चटपटीत लज्जतदार

* पाककृती सहकार्य : लतिका बत्रा

चीज चाट कटोरी

साहित्य

*  ४-५ ब्रेड स्लाईस
*  १ उकडलेला बटाटा
*  १ मोठा चमचा उकडलेले मटार
*  १ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
*  १ मोठा चमचा बारीक शेव
*  १ मोठा चमचा मसालेदार भाजलेले चणे
*  १ मोठा चमचा भुजिया
*  १ मोठा चमचा रोस्टेड चिवडा
*  १ मोठा चमचा मिक्स सुकामेवा
*  १ मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा
*  १ चिरलेला टोमॅटो
*  २ मोठे चमचे फेटलेले दही
*  १ मोठा चमचा आंबट-गोड चिंचेची चटणी
*  १ मोठा चमचा चटपटीत हिरवी चटणी
*  १ छोटा चमचा लिंबाचा रस
*  १ छोटा चमचा चाट मसाला
*  १ छोटा चमचा भाजलेलं जिरं
*  तेल गरजेपुरतं
*  मीठ चवीनुसार.

कृती

ब्रेडस्लाईस लाटण्याने लाटून पातळ करा. ते कटर वा वाटीच्या मदतीने गोल कापून घ्या. गोल ब्रेडला सूरीने एका बाजूला कट द्या. यावर ब्रशच्या मदतीने तेल लावा आणि मग छोटया आकाराच्या वाटीच्या मदतीने व्यवस्थित गोल करून घ्या. एका कढईत तेल गरम करून घ्या आणि ब्रेड लावलेल्या वाटीसकट ब्रेड सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे ब्रेडच्या सर्व कटोऱ्या तयार करून त्या थंड झाल्यावर ब्रेडमधून वाटी काढून घ्या. चाट सेट करण्यासाठी सर्व ब्रेडचा कटोऱ्या तयार आहेत. आता चाट बनविण्याचं सर्व साहित्य एकत्र करून घ्या आणि ब्रेड कटोऱ्यामध्ये भरा. वरून दही, चटण्या टाकून जिरे पावडर टाका. कोथिंबीर आणि किसलेल्या चीजने  सजवून सर्व्ह करा

गार्लिक वडा पाव

grihshobhika-food-article

साहित्य

*  ६ पाव
*  २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट
*  २ मोठे चमचे पावभाजी मसाला
*  १ मोठा चमचा लाल तिखट
*  १ मोठा चमचा चिली फ्लेक्स
*  २ मोठे चमचे कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट
*  १ मोठा चमचा बारीक चिरलेली सिमला मिरची
*  १ मोठा चमचा बारीक चिरलेली लालपिवळी सिमला मिरची
*  १ चमचा किसलेलं गाजर
*  १ चमचा उकडलेले मटार
*  १ मोठा चमचा बारीक कापलेला बटाटा
*  १ मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा
*  १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
*  १ मोठा चमचा उकडलेला मका.

कृती

दोन मोठे चमचे लोण्यात थोडी आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट, चिली फ्लेक्स आणि पावभाजी मसाला एकत्रित करून घ्या. एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे लोणी गरम करून त्यात सर्व भाज्या परतून घ्या. सर्व मसाले व आले-लसूण पेस्ट टाका आणि भाज्या थोडया परतून घ्या. नॉनस्टिक पॅनवर मसाला मिक्स केलेलं लोणी टाका आणि सर्व पाव मधोमध कापून आत-बाहेर लोण्यामध्ये व्यवस्थित शेका. तयार पावांवर भाज्यांचं मिश्रण लावा. चीज पसरवून पावाचा वरचा भाग त्यावर ठेवून थोडं लोणी आणि मसाला लावून, गरमागरम द्या.

नाचोज प्लॅटर

grihshobhika-food-article

साहित्य

*  १ मोठा चमचा उकडलेला राजमा
*  १ मोठा चमचा उकडलेले पांढरे चणे
*  १ मोठा चमचा बारीक चिरलेला हिरवा कांदा
*  १ मोठा चमचा बारीक चिरलेलं गाजर
*  १ मोठा चमचा उकडलेले मटार
*  ४-५ उकडलेले मशरूम
*  एक चतुर्थांश कप लाल पिवळी-हिरवी सिमला मिरची बारीक चिरलेली
*  १ मोठा चमचा रेड चिली सॉस
*  १ मोठा चमचा ग्रीन चिली सॉस
*  अर्धा कप कुस्करलेल चीज
*  १ छोटा चमचा चीली फ्लेक्स
*  १ मोठा चमचा टोमॅटो केचप
*  १ मोठा चमचा मेयॉनीज
*  १ पॅकेट नाचोज
*  गार्लिक सॉल्ट चवीनुसार.

कृती

सर्व भाज्या, राजमा, चणे, सर्व सॉस, थोडंसं मीठ, चीज आणि मेयोनिज टाकून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित करून घ्या. एका प्लॅटरमध्ये हे एकत्रित सलाड टाका. बाजूने नाचोजने सजवा, वरून चीज आणि सीजनिंग टाकून खायला द्या.

पावसाळ्यातील गरमागरम मेजवानी

* पाककृती सहकार्य : ओम प्रकाश गुप्ता

  • नवरत्न चिवडा करंजी

साहित्य

*  २०० ग्रॅम मैदा

*  ५० ग्रॅम रवा

*  ६५ ग्रॅम तूप

*  २५० ग्रॅम नवरत्न चिवडा

*  तळणीसाठी तेल

*  मीठ चवीनुसार.

कृती

मैदा, रवा, तूप व मीठ एकत्रित करून हाताने चोळून घ्या. गरजेनुसार पाणी टाकून थोडं घट्ट मळून घ्या. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा. नंतर छोटे छोटे गोळे करून घ्या. पातळ लाटी लाटून घ्या. करंजीच्या साच्यात ठेवून नवरत्न चिवडा भरून काठाने पाणी लावून घ्या आणि करंजीच्या आकार द्या. कढईत तेल गरम करून मंद आचेवर करंजी तळून घ्या.

  • तिरंगी कटलेट्स

साहित्य

*  अर्धा कप उकडलेले बटाटे मॅश करून

*  १ कप मॅश केलेले मटार

*  १ तुकडा पनीर मॅश केलेला

*  २ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर

*  १ छोटा चमचा हिरवी मिरची पेस्ट

*  १ छोटा चमचा आलं पेस्ट

*  १ छोटा चमचा जिरे

*  १ छोटा चमचा हळद पावडर

*  १ छोटा चमचा गरम मसाला

*  चिमूटभर हिंग

*  तळण्यासाठी तेल

*  मीठ चवीनुसार.

कृती

पनीरमध्ये अर्धा चमचा हळद आणि मीठ टाका आणि ४ बॉल्स बनवून ठेवा. पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, हिरवी मिरची पेस्ट आणि आलं पेस्ट टाकून परतवून घ्या. मटार आणि इतर मसाले परतवून घ्या. या मिश्रणचे ४ पेढे बनवून ठेवा. मॅश केलेल्या बटाटयामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि थोडं मीठ टाकून ४ पेढे बनवून ठेवा. आता मटारचे पेढे घेऊन १-१ हातावर ठेवून पसरवा आणि पनीरची एक स्लाईस मध्ये ठेवून चारही बाजुंनी बंद करून कटलेट बनवा. अशाप्रकारे बटाटयाच्या पेढ्यांना पसरवून मटारचे कटलेट ठेवा आणि बंद करा. असेच बाकी कटलेट्स बनवा. नंतर कढईत तेल गरम करा आणि ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. ४-४ तुकडे करून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

पावसाळ्यातील गरमागरम मेजवानी

* पाककृती सहकार्य : ओम प्रकाश गुप्ता

  • राईस लॉलीपॉप

साहित्य

*  २ कप भात

*  अर्धा कप उकडलेले बटाटे मॅश करून

*  २ मोठे चमचे हिरवी शिमला मिरची बारीक चिरलेली

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची

*  २ मोठे चमचे बारीक चिरलेला टोमॅटो

*  २ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

*  अर्धा छोटा चमचा लाल तिखट

*  १ छोटा चमचा धणे पावडर

*  अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर

*  अर्धा छोटा चमचा गरम मसाला

*  १ छोटा चमचा चाट मसाला

*  अर्धा छोटा चमचा कुटलेली बडीशेप

*  तळण्यासाठी तेल

*  आईस्क्रिम स्टिक्स

*  मीठ चवीनुसार.

कृती

तेल तसंच आईस्क्रिम स्टिक्स सोडून इतर सर्व साहित्य एका बाउलमध्ये टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्या. अर्धा चमचा तेल घेऊन घट्ट कणिकसारखं मळून घ्या. एका ट्रेला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये भाताचं मिश्रण पसरवून अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. नंतर सुरीने मिश्रणाचे तुकडे कापून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून तुकडे मंद आचेवर दोन्ही बाजुंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. प्रत्येक तुकडयात आईस्क्रिम स्टिक घुसवून चटणी आणि सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

  • कांदा पॅन केक

साहित्य

*  १ मोठा कप बारीक रवा

*  अर्धा कप दही

*  गरजेपुरते गोल कापलेले कांदे

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची

*  १ छोटा चमचा फ्रुट सॉल्ट

*  तळण्यासाठी रिफाइंड तेल

*  मीठ चवीनुसार.

कृती

रव्यात दही, मीठ व लाल तिखट एकत्र करा. पुरेसं पाणी टाकून फेटून घ्या. घट्ट घोल तयार करा. गाठी राहता कामा नये. नॉनस्टिक गरम करून घ्या. तयार घोलमध्ये फ्रुट सॉल्ट टाकून अजून फेटावं. हलक्या गरम तव्यावर एक डाव घोल टाकून गोलसर पसरवा. यावर गोल कापलेले कांदे टाका. कडानी तेल टाकून दोन्ही बाजुंनी व्यवस्थित भाजून घ्या. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें