कोरोनापासून सावध राहावे गर्भवती महिलांनी

– डॉ. सागरिका अग्रवाल

गर्भावस्था ही अशी स्थिती आहे, ज्यात एका महिलेला सर्वात जास्त देखभालीची व सावधगिरी बाळगायची गरज असते. हे सत्य आहे की गर्भार महिला जो आहार घेते आणि ज्याप्रकारच्या जीवनशैलीचे पालन करते त्याचा थेट परिणाम तिच्या गर्भावस्थेवर व होणाऱ्या बाळावर होतो. कोव्हिड -१९ ने प्रत्येक व्यक्तिची जीवनशैली संपूर्णत: बदलून टाकली आहे. देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गर्भार महिलांमध्ये या संक्रमणाचा धोका जास्त आहे. खरे पाहता गर्भार महिलांना वेळोवेळी तपासणी करण्याची गरज भासते पण कोरोनाकाळात त्यांचे बाहेर जाणे धोक्याचे आहे. घराबाहेर जावे लागू नये यासाठी गायनाकॉलॉजिस्ट गर्भार महिलांना ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशनचा सल्ला देतात.

चांगली बातमी ही आहे की व्हायरस प्लॅसेंटाच्या पलिकडे जाऊ शकत नाही. याचा अर्थ हा की पोटात वाढणाऱ्या गर्भाला या व्हायरसचा काही धोका नाही. लॉकडाऊनदरम्यान एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने अगदी सुदृढ बालकाला जन्म दिला होता.पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमच्या तब्येतीबाबत व गर्भावस्थेबाबत निष्काळजीपणा करावा, कारण असे करणे तुमच्यासाठी व तुमच्या होणाऱ्या बाळासाठी अजिबात योग्य ठरणार नाही.

कोरोना व्हायरसमुळे वाढली आहे ताणवाची पातळी

हार्मोनल बदलांमुळे गर्भार महिलांच्या मानसिक स्थितीवर सखोल परिणाम होतो. त्यांच्यात ताण, नैराश्य, चिंता, राग, मूड स्विंग वगैरे या सामान्य समस्या निर्माण होतात, म्हणून या महामारीदरम्यान त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनाचा धोका अशा महिलांना जास्त असल्याने त्यांना तणाव वाटणे स्वाभाविक आहे. एखाद्या गर्भार महिलेला हे खूप जड जाऊ शकते.

या जाणून घेऊ की कोरोना व्हायरस दरम्यान गर्भार महिलांनी कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे व कोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगायला हवी, ज्यामुळे बाळबाळंतीण दोघेही स्वस्थ राहतील.

असे राहा निरोगी

एक चांगली दिनचर्या तयार करा : एक चांगली दिनचर्या तयार करा व रोज त्याचे पालन करा. मातृत्व या विषयावर पुस्तकं वाचलीत तर तुम्हाला कळेल की स्वत:ची व गर्भात वाढणाऱ्या बाळाची निगा कशी राखली जाऊ शकते दिवसभर चांगल्या अॅक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त राहा.

हलकेफुलके व्यायाम करा : व्यायाम ना केवळ तुम्हाला शारीरिक दृष्टया तर मानसिक दृष्टयाही सुदृढ ठेवतात. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करा. यामुळे मेंदूमधील रक्ताभिसरण सुधारते, आनंदाचे हार्मोन्स स्रवतात व ऑक्सिडेंटिव्ह ताण कमी होतो. हलक्या फुलक्या व्यायामाने तब्येत चांगली राहील.

पौष्टिक आहार : तुम्हाला पौष्टिक व संतुलित आहार व शारीरिक चलनवलनाकडे नीट लक्ष द्यायला हवे. अशा पदार्थाचे सेवन करा, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ति बळकट होईल. हार्मोनल चढउतारामुळे कधीकधी भूक जास्त लागते, तर कधी काहीही खाण्याची इच्छा होत नाही. खरी समस्या जी असेल त्यावर लक्ष केंद्रीत करा, दूरदृष्टी बाळगून विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.

चांगली झोप गर्भार महिलेला रोज ६-७ तास झोपेची गरज असते. झोप पूर्ण झाल्याने तिला स्वस्थ व उत्साहित वाटते. चांगल्या झोपेने ताणाची पातळीसुद्धा कमी होते.

विश्रांती आवश्यक : गर्भार महिलेने फार काम अथवा जड सामान उचलू नये. व्यायामसुद्धा हलकाफुलकाच करायला हवा, ज्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होणार नाही. ज्या महिला जड सामान उचलतात किंवा खूप काम करतात व नीट आराम करू शकत नाही त्याच्यात गर्भपाताचा धोका जास्त असतो. म्हणून दुर्लक्ष करू नये व गरजेपेक्षा अधिक काम करू नये.

स्वच्छता आवश्यक : गर्भार महिलेने स्वच्छतेकडे अतिशय लक्ष द्यायला हवे. तसेच कोरोनादरम्यान स्वच्छतेकडे लक्ष देणे आणखीनच आवश्यक आहे. म्हणून व्यक्तिगत स्वच्छतेकडे संपूर्ण लक्ष द्या.

गर्भार महिलेने नेहमी सकारात्मक विचार करायला हवा, ज्यामुळे तिचे भावनात्मक संतुलन कायम राहते. आपला मूड आपले आरोग्य व आपल्या आसपासचे वातावरण कसे आहे यावर अवलंबून आहे. त्यामुळे अशा कोरोनाच्या वातावरणात स्वत:कडे विशेष लक्ष द्या. पौष्टिक आहार व वेळेत जेवण्याची सवय तुम्हाला निरोगी ठेवण्यात मदत करते. शिवाय स्वच्छ वातावरण तुम्हाला मानसिक पातळीवर आनंदी ठेवते. गायनोकोलॉजिस्टने सांगितलेली सर्व औषधे नियमित घ्या. गरज भासल्यास ऑब्स्टेट्रीशिअनशी संपर्क करण्यात मागेपुढे पाहू नका.

काय करू नये

* जोवर स्थिती पूर्णपणे सामान्य होत नाही, घराबाहेर पडू नका.

* तेलकट पदार्थ व जंक फूड खाणे टाळा.

* असा कोणताही पदार्थ खाऊ नका, ज्याने तुम्हाला व तुमच्या बाळाला इजा  पोहोचू शकेल.

* ताप, डोकेदुखी, खोकला व इतर आरोग्यविषयक तक्रारी जाणवल्या तर डॉक्टरच्या सल्ल्याविना कोणतेही औषध घेऊ नका.

* सर्दी पडसे कितीही किरकोळ असले तरीही डॉक्टरशी संपर्क करण्यास अजिबात विसरू नका.

* आपल्या आजूबाजूची जागा अस्वच्छ ठेवू नका.

* घरातील सदस्यांशी बोलताना अंतर ठेवा.

* जड सामान स्वत: उचलू नका.

* खूप वेळ उभे, झोपलेले अथवा बसून राहू नका, याने बाळाच्या वाढीवर परिणाम होतो.

* धूम्रपान, दारू अथवा तंबाखू याचे सेवन टाळा.

* चहा, कॉफीसुद्धा जास्त प्रमाणात घेऊ नका.

* आपल्या गर्भावस्थेबाबत सल्ल्यासाठी जास्त लोकांशी चर्चा करू नका, कारण एखादी व्यक्ति आपल्या अनुभवानुसार सल्ला देते. आपल्या समस्यांबाबत आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे योग्य असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें