रिमझिम पाऊसधारा आणि अनोखा स्वाद – साबुदाणा मिनी कटलेट

* प्रतिनिधी

साबुदाणा मिनी कटलेट

काय लागेल

* अर्धा कप साबुदाणा

* १ उकडलेला बटाटा मॅश करून

* अर्धा कप ब्रेडक्रम्स

* ५० ग्रॅम पनीर

* १ मोठा चमचा बारीक चिरलेलं आलं व हिरवी मिरची

* १ छोटा चमचा चाट मसाला

* २ छोटे चमचे मध

* पाव छोटा चमचा काळीमीरी चूर्ण

* १ छोटा चमचा आमचूर पावडर

* कटलेट डीप फ्राय करण्यासाठी रिफाईड ऑइल

* १ छोटा चमचा चाट मसाला

* मीठ चवीपुरतं.

कसं कराल

साबुदाणा ६-७ तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर पाणी काढून पाव कप फुललेला साबुदाणा मिक्सरमध्ये क्रश करून वेगळा ठेवा. उरलेल्या साबुदाण्यात पनीर, बटाटा व इतर सर्व मसाले एकत्रित करा. आवडत्या आकारांचे कटलेट बनवून साबुदाण्याच्या पेस्टमध्ये लपेटून डीप फ्राय करा व मधामध्ये चाट मसाला व लिंबाचा रस एकत्रित करून प्रत्येक कटलेटवर थोडसं टाका.

रिमझिम पाऊसधारा आणि अनोखा स्वाद – अचारी राजमा खिचडी

* प्रतिनिधी

अचारी राजमा खिचडी

काय लागेल

* ५०० ग्रॅम भात

* ५० ग्रॅम आलं व लसूण पेस्ट

* १० हिरव्या मिरच्या चिरलेल्या

* १० ग्रॅम हिरवी वेलची

* ३-४ लवंग

* थोडीशी तमालपत्र

* ५० ग्रॅम तूप

* चिमूटभर हळद

* ५० ग्रॅम लाल मिरचीचं लोणचं

* १०० ग्रॅम दूध

* २०० ग्रॅम उकडलेला राजमा

* थोडीशी वडी

* ५०० ग्रॅम सालीसकट उडद

* १ किलो धुतलेली उडद

* चिमूटभर रजवाडी हिंग

* थोडसं काळमिरी

* १० ग्रॅम बडीशेप

* १० ग्रॅम बेकिंग पावडर

* ८० ग्रॅम मखनी ग्रेव्ही

* थोडीशी कोथिंबीर

* लाल तिखट चवीपुरतं

* मीठ चवीपुरतं.

कसं कराल

डाळ धुवून २४ तासासाठी भिजत ठेवा. नंतर वाटून घ्या आणि यामध्ये काळीमिरी, बडीशेप, हिंग, मीठ व बेकिंग पावडर टाका. एका ट्रेमध्ये वाटलेली डाळ सेट करून ३० मिनिटं वाफेवरती शिजवा. कटरच्या सहाय्याने गोल आकारात कापा. आता एका पॅनमध्ये तूप गरम करून तमालपत्र, लवंगा आणि वेलची टाका. आलं लसूण पेस्ट, हळद व मीठ टाका. आता शिजवलेला भात, राजमा, दूध आणि पाणी टाका, सोबतच मिरचीचं लोणचं टाका. खिचडी तयार आहे. आता वडीला गरम तेलामध्ये फ्राय करा आणि मखनी ग्रेव्हीमध्ये टाका. यामध्ये हिंग, हिरवी मिरची, आलं व लाल मिरचीची फोडणी द्या आणि खिचडी व वडीला एका प्लेटमध्ये टाकून कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें