Diwali Special: रीतिरिवाजाच्या बंधनात पेहराव

* शैलेंद्र

सणांचा काळ होता. नेहाने आपली आवडती काळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज घालण्यासाठी बाहेर काढले. ब्लाउज बॅकलेस तर होताच, पण पुढूनही डीप नेक होता. तिची क्लीवेज दिसत होती. ती तयार होऊन आपल्या सासूसमोर उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘आई, मी कशी दिसतेय.’’

नेहाची सासू खूप समजदार होती. कधीही कोणत्याही प्रकारचा ड्रेस परिधान केल्यानंतर ती त्यावर विशेष टीका-टिप्पणी करत नसे. याच कारणामुळे नेहा नेहमी कपडयांच्या बाबतीत आपल्या सासूचे मत विचारात घेत असे. सासू मुक्त विचारांची असल्यामुळे कधीही कोणतीही अडचण येत नसे. दांडीया नृत्य करण्यासाठी तयार होऊन नेहा सर्वप्रथम सासूजवळ गेली आणि तिला पेहरावाबाबत विचारले.

नेहा दांडीयामध्ये काळया रंगाची साडी चांगली दिसणार नाही. तिथे उपस्थित लोक तोंड वाकडे करतील. बाकी लोक दांडीयाच्या हिशोबाने कपडे घालून येतील. तू हा पेहराव बदलून दुसरा घाल. नेहाने आपल्या सासूचे बोलणे ऐकले. तिने आपला पोशाख बदलला. त्यानंतर त्या दोघी दांडीया खेळण्यासाठी गेल्या. दांडीया डान्समध्ये ज्या लोकांना भाग घ्यायचा होता, त्यामध्ये रीनाही होती. तिनेही खूप फॅशनेबल ड्रेस घातला होता. अनेक लोकांच्या नजरा तिच्या ड्रेसवर खिळल्या होत्या. सध्या दांडीयामध्ये फॅशनची स्पर्धा जरूर सुरू झालेली असली, तरी तिथेही या गोष्टीची काळजी घेतली जाते की धार्मिक विचारधारेनुसार ड्रेसमध्ये बदल व्हावेत. रीनाने गाउन स्टाईलचा सूट परिधान केला  होता. ती जेव्हा दांडीया खेळण्यासाठी जाऊ लागली, तेव्हा आयोजकांनी तिला अडविले. त्यांचे म्हणणे होते की दांडीयामध्ये पारंपरिक पेहराव परिधान केला पाहिजे. जर अशा ड्रेसमध्ये जायचे असेल, तर दुपट्टा घेऊन ड्रेसला कव्हर करावे लागेल. रीनाजवळ कोणताही दुपट्टा नव्हता. तिने आधी तिथून एका दुसऱ्या महिलेकडून दुपट्टा मागितला. मग त्याद्वारे आपला ड्रेस झाकला. त्यानंतर दांडीयामध्ये सहभागी झाली. दांडीयाला एक प्रकारे धार्मिक आयोजन बनविण्यात आले. त्यामुळे तिथे परंपरागत ड्रेस घालणे आवश्यक असते.

सणांच्या काळात केवळ महिलांसाठीच नव्हे, पुरुषांसाठीही वेगळे ड्रेसकोड असतात. धार्मिक आयोजनाच्या वेळी पुरुषांनाही डोक्यावर रुमाल ठेवणे किंवा टोपी घालण्याची पद्धत आहे. केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मामध्येही अशा प्रकारचे रिवाज आहेत. कपडयांची केवळ डिझाइनच नव्हे, त्यांचे रंगही पाहिले जातात.

धार्मिक रंगांत रंगलेले पोशाख

काळया आणि सफेद रंगांच्या ड्रेसना सण-उत्सवाच्या दृष्टीने चांगले मानले जात नाही. याच कारणामुळे अशा रंगाचे ड्रेस सणाच्या काळात कमी निवडले जातात. त्यामुळेच डिझायनरही सणांच्या हिशोबाने पोशाख तयार करण्यापूर्वी रंग आणि डिझाइनची पूर्ण काळजी घेतात. ते अशा रंग आणि डिझाइनची निवड करत नाहीत, जे धार्मिक गोष्टींत वापरता येणार नाहीत. ड्रेसचे रंग लाल-पिवळे असतात. धर्माच्या कट्टरतेने वेगवेगळया रंगांवर कब्जा केलेला आहे. धर्माने कपडयांनाच नव्हे, रंगांनाही धर्माच्या आधारावर वेगवेगळे केले आहे. हिंदू धर्मात लाल, भगवा आणि पिवळा हे रंग चांगले मानले जातात. याच कारणामुळे प्रत्येक आयोजनात या रंगांच्या कपडयांना विशेष महत्त्व दिले जाते.

सर्वात जास्त समस्या तर मुलांबाबत असते. लग्नाच्या विधींमध्ये मुलांना धोती-कुर्ता घालावा लागतो. लग्नानंतर पहिला सण आल्यानंतर दीपकलाही धोती-कुर्ता घालावा लागला होता. दीपकला तर दांडीया डान्समध्ये सहभाग घ्यायचा होता. त्यासाठी त्याला धोती घालायची होती. दीपकने कधी धोती घातली नव्हती. अशा वेळी धोती घालणे त्याच्यासाठी कठीण काम होते. अशा वेळी त्याच्यासाठी रेडीमेड धोती आणण्यात आली. तो कसातरी धोती घालण्यासाठी तयार झाला, पण या पेहरावात त्याला विचित्र वाटत होते.

अनेक प्रकारच्या पूजांमध्येसुद्धा धोती घालावी लागते. सणांमध्ये होणाऱ्या धार्मिक आयोजनांमध्ये अनेक वेळा पतिपत्नीला एकत्र भाग घ्यावा लागतो. त्यामध्ये पतिपत्नीला एका कपडयाच्या गाठीने बांधले जाते. अशी खूप बंधने असतात, जे सणांच्या आनंदावर विरजण घालतात. अशा वेळी सणांच्या आनंदामध्ये धार्मिक दिखावा टाळणे आवश्यक आहे. याचा एक फायदा हाही होईल की इतर धर्माचे लोकही लांब न राहता एकमेकांच्या जवळ येतील.

बंधनात फॅशन

मुस्लिमांना ईदच्या सणाला टोपी घालावी लागते. मुस्लीम वर्गातील लोक तसे कितीही फॅशनेबल पेहराव परिधान करोत, पण सणाला ते कुर्ता-पायजामा जरूर घालतात. पायजमाही असा घातलेला असतो की तो पायाच्या घोटयाच्या वरती येतो. छोटया-छोटया मुलांना कुर्ता-पायजमा घातलेले पाहून कळून येते की ते कोणत्या तरी उत्सवात सहभागी होत आहेत.

ख्रिश्चन आपल्या सणांमध्ये सफेद रंगाचा पोशाख घालतात. अर्थात ख्रिश्चन प्रगतिशील विचारधारेचे असतात, पण सणांच्या काळात ते धार्मिक पेहराव घालण्यास विवश असतात. मुस्लीम धर्मात बिकिनी वापरण्याचा रिवाज नाही. यामुळेच मुस्लीम मुली पोहण्यात पुढे येत नाहीत. इतर अनेक प्रकारच्या खेळांतही त्यांचे वेगळे पोशाख असतात.

खरे तर धर्माचे हे सर्व प्रतिबंध यासाठी लावले जातात, जेणेकरून धर्माच्या परवानगीशिवाय लोक काहीही करू शकू नयेत. धर्माला आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यात स्वत:ची हजेरी दाखवायची असते. त्यामुळे धर्माची पकड सैल होत नाहीए. आता तर तरुणाईही वेगाने याची शिकार होतेय. सणाच्या काळात प्रत्येक तरुणाला धोती घातलेले पाहता येऊ शकेल. बंगाल आणि दक्षिण भारतात प्रत्येक सणामध्ये पारंपरिक पेहराव घालणे आवश्यक असते. अशा वेळी सर्व आपले रोजचे पेहराव बाजूला करून धोती घालतात.

धार्मिक प्रभावामुळे वाढता दुरावा

सणांवर धर्माच्या प्रभावाचा वाईट परिणाम हा होतो की यांचा आनंद एक धर्म आणि क्षेत्राच्या लोकांपर्यंतच मर्यादित राहतो. बंगाली लोकांच्या दुर्गापूजेच्या वेळी दुसऱ्या कोणत्याही धर्माची व्यक्ती पूजेत सहभागी होत नाही. दुर्गापूजेत सहभागी होण्यासाठी धार्मिक आधारावर निश्चित केलेला व त्याच रंगाचा पेहराव वापरला जातो.

अशा प्रकारे ईदला सफेद कुर्ता-पायजमा वापरला जातो. त्यामुळे दुसऱ्या धर्माचे लोक यामध्ये सामील होत नाहीत. गुजराती, मराठी, दक्षिण भारतीय, आसाममध्ये राहणाऱ्या लोकांच्या सणांमध्येही एका निश्चित रंगाचा पोशाख घातला जातो, त्यामुळे दुसऱ्या धर्माची व्यक्ती त्यामध्ये सहभागी होत नाही. जर सणांमधील धर्माचा हा दबाव संपुष्टात आला, तर इतर धर्माचे लोकही सर्व प्रकारचे सण साजरे करू शकतात.

धर्माच्या कट्टरतेचा माणसावर चांगलाच पगडा असतो. त्यामुळे कपडयाचे रंग आणि डिझाइन निश्चित केलेले असतात. मात्र, कधी असे घडले नाही की दान-दक्षिणा आणि देणग्या अशा असतील की एका धर्मामध्ये चालतील, तर दुसऱ्या धर्मामध्ये चालणार नाहीत. रुपये-पैसे, जमीनजुमला यांचा सर्व धर्मांमध्ये देणगीच्या रूपात स्वीकार केला जातो. मंदिर, मशीद, चर्च सर्व ठिकाणी देणग्यांसाठी दानपात्र ठेवलेली असतात. प्रत्येक धर्म देणग्या सोडून बाकी बाबतीत वेगवेगळी विचारधारा बाळगतात.

खरे तर सर्वांनी मिळून-जुळून राहावे, अशा धर्माचा दिखावा करणाऱ्यांची मुळीच इच्छा नसते. जेणेकरून आपसातील धार्मिक दुरावा कमी होईल आणि मग एकमेकांना आपसात लढवणे कठीण होईल. धर्माच्या नावावर पेहराव निश्चित केल्यामुळे सणाचा आनंद धर्माच्या कट्टरतेमध्ये दबून जातो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें