Diwali Special: दिवाळी स्वीट्स

* पाककृती सहकार्य : अनुपमा गुप्ता

  1. बेसन बदाम बर्फी

 

साहित्य

* १ कप बेसन

* अर्धा कप बदाम पूड

* पाऊण कप साखर

* अर्धा कप पाणी

* २ मोठे चमचे तूप

* सजावटीसाठी बदाम.

कृती

कढईत तूप गरम करून बेसन भाजा. नंतर त्यात बदाम पूड घालून परता. दोन-तीन मिनिटांनंतर गॅसवरून उतरवा. एका कढईत साखर व पाण्याचा एक तारी पाक बनवा. यात बदाम व बेसन मिसळा. दोन-तीन मिनिटे परतून घट्ट करा. एका थाळीत हलकेसे तूप लावून कापलेल्या बदाम आणि सजवून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून आवडीच्या आकारात कट करून सर्व्ह करा.

2. मैद्याची बर्फी

साहित्य

* अर्धा लिटर दूध

* ६ मोठे चमचे साखर

* ३ मोठे चमचे मैदा

* २ छोटे चमचे तूप

* थोडासा कापलेला सुकामेवा सजावटीसाठी.

कृती

मैद्यात तूप घालून हलका सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत परता. कढईत दूध घालून उकळायला ठेवा. दूध घट्ट झाल्यानंतर मैदा घालून मिसळत शिजवा. त्यानंतर साखर घालून ६ ते ७ मिनिटे हलवा व गॅस बंद करा. एका प्लेटमध्ये तूप लावून मिश्रण त्यात ओता व पसरवा. काजू व बदामाने सजवा. थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.

3. रवा रोल

साहित्य

* अर्धा कप दूध

* १ मोठा चमचा साखर

* ३ चमचे खवा

* २ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क.

कृती

कढईत दूध गरम करून त्यात रवा घाला व घट्ट होईपर्यंत शिजवा. याचे गोळे बनवून प्लास्टिकच्या दोन पदरांमध्ये पातळ लाटा. दीड इंच रुंद पट्टी कापा. खवा व कंडेन्स्ड मिल्क मिसळा. रव्याच्या पट्टीच्यावर खवा व कंडेन्स्ड मिल्कचे मिश्रण लावा. एकसारखे रोल करून फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करा.

4. चोको ब्रेड पेढा

साहित्य

* ४ ब्रेड स्लाईसेस

* २ मोठे चमचे वितळलेले चॉकलेट

* ५ छोटे चमचे कंडेन्स्ड मिल्क

* २ मोठे चमचे किसलेला नारळ.

कृती

ब्रेड मिक्सरमध्ये घालून चुरा करून घ्या. एका कढईत तूप घालून ब्रेडचा चुरा परतून घ्या. आता यात कंडेन्स्ड मिल्क व वितळलेले चॉकलेट घालून पेढे बनवून त्यांना नारळात घोळवून थंड करून सर्व्ह करा.

कलाकंद

साहित्य

* ६ कप दूध

* पाऊण कप पनीर

* ८ छोटे चमचे साखर

* २ मोठे चमचे मलई
* थोडासा कापलेला सुकामेवा सजावटीसाठी.

कृती

दूध सतत हलवत त्याला आटवून घ्या. नंतर गॅस बंद करून भांडे गॅसवरून उतरवा. आता पनीर चांगले मॅश करुन दुधात घाला व उलथण्याने मिसळा. नंतर भांडे गॅसवर ठेवा. मलई घाला व घट्ट होईपर्यंत शिजवा. काही वेळानंतर जेव्हा मिश्रण खव्यासारखे होऊ लागेल, तेव्हा यात साखर घाला. मिक्स करून तोपर्यंत शिजवा जोपर्यंत बर्फी बनवण्याची इतपत घट्ट होत नाही. आता गॅस बंद करा. एका प्लेटमध्ये तूप लावून मिश्रण त्यात काढून पसरवा. वरून बदाम-पिस्ता घाला. जेव्हा मिश्रण घट्ट होऊ लागेल, तेव्हा चाकूने बर्फीच्या आकाराच्या तुकडयांमध्ये कापा.

5. मिल्क केक

साहित्य

*  ८ कप दूध

* २ मोठे चमचे साखर

* १ मोठा चमचा लिंबाचा रस

* १ छोटा चमचा वेलचीपूड.

कृती

जाड बुडाच्या कढईत दुध गरम होण्यासाठी ठेवा. दुध हलवत उकळून घ्या. जेव्हा दूध १/३ राहील, तेव्हा आच बंद करून लिंबाच्या रसात ३-४ चमचे पाणी मिसळून दुधात घालून मिसळा व नंतर दूध अर्धा मिनिटं तसेच राहू द्या. आता दूध सतत हलवत थोडे आणखी आटेपर्यंत शिजवा. आच मंदच ठेवा. दूध घट्ट आणि रवाळ झाल्यानंतर यात साखर घालून पुन्हा हलवत शिजवा. मिश्रण तयार आहे. आता यात वेलचीपूड घालून चांगल्या पद्धतीने मिसळा. प्लेटमध्ये तूप लावून मिल्क केकचे मिश्रण त्यात घालून सेट होऊ द्या. नंतर आवडीच्या आकारात कापा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें