फ्रेश लुकसाठी ५ फेस मास्क

* पारुल भटनागर

दिवाळीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की तिचं घर उजळून निघावं, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनी तिने दिलेल्या भेटवस्तूची स्तुती करावी आणि हे सर्व करण्यात स्त्रिया अनेकदा भरपूर मेहनत करतात. परंतु या सगळयांमध्ये त्या एक गोष्ट करत नाहीत ते म्हणजे स्वत:कडे लक्ष देणं.

गरजेचं नाही की तुम्ही पार्लरमध्ये जाऊनच तुमचा चेहरा उजळवू शकता. तुम्ही घरच्या घरीदेखील सहजपणे सर्व कामं करता करता मिनिटात तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता आणि तेदेखील तुमच्या पाकिटावर अधिक भार न टाकता. होय, तुम्ही घरच्या घरी फेस मास्कने मिनिटात रिफ्रेश लुक व ग्लो मिळवू शकता.

चला तर, जाणून घेऊया कोणकोणते फेस मास्क आहेत जे तुमच्यासाठी बेस्ट आहेत :

हनी पोशन रीनेविंग फेस मास्क

या फेस मास्कला कोरडया त्वचेच्या लोकांसाठी मॅजिक म्हणणं चुकीचं नाही ठरणार, कारण यामध्ये हायड्रेशन प्रॉपर्टीज असतात. हे हनी बेस मास्क अँटिऑक्सिडंटमध्ये रिच असल्यामुळे तुमच्या त्वचेला काही मिनिटातच मुलायमपणा देण्याचं काम करतात.

सोबतच या मास्कमध्ये विटामिन बी असल्यामुळे हे त्वचेवर सणासाठी इन्स्टंट ग्लो आणण्याचं काम करतं. तर मग या हायड्रेट अँटिऑक्सिडंट फेस मास्कने मिळवा ग्लोइंग कॉम्प्लेक्शन. हे मास्क क्रुएल्टी फ्रीदेखील आहे.

कसं अप्लाय कराल : तुम्ही हे दहा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एकदम ग्लो दिसून येईल. जे पार्टी वा फंक्शनसाठी योग्य आहे. हे तुम्ही तुमच्या सुविधेनुसार ऑनलाइन, ऑफलाइन सहजपणे खरेदी करू शकता.

ग्रेपफ्रूट हायड्रोजेल मास्क

जर तुमच्या त्वचेवर मुरुमांची समस्या असेल आणि तुमच्या त्वचेवर तुम्ही काही लावायलादेखील घाबरत असाल तर तुम्ही ग्रेपफ्रूट हायड्रोजेल मास्कचा वापर कोणताही विचार न करता करू शकतात. हे खास करून अॅक्ने प्रोन त्वचेसाठी डिझाइन केलं गेलंय. यामध्ये ग्रेपफ्रूट सीड एक्सट्रॅक्ट, जे त्वचेला रिफ्रेश करण्याचं काम करतं आणि यामध्ये विटामिन सीच्या अनेक गुणधर्म त्वचेला उजळवण्याबरोबरच अॅक्ने रोखण्याचंदेखील काम करतं. सोबतच अॅक्नेमुळे पडणारे डागदेखील कमी करण्यास मदतनीस ठरतं. जर तुम्ही या मास्कला सणासाठी लावाल तेव्हा तुमची त्वचा पार्लरसारखी उजळून निघेल.

कसं अप्लाय कराल : हे पील ऑफ मास्क असतं. याला फक्त १० ते १५ मिनिटानंतर त्वचेवरून पील ऑफ करण्याची गरज असते. म्हणजेच सहज वापरता येण्याजोगं आणि हे मास्क खूपच बजेट फ्रेंडलीदेखील असतं. हे कोणीही अफोर्ड करू शकतं.

चारकोल मास्क

चारकोल मास्क अलीकडे खूपच ट्रेन्डमध्ये आहे. खास बाब म्हणजे हे पोर्स क्लीन करण्याबरोबरच तुम्हाला ब्लॅक हेड्सच्या समस्यापासूनदेखील सुटका देण्याचं काम करतं. चारकोलच्या प्रॉपर्टीज त्वचेवर जमा झालेली धूळमाती व घाण रिमूव करून तुम्हाला क्लियर स्किन देण्याबरोबरच अॅक्नेच्या समस्येपासूनदेखील सुटका देण्याचं काम करतं. हे डेड स्किन सेल्सला रिमूव करून त्वचेतील अतिरिक्त ऑईल काढून त्वचेवर ग्लो आणण्याचं काम करतं .ज्यामुळे त्वचा क्लीन होण्याबरोबरच ग्लोईंगदेखील दिसून येते.

कसा अप्लाय कराल : सर्वप्रथम त्वचेला स्वच्छ करून चांगला फेस मास्क अप्लाय करा नंतर या मास्कला चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून सोडून द्या आणि नंतर धुऊन टाका. याबरोबरच चेहऱ्याला हलक्या हाताने स्वच्छ करून यावर मॉइश्चरायझर अप्लाय करा. तुम्हाला त्वरित तुमच्या त्वचेतील फरक दिसून येईल.

ओटमील मास्क

जर तुमची त्वचा खूपच सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट वापरण्यापूर्वी दहावेळा तरी विचार करा. कारण सेन्सिटिव्ह त्वचेवर कोणतही प्रोडक्टस वापरल्यामुळे त्वचेचं नुकसान होतं.

परंतु सण-उत्सवात चेहऱ्यावर त्वरित ग्लो आणायचं असेल तर सेंसिटिव स्किन असणाऱ्यांना ओटमील मास्क सर्वात उत्तम पर्याय आहे. कारण यामध्ये अँटीइनफ्लेमेटरी व अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात, ज्या त्वचेला स्वच्छ व मुलायम करण्याचं काम करतात. मास्क त्वचेच्या हीलींग प्रोसेसलादेखील वेगवान करण्याचं काम करतं.

कसा अप्लाय कराल : त्वचा स्वच्छ करूनच हा मास्क चेहऱ्यावर लावा. नंतर कमीत कमी १५ मिनिटांसाठी हे चेहऱ्याला लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसून येईल आणि त्वचेचं नुकसानदेखील होणार नाही. हे मात्र तुम्हाला सहजपणे प्रत्येक ठिकाणी मिळू शकेल.

पंपकिन आणि हनी मास्क

जर तुम्हाला त्वचेवर त्वरित ग्लो आणायचा असेल तर तुम्ही फेस्टिवल्स पंपकिन हनी मास्क त्वचेवर लावून रिफ्रेश व ग्लोइंग लुक मिळवा. हनी हेल्दी सेल्स प्रमोट करून त्वचेला तरुण बनवण्याचं काम करतं. पंपकिन ऑइलमध्ये विटामिन्स, मिनरल्स व ओमेगा असल्यामुळे हे डॅमेज त्वचेला त्वरित रिपेयर करण्याबरोबरच एजिंग प्रोसेस लॉक करण्याचंदेखील काम करतं.

हे तुमच्या त्वचेतील डलनेस दूर करण्याबरोबरच ते चमकदार बनवतं. सोबतच मुलायम देखील बनवण्याचं काम करतं.

कसं अप्लाय कराल : अप्लाय करणं सहजसोपं आहे. फक्त चेहऱ्यावर व्यवस्थित १० ते १५ मिनिटांसाठी लावा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.

लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही स्वत:साठी फेस मास्क विकत घ्याल त्यापूर्वी तुमच्या त्वचेचा टाईप म्हणजेच पोत लक्षात घ्या. कारण प्रत्येक फेस मास्क वेगवेगळया स्किन टाइपला लक्षात ठेवूनच बनवला जातो. जर तुम्ही स्किन टाइप लक्षात ठेवून फेस मास्क विकत घेतला तर तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल. सोबतच त्वचेचं कोणतेही नुकसान होणार नाही.

ही गोष्टदेखील लक्षात ठेवायला हवी की फेस मास्कमध्ये पॅराबेन्स, सुगंध, अल्कोहोल, डायचा वापर केलेला नसावा. सोबतच हे चेहऱ्यावर अॅलर्जीचं कारण बनू शकतो आणि जेव्हा त्वचेवर मास्क अप्लाय कराल तेव्हा उत्तम रिझल्टसाठी तो अधिक काळ चेहऱ्यावर लावून ठेवू नका. फक्त १० ते १५ मिनिटं योग्य वेळ आहे

सनबर्नपासून वाचण्याचे घरगुती उपाय

– पारुल भटनागर

सूर्याच्या तीव्र किरणांचा थेट परिणाम महिलांच्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा काळवंडणे यासोबतच खाज, जळजळ व लाल चट्टे पडू लागतात. याला सनबर्न म्हणतात. यात हळूहळू त्वचेची आर्द्रता संपण्यासोबतच त्वचा रुक्ष व मृतवत होऊ लागते. इतकेच नव्हे तर सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांच्या अधिक संपर्कात आल्याने त्वचेला सुरकुत्या पडण्याने वयदेखील जास्त दिसू लागते.

जर तुम्हीसुद्धा सनबर्नने त्रस्त असाल तर घाबरू नका. उलट आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगू, ज्याद्वारे तुम्हाला काही दिवसांतच सनबर्नच्या तक्रारीपासून मुक्तता मिळेल.

घरीच सनबर्नच्या समस्येचे निवारण करा

जर सनबर्नची समस्या आहे तर सनबर्न झालेल्या जागी कच्च्या बटाटयाचा उपयोग केल्याने चेहऱ्यावरचे डाग व चट्टे दूर होतात व वर्णदेखील उजळतो. याशिवाय तुम्ही बटाटयाचा रसदेखील घेऊ शकता, जो त्वचेची सूज कमी करण्यासोबतच त्वचेमध्ये होणारी जळजळदेखील कमी करतो. यासाठी तुम्ही एक बटाटा धुवून त्याची साल काढून किसून एका बाऊलमध्ये त्याचा ज्यूस काढा. नंतर यात काही थेंब लिंबाचा रस मिसळून कापूस बुडवून त्याला चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याचा नियमित वापर केल्याने सनबर्नची समस्या ठीक होऊन जाते.

बटाटयात व्हिटॅमिन, मिनरल, फायबर व नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. तसेच यात व्हिटॅमिन सीचे कॉम्बिनेशन असल्याने हे पिगमेंटेशन घालवण्यासोबतच त्वचेचा वर्णसुद्धा उजळण्याचे काम करते.

एलोवेरा, लाल मसूर व टोमॅटोचा पॅक

लाल मसूरचा पॅक सनबर्नसाठी बराच चांगला उपाय मानला जातो. यासाठी फक्त जेव्हा तुम्हाला हा पॅक चेहऱ्याला लावायचा असेल, तेव्हा एक तास आधी डाळ पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे स्मूथ पेस्ट बनवणे सोपे होईल. नंतर यात जवळपास एक चमचा टोमॅटोचा रस व थोडेसे एलोवेरा जेल मिसळून ही पेस्ट सनबर्न असलेल्या जागी लावून पाच मिनिटे मसाज करा. नंतर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा व नंतर धुवा. लावल्यानंतर काहीच दिवसात तुम्ही त्वचेत बदल पाहू शकाल.

ते अशासाठी की लाल मसूरमध्ये विटामिन सी असते, जे सनबर्न घालवण्यासोबतच त्वचेचा पोतदेखील सुधारण्याचे काम करते. सोबतच यातील पोषक तत्वांमुळे हे ड्राय पॅचेससुद्धा हटवते. याला स्किन क्लिंजरदेखील म्हणतात, ज्यामुळे त्वचा निरोगी टवटवीत व उजळ बनते. शिवाय कोरफडीत व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा काळपटपणा व सुरकुत्या दूर करण्यासाठी उत्तम मानले जातात.

बेसन व हळदीचा पॅक

त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी बेसन व हळदीच्या पॅकचा वापर तर वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. अशात तुम्ही उजळपणासोबतच डागरहित त्वचा व सनबर्नपासून सुटका मिळवू इच्छिता, तर तुम्ही बेसन व हळदीचा पॅक जरूर लावा. यासाठी तुम्हाला एक छोटा चमचा बेसन, अर्धा लिंबू, एक छोटा चमचा मधात चिमुटभर लिंबाचा रस मिसळावा लागेल. नंतर या तयार पेस्टला चेहऱ्यावर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा. सुकल्यानंतर दुसऱ्यांदा स्क्रब करा. यामुळे काही मिनिटांमध्ये चेहरा उजळण्यासोबतच दर वेळच्या लावण्याने सनबर्न हळूहळू कमी होऊ लागेल. चांगल्या परिणामांसाठी हा पॅक आठवडयातून तीन ते चार वेळा लावावा लागेल.

बेसन नॅच्युरल एक्सफोलिएटरच्या रूपात काम करते, ज्यामुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यासोबतच त्वचेत जिवंतपणा येतो. हळद चेहऱ्यावर चमक आणण्यासोबतच पिगमेंटेशन दूर करण्याचेदेखील काम करते. मधात त्वचेच्या पेशी वेगाने भरून काढणारी तत्त्वे असतात, ज्याने त्वचेचा गेलेला वर्ण पुन्हा येऊ लागतो.

आईस क्यूब ट्रीटमेंट

आईस क्यूब प्रत्येक घरी सहज उपलब्ध असतात. सन बर्न ठीक करण्यासाठी हे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडपणा मिळण्यासोबतच ती घट्ट होईल व त्यावर तेजसुद्धा दिसू लागेल. बर्फात थंडपणाचे गुणधर्म असल्याने ते त्वचेच्या उष्णतेला शोषून घेऊन थंडपणा पोहोचवण्याचे कामदेखील करते, ज्यामुळे जळजळदेखील कमी होते. सोबतच काळया वर्तुळांपासूनदेखील सुटका होते.

दही पॅक

सनबर्नपासून वाचण्यासाठी दही खूप उपयुक्त ठरते. यात असणारे प्रोबायोटिक्स त्वचेची सूज कमी करून त्वचा स्वच्छ करतात. यासाठी तुम्ही दही दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा व नंतर धुवा. यामुळे रोमछिद्रे मोकळी होतात व त्वचा स्वच्छ होऊन जाते. दह्यात झिंक व अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजदेखील असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ बऱ्यापैकी कमी होते. तुम्ही हा पॅक आठवडयातून चार वेळा नक्की लावा.

हनी मिल्क पॅक

सनबर्न घालवण्यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे लागतील. पेस्ट बनवण्यासाठी यात दूध मिसळा. नंतर हे २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून धुवून टाका. रोज असे केल्याने तीव्र सनबर्नदेखील ठीक होतात. जिथे मधात अँटी टॅन एजंट असतात, तिथे दूध त्वचेला आर्द्र बनवण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेच्या तक्रारीही दूर होतात.

राईस वॉटर पॅक

सनबर्नसाठी राईस वॉटर पॅक उत्तम आहे. यासाठी तांदूळ शिजवा व त्याचे पाणी फेकू नका, तर एक दिवस तसेच ठेवा. मग त्यात इसेन्शियल ऑईल घालून त्याचा पॅक बनवा, जेणेकरून त्याची घाण निघून जाईल. नंतर त्यात टिशू पेपर घालून चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. याला सनबर्न ट्रीटमेंट असेही म्हणतात. याने खूप लवकर सन बर्न ठीक होतो.

या नॅच्युरल बाथ थेरपीजदेखील तुम्हाला सनबर्न व वेदना, जळजळ यापासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतील :

* आपल्या बाथटबमध्ये अर्धा कप अॅप्पल साइडर व्हिनेगर घाला. यामुळे सन बर्न त्वचेची पीएच लेवल पातळीत येण्याने त्वचा भरून येण्यात मदत होते.

* अंघोळ करते वेळी पाण्यात इसेन्शियल ऑईल, जसे की गुलाबजल, लव्हेंडर घाला. यामुळे वेदनेपासून बराच आराम मिळतो.

* थोडा बेकिंग सोडा घातलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने सनबर्नमुळे झालेली जळजळ व वेदना कमी होतात.

* एक कप ओट्स पाण्यात भिजवण्यासाठी ठेवून द्या. नंतर ह्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेची जळजळ दूर होण्यासोबतच त्वचेची गेलेली आर्द्रतादेखील परत येऊ लागते.

काही अत्याधुनिक ट्रीटमेंट्सदेखील आहेत ज्यांची माहिती करून घेऊया त्वचारोग तज्ञ डॉक्टर भारती तनेजा यांच्याकडून :

फ्रुट बायोपील फेशियल बरेच परिणामकारक

फेशियल तर तुम्ही पुष्कळ करून घेतले असतील, परंतु टॅनिंग वा सनबर्नसाठी फ्रुट बायोपील फेशियलसारखं उत्तम काही नाही. कितीही तीव्र सनबर्न का असेना, याच्या एका एप्लीकेशनने बऱ्याच प्रमाणात दूर होतो. जसे पपईचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचा एका वेळेतच खूप सुंदर बनते.

व्हाइटनिंग फेशियल

व्हाइटनिंग फेशियलसुद्धा सनबर्नसाठी पुष्कळ लोकप्रिय फेशियल आहे, कारण यात व्हिटॅनॉल घातलं जातं. त्यामुळे याला व्हाइटनिंग फेशियल म्हणतात. यामुळे त्वचेवर कितीही तीव्र सनबर्न असेल, तरी तो आरामात निघून जातो, कारण यात अँटिऑक्सिडंट व पोषक तत्वे जी असतात, जी त्वचेतून मेलानिन कमी करून त्वचेचा वर्ण सुधारण्यासोबतच उजळण्याचेदेखील काम करतात.

लेर ट्रीटमेंट

चेहऱ्यावरील केस लेझरद्वारे काढण्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, परंतु आता तीव्र सनबर्नदेखील १-२ सीटिंग्समध्ये लेझर ट्रीटमेंटद्वारे हटवले जाऊ शकते. जेव्हा त्वचा लाल तसेच सोलवटून निघण्यासोबतच ताप, प्रभावित भागावर फोड येतात, तेव्हा लेझर ट्रीटमेंटची गरज पडते. यात स्किन पिगमेंटेशन लेझर ट्रीटमेंटद्वारे एकाच खेपेत त्वचेतून ८० टक्के मेलानिन हटवले जाते. फ्रॅक्सील लेझर ट्रीटमेंटने हायपर पिग्मेंटेशन, एजिंग व अॅक्ने व्रण यांना सहजतेने हटवून नवीन निरोगी त्वचा मिळवली जाऊ शकते.

कोरड्या त्वचेसाठी फेस मास्क

* मोनिका गुप्ता

हिवाळयात कोरडी त्वचा मॅनेज करणे थोडे कठीण होते. कोणताही मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा, थोडया वेळाने पुन्हा चेहरा कोरडा होईल. कोरडया त्वचेला बरे करण्यासाठी महिला वेगवेगळया प्रकारचे फेस मास्कदेखील वापरतात. परंतु त्यांचा प्रभावही काही दिवसच टिकतो. परंतु असे काही नैसर्गिक फेस मास्क आहेत, जे आपण सहजपणे घरी बनवू शकता. त्यांचा वापर केल्याने त्वचा बऱ्याच काळासाठी ओलसर राहते :

कोरफडीचा फेस मास्क

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे शरीर आणि त्वचा दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. एलोवेरा फेस मास्क बनविण्यासाठी कोरफडीतून जेल बाहेर काढा. त्यात काकडीचा रस घाला. हा मास्क फेस वॉशनंतर चेहऱ्यावर लावा आणि नंतर थोडया वेळाने चेहरा धुवा. हे केवळ चेहऱ्यावरील कोरडेपणाच दूर करणार नाही तर चेहऱ्यावर चमकही दर्शवेल.

एवोकॅडो फेस मास्क

फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यांचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते, चेहऱ्यावरही चमक टिकून असते. एवोकॅडोमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे त्वचेस निरोगी बनवतात. कोरडी व खराब झालेली त्वचा काढून टाकून ते त्वचेस कोमल बनवते. एवोकॅडो फेस मास्क तयार करण्यासाठी २ चमचे मॅश केलेल्या एवोकॅडोमध्ये, १ चमचे मध आणि १ चमचे गुलाब पाणी घाला आणि चांगले मिक्स करा. मग ते चेहरा स्वच्छ करून झाल्यावर चेहऱ्यावर लावा.

स्ट्रॉबेरी फेस मास्क

स्ट्रॉबेरीमुळे केवळ त्वचा कोमलच होत नाही तर चमकदारदेखील दिसते. तिच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. तिच्या वापरामुळे त्वचेत गोठलेल्या मृत पेशीही निघून जातात. स्ट्रॉबेरी फेस मास्कसाठी २-३ मोठया स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात १ चमचे मध आणि १ चमचे ओटचे पीठ मिक्स करून पेस्ट बनवा आणि नंतर त्यास चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवडयातून असे दोनदा करा.

पपईचा फेस मास्क

पपई हे आरोग्य आणि सौंदर्य या दोघांसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्यात पोटॅशियम असते, जे त्वचेस हायड्रेटेड आणि सुंदर ठेवते. हे त्वचेमध्ये असलेल्या मृत पेशी आणि डाग साफ करण्यासदेखील मदत करते. पपईचा फेस मास्क बनविण्यासाठी, पिकलेल्या पपईपासून १ कप पेस्ट बनवा. नंतर त्यात १ चमचे मध आणि १ चमचे लिंबाचा रस घाला आणि चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

केळी आणि चंदनाचा फेस मास्क

केळी फेस मास्क कोरडया त्वचेला ओलावा देऊन त्यास चमकदार बनविण्यात मदत करते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा संपतो, शिवाय सुरकुत्यांची समस्यादेखील संपते. तसेच त्वचा घट्ट राहण्यासही मदत करते.

केळयाचा फेस मास्क बनविण्यासाठी, १ पिकलेली केळी चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या आणि त्यात १ चमचे मध, १ चमचे ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा चंदन पावडर घाला. आता हा मास्क चेहऱ्यावर लावा. तो कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें