बनावट सौंदर्याच्या शिकार होऊ नका

* गरिमा पंकज

नवीन वर्ष, नवी पहाट, नवीन इच्छा आणि सर्वात सुंदर दिसण्याची इच्छा. भलेही सोहळा कोणताही असो आणि पार्टी कुठेही असो, सर्वांत सुंदर दिसावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. काही मुलींना निसर्गानेच अतुलनीय सौंदर्य दिलेले असते तर काहींना त्यांच्या शारीरिक कमतरतांशी तडजोड करावी लागते. या उणीवा दूर करण्याच्या किंवा त्याहूनही सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात अनेकदा त्यांना मोठा फटका बसतो.

तुम्हीही या नवीन वर्षात स्वत:ला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न जरूर करा, पण अतिशयोक्ती नकोच. याचा अर्थ असा की, आपल्या नैसर्गिक सौंदर्याशी अशा प्रकारे छेडछाड करू नका की, त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होईल.

अशा अनेक नोकऱ्या किंवा काम असते जिथे महिलांना नीटनेटके दिसणे गरजेचे असते आणि याच नादात त्यांना त्यांच्या आरोग्याशी तडजोड करावी लागते. उदाहरणार्थ, हवाई सुंदरींना अनेकदा १२ तासांपेक्षा जास्त काळ उंच टाचांच्या चपला घालाव्या लागतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच नुकताच एक निर्णय घेण्यात आला, त्यानुसार, युक्रेनच्या स्काय अप एअरलाइन्सच्या महिला क्रु मेंबर्स आता पेन्सिल स्कर्ट, हाय हिल्स आणि ब्लेझरऐवजी आरामदायी ड्रेस पँट, सूट आणि स्नीकर्समध्ये दिसतील.

अशाच प्रकारे अभिनेत्रींना तासन्तास पूर्ण मेकअपमध्ये राहावे लागते, त्यामुळे त्यांचा चेहरा खराब होतो. करीना कपूरचाच चेहरा घ्या, अलीकडच्या काळात तिचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये तिचा चेहरा मेकअपशिवाय खूपच खराब दिसत आहे. इतर अनेक अभिनेत्रींसोबतही असेच घडले आहे. वास्तविक, वर्षानुवर्षे सतत मेकअप केल्यामुळे त्वचेचे नुकसान होते.

अशाच प्रकारे ब्रेस्ट इम्प्लांटसारख्या कृत्रिम सौंदर्यामुळेही अनेकदा महिलांचे आरोग्य बिघडते. कधी महिला जाणूनबुजून तर कधी वर्क कल्चरमुळे पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्वत:ला अधिक सुंदर, आकर्षक आणि कामुक बनवतात. सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी मुली काहीही करायला तयार असतात.

काही शस्त्रक्रियांवर करोडो रुपये खर्च करतात तर काही अनेक प्रकारच्या क्रीम्स आणि औषधे खरेदी करतात. स्वस्तच्या नादात अनेक मुली स्वत:चे खूप नुकसान करून घेतात. अनेकदा आधीच सुंदर असलेल्या अनेक मुली अधिक सुंदर दिसण्याच्या नादात आपला चेहरा आणि आयुष्य उद्धवस्त करून घेतात.

सौंदर्य वाढण्याऐवजी ठरली चेष्टेचा विषय

असेच काहीसे इंग्लंडमधील लँकशायरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय ऑलिव्हिया मॅककॅनसोबत घडले. व्यवसायाने हवाई सुंदरी असलेल्या ऑलिव्हियाने तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ओठांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, मात्र शस्त्रक्रियेनंतर तिचे ओठ तिप्पट मोठे झाले.

ऑलिव्हियाचा चेहरा पाहून लोक हसू लागले. तिची चेष्टा करू लागले. खरेतर, २१ वर्षीय हवाई सुंदरी ऑलिव्हियाने १० हजार रुपयांमध्ये तिच्या ओठांची शस्त्रक्रिया करून घेतली होती. तिला थोडेसे मोठे ओठ हवे होते. सौंदर्य तज्ज्ञांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर तिच्या ओठांवरची सूज कमी होईल आणि तिचे ओठ नैसर्गिकरित्या सुंदर दिसतील, पण असे झाले नाही. सुंदर दिसण्यासाठी तिने शस्त्रक्रिया केली खरी, पण या शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा विद्रुप होईल आणि तिचे ओठ तिप्पट मोठे होतील याची तिला कल्पना नव्हती.

शस्त्रक्रियेनंतर, ऑलिव्हियाच्या ओठांवर फोड आले होते जे खूप वेदनादायक होते. अनेक महिने तिची अवस्था अशीच बिकट होती. त्यानंतर हळूहळू ती थोडी बरी झाली. ऑलिव्हियाने सुंदर दिसण्यासाठी तिच्या ओठात आधीच फिलर्स लावले होते.

बनावट सर्जनची लबाडी

स्वत:ला बार्बी सर्जन म्हणवणारी ओलगिसा अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे. त्याचवेळी मुलींना तिच्यासारखे सुंदर बनवण्याचे आमिष दाखवून प्लास्टिक सर्जरीसाठी प्रवृत्त करत असे. तिच्याकडे या व्यवसायाची कोणतीही पदवी नव्हती. परिणामी, ओलगिसाचे अनेक रुग्ण आज अत्यंत वाईट अवस्थेत आहेत.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ओलगिसाची छायाचित्रे पाहून ती प्रभावित झाली. त्यानंतर तिला भेटली आणि स्वत:चे नाक तसेच भुवया उंचावण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास तयार झाली. ओलगिसाने तिची शस्त्रक्रिया केली.

मात्र त्यानंतर तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला जळजळ सुरू झाली. याचा परिणाम असा झाला की, तिला ७ दिवस डोळे उघडता आले नाहीत. अशाच समस्या घेऊन सुमारे ११ महिला पुढे आल्या. अनेक तक्रारी समोर आल्यानंतर, ओलगिसा तिच्या दवाखान्यातून पळून गेली.

सौंदर्याच्या नादात गमवावे लागले दोन्ही पाय

असेच काहीसे सविंक सेक्लिक नावाच्या मुलीसोबत घडले. सुंदर चेहऱ्याच्या हव्यासापोटी तिला नाकाची शस्त्रक्रिया करणे महागात पडले. तुर्कीच्या प्लास्टिक सर्जरी क्लिनिकमध्ये नाकाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला तिचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापून टाकावे लागले. २५ वर्षीय सविंक सेक्लिकने तिचे नाक लहान करण्यासाठी इस्तंबूलमधील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली.

सुमारे २ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिला घरी पाठवले. घरी गेल्यावर सेविंकला ताप येऊ लागला, मात्र, ही सामान्य लक्षणे आहेत, घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे रुग्णालयाने ठामपणे सांगितले, पण तिची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.

तिने खाणे-पिणे सोडले. ती सतत आजारी पडू लागली. तिच्या पायाचा रंग काळा झाला होता. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सविंकला रक्तात विषबाधा झाली होती. अखेर तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे पाय कापण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिचे गुडघ्याखालचे पाय कापावे लागले. सौंदर्याच्या नादात तिने सामान्य जीवन जगण्याचा आनंदही गमावला.

हातातून गेल्या अनेक भूमिका

अशाच प्रकारे चिनी अभिनेत्री आणि गायिका गाओ लिऊ हिने नुकतीच कॉस्मेटिक सर्जरी केली, पण तिलाही ही शस्त्रक्रिया करणे महागात पडले. अभिनेत्रीने तिच्या शस्त्रक्रियेपूर्वीचे आणि नंतरचे काही फोटो सोशल मीडियावर तिच्या ५० लाख फॉलोअर्सना शेअर केले, ज्यामध्ये कॉस्मेटिक सर्जरीनंतर तिच्या नाकावर डाग दिसत आहेत. नाकाचा पुढचा भाग काळा आणि सपाट दिसतो.

खरेतर, एका मित्राच्या सांगण्यावरून, अभिनेत्रीने अधिक सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये नाकाची शस्त्रक्रिया केली होती. सुमारे ४ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला तिच्या नाकासाठी हवा असलेला आकार तर मिळाला नाहीच, शिवाय तिच्या नाकातील काही उती मृत झाल्या. अभिनेत्रीला नंतर कळले की, तिने ज्या क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया केली होती त्यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नव्हती.

गाओ लिऊच्या म्हणण्यानुसार तिला वाटत होते की, शस्त्रक्रियेनंतर तिला अधिक भूमिका मिळू लागतील, पण आता चेहरा बिघडल्यामुळे तिच्या मनात आत्महत्येसारखे विचार येत असून अनेक भूमिका हातातून निसटून गेल्या आहेत. गाओ सांगते की, या शस्त्रक्रियेमुळे तिला ६१ दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला दोन चांगले प्रोजेक्ट गमवावे लागले, त्यामुळे तिचे करोडोंचे नुकसान झाले.

प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांपैकी बहुतांश तरुणी आहेत. सोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी आणि प्रभावशाली  वाटण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीमुळे शस्त्रक्रियेची ही बाजारपेठ झपाटयाने वाढत आहे. सुंदर दिसण्यानेच आपल्याला इच्छित ध्येय गाठता येईल, अशी अनेक मुलींची मानसिकता असते. नातेसंबंध असोत किंवा करिअर असो, त्यांच्या दृष्टीने सौंदर्य ही यशाची सर्वात महत्त्वाची पायरी असते.

त्यामुळेच सुंदर दिसण्यासाठी त्या कोणतेही पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पुढे जेव्हा याचे दुष्परिणाम समोर येतात तेव्हा खंत करण्याशिवाय दुसरे काहीच हाती उरत नाही. म्हणूनच मुलींनी समजून घेतले पाहिजे की, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य जपण्यातच शहाणपण आहे आणि जे मिळाले ते इतरांच्या लालसेपोटी वाया घालवू नये. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनवू शकता आणि नैसर्गिक पद्धतीने तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

स्वत:ला निरोगी आणि स्मार्ट बनवा

सौंदर्याचे पहिले प्रमाण म्हणजे तुमचे निरोगी व्यक्तिमत्व. जर तुम्ही निरोगी असाल, शारीरिकदृष्टया अपंग नसाल, साहसी असाल, खूप लठ्ठ नसाल आणि खूप बारीकही नसाल, तुमचे खांदे उतरलेले नसतील आणि तुम्ही जे काही घालता ते तुम्हाला शोभत असेल तर तुमचे शरीर संतुलित आहे असे समजावे. असे असेल तर तुमच्यापेक्षा सुंदर दुसरा कोण असू शकतो? आकर्षक व्यक्तिमत्व आणि सौंदर्यासाठी नाक, ओठ किंवा स्तनाचा आकार महत्त्वाचा नसून तुम्ही निरोगी आणि स्मार्ट असणे जास्त महत्त्वाचे असते.

डोळयात हवी काहीतरी करण्याची चमक

सौंदर्य डोळयात दिसते. तुमचे डोळे सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असतील, तुम्ही तुमच्या डोळयांनी हसत असाल आणि डोळयांनी समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्यास सक्षम असाल, तर तुम्हाला सौंदर्याची काळजी करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट करण्याचा विश्वास आणि जिद्द डोळयात दिसली तर लोक स्वत:च तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला तुमच्या कामातून ओळख मिळेल. तुमच्या डोळयात आत्मविश्वास दिसला पाहिजे तरच तुम्ही करिअरच्या वाटेवर वेगाने वाटचाल करू शकाल.

सकारात्मक दृष्टिकोन

काही लोकांचे बोलणे असे असते की, समोरच्या व्यक्तीला ते ऐकल्यावर खूप बरे वाटते. दोघांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजूबाजूचे वातावरणही सकारात्मक होते. मग तो कर्मचारी असो किंवा मित्र, प्रत्येकाला अशा व्यक्तीशी नाते जपायचे असते. म्हणूनच तुमच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या वृत्तीवर काम करणे जास्त महत्त्वाचं असते. दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

अशा सलूनमध्ये जाणे टाळा

* रोचिका शर्मा

उद्या सोहाला दरमहा होणाऱ्या तिच्या किट्टी पार्टीला जायचे आहे, म्हणून घरातील कामे पूर्ण करून ती सलूनला निघून गेली. तसे ती दरमहा वॅक्स, हेअर कट, आयब्रोज करते, परंतु यावेळी किट्टी रॅट्रो थीमवर आयोजित केली जात आहे, म्हणूनच तिला ७०-८० च्या दशकातील अभिनेत्रीसारखे काहीसे खास तयार व्हायचे आहे. त्या काळात केशरचनेवर विशेष भर दिला जात असे. म्हणून जेव्हा सलूनमध्ये गेल्यानंतर तिने केशरचनेबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी विविध प्रकारच्या स्टाइल दाखवल्या आणि दुसऱ्या दिवशी येण्याचा वेळ निश्चित केला.

सदस्यता आणि सवलतीचा लोभ

‘‘मॅडम, तुम्ही किट्टी पार्टीची तयारी करतच आहात तर मग आमचा नवीन डायमंड फेशियल का करून घेत नाहीत? एकदा केल्यानेही खूप चमकेल,’’ सलूनमध्ये काम करणारी मुलगी म्हणाली.

‘‘या फेशियलमध्ये काय विशेष आहे?’’ सोहाने विचारले.

‘‘मॅडम, हा टॅन रिमूव्हिंग फेशियल आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅन बरोबरच मृत त्वचादेखील दूर होईल, ज्यामुळे चेहऱ्यावरील डागही कमी होतील. त्यामुळे चेहरा चमकदार होईल. एकदा करून तर पहा.’’

‘‘या फेशियलचा दर काय आहे?’’

‘‘मॅडम काही खास नाही, फक्त रू. २,२००.’’

‘‘हे तर खूप महाग आहे?’’

‘‘मॅडम, आपल्याकडे सलूनची सदस्यता आहे का?’’

‘‘नाही, पण का?’’

‘‘मॅडम, तुम्ही सदस्यत्व घ्या. आम्ही सदस्यांना सवलत देतो. जेव्हा-जेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबातील एखादा सदस्य आमच्याकडून सेवा घेईल तेव्हा आम्ही त्याला सूट देऊ आणि आजच्या फेशियलमध्येही तुम्हाला २० टक्के सवलत मिळेल.’’

सोहा काय करावे या पेचात पडली होती. तेवढयात समोरच्या आरशामध्ये तिने चेहरा पाहिला. मुरुमं दिवसेंदिवस वाढतच होते, म्हणून तिने विचारले, ‘‘या फेशियलमुळे हे डागसुद्धा कमी होतील का?’’

‘‘हो मॅम, पण त्यांना काढून टाकण्यासाठी तुम्हाला ३-४ सेटिंग्स घ्याव्या लागतील, कारण डाग जुने आहेत.’’

स्वत:ला सुंदर दिसण्यासाठी फेशियल करून घेण्यास सोहाने सहमती दर्शविली.

एक तासानंतर जेव्हा तिने तिचा चेहरा पाहिला तेव्हा ती खरोखरच चमकली होती.

पण विचार करण्यासारखी बाब म्हणजे मुरुमं कधी फेशियलने जाऊ शकतात का?

होय, तात्पुरता फरक नक्कीच येईल, कारण चेहऱ्याच्या मालिशद्वारे रक्त परिसंचरणात वाढ झाल्याने चेहऱ्याची साफसफाई होऊन जाते. परंतु मृत त्वचा काढून टाकल्यामुळे, मुरूमंयुक्त त्वचा अतिनील किरणांसाठी पूर्वीपेक्षा अधिक एक्सपोज झाली. म्हणूनच सोहा तिच्या त्वचेच्या मुरुमांच्या उपचारांसाठी त्वचारोग तज्ज्ञांकडे गेली असती तर बरे झाले असते.

नवीन उत्पादनांचा वापर आणि खर्च

याचप्रमाणे नेहादेखील एक दिवस सलूनमध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने सांगितले की ती बिकिनीची शेव करून-करून अस्वस्थ झाली आहे, मासिक कालावधीत तर विशेषकरून समस्या होते. नंतर जेव्हा केस पुन्हा येऊ लागतात तेव्हा ते खूप दाट असतात, जे टोचू लागतात. आता अशा ठिकाणीवारंवार स्क्रॅच करायला चांगले वाटत नाही. मग सलूनमध्ये काम करणारी मुलगी म्हणाली मॅडम, बिकीनी वॅक्स करा. संपूर्ण महिना आराम वाटेल.

एकदा नेहा कचरली, मग विचार केला की प्रयत्न करण्यात काही नुकसान होणार नाही. मग जेव्हा सलूनमधील मुलीने विचारले मॅडम वॅक्स कोणता, नॉर्मल की मग फ्लेवर्ड, तेव्हा नेहा म्हणाली की फक्त नॉर्मलच करा.

यावर मुलीने म्हटले की ती फक्त फ्लेवर्ड वॅक्सच करेल, कारण यामुळे सहजपणे बिकिनीचे केस निघतात.

आता नेहा पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स घेत असल्याने म्हणाली ठीक आहे, पण जेव्हा बिल पाहिले तेव्हा ते २ हजार रुपये होते. सामान्य वॅक्सपेक्षा दुप्पट. अरेरे, तिच्या तोंडातून निघाले.

जेव्हा नेहाने घरी येऊन आईला सांगितले तेव्हा आई म्हणाली की वॅक्स ते वॅक्स आहे, त्याचे काम केसांवर चिकटणे आहे. जेणेकरून त्यावर वॅक्सिंग स्ट्रिप चिकटवून केस ओढले जातील. त्यात फ्लेवरने काय फरक पडेल? पैसे कमविण्याचा हा मार्ग आहे.

डोळे दिपवणाऱ्या ऑफरी

नवीन वर्षात सूट किंवा दिवाळी निमित्त हे नवीन पॅकेज अशा अनेक बहाण्यांनी सलून काही ना काही ऑफर देतात. या पॅकेजेसमध्ये वॅक्स, आयब्रो, मॅनीक्योर, पेडीक्योर, हेअर कट इ. सह केसांचा रंग मुक्त.

अशा पॅकेजसमध्ये केसांच्या रंगाचे पैसे आधीपासूनच जोडलेले असतात. मग जर रंगीबेरंगी केस एकदा तुम्हाला अनुकूल ठरलेत, इतर लोकांनी तुमची स्तुती केली, तर आपण दरमहा त्यांचे ग्राहक बनता. एकंदरीत, सलूनने नफा कमावला आणि आपणही आनंदी असता. परंतु यामध्ये आपण हे विसरता की केसांच्या रंगात रसायने असतात, ज्यामुळे आपल्या केसांचे नुकसान होते.

रंगीत केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते, जे आपण करू शकत नाही. आता जेव्हा आपले केस खराब होतात, तेव्हा आपण पुन्हा सलूनवाल्याला विचारता, ‘‘मी काय करावे, माझे केस गळत आहेत आणि केस रफदेखील झाले आहेत.’’

मग ते त्यांच्या सलूनमध्ये ठेवलेल्या बऱ्याच मोठया कंपन्यांची उत्पादने वापरण्यास सांगतात. त्यांचे कमिशन निश्चित असते. एकंदरीत, सलूनवाल्यांचा फायदा आणि आपले बुद्ध बनणे.

पॅकेजांची भरमार आणि आपण बांधले जाणे

याचप्रमाणे, आजकाल सलूनमध्ये आणखी एक नवीन पॅकेज तयार आहे. जर आपण आमच्या सेवांवर ३ महिने सतत ३ हजार रुपये खर्च केले तर आपल्या केसांचा कट चौथ्या महिन्यासाठी विनामूल्य आहे. आता ग्राहक दरमहा दीड किंवा दोन हजार सलूनमध्ये खर्च करतो, परंतु त्या मोफत हेअर कटसाठी तो दरमहा जादा सेवा घेऊन ३ हजार खर्च घेतो. तो विचार करतो की हे ३ हजार सेवेचे आहेत. नंतर हेअर कट मोफत आहे. येथे हे समजण्याचा प्रयत्न करा की जगात काहीही मोफत नसते. आपल्याला कुठेतरी किंमत मोजावीच लागते. अशाप्रकारे, प्रत्येक ग्राहकांकडून 3 हजार मिळविल्यानंतर त्यांचे उत्पन्न निश्चित होते आणि आपण तेथे ४-५ महिन्यांसाठी जाणारच, कारण आपल्याला विनामूल्य हेअर कट जो करायचा आहे.

आपण पैसे देऊन त्या एकाच सलूनमध्ये बांधले जाता. आपल्याला त्यांचे काम जरी आवडत असले किंवा नसले तरीही इतरत्र जाण्याचा विचारही करू शकत नाही.

पॅकेजची आगाऊ रक्कम

त्याचप्रकारे, निहारिकाने एक पॅकेज घेतले जे दोन दिवसात पूर्ण करायचे होते. पहिल्या दिवशी तिने केस रंगवले. तिला टाळूमध्ये खूप खाज येऊ लागली. घरी पोहोचताच तिच्या डोक्यावर लाललाल पुरळ उठली. त्यांच्यामुळेच तिला डॉक्टरकडे जावे लागले. हे कळले की तिच्या केसांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगामुळे तिच्या डोक्यात एलर्जीची प्रतिक्रिया उद्भवली आहे. तिला खूप राग आला. दुसऱ्या दिवशी ती सलूनमध्ये जाऊन म्हणाली की तिचे पॅकेजचे पैसे परत करावे, ती तेथून कोणतीही सेवा घेऊ इच्छित नाही. पण सलूनवाले पैसे परत देण्यास तयार नव्हते.

ते म्हणाले की मॅडम ऑनलाइन सिस्टममध्ये हे सर्व पूर्वीच दिले गेलेले असते. आपण पॅकेज घेतला आणि त्यासाठी पैसे दिले, आता आपल्याला सेवा घ्याव्या लागतील. जर आपणास अर्ध्या सेवा घेतल्यानंतर सोडायचे असेल तर आमचा दोष काय? आणि आपल्याला कोणत्या उत्पादनापासून एलर्जी आहे हे देखील आपण सांगितले नाही. या उत्पादनाद्वारे अन्य कोणत्याही ग्राहकांचे नुकसान झाले नाही. आपण अशी तक्रार येथे आणणारी पहिलीच महिला आहात.

मग काय, निहारिका स्वत:चे चिमणीएवढे तोंड करून घरी परतली.

बनावट उत्पादनांची ओळख

आजकाल सर्व मोठया ब्रँडचे बनावट प्रॉडक्ट्स बाजारात विकले जात आहेत. अगदी बनावट वस्तूंची विक्रीही ऑनलाइन केली जात आहे. हीच बनावट उत्पादने बऱ्याच सलूनमध्ये वापरली जातात. ग्राहकांना याची कल्पना नसते आणि तेथे मोठी किंमत देऊन ते सेवा घेतात, तर सलूनवाल्यांना कमी किंमतीत ते बनावट उत्पादने मिळतात. सलूनला यातून बरेच पैसे मिळतात.

आता मुद्दा हा आहे की ग्राहक या बनावट उत्पादनांना कसे ओळखू शकेल? तर सर्वप्रथम, जेव्हा ग्राहक सलूनमध्ये सेवा घेतो, तेव्हा वापरलेल्या उत्पादनांच्या पॅकिंगची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि बॅच नंबर पहा, कारण बाजारात रिपॅकिंग केलेले उत्पादने उपलब्ध असतात म्हणजेच पॅकिंग मटेरियल अस्सल असते आणि त्यामध्ये भरलेला माल बनावट असतो. आपण वापरलेल्या मूळ उत्पादनांच्या रिक्त बाटल्या, डबे रद्दीवाल्याला विकून टाकतो किंवा कचऱ्यामध्ये टाकतो. या बाटल्या आणि बॉक्स बनावट वस्तूंच्या पॅकिंगमध्ये वापरले जातात. बनावट उत्पादनांच्या वापरामुळे जळजळदेखील उद्भवू शकते, हे देखील ते बनावट असल्याचा पुरावा आहे.

सलूनमध्ये विक्री होणारी उत्पादने

त्याचप्रमाणे एकदा निहारिका केस कापण्यासाठी मोठया सलूनमध्ये गेली आणि बरोबर मुलीलाही घेऊन गेली. तिथे केस कापण्यापूर्वी केस धुणे आवश्यक असते. सलूनच्या स्टाफने केस धुऊन हेअर कट केला आणि बिलिंगच्यावेळी म्हणाली, ‘‘मॅडम, तुमच्या मुलीचे केस खूप रफ झाले आहेत. केस कापताना मला कंघी घ्यायलाही त्रास होत होता. तुम्ही त्यासाठी आमच्या सलूनमध्ये ठेवलेली उत्पादने का वापरत नाहीत? हे पहा …’’ असं म्हणत तिने आपल्या सलूनच्या शोकेसमधील बरीच महागडी उत्पादने दाखवली.

आपल्याकडून पैसे काढण्याची ही युक्ती असल्याचे निहारिकाला समजले. म्हणून, उत्पादने पाहिल्यानंतर तिने सांगितले की मी नंतर विचार करेन. पण कर्मचाऱ्याला पुढे ढकलणे कुठे सोपे होते. ते उत्पादन विकल्यानंतर तिला कमिशन मिळणार होते, म्हणून ती म्हणाली की ‘‘मॅडम ऑर्गेनिक उत्पादने आहेत. यामुळे आपल्या मुलीचे केस चांगले राहतील, नाहीतर खूप वाईट होतील.’’

निहारिका त्यांच्या जाळ्यात अडकायला तयार नव्हती, म्हणून ती म्हणाली, ‘‘मी घरी तिचे केस धुण्यासाठी आवळा, रीठा, शिकाखाईचा वापर करते आणि त्यामुळे मी खूप समाधानी आहे.’’

त्याचप्रमाणे, जेव्हा सत्या केस कापण्यासाठी गेली, तेव्हा केस धुताच तिच्या केसांना मेहंदीचा सुगंध येऊ लागला, कारण ती मेहंदी वापरत असे. सलूनची स्टाफ केस कापताना तिला म्हणाली की मॅडम तुमच्या केसांपासून वास येत आहे. मेहंदीऐवजी केसांचा रंग का वापरत नाहीत?

स्टाफचे म्हणणे ऐकून सत्या म्हणाली, ‘‘तुम्ही ज्याला वास बोलत आहात, आम्हाला तो सुगंध वाटतो, आपण केस कापा, त्याशिवाय काहीही करु नका.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें