फ्लर्टिंगमध्ये पुरूषांच्या पुढे महिला

* मिनी सिंग

फ्लर्टिंगच्या बाबतीत पुरुषांची अनेकदा बदनामी होते. असे मानले जाते की मुलींना पाहताच ते त्यांच्यावर लाईन मारण्यास सुरुवात करतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी ते विविध क्रिया करतात. पण असे नाही. पुरुषांच्या तुलनेत महिला अशा ५ प्रकारचे सेक्सी बॉडी सिग्नल देतात, ज्यापासून पुरुषांना हा संकेत मिळावा की ते त्यांना आवडतात.

संशोधनात शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे की स्त्रियादेखील फ्लर्टिंगमध्ये पुरुषांच्या तुलनेत मागे नाहीत. एका बायोलॉजिस्टनेदेखील आपल्या संशोधनात हे ही उघड केले आहे की पुरुषांपेक्षा महिला जास्त फ्लर्ट करतात.

हेलन फिशर नावाच्या या शास्त्रज्ञाने त्यांच्या ‘अॅनाटॉमी लव्ह’ या नवीन पुस्तकात खुलासा केला आहे की, स्त्रिया त्यांच्या अभिव्यक्तीद्वारे सांगतात की त्यांना पुरुषांमध्ये रस आहे की नाही. हे स्त्रीच्या स्मितहास्याने आणि डोळयांद्वारे ओळखले जाऊ शकते. हे संपूर्ण रहस्य उलगडण्यासाठी वॉशिंग्टनमधील मानववंश शास्त्रज्ञ डेव्हिड गिव्हन्स आणि सॅक्सोलॉजिस्ट टिमोथी पर्पर यांनी अनेक ‘बार’ आणि ‘क्लब’मध्ये शेकडो तास बसून जोडप्यांना त्यांच्या पहिल्या भेटीत पाहिले.

या संपूर्ण संशोधनात जे निष्कर्ष समोर आले ते खूपच आश्चर्यकारक होते, कारण त्यापैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला होता. हेलन फिशर यांनी २०१० मध्ये २५,००० अविवाहित मुला-मुलींवर एक अभ्यास केला होता, ज्यामध्ये असे आढळून आले की सर्व वयोगटाच्या आणि रंगांच्या महिला अशा बाबतीत अधिक पुढाकार घेतात.

यानंतर २०१२ मध्ये, सुमारे ५० हजार पुरुषांनी कबूल केले की त्यांना कुणा महिलेने बाहेर भेटण्यासाठी आमंत्रित केले होते आणि यापैकी ९५ टक्के पुरुष या गोष्टीमुळे आनंदी होते. त्यांनी सांगितले की यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु जर कोणी एकाने ‘इशारा’ चुकवला तर संपूर्ण गेमदेखील संपुष्टात येऊ शकतो.

फ्लर्टिंगची चिन्हे

काही चिन्हे जी स्त्रिया फ्लर्ट करण्यासाठी वापरतात जेणेकरून पुरुषांना त्यांची फ्लर्टिंग भाषा समजू शकेल :

* जेव्हा एखादी स्त्री संभाषणादरम्यान पुरेशी जवळ जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की तिला तो पुरुष आवडतो.

* जरी स्त्रिया पुरुषांपासून समान अंतर ठेवत असल्या तरी फ्लर्टिंग करताना त्या तुमच्याशी अधिक स्पर्शी होण्याचा प्रयत्न करतात. तथापि त्यासाठी त्या सॉरी बोलतील, पण ज्या पद्धतीचा त्यांचा स्पर्श असेल, त्यावरून तुम्हाला समजेल की हा फ्लर्ट आहे.

* जेव्हा एखादी स्त्री पुरुषासमोर तिचे केस वारंवार कानामागे घेते किंवा मग बोटांनी ते फिरवू लागते तेव्हा ती त्या पुरुषाकडे आकर्षित होत असल्याचे स्पष्ट होते.

* जर स्त्री बोलत असताना बराच वेळ आय कॉन्टॅक्ट ठेवत असेल किंवा विशेष प्रकारे नजर झुकवत असेल तर समजा की ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे.

* तिच्या पुरुष मित्राला भेटताना त्याचे हसतमुखाने स्वागत करणे, तो दिसताक्षणी स्वत:चे कपडे व्यवस्थित करणे ही फ्लर्टिंगची चिन्हे आहेत.

* फ्लर्टिंगमध्ये पारंगत असलेल्या स्त्रीला हे चांगलेच ठाऊक असते की पुरुषाला कशाप्रकारे आपल्याकडे आकर्षित करून आपल्या मनातील गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवता येईल.

* जर ती तुमच्याजवळ येत असेल किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा तुमच्यासाठी ग्रीन सिग्नल आहे.

* फ्लर्टिंगमध्ये पारंगत असलेली स्त्री अतिशय हुशारीने तेवढीच त्वचा उघड करेल, ज्यामुळे पुरुषाचे लक्ष तिच्याकडे वेधले जाईल किंवा नंतर तिच्या विचारांमध्ये हरवले जाईल.

* फ्लर्टी स्त्री पुरुष मित्राकडे येईल आणि खूप मादक अदेने हळू-हळू काहीतरी बोलेल जेणेकरून त्याला समजेल की तो तिला आवडू लागला आहे.

महिलांना काय वाटते

* महिलांचा फ्लर्टिंगबद्दल काहीतरी वेगळाच विचार असतो. त्या म्हणतात की फ्लर्टिंगची कला तुम्हाला असे आनंदाचे क्षण जगण्याची संधी तर देतेच, शिवाय ते ताजेतवानेही करते आणि आता या कलेमध्ये त्यादेखील कोणाच्या मागे नाहीत, फक्त त्यांची पद्धत पुरुषांपेक्षा थोडी वेगळी आहे.

* स्त्रिया म्हणतात की फ्लर्टिंग तुम्हाला फ्रेश आणि रोमँटिक ठेवते. यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो.

* स्त्रिया मानतात की जर कोणी त्यांच्या मनाला आवडू लागला असेल तर त्याच्याशी फ्लर्ट करण्यात काही गैर नाही.

* फ्लर्टिंगमध्ये दोन्ही पक्षांसाठी एक फील-गुड फॅक्टर जुडलेला असतो.

* स्त्रिया विचार करतात की कदाचित फ्लर्टिंगपासून सुरू झालेली गोष्ट प्रेमसंबंधांपर्यंत पोहोचेल.

* काहीवेळा लोक फ्लर्टिंगला तुमच्या चारित्र्याशी जोडून पाहू लागतात, अशा स्थितीत फ्लर्टिंग थोडे जपून केले पाहिजे आणि तुमच्यासारख्या खुल्या मनाच्या व्यक्तीसोबतच केले पाहिजे.

* चुकीच्या उद्देशाने फ्लर्टिंग कधीही करू नये. फ्लर्टिंगचा उद्देश हा असावा की तुम्ही ही आनंदी राहावे आणि समोरची व्यक्तीही.

* जर कोणी छान दिसत असेल तर त्याच्याकडे बघण्यात, त्याला पाहून स्मितहास्य करण्यात आणि बोलण्यात काही गैर नाही. मात्र हेतू उदात्त असावा.

* जर कोणी चांगले दिसत असेल तर त्याची प्रशंसा नक्कीच केली पाहिजे.

फ्लर्टिंगचे तोटे

फ्लर्टिंगमुळे तुम्हाला नुकसानही सहन करावे लागू शकते हे लक्षात ठेवा.

* भलेही तुमचा हेतू चांगला असेल, पण फ्लर्ट करणारी स्त्री समाजात चांगली समजली जात नाही. या मुद्दयावरून कुठे न कुठेतरी तिच्या चारित्र्याचा अंदाज घेतला जातो. लोक त्या स्त्रीबद्दल वेगवेगळया प्रकारच्या गोष्टी करू लागतात.

* फ्लर्टिंग करताना भावनिक ओढ असणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत फ्लर्टिंग खूप काळजीपूर्वक केले पाहिजे, अन्यथा नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

* काही पुरुष महिलांच्या फ्लर्टिंगच्या शैलीचा गैरसमज करून घेतात आणि त्यांचे हावभाव चुकीच्या दिशेने घेतात. अशा परिस्थितीत फ्लर्टिंगची कला जाणण्या-समजण्याचा मार्ग योग्य असावा जेणेकरून पुढे तुमची फसवणूक होणार नाही.

संशोधकाचे म्हणणे आहे की त्यांच्या लैंगिक स्वारस्यांबद्दल स्त्रियांचे गैर-मौखिक संकेतदेखील पुरुष समजू शकत नाहीत. अशा परिस्थितीत महिलांच्या या हावभावांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

जर नवरा फ्लर्टी असेल

* पूनम अहमद

रेखाने लग्नाच्या पहिल्याच वर्षी हे नमूद केले होते की तिचा पती अनिलला इतर महिलांसोबत फ्लर्टिंग करण्याची सवय आहे. आधी तिला वाटलं की लग्नाआधी सगळी मुलं फ्लर्ट करतातच. अनिलची सवय हळूहळू दूर होईल, पण तसे झाले नाही.

रेखाला आश्चर्य वाटत होते की तिच्या उपस्थितीतही अनिल इतर महिलांसोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांना २ मुलेही होती.

रेखाला वाटायचे, जेव्हा ही अवस्था माझ्यासमोरच आहे, तर मग ऑफिस किंवा बाहेर काय-काय करत असतील. अनिलची कृती पाहून ती विचित्रशा नैराश्यात राहू लागली.

एक दिवस तर खूपच झाले. तिच्याच सोसायटीत राहणारी खास मैत्रीण रीना ही संध्याकाळी त्यांच्या घरी आली. अनिल घरीच होता. जोपर्यंत रेखा रीनासाठी चहा आणते तोपर्यंत अनिल उघडपणे रीनाशी फ्लर्ट करत होता. रेखाला खूप राग आला.

रीना निघून गेल्यावर तिने अनिलला रागाने विचारले, ‘‘रीनाशी इतके फालतू बोलायची काय गरज होती?’’

अनिल म्हणाला, ‘‘मी फक्त तिच्याशी बोलत होतो. ती आमची पाहुणी होती.’’

जेव्हा सहनशक्तीच्या बाहेर होईल

पुन्हा हा प्रकार घडला, अनिलने तिचे बोलणे नाही मानले. अनिल घरी असतांना जेव्हा केव्हा रीना घरी यायची तेव्हा तो तिथेच टिकून असायचा.

एके दिवशी तर हद्दच झाली, जेव्हा त्याने रीनाचा हात मस्करीत पकडला. जेव्हा ती घरी जाण्यासाठी उठली तेव्हा अनिल तिचा हात धरून म्हणाला, ‘‘अहो, अजून थोडा वेळ बसा. इथे सोसायटीतच तर जायचं आहे.’’

रीना तर खजील होत निघून गेली पण रेखाला तिच्या पतीच्या या कृत्याची खूप लाज वाटली. रीना निघून गेल्यावर तिचं अनिलशी खूप भांडण झालं. पण अनिलवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

रेखा आणि रीना खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. रेखाने आपल्या पतीच्या या कृत्याबद्दल एकांतात तिची माफी मागितली आणि तिला असेही सांगावे लागले, ‘‘रीना, अनिल घरी असतांना तू येत जाऊ नकोस. मला फोन कर, मीच येत जाईन.’’

एक दु:खद परिस्थिती बनते

त्या दिवसापासून रीना अनिलच्या उपस्थितीत रेखाच्या घरी कधीच आली नाही. त्यात आणखीनच दु:खद परिस्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा रीनाने अनेकांना सांगितले की रेखा तिच्या नवऱ्याच्या रुपलोभी स्वभावामुळे सुंदर स्त्रियांना घरी येण्यास नकार देते.

अनिल एका कंपनीत अधिकारी म्हणून होता आणि रेखा साध्या स्वभावाची होती. अनिलच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे तिची प्रतिमा डागाळली. ही गोष्ट रेखा कधीच विसरली नाही आणि दु:खी होत राहिली. दोघांमध्ये वारंवार बेबनाव होत राहिला.

एके दिवशी मुलगीही असे म्हणाली,  ‘‘बाबा, माझ्या मैत्रिणी येतील, तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीतच राहा.’’

मुलाचे लग्न झाले. आता सून घरात आली, तेव्हा अनिल कधी बोलता-बोलता नव्या सुनेचा हात धरून बसवायचा, तर कधी तिच्या खांद्यावर हात ठेवायचा. रेखाला हे सर्व सहन होत नव्हते.

एके दिवशी ती खाजगीत कडक शब्दात म्हणाली, ‘‘तुम्ही जर ही सवय कुठल्याही प्रकारे सोडली नाही, तर आता परिणाम खूप वाईट होईल, विचार करा.’’

रीनाशी गप्पा मारताना तिने तिच्या आयुष्यातील या सर्व गोष्टीही सांगितल्या, ‘‘मी अनिलची फ्लर्टिंगची सवय आयुष्यभर सोडवू शकले नाही. मला माहित नाही काय कारण असेल की एवढया वयातही अनिल इतर महिलांशी फ्लर्टिंगची संधी आजही सोडत नाहीत. त्यांच्या या स्वभावामुळे मी माझ्या माहेरच्या घरीही कधीच शांततेने जाऊन राहू शकले नाही आणि सासरी तर जणू त्यांना त्यांच्या वहीनींसोबत फ्लर्ट करण्याचा परवानाच होता. त्यांच्या या सवयीने मला आयुष्यभर दु:खाने भरून ठेवले आहे.’’

त्याचवेळी आरतीही तिच्या नवऱ्याच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे खूप नाराज आहे. ती म्हणते, ‘‘जर कुठे एखाद्या काउंटरवर मुलगा-मुलगी दोघेही असतील, तर माझा नवरा कपिल मुलीच्या काउंटरवरच अडकतो. माहित नाही की त्याला बोलण्यासाठी किती बहाणे सापडतात.

‘‘हे बघून मला लाज वाटते, जेव्हा मला त्या मुलीच्या डोळयात चिडचिड दिसते. एखाद्या मुलाशी बोलत असताना केवळ कामाबद्दल बोलतो आणि फोन ठेवतो, पण जर एखाद्या मुलीचा फोन असेल तर त्याचा टोनच बदललेला असतो.’’

नातेसंबंधात निर्माण झाला असंतोष

सेक्स रोल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनानुसार पुरुष या कारणांसाठी फ्लर्ट करतात – सेक्स करण्यासाठी, नातेसंबंधात राहण्यासाठी, एखादे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी, एखादी गोष्ट ट्राय करण्यासाठी, आत्मसन्मान वाढवण्यासाठी  किंवा मग मौजमस्ती करण्यासाठी, कौटुंबिक थेरपिस्ट कासेंडा लेन यांच्या मते, ‘‘पुरुष आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतो आणि त्याची काळजी घेतो, परंतु तो उत्साह किंवा अहंकार वाढवण्यासाठी फ्लर्टदेखील करू शकतो.’’

लाइफ कोच आणि लव्ह गुरू टोन्या म्हणतात की फ्लर्टिंग फसवणूक नाही, परंतु फ्लर्टिंग समस्या देऊ शकते, फ्लर्टी जोडीदारासह आत्मसन्मान कमी होऊ शकतो.

अशा परिस्थितीत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी तुमच्या जोडीदारावर आरोप न करता त्याच्याशी बोला. त्याला सांगा तुम्हाला काय लक्षात येतं? त्याच्या फ्लर्टिंग सवयीबद्दल लोक तुम्हाला काय सांगतात? तुम्हाला काय वाटते? कधीकधी फ्लर्टी पार्टनरला हे जाणवतच नाही की त्याच्या कृतीमुळे त्याच्या पार्टनरला त्रास होत आहे. जर एखादी व्यक्ती आनंदी नसेल तर ती अशा प्रकारे आनंदाच्या शोधात फ्लर्टिंग करू शकते, स्वत:वर लक्ष केंद्रित करा, संपूर्ण परिस्थिती काळजीपूर्वक समजून घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें