फॅशनेबल पेहराव प्रत्येक वयाची आवड

* रेणू श्रीवास्तव

एक काळ असा होता की त्यावेळी महिलांच्या साजशृंगारावर कोणतेही बंधन नव्हते. आपले सौंदर्य उजळण्यासाठी त्या आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करत होत्या, जसजसा काळ पुढे सरकला, तसतसा समाज त्यांच्या सर्व गोष्टी काढून घेत गेला. त्यांच्या इच्छा चार भिंतींच्या आत दबून राहू लागल्या, पण आता पुन्हा एकदा समाज एका मर्यादेपर्यंत बदलला आहे आणि महिला आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागल्या आहेत.

नवीन विचारधारेबरोबरच समाजालाही आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी भाग पाडावेच लागते. फॅशनने प्रत्येक वयाच्या महिलांसाठी एक मोठी क्रांती केली आहे. सडक्या मानसिकतेनुसार सहावारी साडीमध्ये शरीर झाकण्याची प्रथा मोडून काढण्यासाठी महिला तत्पर झाल्या आहेत.

आज आकर्षक पेहराव, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि आकर्षक विचारधारा हे पर्याय बनले आहेत. ‘जीवन माझे, तनमन माझे, तर मग मी फॅशनच्या बदलत्या मोसमानुसार याला का सजवू नको?’ आज प्रत्येक महिलेच्या ओठी हेच उद्गार आहेत. धर्म, समाज, परिवार, मुल्ला-मौलवी मग कितीही फतवे काढू देत, काही पर्वा नाही.

जेव्हा प्रत्येक क्षेत्रात मुलींनी, महिलांनी आपले आकाश शोधले आहे, आपले अधिकार शोधत आहेत, तर मग मनाप्रमाणे पेहराव करणे ही तर सामान्य गोष्ट आहे. एखाद्या खास निमित्ताने पेहराव करण्यास रोखण्याचे काही कारण नाही. जीन्स, टॉप, स्कर्ट, छोटा फ्रॉक, शर्टमध्ये खुलणारे शरीर, न जाणो वयाची किती वर्षे लपवतात आणि तारुण्याची अनुभूती देतात.

घराबाहेरील दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पेहरावांना खूप महत्त्व असते. वाहन संचालनावर अधिपत्य ठेवणाऱ्या मुली असो किंवा तरुणी, प्रौढ महिला असो किंवा वृध्द त्यांना पेहरावांना आधुनिक साच्यात सजावेच लागते. लग्न समारंभ आणि सणांच्या काळात जरी, मोती आणि टिकल्यांनी सजलेल्या साड्या, पायघोळ आणि लहेंग्यासह भारी दागिने घातल्यास आपण आकर्षक तर दिसालच, पण इतरही तुमच्या प्रेमात पडतील. अर्थात, रोजच्या जीवनात यांचा वापर करणे शक्य नसते.

आज ६० असो किंवा ७०, जास्त वयाच्याही भारतीय महिला परदेशातच नव्हे, तर आपल्या देशातही जीन्स, पँट, स्कर्ट, टॉप यासारख्या पोषाखांमध्ये दिसतात, तेव्हा नजरेला खूप बरे वाटते. प्राचीन आणि आधुनिक फॅशनेबल पेहरावांच्या मिश्रीत डिझाइन नयनरम्य होण्यासोबतच बजेटमध्ये असतात. एकापेक्षा एक डिझायनर ड्रेसेस फॅशनच्या जगात लोकप्रियता मिळवत आहेत.

फॅशनवर मुली किंवा महिलांचे विचार

२४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयर दिव्या दत्ता सांगते की सलवार-कमीजपेक्षा तिला जीन्स, पँट, फुल स्कर्ट, टॉप, शर्टमध्ये जास्त चांगले वाटते. त्यामुळे अशा ड्रेसेसमध्ये उत्साही, स्मार्ट तर दिसताच, पण हलकेफुलके वाटण्याबरोबरच, प्रत्येक वर्गातील लोकांसोबत काम करताना सहजता जाणवते.

अनारकली पेहरावांची चाहती बँकेत काम करणारी पूजा सर्व आधुनिक पेहराव वापरते, पण योग्यप्रकारे. पेहरावांबरोबरच ती कामाचे ठिकाण व भेटणाऱ्यांनाही तेवढेच महत्त्व देते. ज्यांचे वजन जास्त आहे, अशा महिलांना घट्ट कपड्यांऐवजी सैलसर कपड्यांत पाहणे तिला जास्त आवडते.

३७ वर्षीय डेंटिस्ट सृजानेही दिव्याप्रमाणेच सांगितले, पण तिला विशेष प्रसंगी पारंपरिक आणि आधुनिक फ्युजनचे परिधान खूप आवडतात. घराबाहेर कॅपरी वापरणे तिला आरामदायक वाटते.

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी रश्मी, सपना, मेघा, नमिताने सांगितले की त्यांना नवीन फॅशनचे कपडे सुंदर, टिकाऊ होण्यासोबतच आरामदायकही वाटतात. कपड्यांचे मटेरियल एवढे चांगले असते की ते घरीच धुऊ शकतो. ड्राय वॉशची काही गरज भासत नाही.

४५ वर्षीय अंजूलाल खास प्रसंगी बनारसी डिझायनर साडी वापरतात. त्यांना आधुनिक आणि पारंपरिक सलवारकुर्ता घालायला आवडतो.

पाटणा वुमन्स कॉलेजच्या इंग्रजीच्या प्राध्यापिका ५० वर्षीय स्तुती प्रसाद यांचे म्हणणे आहे की त्यांना सलवार-कुर्ता घालायला खूप आवडतो. त्या प्राध्यापिका असल्याने पेहरावात शालीनतेची काळजी घ्यावी लागते.

६० वर्षीय गृहिणी सुनीता लंडनच्या वाऱ्या करू लागल्याने, त्या जीन्स, टॉप, शर्टच वापरतात. आकर्षक साडी एखाद्या खास प्रसंगी वापरतात.

७५ वर्षीय मीनाजींना रंगीबेरंगी गाउन घालायला खूप आवडतात. त्या जेव्हाही अमेरिकेला जातात, तेव्हा तेथील मॉल्समधून एकापेक्षा एक फॅशनेबल पेहराव खरेदी करून आणतात.

वास्तविक, आपल्या मनपसंत पेहरावांच्या संगतीत जगण्याचा अंदाजच काही निराळा असतो. मग मन नेहमी उत्साहाने भरलेले असते आणि थकवा, ताण आपल्या आयुष्यातून हद्दपार होतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें