उन्हाळ्यात रूक्ष त्वचा आता नाही

* डॉ. साक्षी श्रीवास्तव, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, जेपी हॉस्पिटल

वास्तविक उन्हाळ्याच्या दिवसात काही लोकांची त्वचा तेलकट होते, परंतु ज्या लोकांची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असते, अशांची त्वचा उन्हाळयात जास्तच कोरडी होउ लागते.

कोरडी त्वचा ओळखण्यासाठी तुम्ही प्रथम सामान्य त्वचेबद्दल जाणून घेणं जरूरी आहे. सामान्य त्वचेत पाणी आणि लिपिड याचं प्रमाण संतुलित असतं. परंतु जेव्हा त्वचेत पाणी किंवा मेद वा दोन्हींचं प्रमाण कमी होतं, तेव्हा त्वचा कोरडी म्हणजे रुक्ष होऊ लागते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्यावरील थर निघणं, त्वचा फाटणं अशी लक्षणं दिसू लागतात.

सामान्यत: त्वचेचे खालील भाग कोरडे असतात :

हात आणि पाय : सतत तीव्र साबणाने हात धुतल्याने त्वचा रुक्ष होऊ लागते. असे ऋतुबदलाच्या वेळेसही दिसून येते. कपडयांच्या घर्षणामुळेसुद्धा काख आणि जांघांमधील त्वचा कोरडी होऊ लागते. म्हणून उन्हाळयात टाईट फिटिंगचे कपडे घालू नका.

गुडघे आणि कोपर : टाचांना भेगा पडणं हे या ऋतुत अगदी साहजिक आहे. अनवाणी चालणं किंवा मागून उघडी पादत्राणं वापरल्याने या समस्या वाढतात. म्हणून टाचांवर मॉइश्चरायजर लावून त्या ओलसर ठेवा.

जर तुम्ही रुक्ष त्वचेकडे लक्ष दिलं नाही, तर ही समस्या रॅशेस, एझिमा, बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरेवर जाऊ शकतं.

रुक्ष त्वचेची कारणं

उन्हाळयात रुक्ष त्वचेची कारणं काही अशी असतात :

घाम येणं : घामाबरोबर त्वचेचा ओलावा कायम ठेवणारं अत्यावश्यक ऑइलही निघून जातं, ज्यामुळे त्वचा रुक्ष होऊ लागते.

योग्य प्रमाणात पाणी न पिणं : उन्हाळयात कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होतं. म्हणून पाण्याचं योग्य प्रमाण कायम ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आणि पातळ पदार्थ खायला हवे.

एअर कंडिशनर : थंड हवेत ओलावा कमी असतो, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. याशिवाय जेव्हा तुम्ही थंड हवेतून गरम हवेत जाता, गरम हवा त्वचेतील उरला सुरला ओलावा शोषून घेते. यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते.

अनेकदा अंघोळ करणे : अनेक अंघोळ केल्याने त्वचेतील ऑइल निघून जाते. याशिवाय स्विमिंग पूलमध्ये पोहल्याने क्लोरिन त्वचेतील नैसर्गिक सिबम ठरवते आणि त्वचा रुक्ष होते.

रुक्ष त्वचेपासून स्वत:चं रक्षण कसं कराल

* अशा गोष्टींपासुन दूर राहा, ज्या त्वचेचा ओलावा शोषून घेतात. जसे अल्कोहोल, अॅस्ट्रिनेंट किंवा हॅन्ड सॅनिटायझिंग जेल.

* कठोर साबण आणि अँटीबॅक्टेरियल साबणाचा वापर करू नका, कारण हे त्वचेतील नैसर्गिक ऑइल शोषून घेतात.

* रोज स्क्रबिंग करू नका. आठवडयातून एकदा किंवा ३ वेळा स्क्रबिंग करा.

* सनस्क्रीन लोशन लावूनच घराबाहेर पडा. युव्ही किरण त्वचेच्या संपर्कात आल्याने फोटोएजिंगची समस्या उद्भभवू शकते. यामुळे त्वचा रुक्ष होते.

* लीप बाममध्ये मेंथॉल आणि कापूर यासारखे पदार्थ असतात. जे ओठांचा कोरडेपणा वाढवतात.

* ऑइल बेस्ड मेकअपचा वापर करू नका, कारण यामुळे त्वचेचे रोमछिद्र बंद होतात.

* प्रदूषणामुळे त्वचेतील व्हिटॅमिन ए नष्ट होतं, जे त्वचेचे टिशूज दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असतं. अशा वेळी दिवसातून ४-५ वेळा हर्बल फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.

* वाढत्या वयाबरोबर त्वचेची जास्त काळजी घ्यायला हवी. विशेषत: जर तुमची त्वचा ड्राय असेल तर. अँटीएजिंग मॉइश्चरायजर वापरा जेणेकरून त्वचेचा घट्टपणा कायम राहील.

रुक्ष त्वचेची काळजी

पौष्टिक आहार घ्या : असा आहार घ्या, ज्यात अँटीऑक्सिडंटचं योग्य प्रमाण असेल. यामुळे त्वचेत तेल आणि मेद योग्य प्रमाणात कायम राहतं आणि त्वचा मुलायम राहते. बेरीज, संत्री, लाल द्राक्ष, चेरी, पालक आणि ब्रोकोली यात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.

सनस्क्रीनचा वापर करा : याचा वापर प्रत्येक ऋतूमध्ये करायला हवा, कारण यूव्ही किरणं त्वचेला नुकसान पोहचवू शकतात.

एक्सफोलिएशन : यामुळे रुक्ष त्वचेचा वरचा थर निघून जातो आणि त्वचेत ओलावा कायम राहतो.

मॉइश्चरायजिंग : चेहरा आणि शरीराच्या त्वचेसाठी वेगवेगळया मॉइस्चरायजरची गरज असते. चेहऱ्याचा मॉइश्चरायजर माईल्ड असावा. या उलट शरीराच्या त्वचेसाठी ऑइल बेस्ड थीक मॉइश्चरायजर असावा.

आपल्या पायांची काळजी घ्या : पायांकडे दुर्लक्ष करू नका. पायांना १० मिनिटं कोमट पाण्यात भिजवल्यावर स्क्रब करा. यानंतर फूट क्रीम किंवा मिल्क क्रीमचा वापर करा. यामुळे पायाची त्वचा मऊ होईल.

घरगुती उपचार

* नारळाच्या तेलात असलेले फॅटी अॅसिड्स त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात. झोपण्याआधी नारळाचं तेल लावा. अंघोळीनंतरही नारळाचं तेल लावू शकता.

* ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि फॅटी अॅसिड कोरडया त्वचेला ओलसर बनवतात. हे केवळ त्वचाच नव्हे, तर केस आणि नखांसाठीही फायदेशीर असतं.

* दूध मॉइश्चरायजरचं काम करतं. दूध त्वचेची खाज, सूज दूर करतं. गुलाबजल किंवा लिंबाचा रस दुधात एकत्र करून कापसाच्या बोळयाने त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ मुलायम होते.

* मधात कितीतरी व्हिटॅमिन आणि मिनरल असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. हे पपई, केळ किंवा एवोकोडोबरोबर मिसळून हातापायांवर १० मिनिट लावा आणि पाण्याने धुवा.

* योगर्ट त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायजर आहे. यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी घटक त्वचेला मऊ बनवतात. यात असलेलं लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरियापासूनही रक्षण करतं, ज्यामुळे त्वचेची खाज नाहीशी होते. हे चण्याच्या पिठात, मध आणि लिंबाच्या रसात मिसळून त्वचेवर लावा. १० मिनिटांनी धुवा.

* एलोवेरा त्वचेवरील पुरळ नाहीशी करते, शिवाय डेड सेल्सही नष्ट करण्यास सहाय्यक ठरते.

* ओटमील त्वचेचं सुरक्षा कवच कायम ठेवतं. बाथटबमध्ये एक कप प्लेन ओटमील आणि काही थेंब लव्हेंडर ऑइल टाकून अंघोळ केली तर फ्रेशनेस येतो. हे पिकलेल्या केळ्यात मिसळून फेसमास्क तयार करा आणि लावल्यानंतर १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

या उपायांचा वापर करून तुमचा उन्हाळा आनंदी उन्हाळा होईल.

संवेदनशील त्वचेची काळजी कशी घ्यावी

* गृहशोभिका टीम

ऍलर्जीमुळे तुमच्या त्वचेत काही बदल झाले आहेत का? जसे की त्वचेवर लाल-लालसर रॅशेस दिसणे, खाज सुटणे किंवा खाजवण्याची इच्छा होणे किंवा ओरखडे येणे. हे सर्व त्वचेच्या संवेदनशीलतेचे लक्षणं आहेत.

तथापि, असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या त्वचेचा प्रकार काय आहे हे माहित नाही. संवेदनशील किंवा सामान्य. तर प्रथम जाणून घेऊया कोणती चिन्हे आहेत ज्यामुळे आपल्या त्वचेची संवेदनशीलता जाणवते.

संवेदनशील त्वचेची सुरुवातीची चिन्हे :

  1. थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगनंतर त्वचेला कोरडेपणा किंवा जळजळ आणि खाज सुटणे.
  2. चेहरा धुतल्यानंतर ताणल्यासारखे वाटणे.
  3. त्वचा अचानक जास्त लाल होते आणि पुरळ बाहेर येतात.
  4. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर लवकरच दिसून येतो.
  5. कोणत्याही बाह्य कारणाशिवाय त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे.
  6. काही आंघोळीचे आणि कापडी साबणदेखील आहेत ज्यांच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ होते.
  7. अकाली सुरकुत्या.

त्यामुळे खालील कारणांमुळे त्वचा संवेदनशील असते :

 

  1. घाण आणि प्रदूषण.
  2. कडक पाणी.
  3. अपुरी स्वच्छता.
  4. भ्रष्ट जीवनशैली.
  5. हार्मोन्स.
  6. ताण.
  7. आहार आणि त्वचेची आर्द्रता.
  8. हानिकारक त्वचा काळजी उत्पादने.
  9. कपडे आणि दागिने.
  10. घराची स्वच्छता.

यानंतर तुमची त्वचा संवेदनशील आहे की नाही हे तुम्हाला समजले असेल. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला तुमच्या त्वचेची अशी काळजी घ्यावी लागेल.

  1. तुमच्या त्वचेसाठी कॉस्मेटिकची चाचणी केल्यानंतरच वापरा.
  2. धूळ, माती आणि रसायनांपासून त्वचेचे संरक्षण करा.
  3. थंडीत नेहमी मऊ लोकरीचे स्वेटर घाला. सिंथेटिक लोकर त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.
  4. सौंदर्य उत्पादन खरेदी करताना, ते संवेदनशील त्वचेसाठी असेल तरच लेबल तपासा.
  5. हर्बल आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादने वापरा.
  6. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावा.
  7. केसांना कंघी करण्यासाठी कठोर केसांचा ब्रश वापरू नका.
  8. मजबूत परफ्यूमसह साबण किंवा डिटर्जंट वापरणे टाळा.
  9. परफ्यूम किंवा आफ्टर शेव लोशन खरेदी करताना, ते तुमच्या त्वचेवर फवारून त्याची चाचणी करा. जर त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेला खाज सुटू शकते.

भेगा पडलेल्या टाचांना असे बनवा मुलायम

* पारुल भटनागर

जशी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो तशी आपल्या हाता-पायांची घेत नाही. त्यामुळेच ऋतुचक्र बदलताच म्हणजे हिवाळयाला सुरुवात होताच पायांना भेगा पडायला सुरुवात होते. यामागचे कारण म्हणजे पुरेशी काळजी न घेणे आणि दुसरे म्हणजे जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे. कोरडया हवेमुळे हळूहळू शरीरातील ओलावा कमी होऊ लागतो.

शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यामुळेही टाचांना भेगा पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय करणेही गरजेचे असते, जेणेकरून टाचांना पडलेल्या भेगा बऱ्या होतील आणि भेगांमुळे कोणासमोरही तुम्हाला लाजल्यासारखे वाटणार नाही.

यासंदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव सांगतात की, बाजारात तुम्हाला शेकडो अशा क्रीम मिळतात ज्या टाचांच्या भेगा बऱ्या करण्याचा दावा करतात, पण प्रत्येक महागडी क्रीम आणि केलेला दावा खरा असेलच असे सांगता येत नाही.

त्यामुळेच तुम्ही जेव्हा बाजारातून भेगा पडलेल्या टाचांना बरे करणारे क्रीम खरेदी कराल तेव्हा लक्षात ठेवा की, त्यात कडुलिंबाचा वापर केलेला असेल. यामुळे तुमच्या टाचा लवकर बऱ्या होऊन तेथील त्वचेला आवश्यक ओलावा मिळेल :

* कापराचे तेल शतकानुशतके त्याच्यातील नैसर्गिक गुणांसाठी ओळखले जाते, कारण ते भेगा पडलेल्या टाचांमुळे होणारी जळजळ थांबवण्यासाठी प्रभावी असते. सोबतच ते रक्ताभिसरण वाढवून वेदनेपासून सुटका करते.

* काळया मिरीचे तेल जेवणाची चव वाढवते, सोबतच शतकानुशतके याचा वापर औषधे बनवण्यासाठीही केला जातो. यात मोठया प्रमाणावर फॉलिक अॅसिड, कॉपर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम असते. ते टाचांच्या जखमा बऱ्या करून वेदनेपासून आराम मिळवून देतात.

* पुदिन्याच्या तेलाचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो, कारण ते त्वचेला तरुण आणि सुंदर ठेवण्याचे काम करते. तणाव दूर करणारे हे सुगंधित तेल भेगा पडलेल्या टाचांची जळजळ दूर करण्यास मदत करते. यातील मिथॉलसारखे घटक टाचांना बरे करण्यासाठी प्रभावी ठरतात.

* लॅव्हेंडर तेलात अँटीसेफ्टिक आणि अँटीइन्फलमेंट्री म्हणजे जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुण असल्यामुळे ते टाचांची भेगा पडलेली त्वचा आणि टाचांनाही बरे करते. ते मृत त्वचा काढून टाकून त्वचेतील निरोगी पेशी वाढवण्याचे काम करते. सोबतच टाचांचा कोरडेपणा दूर करून पायांचे सौंदर्यही परत मिळवून देते.

हेही आहेत प्रभावी उपाय

बादलीत गरम पाणी घेऊन त्यात तीन मोठे चमचे एप्सम मीठ टाका. त्यानंतर त्यात सुमारे अर्धा कप डेटॉल टाका. एप्सम मीठ त्वचेला मुलायम बनवण्याचे काम करते, तर डेटॉल जंतुनाशक असून ते फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य संसर्ग होऊ देत नाही. टाचांना जास्त भेगा पडल्यामुळे बऱ्याचदा संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसा. त्यानंतर शॉवर जेलने पाय अलगद पुसून घ्या.

त्यानंतर त्याच बादलीत पुन्हा पाय टाकून धुवा व नंतर टॉवेलने पुसा. नंतर चांगल्या दर्जाचे लोणी पायांना लावून ५ मिनिटे मालिश करा. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, लोण्यात दाह कमी करणारे घटक असतात. त्यामुळे ते टाचा लाल होणे, भेगा पडल्यामुळे टाचांची होणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात. असे तुम्ही आठवडयातून दोनदा रात्री झोपताना करा. टाचांना पडलेल्या भेगा निश्चिंतच बऱ्या होतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें