आरोग्य बिघडवू शकते एक्सरसाईज

* डॉ. सागरिका अग्रवाल, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल्स

आरोग्याच्या दृष्टीने एक्सरसाईज किंवा व्यायामाचे बरेच फायदे आहेत. पण आजकाल आपण अशी जीवनशैली जगत आहोत, जिथे व्यायामासाठी जराही वेळ नसतो. बऱ्याच वर्षांपासून जीवनशैली एकाच प्रकारची असल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये शारीरिक स्थितीसह मानसिक परिस्थितीचाही समावेश असतो.

कुठल्याही प्रकारे का असेना, पण आपल्या शरीराला रोज थोडया प्रमाणात सक्रिय राहाणे गरजेचे असते. यामुळे आपल्या शारीरिक विकासास प्रोत्साहन मिळते आणि आपली एकूण कार्यक्षमताही वाढते. व्यायामाचे जसे अनेक सकारात्मक पैलू आहेत तसेच नकारात्मक पैलूदेखील आहेत, ज्यांच्याकडे ठराविक लोकांचेच लक्ष जाते. जसे की भरपूर व्यायामामुळे प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

एक्सरसाईजचे सकारात्मक पैलू

हृदयाच्या स्थितित सुधारणा : आपण शारीरिकरित्या किती काम करतो यावर आपल्या हृदयाची स्थिती अवलंबून असते. जे लोक दररोज शारीरिकदृष्टया सक्रिय नसतात, त्यांनाच हृदयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात.

चांगली झोप न येणे : अनेक अभ्यासांद्वारे हे सिद्ध झाले आहे की जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांना रात्री चांगली झोप येते. हे यामुळे घडते कारण व्यायामामुळे शरीराची सर्केडियन रिद्म व्यायामामुळे मजबूत होते, जी आपल्याला दिवसा सक्रिय ठेवण्यास मदत करते. यामुळे रात्री चांगली झोप येते.

शारीरिक उर्जेमध्ये वाढ : आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात एक्सरसाईजबाबत अनेक प्रकारचे गैरसमज असतात, जसे की एक्सरसाईज आपल्या शरीराची सर्व शक्ती शोषून घेते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर काहीही करू शकत नाही. प्रत्यक्षात याच्या अगदी उलट घडते. कारण एक्सरसाईजदरम्यान, तुमच्या शरीरातून काही खास प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात, जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

आत्मविश्वास वाढणे : नियमित व्यायामामुळे हवा तसा परफेक्ट शेप तुमच्या शरीराला मिळू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो. शरीराची उत्तम ठेवण आणि सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही घर आणि कार्यालयातही पूर्वीपेक्षा अधिक चांगले काम करू शकता.

अति एक्सरसाईजचे नकारात्मक पैलू

नियमित व्यायामाचे बरेच फायदे आहेत, म्हणूनच फिजिकल अॅक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही. परंतु काही अशा गोष्टीही आहेत, ज्यामुळे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे हे लक्षात येते की अति व्यायामामुळे शरीरावर नकारात्मक परिणामदेखील होऊ शकतो :

* महिलांमध्ये एक विशेष स्थिती निर्माण होते, ज्याला रजोरोध म्हणतात. ही परिस्थिती तेव्हा निर्माण होते, जेव्हा सामान्य महिलेस सलग ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत योग्य प्रकारे मासिक पाळी येत नाही. बऱ्याच महिलांमध्ये अशी स्थिती निर्माण होते, कारण त्या शरीराला नियमित ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज देणाऱ्या पदार्थांचे सेवन न करताच जिममध्ये काही विशेष प्रकारच्या व्यायामाचे ३-४ सेशन नियमित करतात.

* शरीरातील कॅलरीजच्या कमतरतेचा थेट परिणाम केवळ प्रजननक्षमतेवरच होत नाही तर महिलांच्या लैंगिक इच्छेवरदेखील याच प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त, लठ्ठपणादेखील यात महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण बहुतेक करून लठ्ठ महिला वजन कमी करण्यासाठी अनेकदा खूपच कठीण व्यायाम करतात, ज्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

* लठ्ठपणामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे ओव्हुलेशन आणि मासिक पाळीवर परिणाम होतो आणि वंध्यत्वाचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये तरुण महिलादेखील एवढया जास्त प्रमाणात वर्कआऊट करतात की त्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी त्या स्तरापर्यंत जाते, जी त्यांच्या मासिक पाळीत अडथळा आणते. इस्ट्रोजेनच्या पातळीत बरेच बदल झाल्यास गर्भधारणा होण्यासाठीही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

* आपल्या सर्वांना आणि विशेषत: महिलांना हे चांगले माहीत असते की बहुतेक   गर्भनिरोधक औषधांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी जास्त असते. म्हणूनच महिला    त्यांचे सेवन केल्यानंतर गर्भवती होण्यापासून स्वत:ला रोखू शकतात. अति व्यायामामुळेही इस्ट्रोजेनची पातळी वाढते. म्हणूनच जर एखाद्या महिलेला गर्भधारणा करायची असेल तर तिने हेवी एक्सरसाईज करू नये.

* हेवी ट्रेनिंग सेशनमुळे पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, जी थेट त्यांच्या प्रजननाशी संबंधित आहे. आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे बॉडी मेन्टेन ठेवण्यासाठी प्रदीर्घ काळ कठीण ट्रेनिंग सेशन फॉलो करतात.

* तुम्ही जर अति थकवा आणणाऱ्या आणि कठीण ट्रेनिंगमधून जात असाल तर सामान्य ट्रेनिंग सेशन फॉलो करणाऱ्या लोकांच्या तुलनेत तुमच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी असण्याची शक्यता असते.

* दीर्घ काळापर्यंत थकवा आणणारा कठीण व्यायाम केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, सोबतच पुनरुत्पादनाची क्षमतादेखील कमी होऊ शकते. शिवाय हेवी रेजिस्टन्स ट्रेनिंग फायद्याऐवजी तुमचे नुकसान करू शकते. कारण यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढते, जे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतर हार्मोन्सवर विपरित परिणाम करते. यामुळे तुमच्या महिला जोडीदारास गर्भधारणा होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नियमित व्यायामासह पुरेसा आहार घेणेदेखील आवश्यक असते, कारण तुमच्या शरीराला नियमितपणे कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. खास करून तेव्हा ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाईजदरम्यान खूप ऊर्जा गमावता. म्हणूनच पुरुषांनी वेळोवेळी आपले स्पर्म काउंट तपासून पाहिले पाहिजेत तर महिलांनी त्यांच्या गर्भधारणेच्या क्षमतेची तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे तुम्हाला समस्येतून बाहेर पडण्यासाठी आणि सामान्य जीवन जगण्यासाठी मदत होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें