जेव्हा जोडीदार असेल संशयी स्वभावाचा

* पूनम अहमद

‘‘तू इतक्या रात्री कोणाशी बोलत होतास? तू माझा फोन का उचलला नाहीस? ती तुझ्याकडे पाहून का हसली? माझ्या पाठीमागे काहीतरी चालले आहे का?’’

जर तुम्हाला दररोज अशा प्रश्नांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही ते बरोबर समजलात की तुमचा जोडीदार संशयी स्वभावाचा आहे.

जर तुम्ही या प्रश्नांना कंटाळले असाल आणि हे नातं निभावू शकत नसाल, पण तुमच्या प्रियकरावर किंवा मैत्रिणीवरही प्रेमही करत असाल आणि त्याला या संशयाच्या सवयीमुळे सोडूही इच्छित नसाल, तर अशा संशयी स्वभावाच्या जोडीदाराला सामोरे जाण्यासाठी या टीप्स विचारात घ्या :

* शंका घेणे कोणत्याही नात्यात सर्वात वाईट गोष्ट असू शकते. असुरक्षितता, खोटे बोलणे, फसवणूक, राग, दु:ख, विश्वासघात हे सर्व यातून येऊ शकतात. नात्याच्या सुरुवातीला एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. एकमेकांकडे अधिक लक्ष दिले जाते. एकदा की तुमच्या दोघांमध्ये एक बंध निर्माण झाला की तुम्ही जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करता. याचा अर्थ असा नाही की जोडीदारामध्ये रस कमी झाला आहे. याचा अर्थ असा की आता तो तुमच्या जीवनाचा एक भाग आहे आणि तुम्ही आता त्याच्याबरोबर इतर गोष्टींवर आणि कामांवर आपले लक्ष केंद्रित करू शकता.

* कधीकधी जोडीदार हा बदल सहजपणे स्वीकारू शकत नाही आणि तो विचित्र प्रश्न विचारू लागतो, ज्यामुळे तुमच्या निष्ठेवरच प्रश्न निर्माण होतात. त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका, त्याच्या अंत:करणात तुमच्यासाठी काय भावना आहेत ते समजून घ्या, अनेकवेळा अजाणतेपणाने आपली इच्छा नसतानाही आपल्या काही सवयीमुळे त्याच्या मनात शंका येते, हे समजून घ्या.

* तुम्ही नात्याच्या सुरुवातीचे ३-४ महिने तुमच्या मैत्रिणीकडे पूर्ण लक्ष दिले आहे. ती भविष्यातसुद्धा तशीच आशा ठेवते, परंतु तेवढे पुन्हा शक्य होत नाही, पण त्यात तुमच्या मैत्रिणीचा इतका दोष नाही, सुरुवातीच्या दिवसात इतके अतिशयोक्तीपूर्ण काम करू नका की नंतर तुमच्याकडून तेवढे लक्ष देण्याची उणीव तिला भासेल.

* जोडीदारासोबत दर्जेदार वेळ अवश्य घालवला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की एक मोठी महागडी डेट असावी, याचा अर्थ एकत्र बसणे, एकमेकांच्या आवडीचा कोणताही ऑनलाइन शो एकत्र पाहणे, घरी बसून एकमेकांच्या गोष्टी ऐकणे असाही होऊ शकतो.

* तिला तुमच्या गटात सामील करा आणि तिचे वर्तन पहा की ती प्रत्येकामध्ये मिसळते की अलिप्त राहते. तिला तुमच्या आयुष्याचा आणि तुमच्या सामाजिक वर्तुळाचा ती एक भाग असल्याची जाणीव करून द्या. तिला आपल्या मित्रांची ओळख करून द्या. तिला हे समजून घेण्याची संधी द्या की ते तुमचे मित्र आहेत आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ती तुमच्या मित्रांना जितके अधिक समजेल तितकी ती तुमच्यावर कमी शंका घेईल.

अनावश्यक संशयाचे ५ दुष्परिणाम

* मधू शर्मा कटिहा

पार्टी संपताच कावेरी नेहमीप्रमाणे तोंड फुगवून पती संदीपच्या पुढे-पुढे चालू लागली. गाडीत बसताच तिने संदीपसमोर प्रश्नांचा भडीमार केला, ‘‘जेव्हापण तुम्हाला श्रीमती टंडन भेटते, ती तुम्हाला पाहून इतकी का हसते? टंडन सरांसमोर तर ती आपले तोंड वाकडे करून राहते…नेहाने तुम्हाला मिस्टर हँडसम असे का म्हटले आणि जरी तिने असे म्हटले तरी तुम्हाला हसत आपल्या छातीवर हात ठेवण्याची आणि डोकं झुकवण्याची काय गरज होती? आणि ही जी तुमची सहाय्यक सोनाली आहे ना, तिची तर एखाद दिवशी तिच्याच घरी जाऊन चांगली खरडपट्टी काढीन. आपल्या नवऱ्याला घरी सोडून पार्टीत येते आणि बहाणा असा करते की त्यांची तब्येत ठीक नसते. दुसऱ्यांचेच पती मिळतात हिला थट्टा-मस्करी करण्यासाठी?’’ कावेरीचे कुरकुर करणे चालूच होते.

दोन वर्षांपूर्वी कावेरीचे लग्न झाले होते तेव्हा संदीपसारखा स्मार्टड्ड आणि देखणा नवरा मिळाल्याने तिचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. पण काही दिवसांनंतरच तिचा सर्व आनंद गायब झाला. आता संदीपच्या सभोवताली कुणा महिलेला पाहून ती क्रोधीत होते.

कावेरीप्रमाणेच नताशाही तिचा नवरा रितेशच्या स्मार्टनेसला आपली सवत मानू लागली आहे, कारण रितेशच्या स्मार्टनेसमुळे तिची शांतता हिरावून गेली आहे. रितेश त्याच्या स्मार्ट असण्याचा फायदा घेत असल्याचे तिला वाटते. एखादी कुमारिका असो की विवाहित तो सर्वांशी घनिष्ठता वाढवतो.

रितेशला एखाद्या बाईशी बोलत असताना पाहून नताशा सर्वांसमोरच भांडणास सुरवात करते. आपला सन्मान वाचवण्यासाठी रितेश आपल्या मित्रांच्या पत्नींद्वारे केले गेलेले ‘हॅलो’, ‘नमस्कार’चे उत्तर देण्यासही कचरतो. नताशाबरोबर असताना त्याला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. नताशाच्या निराधार संशयामुळे रितेशचे जीवन जवळजवळ संपले आहे.

नताशा आणि कावेरी यांच्याप्रमाणेच अशी कितीतरी बायकांची उदाहरणे आहेत, ज्या आपल्या पतीवर कुण्या स्त्रीची दृष्टी केवळ यासाठी सहन करू शकत नाहीत की त्यांचे पती त्यांच्यापेक्षा अधिक आकर्षक दिसतात. अशा परिस्थितीत कोणतीही महिला जवळ आल्याबद्दलचा दोषी त्या त्यांच्या पतीलाच मानून त्यांच्यावर शंका घेऊ लागतात.

संशयाचे दुष्परिणाम

तनावाने ग्रस्त वैवाहिक जीवन कोणताही पती आपल्या पत्नीकडून विनाकारण लावले गेलेले लांच्छन सहन करणार नाही. याचा परिणाम असा होईल की या दोघांमध्ये भांडणे होत राहतील. अशा परिस्थितीत वैवाहिक जीवनात प्रेम आणि शांतीच्या जागी तणाव वाढेल.

आत्मविश्वास गमावणे : जर पती-पत्नी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील तर दोघांचीही मने आनंदी असतील आणि ते एकमेकांबरोबर आनंददायक वेळ घालवू शकतील. परंतु पत्नीकडून निराधार शंका घेतल्या गेल्यास पतीच्या आत्मविश्वासात कमी येईल. त्याला समजू शकणार नाही की त्याने काय चूक केली, जे संकटांचे कारण बनले. पत्नीही इतर स्त्रियांच्या तुलनेने स्वत:ला निम्न दर्जाची समजून निराश होईल.

मुलांच्या मानसिकतेवर परिणाम : मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी पालकांमध्ये वेळोवेळी सल्लामसलत होणे खूप महत्वाचे आहे, परंतु सतत घेतल्या जाणाऱ्या संशयामुळे पती-पत्नीमधील वाढते अंतर, मुलांविषयी चर्चा करण्याची संधी न देता आपापसातील निराधार प्रश्नांचे निराकरण करण्यास भाग पाडेल, याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होईल.

सामाजिक मेळाव्यात घट : अनावश्यक शंका पतीला कोणत्याही सामाजिक समारंभात जाण्यापासून प्रतिबंधित करते. त्याला अशी भीती असेल की एखादी स्त्री त्याच्याकडे पाहून हसली तर घरात वादळ घोंघावेल. त्याचप्रमाणे पत्नीसुद्धा सामाजिक मेळावे टाळण्यास सुरवात करेल. नवऱ्याचा देखणेपणा तिच्या दृष्टीने स्वत:साठी एक नवीन समस्या उभी करण्यासारखा होईल.

पती खोटया गोष्टींचा आधार घेऊ लागतो : संशयामुळे काही बायका ऑफिसपर्यंत पतींचा पाठलाग करतात. तेथे कोणत्या महिला सहकाऱ्याला तो किती महत्त्व देतो, कोणा-कोणाबरोबर हसत गप्पा मारतो आणि आपल्या सेक्रेटरीबरोबर किती वेळ घालवतो, या सर्व बाबींची माहिती ती पतीकडून बोलता-बोलता घेत असते. जेव्हा एकमेकांमध्ये कशाबद्दलही थोडाही वादविवाद होतो तेव्हा त्या सर्वांची नावे बायका नवऱ्याशी जोडतात आणि त्यांची बदनामी करण्यास सुरवात करतात. वैतागून हळूहळू पती सर्व काही सत्य न सांगता खोटे बोलू लागतात.

आत्महत्येची वेळ येणे : लखनौमध्ये एक माजी सैनिक ओमप्रकाश यांच्या पत्नीला संशय असायचा की तिच्या पतीचा दुसऱ्या एका महिलेबरोबर अनैतिक संबंध आहे. ही निराधार शंका दूर करण्यासाठी पतीने भरपूर प्रयत्न केले. पण पत्नीची शंका दूर करू शकला नाही तेव्हा स्वत:ला गोळी मारून त्याने आयुष्य संपवलं.

स्वत:ला संपवायची कल्पना पती किंवा पत्नीच्या मनात येवो किंवा न येवो, परंतु हे खरे आहे की संशयामुळे जन्मलेल्या यातनांमुळे विवाहित जीवन नरक बनते. मनात संशयाचे बीज वाढत असताना पत्नीने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

* हुशार पती मिळाल्यावर पत्नीला आनंदी असायला हवे. जर अशा व्यक्तीने तिला पसंत केले असेल तर तिच्यात नक्कीच काहीतरी विशेषता तर असेलच. जर ही गोष्ट तिने मनात ठेवली असेल तर ती स्वत:ला कोणापेक्षाही कमी लेखणार नाही आणि तेव्हा नवऱ्याचे एखाद्या महिलेशी बोलणे तिला खटकणार नाही.

* नवरा हँडसम असल्यास निकृष्टतेने ग्रस्त होण्याऐवजी पत्नीने तिचे सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी विविध मासिके आणि यूट्यूबच्या माध्यमातून मेकअपच्या नव-नवीन टिप्स जाणून त्या अवलंबता येतील. बाजारात आणि ऑनलाइनमध्ये विविध प्रकारचे नव-नवीन सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने आपण स्वत:ला आकर्षक बनवू शकता.

* आपल्या पतीभोवती फिरणाऱ्या महिलांकडे तोंड फुगवून पाहत पतीला मनातल्या मनात शिव्या-शाप देण्यापेक्षा चांगले हे आहे की त्या महिलांशी मनमोकळे हसत बोलण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे घनिष्ठता वाढविल्याने त्या महिला कौटुंबिक मित्रांसारख्या वाटू लागतील.

* जर संशयाने वेढलेल्या बायकोला संपर्कात रहायचे असेल तर पतीच्या मैत्रिणींविषयी माहिती देणाऱ्या लोकांऐवजी चांगली मासिके, माहितीपूर्ण आणि मनोरंजक वेबसाइट्स आणि व्हॉट्सअॅपवर आपल्या जुन्या मित्रांच्या संपर्कात रहा. यातून नव-नवीन माहिती मिळाल्याने तिचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि मन आनंदी राहिल्याने ताणतणावदेखील होणार नाही.

अशाच प्रकारे आपल्या पत्नीच्या संशयी स्वभावाचा सामना करण्यासाठी पतीनेही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत :

* आपल्या पत्नीचे कौतुक करण्यात कंजुषी करू नका. जेव्हा तिने काहीतरी नवीन घातले असेल किंवा बाहेर जाण्यासाठी तयार असेल तेव्हा स्तुतीचे २ शब्द नक्की बोला.

* बायकोला वेळोवेळी आठवण करून दिली पाहिजे की केवळ शारीरिक सौंदर्यच सर्वकाही नसते. पत्नीच्या काही विशेष गुणांची प्रशंसा करताना म्हणा की तिच्यात खरोखर असे गुण आहेत, जे त्याने आजपर्यंत कोणत्याही सुंदर स्त्रीत पाहीले नाहीत.

* आपल्या पत्नीबरोबर वेळोवेळी फिरण्यासाठी वेळापत्रक तयार करा. कधी रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी वगैरे तर कधी आठवडयाच्या शेवटी जवळपासच्या ठिकाणी जाऊन १-२ दिवस घालवण्यासाठी. तेथे मौज-मस्तीच्या मूडमध्ये बुडून काही छायाचित्रे काढून फेसबुकवर पोस्ट केली जाऊ शकतात किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणूनदेखील टाकली जाऊ शकतात. जर कॅप्शन ‘माय लव्हली वाईफ एंड मी’ यासारखे असेल तर ते दुधात साखर असेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें