पोशाख पाडतो विचारसरणीवर प्रभाव

* नसीम

मानसी क्राईम रिपोर्टर अर्थात गुन्हे पत्रकार होती. ती एक संवेदनशील आणि धाडसी पत्रकार होती. कानपूरमध्ये ती बहुतेक सलवार-कुर्ता घालून रिपोर्टिंग करायची. या पोशाखात तिला कधीही कोणतीही अडचण आली नाही. या पोशाखाचा तिच्या कामावर काही परिणाम होईल असे तिला कधीच वाटले नाही. तिला या पोशाखात ऊर्जेची कमतरता भासली नाही, उलट खूप आरामदायक वाटायचे. शहरातील लोकांना तिच्यातील क्षमतेची जाणीव होती. तिला मुलाखत देताना कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने कधीही टाळाटाळ केली नाही. तिने आतल्या गोष्टीही अगदी सहज बाहेर काढल्या.

२००८ मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून बदली झाल्यानंतर मानसी दिल्लीत आली, त्याच दरम्यान दिल्लीत अनेक दहशतवादी घटना आणि बॉम्बस्फोट झाले. मानसीने तिच्या मासिकासाठी या घटना पूर्ण संवेदनशीलतेने कव्हर केल्या. रुग्णालयात जाऊन पीडितांच्या प्रकृतीची विचारपूस केली, परंतु संबंधित विभागाचे डीसीपी आणि गुन्हे शाखेचे प्रमुख यांच्याकडून माहिती घेण्यासाठी अनेक फेऱ्या मारूनही तिला यश मिळाले नाही. तिने पोलीस आयुक्तांची मुलाखत घेण्याचाही प्रयत्न केला, पण तीन दिवस त्यांच्या कार्यालयाबाहेर बसून ती परत आली. मुलाखत मिळू शकली नाही.

असा करा प्रगतीचा मार्ग खुला

प्रत्यक्षात या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्व वेळ माध्यम कर्मचाऱ्यांचा जणू मेळावा भरायचा. जीन्स टॉपमध्ये टिप टॉप दिसणाऱ्या, बॉब केलेले केस विस्कटलेल्या, पूर्ण मेकअपमध्ये पत्रकार कमी आणि मॉडेल्स किंवा अँकरसारख्या दिसणाऱ्या पत्रकारांनाच सर्वत्र महत्त्व मिळत होते.

अधिकाऱ्याचा शिपाई साहेबांशी अशा मुलींची पटकन ओळख करून देत होता. मानसीने व्हिजिटिंग कार्ड देऊनही ती अधिकाऱ्यांना भेटण्यात यशस्वी होत नव्हती.

मानसी चिडून तिच्या कार्यालयात परतली. अधिकाऱ्यांचा बाइट किंवा मुलाखत नसल्यामुळे तिचा अहवाल अपूर्ण असल्याचे सांगत संपादकांनी तो टेबलावर फेकला. मानसीला अश्रू अनावर झाले. तेव्हा सहकारी पत्रकार निखिलने तिचे सांत्वन केले आणि सांगितले की, जर तुला दिल्लीत रिपोर्टिंग करायचे असेल तर आधी तुझे रहाणीमान बदलावे लागेल.

अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारून ३ दिवसांतच मानसीला हे समजले होते की, भलेही तुम्ही चांगले पत्रकार नसलात, तुमच्यात बातम्या लिहिण्याची समज नसली आणि भलेही तुम्ही संवेदनशील नसाल, पण तुम्ही जीन्स – टॉप किंवा पाश्चिमात्य पोशाख घालत असाल, तुमच्या बोलण्यात स्टाईल असेल आणि तुम्ही थोडेफार इंग्रजी बोलू शकत असाल तर तुम्हाला सर्वत्र महत्त्व मिळू लागते. अधिकारी स्वत:हून उभा राहून हस्तांदोलन करतो. तुम्हाला पूर्ण वेळ देतो. तुमच्यासाठी चहासोबत बिस्किटे मागवतो आणि तुमच्या मूर्ख प्रश्नांची गंभीरपणे उत्तरे देतो. पण, जर तुम्ही जुन्या पद्धतीचे कपडे घातले आणि साधे दिसत असाल तर तुमच्या गंभीर प्रश्नांकडेही दुर्लक्ष केले जाते.

जेव्हा मानसीने तिच्या सहकाऱ्याच्या सांगण्यावरून तिचा पोशाख बदलला तेव्हा तिच्या प्रगतीचा मार्ग इतका खुला झाला की, आज ती एका मोठया वृत्तवाहिनीची वरिष्ठ पत्रकार बनली आहे.

आश्चर्यकारक प्रभाव

एखाद्याच्या पोशाखाच त्याच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडतो. समीर एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला आहे. तो सांगतो की, एकदा मला तयारीशिवाय लग्नाला जाण्यास भाग पाडले गेले. मी नातेवाईकांना खूप समजावले, पण त्यांनी मला घरी जाऊ दिले नाही. लग्नाच्या मिरवणुकीत मी साध्या पोशाखातच होतो. मिरवणूक आग्रा ते मेरठला जाणार होती. माझ्या एका मित्राचे मेरठमध्ये घर होते. वाटेत लग्नाच्या मिरवणुकीतले सगळे जण माझ्याकडेच बघत आहेत असे मला वाटत होते.

माझ्या पोशाखाबद्दल दुसऱ्याशी कुजबुजत होते. माझ्यात इतका न्यूनगंड निर्माण झाला की, मेरठला पोहोचताच मी लग्नाची मिरवणूक सोडून माझ्या मित्राच्या घरी गेलो. इतकं कसंतरी वाटलं की मी मित्राला सतत त्याबद्दलच सांगत होतो. सकाळी लवकर उठून मी थेट ट्रेन पकडली आणि आर्ग्याला परत आलो. घरी पोहोचेपर्यंत मनात निर्माण झालेली हीन भावना माझा पाठलाग करत होती. त्या दिवशी मला समजले की, आपल्या पोशाखामुळे समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्यामध्येच जास्त नकारात्मकता किंवा सकारात्मकता निर्माण होते आणि तो आरामदायी राहण्यात अडचण येते.

मानवी विचारसरणी आणि पोशाख

चेहऱ्यानंतर माणसाचे लक्ष फक्त पोषाखाकडे जाते. पोशाखाचा मानवी विचारांवर मोठा प्रभाव पडतो. एखादी व्यक्ती नंतर त्याच्या कामाच्या वर्तनातून स्वत:ची ओळख करून देऊ शकते, परंतु लोक त्याच्या पोशाखाच्या आधारावर अनेक पूर्वग्रह करून घेतात. आपण अशा समाजात राहतो जिथे एखाद्या व्यक्तीचा दर्जा आणि बुद्धिमत्ता त्याच्या पोशाखावरून ठरवली जाते.

बुरख्यात डोक्यापासून पायापर्यंत झाकलेली महिला पाहून ती रुढीवादी, अशिक्षित आणि मागासलेली असल्याचा अंदाज लावला जातो, जरी ती उच्चशिक्षित डॉक्टर किंवा वकील असली तरीही. याचप्रमाणे धोतर आणि सदरा घातलेल्या व्यक्तीकडे पाहून तो उच्च समाजातील सुशिक्षित श्रीमंत माणूस आहे, असे कोणीही म्हणणार नाही. जरी तो तसा असला तरीही.

आत्मविश्वास वाढतो

पोशाखाकडे पाहाणारा आणि ते परिधान करणारा या दोघांचे वर्तन आणि विचार बदलण्याची क्षमता पोशाखात असते. टाइट जीन्स टॉप घातलेल्या मुली मेट्रोमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र् असतात. यात त्या स्मार्ट आणि उत्साही दिसतात. जीन्स-टॉपमुळे चालण्यात स्मार्टनेस आणि वेग आपोआप येतो, हे खरे आहे.

आत्मविश्वासाची पातळीही उंचावते

अशा पोशाखात माणसाला विशेषत: मुलींना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटते. त्याचवेळी सलवार-कुर्ता किंवा साडी नेसलेल्या मुली दबून वागताना दिसतात. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. महानगरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत ४५ ते ५० वर्षांची महिला जीन्स घालून काम करताना दिसते, त्या तुलनेत घरात राहणारी त्याच वयाची महिला स्वत:ला वृद्ध समजते आणि धार्मिक कार्यात मग्न होते.

ध्येय बनवा सोपे

भारतीय कुटुंबांमध्ये, सासरच्यांसोबत राहणाऱ्या सुना सहसा साडी किंवा दुपट्टयासोबत सलवार-कुर्ता घालतात. त्या बहुतेक शांत, सुंदर आणि नाजूक दिसतात, पण एखादे जोडपे कुटुंबापासून दूर दुसऱ्या शहरात राहात असेल, तिथे जर सून जीन्स, स्कर्टसारखे पाश्चिमात्य कपडे घालत असेल तर पतीला पत्नीमध्ये आपल्या मैत्रिणीची प्रतिमा दिसते.

त्यांच्यामध्ये आकर्षण, शारीरिक संबंध आणि प्रेम दीर्घकाळ टिकते. ते उत्साही आणि एकत्र फिरायला जाण्यास उत्सुक असतात. याउलट, साडी नेसणाऱ्या महिला अनेकदा तक्रार करतात की, पती त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना कुठेही बाहेर नेत नाहीत, किंबहुना त्यांचा पोशाख पतीसाठी कंटाळवाणा होतो.

सभ्य आणि आरामदायक पोशाख परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो, कारण त्याचा आपल्या कामावर आणि विचारांवर सकारात्मक परिणाम होतो. उत्तम विचारसरणी आणि आत्मविश्वासामुळेच आपण जीवनातील प्रत्येक ध्येय गाठू शकतो.

असे हवे एअरपोर्ट लुक

* पूनम अहमद

विमान प्रवास करायचा असतो तेव्हा चांगले दिसता येईल व आरामदायक असेल असाच पेहराव असावा असे तुम्हाला वाटत असते. तशी तर ही गोष्ट अगदी क्षल्लक वाटते, पण हव्या असलेल्या या दोन्ही गोष्टी एकाच पोषाखात मिळाव्यात यासाठी बराच विचार करावा लागतो. विमान उड्डाण आणि ते नियोजित ठिकाणी पोहोचण्याची वेळ, विमानातील थंड वातावरण हे सर्व लक्षात घ्यावे लागते. तुम्ही देशाबाहेर जाणार असाल तर विमानातून इमिग्रेशन काऊंटरपर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचाही विचार करावा लागतो. तुमचा एअरपोर्ट लुक फॅशनेबल असावा, सुरुवातीपसून शेवटपर्यंत तुम्हाला ताजेतवाने वाटावे यासाठी या काही टीप्स :

* तुम्ही थंड वातावरणातून उष्ण वातावरणात किंवा उष्ण वातावरणातून थंड वातावरणात जाणार असाल तर लेअरिंग करणे तुमच्यासाठी खूप चांगले ठरेल. एअरपोर्टवर जाण्यापूर्वी दोन्ही वातावरणासाठीचे कपडे तयार ठेवा.

* थंड वातावरणातून उष्ण वातावरणात जाताना आरामदायक आणि हलकेफुलके कपडे घाला, जेणेकरुन पोहोचल्यावर अतिरिक्त कपडे आरामात काढता येतील. महिलांनी कॉटन टँक टॉप किंवा ओपन वूल कार्डिगन सोबत छोटया बाह्यांचा एखादा टॉप घालावा. असा पेहराव एअरपोर्ट आणि विमानात त्यांच्यासाठी ऊबदार ठरेल. व्हीनेक असेल तर उत्तम. गरजेनुसार तुम्ही एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी स्कार्फचाही वापर करू शकता. लेगिंग्सही चांगली, पण ती वापरण्यापूर्वी तिचा रंग फिकट तर झाला नाही ना, हे पाहून घ्या. अन्यथा तुमचा पोषाख खराब दिसेल.

* जेव्हा तुम्ही लॅण्ड कराल तेव्हा वुड कार्डिगन बॅगेत ठेवू शकता. चांगला लुक मिळवण्यासाठी पुरुष बटण असलेले ओपन वुड कार्डिगन घालू शकतात.

* कॅज्युअल दिसायचे असेल तर तुम्ही हुडी किंवा स्वेटर शर्ट घालू शकता. आरामदायक आणि स्मार्ट लुकसाठी तुम्ही ते जीन्ससोबत ट्राय करा. लक्षात ठेवा, गरमीच्या ठिकाणी जात असाल तर वजनदार जाकीट किंवा कोट घालू नका. कारण ते वजनदार असल्यामुळे एअरपोर्टवर सहजपणे वावरता येणार नाही.

* थंड वातावरणातून उष्ण वातावरणात जाताना कपडयांचा क्रम उलटा करा. म्हणजे थोडे जास्त ऊबदार कार्डिगन किंवा स्वेटर शर्ट घालून बाहेर पडा. त्यानंतर मात्र गारव्याचा सामना करण्यासाठी तयार रहा.

* प्रवासाला जाताना स्वत:सोबत जास्त शूज घेऊन जाऊ नका. आरामदायक व स्टायलिश शूजची निवड करा. महिलांनी बॅले फ्लॅट्स किंवा सपोर्टवाले लोफर्स ट्राय करावेत. मोजे घालण्याची गरज नाही. ते दोन्ही वातावरणात फॅशनेबल आणि चांगले दिसतात. पुरुष लेस नसलेले लोफर्स घालू शकतात. यामुळे सिक्युरिटी चेकिंगदरम्यान वेळ लागणार नाही. लेस काढणे, बांधण्याची कटकट राहणार नाही.

* एअरपोर्ट ही बोल्ड प्रिंट आणि ब्राईट कलर्स वापरण्याची जागा नाही. ब्लॅक नेव्ही किंवा बेंज कलर वापरा. सफेद कपडे लवकर खराब होतात. त्यामुळे ते घालू नका.

* फ्लाईट्ससाठी तयार होताना फेब्रिकवर लक्ष द्या. कपडयाचे फेब्रिक चांगले असायला हवे. इकडे तिकडे जावे लागत आल्यामुले तुम्ही थकून जाता. गरम होऊ लागते. विमानात गारवा असतो. त्यामुळे तुमचे कपडे असे हवे जे घातल्याने दोन्हीही वातावरणात तुम्हाला आराम मिळेल. नॅचरल फेब्रिक वापरा. जे मऊ, हवेशीर असतात. सुती आणि तागाचे कपडे चांगले असतात. ते उबदार, हलकेफुलके  असतात. सिंथेटिक फेब्रिकमुळे घाम येतो, शिवाय कम्फर्टेबल वाटत नाही.

* तुम्हाला थेट मीटिंग किंवा इव्हेंटला जायचे असेल तर तुमच्याकडे ड्रेस चेंज करायला वेळ नसतो. अशावेळी रिंकल फ्री फेब्रिक घाला. सिल्कही घालू शकता. हे रिंकल फ्री असतात शिवाय प्रोफेशनल लुकही मिळतो. नेहमी फ्लाईट्समध्ये स्वत:सोबत एक्स्ट्रा कपडे ठेवा. हलक्या वजनाचा कॉटन स्कार्फ तुम्हाला ऊब मिळवून देईल, शिवाय तुम्ही तो तुमच्या बॅगमध्ये सहज ठेवू शकता.

* फ्लाईटमध्ये आराम आणि स्टाईलसाठी कपडयांसोबत तुमच्याकडे काही असे ब्युटी प्रोडक्ट्सही हवे ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण ट्रीपवेळी फ्रेश वाटेल.

* नेहमी चांगले डिओड्रंट सोबत ठेवा. कधीकधी एअरपोर्टवर खूप चालावे लागते, तेव्हा घाम आल्यावर तो वापरा. अराइवलपूर्वी हँड वाईप्स आणि फेशियल वाईप्स वापरल्यास ते तुम्हाला फ्रेश लुक देईल. तुम्ही फेशियल वॉटर, स्प्रेही वापरू शकता. जर कनेक्शन असलेली लांबची फ्लाइट असेल तर अंडर गारमेंटची एक्स्ट्रा जोडी नेहमी सोबत ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें