मृत्यूनंतर सामानाचं काय करायचं?

* सुमन वाजपेयी

अनुराधाच्या पतींचा मृत्यू होऊन दीड वर्ष झालीत. मृत्यूदेखील अचानक झाला होता. कोणताही आजार नव्हता. हार्ट अटॅक आला आणि इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. आता ते गेल्यानंतर त्यांच्या वस्तू म्हणजेच चष्मा, मोबाईल, परफ्युम, घड्याळ, शेविंगचं सामान, चपला जशाच्या तशा ठेवल्या आहेत.

अनुराधाला त्या वस्तू तिथून काढण्याची व कोणाला देण्याची हिम्मतच होत नाही. प्रत्येक गोष्टीसोबत तिची एक आठवण जोडली आहे आणि ती वेगळी करण्याच्या विचाराने ती अधिकच घाबरून जाते. आपल्या मृत्यूच्या एक दिवसापूर्वी एका परिचितांच्या लग्नात जो सूट घालून ते गेले होते त्याला हात लावून पहाते.

अगदी तिच्या मुलाचंदेखील म्हणणं आहे की बाबांच्या वस्तू जशा आहेत तशाच राहू दे. त्या काढायच्या नाही. जिथे बसून ते काम करत होते ती त्यांची खोलीदेखील अजूनपर्यंत तशीच आहे. अगदी टेबलावर ठेवलेला लॅपटॉपदेखील काढला गेला नाहीए. तिला वाटतं की तिचे पती अजूनही काम करायला बसतील.

एका दु:खद वेदनेनंतर

जर अचानक कोणाचा मृत्यू झाला तर अगोदरपासूनच कोणतीही तयारी करणं शक्य होत नाही. कोणी दीर्घकाळ आजारी असेल वा वृद्ध असेल तर अगोदरपासूनच सर्व गोष्टींबद्दल विचार करता येऊ शकतो. परंतु अचानक निघून जाण्याने शोकाकुल कुटुंबीयांना अगोदर विचार करण्याची संधीच मिळत नाही. मृतकाशी संबंधित प्रत्येक गोष्टीमध्ये तो असल्याची जाणीव होते, तसंच त्याच्या नसण्याचे दु:खदेखील देत रहातं. हे दु:ख केवळ तेच समजू शकतात ज्यांनी हे सहन केलं आहे. महिने, अनेकदा वर्ष लागतात या वास्तविकतेला स्वीकारण्यात आणि तेव्हाच निर्णय घेऊ शकतात की या वस्तूंचं काय करायला हवं.

जाणाऱ्याच्या वस्तूंचं काय करायचं आहे, हे ठरवणं अनेक गोष्टींवरती अवलंबून असतं, ज्यामध्ये मृतकासोबतचं नातं काय होतं, याचादेखील समावेश असतो. जसं नातं असतं त्याच हिशोबाने दु:खदेखील होतं. एका नातवाला आपल्या आजोबांच्या वस्तू हटविताना  तेवढा त्रास होत नाही, जेवढा त्यांच्या मुला वा पत्नीला तो होऊ शकतो.

शालिनीला वाटतं की जेव्हादेखील ती तिच्या आईच्या वस्तू कोणाला दान म्हणून देते तेव्हा तिला जाणीव होते जसं की तिचा एखादा भाग तिच्या हातातून सुटत आहे. हे माहीत असूनदेखील आता आई कधीच परतून येणार नाही. तिने तिचा चष्मा आणि तिची उशीदेखील सांभाळून ठेवली आहे.

जेव्हा कोणी जातं तेव्हा घरातील त्यांचा ट्युथ ब्रशपासून धुण्यासाठी मशीनमध्ये ठेवलेले कपडे, त्यांची पुस्तकं, तिने बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास वा लॅम्प, अर्धवट विणलेलं स्वेटर वा कॉफीचा मगपर्यंत वारंवार त्याच्या जाण्याची आठवण देत असतात. मनाला खूप वाईट वाटतं, तेव्हा आठवण येऊ शकते की या वस्तूंनी वारंवार दुखी होण्यापेक्षा किंवा त्या फेकून वा कोणाला दिल्या जाव्यात. स्वत:साठी असं करणं खूपच कठीण असेल तर एखादे परिचित, मित्र वा नातेवाईकांना असं करायला सांगू शकतो.

वेळ घ्या घाई करू नका

सामानाचं काय करायचं आहे, हा निर्णय घेण्यात घाई करण्याची गरज नसते. वेळ घ्या, म्हणजे या प्रक्रियेतून जाणं तेवढं सोपं नसतं परंतु वास्तविकता स्वीकारण्याची कोणतीही योग्य वेळ नसते. म्हणूनच या वेदनेचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करा. जेवढं या गोष्टींशी जुळून रहाल तेवढेच तुम्हाला स्वत:पासून वेगळं करणं कठीण होईल. काही काळ गेल्यानंतर मृतकाच्या वस्तूंशी संबंधित आठवणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करा.

सामान काढण्याचा अर्थ असा नाही आहे की जाणाऱ्याच्या आठवणीतून तुम्हाला सुटका करून घ्यायची आहे वा त्यापासून नातं तुटलं आहे लोकं असं बोलू शकतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण हे दु:ख तुमचं आहे आणि यातून कसं बाहेर पडायचं आहे हेदेखील तुम्हालाच ठरवायच आहे.

काय आहे योग्य पद्धत

मृतकच्या वस्तू घरात इतर कोणाच्या कामी येऊ शकतात जसं की कपडे इत्यादी. परंतु हे गरजेचं नाही आहे की त्याचा उपयोग करायला हवा. माधवीने कितीतरी वेळा आपल्या मुलाला सांगितलं की त्याने बाबांचे कपडे घालावेत, परंतु त्याने स्पष्टपणे नकार दिला की अशा प्रकारे त्याला बाबांची आठवण अधिक येईल. कोणत्याही नातेवाईकांना कपडे देण्याची तिची हिंमत झाली नाही की कदाचित कोणाला तरी वाईट वाटेल की जो निघून गेला आहे त्याचं सामान वाटत आहे. याला अनेक लोक अपशकुन आणि अशुभदेखील मानतात की जो जगात नाही आहे त्याचं सामान वापरलं तर त्याचंदेखील वाईट होऊ शकतं.

अनेकदा लोक सल्ला देतात की एखाद्या गरजूला म्हणजे गरिबाला द्यावं; त्याला दिलं तर तो आशीर्वाद देईल. परंतु असं होतं का? तुम्ही ज्याला गरजवंत समजून देत आहात त्याच्या उपयोगाचं ते सामान नसावं आणि त्याने एखाद्याला विकून वा कचऱ्यात फेकून दिलं तर ते योग्य राहील का? जेवढा सेंटीमेंटल व्हॅल्यू तुमच्यासाठी त्या सामानाची आहे, ती दुसऱ्यासाठी कशी असू शकते? एखाद्या गरीबाने ते कपडे घातले आणि ते व्यवस्थित ठेवू शकला नाही तर ते घाणेरडे आणि इकडे तिकडे फाटलेले कपडे पाहून तुम्हाला सहन होईल का? अशावेळी सर्वात उत्तम पर्याय आहे की ते सामान विकून टाका. विकण्याचा उद्देश पैसा कमावणं नसला तरी त्यापासून मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करू शकता. त्या पैशांनी एखाद्याची मदत केली जाऊ शकते वा   जर मृतक कोणत्या सामाजिक कार्याशी  संबंधित असेल तर तिथेदेखील मदत करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें