमाणे निधीच्या अशा संशयी वागण्याचा त्याला राग आला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा चित्रा निधीच्या घरी जेवण घेऊन आली नाही तेव्हा निधीला हायसे वाटले, पण निधीच्या वागण्याने चित्राला नक्कीच वाईट वाटले असावे, असे निर्मलला वाटले. तो निधीला काहीच बोलला नाही, कारण तिच्याबद्दल काही विचारल्यास निधी खोचकपणे बोलून त्याचे मन दुखावणार, हे त्याला माहीत होते.

सकारात्मक विचार करणे गरजेचे?

निधी आणि चित्रा दोघींच्या लग्नाला अवघी २ वर्षे झाली होती. लग्न होताच दोन्ही कुटुंबे बंगळुरूला स्थायिक झाली होती. शेजारी राहात असल्याने आणि तत्सम परिस्थितीमुळे दोघीही खूप लवकर मैत्रिणी झाल्या, पण त्यांचे पती एकमेकांना खूप कमी भेटायचे, कारण निधीचा पती खूप बोलका होता, तर चित्राचा पती अंतर्मुख होता.

पती कामाला गेल्यावरच त्या भेटायच्या. अनेकदा त्या बाजारात किंवा इतर ठिकाणी एकत्र जात. अलीकडे निधीच्या आजारपणामुळे चित्रा निधीच्या घरी कधीही येऊ लागली होती. निधीला डेंग्यूचा ताप होता, त्यामुळे तिला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी ती सकाळ-संध्याकाळ येऊन जेवण देत होती. कामावर सुट्टी घेऊन निर्मल घरीच राहिल्याने आणि त्यांचा स्वभाव सारखाच असल्याने चित्रा आणि तो एकमेकांशी चांगले बोलू लागले होते. यावरून निधी आणि निर्मलमध्ये अनेकदा वाद व्हायचे.

निधीच्या अगदी उलट असलेला चित्राचा मनमोकळा स्वभाव निर्मलला आवडायचा. छोटया-छोटया गोष्टींवर मनमोकळेपणाने हसणे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे ती येताच वातावरण प्रसन्न होऊन जायचे. निधीला डेंग्यूचा त्रास झाल्यानंतर घरात भकास शांतता पसरली होती. त्यावेळी चित्राने त्यांना खूप मदत केली. ती रोज येऊ लागली होती, तिच्याशी गप्पा मारल्याने थोडा वेळ का होईना, पण आजाराचा, तनावाचा विसर पडायचा.

असुरक्षिततेची भावना कशासाठी?

हे सर्व निधीला आवडत नव्हते. निर्मलच्या फ्लर्ट करण्याच्या सवयीची तिला नेहमीच भीती वाटायची. त्याचा स्वभावच तसा मदमस्त होता. कोणी त्याचे कौतुक केले की, निधीला असुरक्षित वाटायचे, याउलट तो निधीवर खूप प्रेम करायचा. एका चांगल्या पतीप्रमाणे तिची काळजी घ्यायचा.

निधीचा संशयी स्वभाव त्याला अनेकदा खटकत असे. तिने या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडावे, असे त्याने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्नही केला, पण निधीवर त्याच्या काहीही परिणाम झाला नाही. निर्मललाही विनाकारण आपला स्वभाव बदलावा, असे वाटत नव्हते. त्यामुळेच त्यांच्यात खटके उडायचे.

उदासीन वागणूक

१५ दिवस झाले. चित्रा त्यांच्या घरी आली नव्हती. निर्मलही त्याच्या कामात व्यस्त होता. निधीची तब्येत बरी झाली होती, पण तिला अशक्तपणा जाणवत होता. घरी एकटीच असल्याने दिवसभर पलंगावर पडून तिला कंटाळा येऊ लागला होता, त्यामुळे तिला चित्राची खूप आठवण येऊ लागली होती.

ती येत नसल्याने निधीला याची जाणीव झाली की, तिच्यासोबत वेळ कधी निघून जायचा हे समजत नव्हते. तिच्या उदासीन वागण्यामुळेच चित्राने तिच्या घरी येणे बंद केले, हेही निधीच्या लक्षात आले. तिच्या संकुचित वृत्तीमुळे ती एकटी पडेल, हे निर्मलचे बोलणे बरोबर होते, याचा विचार ती करू लागली.

आपल्या संशयी स्वभावामुळे एक चांगली मैत्रीण गमावल्याचा तिला पश्चाताप होऊ लागला. एके दिवशी निर्मल कामाला जाताच तिने चित्राच्या घरी जायचे ठरवले. निधीला अचानक घराबाहेर पाहून चित्राला आश्चर्य वाटले.

चित्रा तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, ‘‘तुझ्यासारख्या मैत्रिणीवर मी कशी रागवेन? तुला माझ्यापासून दूर राहून जेवढे वाईट वाटले, तेवढेच मलाही वाटले. फक्त तूच आहेस, जिच्यामुळेच मी या अनोळखी शहरात आनंदाने राहू शकले. चिंतन नेहमी त्याच्या कामात व्यस्त असतो. तो वरचेवर बाहेरगावी जातो. घरी असला तरी लॅपटॉपला चिकटून राहतो, पण हे नक्की की, मी तुमच्या घरी मुद्दामहून येत नव्हते. माझ्यामुळे तुम्हा पतीपत्नीत वाद व्हावा किंवा तुझ्या घरी येणे बंद करून तुला माझे महत्त्व पटवून द्यावे, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. मला तुमच्या आयुष्यात एवढी घुसखोरी करण्याचा अधिकार नाही की, मी तुला समजावून सांगू शकेन की, कोणतेही नाते विशेषत: पतीपत्नीमधील नाते हे विश्वासाच्या पायावर उभे असते.

‘‘पतीवर संशय घेऊन स्वत:च्याच वैवाहिक जीवनात विष कालवण्याचे काम तू करत आहेस. पतीने पत्नीच्या बहिणीची किंवा वहिनीची थट्टा-मस्करी केली तर ते समाजमान्य आहे. या नात्याच्या नावाखाली कितीतरी अनैतिक संबंध प्रस्थापित झाले तरी ज्या महिलेशी त्याचे कोणतेही नाते नाही तिच्याशी त्याने थट्टा-मस्करी केली तर त्याला संशयाच्या नजरेने का पाहिले जाते? उलट तुझा पती अशा मनमोकळया विचारांचा आहे, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर एक चिंतन आहे, जो कोणाशी बोलत नाही आणि घरात भकास शांतता असते.

‘‘आणखी एक गोष्ट, ज्या पतींचा हेतू वाईट असतो, ते आपल्या पत्नीसमोर खूप सभ्य असतात आणि त्यांच्या पाठीमागे फ्लर्ट करतात. थोडेसे फ्लर्ट केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो, अन्यथा पतीपत्नी सतत एकमेकांसोबत राहून कंटाळतात आणि आयुष्य नीरस होऊन जाते.’’

चित्रा असे म्हणताच निधी म्हणाली, ‘‘चित्रा तू खरं बोलतेस. घरातले वातावरण किती छान असायचे, जेव्हा निर्मल तुझी थट्टा-मस्करी करायचा. आता घर खायला उठते. तू माझे डोळे उघडलेस.’’

‘‘बघ, विचार कर, असे होऊ देऊ नकोस की, मी तुझ्या पतीला पटवेन आणि तू नुसतीच बघतच राहाशील,’’ चित्रा डोळे विस्फारून असे बोलताच दोघीही जोरात हसल्या आणि वातावरण प्रसन्न झाले.

इश्कबाजी करा आणि आनंदी व्हा

* प्रेक्षा सक्सेना

हुजूर इस्कादर भी नई इत्र के चलिये… .और सारे शहर में आपके कोई नहीं… .. हे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाणी आहेत असे म्हणायला पण ते फ्लर्टिंगचे उत्तम उदाहरण आहेत. या जगातील प्रत्येक व्यक्तीला लोकांनी त्याची दखल घ्यावी, त्याच्याकडे आकर्षित व्हावे आणि त्यासाठी त्याने सर्व पद्धतींचा अवलंब करावा असे वाटते. जगभरातील सर्व सभ्यता आणि संस्कृतींमध्ये, पुरुष आणि स्त्रिया एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, सामान्य भाषेत आम्ही त्याला फ्लर्टिंग म्हणतो.

मुले आणि मुलींनी एकमेकांशी इश्कबाजी करणे ही एक सामान्य गोष्ट आहे, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा एक निरोगी मार्ग आहे ज्याद्वारे आपण एखाद्यामध्ये स्वारस्य जागृत करू शकतो. हे लैंगिक छळापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यासाठी तुमच्याकडे विनोदाची भावना आणि संभाषणात्मक कलात्मकता असणे आवश्यक आहे. बरेच लोक फ्लर्टिंगला वाईट मानतात, परंतु सत्य हे आहे की हे केवळ एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले ठेवत नाही तर ते फक्त नैराश्यातून बाहेर येण्यास मदत करू शकते. फ्लर्टिंग हीदेखील एक कला आहे आणि ती तुम्हाला कुठेही उपयोगी पडू शकते जरी तुम्हाला जोडीदार शोधायचा असेल किंवा तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात उबदारपणा ठेवायचा असेल.

फ्लर्टिंगवर संशोधन

वॉशिंग्टन विद्यापीठात केलेल्या अभ्यासादरम्यान असे दिसून आले की ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये फ्लर्टिंगचा काय परिणाम होतो? यासह काम करणारे लोक तणावमुक्त होऊ शकतात का? या संशोधनात शेकडो लोक सामील झाले होते. मनोरंजक गोष्ट अशी होती की हे संशोधन हेल्दी फ्लर्टिंगवर केले गेले होते आणि अशा फ्लर्टिंगवर नाही जे लैंगिक आहे कारण फ्लर्टिंग जे लैंगिक आहे ते लोकांमध्ये तणाव निर्माण करते तर निरोगी फ्लर्टिंग लोकांना आराम देते.

फ्लर्टिंग आणि लैंगिक छळ वेगळे आहेत

निरोगी फ्लर्टिंग आणि लैंगिक छळ यात फरक आहे. एका संशोधनादरम्यान, जेव्हा लोकांना लैंगिक छळाबद्दल विचारले गेले, तेव्हा ते तणावग्रस्त झाले आणि शांतता होती, परंतु जेव्हा फ्लर्टिंगबद्दल विचारले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणि हसू आले आणि लोकांनी मोठ्याने प्रतिक्रिया दिल्या.

फ्लर्टर्स सकारात्मक आहेत

बऱ्याचदा फ्लर्टिंगमध्ये पारंगत असलेले लोक खूप आनंदी आणि स्थायिक स्वभावाचे असतात. हे लोक स्वतःबद्दल स्पष्ट आहेत आणि ते जिथे जातात तिथे त्यांच्या भोवती लोकांची गर्दी जमवण्याची क्षमता असते. प्रत्येकाला त्यांच्याशी बोलायचे आहे, एकंदरीत ते केवळ स्वतःच सकारात्मक नाहीत, ते सभोवतालचे वातावरणदेखील सकारात्मक ठेवतात.

फ्लर्टिंगमुळे नात्यात नवीनपणा येतो

असे नाही की फ्लर्टिंग फक्त मित्र किंवा सहकाऱ्यांमध्ये केले जाते. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फ्लर्ट करत असाल तर तुमच्या नात्यात खूप आनंद आहे. एकमेकांचे महत्त्व दाखवण्याचा हा एक चांगला मार्ग असल्याचे सिद्ध होते. यामुळे नात्यात नवीनपणा राहतो आणि एकमेकांप्रती प्रेमाची भावनाही मिळत राहते. यामुळे शरीरात एड्रेनालाईन नावाचे हार्मोन बाहेर पडते जे आपल्याला आनंदी ठेवते. एकंदरीत, फ्लर्टिंग तुमच्या नात्यातील उबदारपणा टिकवून ठेवण्यास मदत करते.

फ्लर्टिंगचे इतर फायदे

हे आपल्याला तणावापासून दूर ठेवते आणि आपला आत्मविश्वासदेखील वाढवते. तुम्हाला स्वतःबद्दलही विचार करायला लावते. फ्लर्टिंग करून, तुम्हाला लोकांच्या सवयींबद्दल अधिक चांगले माहिती मिळते. याद्वारे आपण एकमेकांना त्याच्याबद्दल काय वाटते ते सांगण्यास सक्षम आहोत. याद्वारे तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता.

तर हे सोपे आहे, इश्कबाजी करा आणि आनंदी व्हा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें