Festive Fashion मध्ये फ्यूजनची कमाल

* मोनिका ओसवाल

सण उत्सवांच्या दिवसांत पारंपारिक परिधानांना नेहमीच मागणी असते. भारतीय महिलांच्या फॅशनचे म्हणाल तर त्यांच्या स्टाईल स्टेंटमेंटमध्ये पारंपारिक वेशभूषेची छाप नेहमी असतेच. आता तरूणी सणांसाठी सूट किंवा सांड्यापेक्षा नवीन पारंपारिक पेहरावांना प्राधान्य देत आहेत.

हळूहळू महिलांमध्ये पारंपारिक रंगाहून थोड्या वेगळ्या फिकट रंगाची क्रेझ वाढत आहे. आता त्या पेस्टल मिंट ग्रीन, शँपेन गोल्ड आणि जेस्टी ऑरेंजसारख्या फिकट रंगांच्या पोशाखांना आपल्या वार्डरोबमध्ये सहभागी करून घेत आहेत. या रंगांमुळे त्यांचे सर्व व्यक्तिमत्त्व प्रफुल्लित आणि उठून दिसते. इतकेच नाही तर त्यांचे लक्ष आता खूप भरीव नक्षी असलेल्या पोशाखांपेक्षा हलक्या फुलक्या कपड्यांकडे अधिक आहे. त्या यादीत आम्ही निवडले आहेत पारंपारिक पोशाखांचे असे ट्रेण्ड, जे प्रत्येक सणाला खुलुन दिसतील.

हायनेक आणि कॉलर : बंद गळा किंवा कॉलरच्या कुर्ती पारंपरिक परिधानांना औपचारिक लुक मिळवून देतात. मित्र-मैत्रीणींना भेटायला जायचे असो किंवा एखाद्या कॉर्पोरेट मिटिंग किंवा कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायचे असो, या कुर्ती प्रत्येक प्रसंगाला साजेशा दिसतात. रेट्रो प्रिंट्सच्या बंद गळ्याच्या कुर्ती यावर्षी अपारंपरिक फॅशनच्या यादीत समाविष्ट असतील. खास जॉमेट्रिकल पॅटर्न आणि रफ काठांच्या डिझाइनच्या कुर्ती परिधान केल्यावर इतरांनी वळून पाहिलं तरच नवल. ब्रोकेड किंवा चंदेरी सिक्कलपासून बनलेली बंद गळ्याची कॉलर असणारी कुर्ती तुम्हाला एकदम शाही लुक देईल. चंदेरी सिल्कच्या ट्राउजर किंवा एक्सेसरीजचा वापर करून या परिधान करता येतील.

बोहो स्कर्ट : प्रत्येक तरूणीच्या वॉर्डरोबमध्ये स्कर्टला महत्त्वाचे स्थान असते. यावर्षी फूले-कळ्या आणि पानांची नक्षी असणारे पारंपारिक प्रिंटेड स्कर्ट्स स्टायलिश आणि चिक शर्टस, टॉप्स आणि ट्यूनिक्ससोबत वापरता येतील. ऑफिस पार्टी, सण आणि लग्नांच्या या सिजनमध्ये हा बोहो इंडोवेस्टर्न ट्रेंड आपलासा करून तरूणी त्यांची छाप पाडू शकतात. सणांच्या दिवसात विशेष आणि वेगळेपण दाखवण्यासाठी तुम्ही हा बोहो स्कर्ट क्रॉप टॉप किंवा हेवी दुपट्ट्यासोबत परिधान करू शकता.

स्लिट्स : सध्या फॅशनमध्ये इन असणारी ऐक्सटेंडेड स्लिट्स तुमच्या पोशाखाला एक नवा आणि आधुनिक लुक देईल. चिक डिझानला दिला गेला आहे बोल्ड स्लिटसची सोबत ज्यामुळे पारंपारिक पोशाखांनाही फॅशनेबल लुक मिळतो. तरूणींमध्ये स्लिट असणाऱ्या कुर्तींना पसंती दिली जात आहे. हा ट्रेंड त्यांना आधुनिक तसेच शाही लुक देतो. विशेषत: पॅटर्न असणाऱ्या स्लिट कुर्तींना विशेष मागणी आहे. ट्राउजर जीन्स आणि फ्लाजोसोबत या कुर्ती घालू शकता व स्वत:चा लुक बदलू शकता. हा प्रयोग या सिझनमध्ये हिट ठरेल.

सणावारांच्या या दिवसांत पारंपारिक कुर्तीसोबत फ्लाजोला खूप मागणी असते. जक्सटापोज प्रिंट असणारे फ्लाजो फक्त सुंदरच नाही तर एकदम अनोखे दिसतात व तुमचा लुकपण विशेष बनवतात. या Festive सीजनमध्ये स्लिट कुर्तींमध्ये मिंट ग्रीन, कोरल इंडिगो ब्ल्यू आणि ऑरेंज असे रंग खूप लोकप्रिय आहेत.

केप्स : एक प्रसिद्ध वेस्टर्न स्टाइल आता भारतीय फॅशन ट्रेंमध्ये मिसळून गेला आहे. केप कुठल्याही बॉडी टाईपची तरूणी सहज वापरू शकते. जर पारंपारिक पोशाख अगदी नव्या ढंगात सादर करायचा असेल तर तुम्ही साधीशी कुर्ती फॅन्सी लहंगा किंवा सेन्सुअल साडीवर केप वापरून पाहा. यामुळे तुम्हाला एक नवा लुक मिळेल.

फेस्टिव्ह सीजनसाठी अत्यंत सुंदर पॅटर्न, स्टाईल आणि टेक्चरमध्येही हे केप्स उपलब्ध आहेत. नेट मटेरिअलमध्ये हेवी एम्ब्रॉयडरी असणारे केप्सही आहेत. जर शाही लुक हवा असेल तर केप्समध्ये लेसचा प्रयोगही करता येईल.

अॅसिमेट्रीक हेम : विशेष कट्स असणारे अॅसिमॅट्रिक हेम्स डिझायनरर्स आणि तरूणींमध्ये खूपच पसंत केले जात आहेत. ही स्टाईल जवळपास प्रत्येक डिझायनर आपल्या लेटेस्ट कलेक्शनमध्ये सहभागी करत आहेत. आपला ट्रेंडी स्टाईल स्टेटमेंट बनवण्यासाठी या अॅसिमेट्रिक कुर्तींना पटिला सलवार, लेगिंग्स आणि फ्लाजोसोबतही घालू शकता. अॅसिमेट्रिक हेम तिरक्या डिझाईनचीही असू शकते, शिवाय टु वेज किंवा हाय लोसुद्धा असू शकते. या पॅटर्नमध्ये अजून रचनात्मक डिझाईनवर काम सुरू आहे. सणांच्या दिवसातील हा उपयुक्त फ्यूजन लुक मानला जाऊ शकतो.

वेस्टर्न साडी : भारतीय पांरपरिक पोशाखांमध्ये वेगाने बदल होत आहेत. हल्ली नवेनवे ट्विस्ट देऊन साड्यांना एकदम नवा लुक दिला जातो. गाऊनप्रमाणे वापरल्या जाणाऱ्या या साड्या आंतरराष्ट्रीय फॅशनला नवे आन्हान देत आहेत. जुन्या स्टाईलच्या ब्लाउजऐेवजी तरूणी या फिटिंगच्या साड्यांना ब्लेजर, क्रॉप टॉप आणि ट्यूबसोबत नेसतात व स्वत:चे उठावदार शरीर अजूनच आकर्षक दिसेल असे पाहतात. अॅक्सेसरीज म्हणून साडीसोबत बेल्ट वापरून साडीच्या या पाश्चिमात्त्य रूपांतरणाला एक वेगळाच लुक मिळेल.

साडीला सर्वात श्रेष्ठ पारंपरिकपोशाख मानले जाते, ही अनेक प्रकारे नेसली जाऊ शकते. सण उत्सवांच्या दिवसांत तुमची साडी थोडी वेगळ्या पद्धतीने नेसून तुम्ही तुमचा लुक बदलू शकता. तुम्ही ब्लाउजमध्येही वेगवेगळे कट्स स्टिचेसचा वापर करू शकता. जर तुमची साडी साधी असेल तर त्याचा ब्लाउज हेवी ठेवा, ब्लाउजचे गळे आणि बॅकवर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून सणांची शान बनू शकता.

लाईट फॅब्रिक्स : पारंपरिक फॅशन ट्रेंडला परिभाषित करण्यामध्ये फॅब्रिकची प्रमुख भूमिका आहे. पंरपरागत हॅन्डलूम आणि आधुनिक डिझाइनच्या मिश्रणाने पारंपरिक पोशाख हलक्या फॅब्रिकमध्ये बनवले जात आहे. कॉटन शिफॉन आणि सिल्क अशा फॅब्रिक्सबरोबरच लक्ष वेधून घेणाऱ्या पॅटर्नचा वापर पोशाखांना अजूनच आकर्षक बनवतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें