Festival मध्ये आकस्मिक पाहुणे येती घरा

* नीरा कुमार

खरं तर प्रत्येक गृहिणीसमोर सणासुदीच्या काळात अशी समस्या निर्माण होते की तिने आपल्या कुटुंबातील व्यक्तिच्या हिशोबाने स्वयंपाक बनविलेला असतो आणि अचानक १-२ पाहुणे येऊन टपकतात. अशावेळी जेवण कमी पडते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. जर तुमच्यापुढेही अशीच समस्या निर्माण झाली तर या टीप्सचा वापर करून तुम्ही समस्येतून मुक्ती मिळवू शकता :

* तुम्ही जर पनीरची रसदार भाजी बनविली असेल, तर थोडेसे मखाने तळून थोडीशी टोमॅटो प्युरी व कोरडे मसाले घालून ३-४ मिनिटे शिजवा आणि भाजीत मिसळा. यामुळे भाजीही छान होईल.

* फ्रोजन मटर फ्रीजरमध्ये ठेवले असतील, तर कोमट पाण्यात टाका. मग बटाटा, पनीर यांसारख्या भाज्यांमध्ये मिसळा.

* उकडलेले बटाटे असतील तर ते, कुस्करून एखाद्या ग्रेव्हीवाल्या भाजीत मिसळा किंवा थोडेसे दही घालून दही-बटाटा बनवा. याबरोबरच बेसन व दही मिसळून फेटा व याची कढीही बनवू शकता.

* कढीला असेच सर्व्ह करू शकता किंवा यात उकडलेल्या बटाटयाचे तुकडे घालू शकता.

* बनविलेली तूर, मूग, उडीद किंवा मसूरची डाळ कमी पडेल, असे वाटत असेल, तर कांदा टोमॅटोची फोडणी करा. त्यात दोन चमचे बेसन घालून भाजा. त्याचबरोबर, जर एखादी हिरवी पालेभाजी असेल, तर तीसुद्धा मिसळा. सर्व मिसळून फोडणी द्या. डाळीचे प्रमाण वाढेल.

* डाळ कोणतीही असो, हिरव्या भाज्यांचे प्रमाण जास्त घालायचे असेल, तर आले, हिरवी मिरची व हिंगाची फोडणी देऊ शकता. पाच मिनिटांत तयार पालेभाजीला डाळीत टाका. भाजीवाली डाळ तयार होईल.

* उकडलेले बटाटे कमी असतील, तर ते हाताने चांगल्याप्रकारे कुस्करून टोमॅटो प्युरी व हिंग-जिऱ्याची फोडणी किंवा सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ घालून बटाटयाचे सांबार तयार करा.

* छोले कमी असतील, तर त्यामध्ये कच्चा बारीक कापलेला टोमॅटो, कांदा व कोथिंबीर घालून मिसळा. छोल्यांचे प्रमाण वाढेल. बटाटेही छोटया-छोटया फोडी करून त्या तळून छोल्यांमध्ये मिसळू शकता.

* शिजलेला भात कमी असेल तर भरपूर कांदा, जिरे, टोमॅटो, कढीपत्त्याची फोडणी करून भात मिसळा.

* जर अगदीच काही सूचत नसेल, तर सर्वात उत्तम म्हणजे, गव्हाच्या पिठात बेसन, आले-लसून पेस्ट व मसाले मिसळून दही घालून पीठ मळा. याचे पराठे बनवा आणि लोणच्यासोबत सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें