कोविडच्या साथीत रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्याच्या टीप्स

निधी धवन

कोरोनाचा उद्र्रेक संपण्याचे नाव घेत नाही. वास्तविक, देशातील इतर समस्या लक्षात घेता सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली आहे, त्यानंतर पुन्हा आयुष्य सामान्य होत असल्याचे दिसते. याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला कोरोनाबरोबरच जगायला शिकावे लागेल. जरी हे स्वीकारून काही लोक घराबाहेर पडू लागले आहेत, परंतु अद्याप बरेच लोक असे आहेत, जे संसर्गाच्या भीतिने घराबाहेर पडत नाहीएत आणि जे बाहेर जात आहेत त्यांना सतत या भीतिने ग्रासलंय की न जाणे ते कधी या महामारीच्या तडाख्यात सापडतील.

ताज्या आकडेवारीनुसार ५.४ लाख मृत्यूसह जागतिक पातळीवर १.२ कोटीहून अधिक लोक कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडले आहेत. भारतात याचे मृत्यूचे प्रमाण ३०,००० आहे. आतापर्यंत ७.४ लाख केसेस दाखल झाल्या आहेत. त्याच वेळी जर रुग्ण मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रस्त असेल तर जीवघेणा धोका ८ पट जास्त असतो. याचा थेट संबंध कमकुवत रोगप्रतिकारशक्ति आणि वाढत्या वयाशी आहे. अशावेळी मृत्यूचा धोका ६० पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ४ पट आहे, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ९ पट आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ते १५ पटींपेक्षा जास्त आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी कणखर प्रतिकारशक्ति हा एकमेव पर्याय आहे.

एकीकडे हा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर, हात धुणे, सॅनिटायझेशन, कुणाशी हात न मिळविणे, मुखवटे आणि ग्लव्ह्ज घालणे, वैयक्तिक स्वच्छता इत्यादींचे पालन करणे आवश्यक आहे तर दुसरीकडे रोगप्रतिकारशक्ति बळकट होणेदेखील खूप महत्वाचे आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ति बळकट आहे ते कमी आजारी पडतात आणि जरी ते गंभीर आजारी पडले तरी ते सहज बरे होऊ शकतात.

तणाव कमी केल्याने योगा, व्यायाम आणि मेडिटेशन यांच्या मदतीने प्रतिकारशक्ति वाढविली जाऊ शकते. त्याचवेळी योग्य आहार घेणेदेखील रोगप्रतिकारशक्ति सुधारण्यासाठी आवश्यक आहे.

रोगप्रतिकारशक्ती बळकट बनवण्यासाठी काय खावे

पालक, मेथी, मोहरी इत्यादी हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, अँटिऑक्सिडंट्स, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फेट इत्यादी घटक भरपूर असतात. हे सर्व घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यात आणि व्यक्तीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत.

व्हिटॅमिन सी : संत्री, आवळा, लिंबू, किवी, ब्रोकोली, पालक, पेरू इत्यादींना व्हिटॅमिन सीचे मुख्य स्त्रोत मानले जाते. निरोगी शरीरासाठी व्हिटॅमिन सी चे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशकक्ति बळकट बनवते, ज्याच्या सहाय्याने शरीर विविध प्रकारच्या रोगांशी लढण्यास सक्षम होते.

व्हिटॅमिन ए : लाल रंगाची फळे आणि भाज्या जसे की पपई, गाजर, बीटस इत्यादींमध्ये भरपूर व्हिटॅमिन ए असते. ही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ति चांगली होते.

कॅल्शियम : कॅल्शियम हाडांची ताकदच सुनिश्चित करत नाही तर शरीराला रोगाविरूद्ध लढण्यासदेखील सक्षम करते. दूध, दही, पनीर, तूप, चीज, ताक, हिरव्या भाज्या आणि फळांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते.

फायबर : फायबरयुक्त आहाराच्या सेवनाने पचनयंत्रणा मजबूत बनते. तंतुदार भाज्या, ब्राऊन ब्रेड, डाळी, फळे, गव्हाचे पीठ, सुका मेवा, ओट्स, मटर आणि मका इत्यादीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतात. आपण या प्रकारचा आहार घेतल्यास कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करणे शक्य आहे.

तुळशी : तुळशी नैसर्गिकरित्या अँटीबायोटिक म्हणून काम करते. तुळशी शरीराला बऱ्याच रोगांपासून वाचवते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ति बळकट करण्यास मदत करते. दररोज सकाळी उपाशी पोटी तुळशीची ४-५ पाने खावी. या व्यतिरिक्त याचा काढा सर्दी, खोकला यासारख्या समस्यांपासून मुक्ती देतो.

हळद : हळद हा आरोग्यासाठी सर्वात चांगला मसाला मानला जातो, कारण यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ति वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटीफंगल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे शरीराला विविध प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करतात. म्हणून आपल्या अन्नात हळद नक्की घालावी. याशिवाय दुधात हळद घालूनही पिता येते.

मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल : जर आपण वरील गोष्टी योग्य प्रकारे सेवन करण्यास सक्षम नसल्यास, आपण मल्टीव्हिटॅमिन गोळयादेखील घेऊ शकता. रोगप्रतिकारशक्ति सुधारण्यासाठी कॅल्शियम, जस्त, तांबे, मँगनीज आणि व्हिटॅमिन डी ३ सारख्या सूक्ष्म पोषक द्रव्यांचा अधिक वापर केला जाऊ शकतो.

पाण्याचे सेवन : पाणी केवळ आपली तहानच शांत करते असे नाही तर ते स्वत:च औषधासारखे आहे. खरे पाहता पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ति  बळकट होते. म्हणूनच वडीलधारे आणि डॉक्टर नेहमी शक्य तितके जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपली प्रतिकारशक्ति बळकट करायची असेल तर दिवसभरात  किमान ३ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.

रोगप्रतिकारशक्ती बळकट होते व्यायामामुळे : नियमित व्यायामाने शरीराची प्रतिकारशक्ति सुधारली जाऊ शकते. एक सुस्त जीवनशैली नेहमीच कमकुवत प्रतिकारशक्तिस कारणीभूत ठरते. तर व्यायामामुळे आपण केवळ बाहेरूनच तंदुरुस्त राहतो असे नव्हे तर तो आपणास आतूनही फिट ठेवतो. हा मानसिक आरोग्य सुधारण्यासदेखील उपयुक्त आहे. म्हणूनच कोरोनाची परिस्थिती असो वा नसो, रोग टाळण्यासाठी शारीरिकदृष्टया सक्रिय असणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपण योगा आणि व्यायामासह नाचणे, पायऱ्या चढणे-उतरणे, जास्तीत जास्त चालणे, खेळ इत्यादी कृतींचा समावेश करू शकता.

सूर्यप्रकाशाने आजारांपासून मुक्त व्हा : सूर्यप्रकाशामध्ये असे चमत्कारी गुण असतात, ज्यामुळे शरीरावर विविध प्रकारचे संसर्ग आणि कर्करोगाचा परिणाम होण्याची शक्यता कमी होते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ति बळकट होते. व्हिटॅमिन डीचा हा मुख्य स्त्रोत आहे, जो हाडे कणखर करण्यास मदत करतो. म्हणून कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नक्कीच दररोज सकाळी अर्धा तास उन्हात बसावे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें