* पूनम पाठक
फिल्म ‘सुपर थर्टी’मध्ये रितिक रोशनद्वारे केल्या गेलेल्या जबरदस्त अभिनयाने त्यांना यशाच्या शिखरावर आणून उभे केले. त्यांचा पुढला चित्रपट ‘वॉर’नेदेखील बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली, पण खूप कमी लोक हे जाणत असतील की गेल्या काही काळापासून ते पुष्कळ मानसिक तणावाच्या काळातून जात आहेत. प्रथम कंगना सोबतच्या त्यांच्या वादाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनाला चर्चेत आणले होते. नंतर पत्नी सुजान सोबतच्या घटस्फोटाने त्यांच्या वैवाहिक जीवनात गोंधळ माजवला. यानंतर बहिणीचे डिप्रेशन आणि वडिलांच्या गंभीर आजारानेदेखील त्यांना पुष्कळ तणावात ठेवले. स्वत: त्यांना अॅक्शन थ्रिलर फिल्म ‘बैंगबैंग’च्या सेटवर एक्सीडेंटमुळे सर्जरीतून जावे लागले.
रितिकच्या मते छोटया-मोठया मानसिक तणावांच्या दरम्यान जर त्यांची कुणी पुष्कळ साथ दिली असेल तर तो त्यांचा जिम ट्रेनर क्रिस गर्थिन आहे, ज्याने ना केवळ त्यांना स्ट्रेसमधून बाहेर आणले, तर त्यांना फिजिकली फिट होण्यातदेखील त्यांची मदत केली. स्ट्रेस दूर पळवण्यासाठी रितीक एक्सरसाइजलाच सर्वात उत्तम मार्ग मानतात. कित्येक अन्य स्टारदेखील वेगवेगळया प्रकारांनी आपल्या स्ट्रेस किंवा दडपणापासून रिलॅक्स होतात, जसे शिल्पा शेट्टी आपला स्ट्रेस दूर करण्यासाठी कुकिंग करणे पसंत करतात, तर बिपाशा बासू आपल्या फेवरेट संगीतासोबत मसाज घेणे. वरून धवन आपले टेन्शन संपवण्यासाठी परिवारासोबत सुट्टया घालवणे पसंत करतात, तर शाहिद कपूरचा स्ट्रेस बस्टर आहे लाँग ड्राईव्ह.
काय आहे तणाव
मुळात काय आहे हा मानसिक दबाव किंवा तणाव आणि सोबतच जाणून घ्या याची कारणे आणि उपाय :
तज्ज्ञांच्या मते तणाव व्यक्तीच्या मन आणि मेंदूची निर्माण होणारी ती अवस्था आहे ज्यात तो जीवनाच्या प्रत्येक बाजूवर नकारात्मक पद्धतीने विचार करणे सुरू करतो. मानसिक दबावाची ही स्थिती जर दीर्घकाळापर्यंत अशीच राहिली तर व्यक्तीचे मन कोणत्या कामात लागत नाही. तो छोटया छोटया गोष्टींवर आक्रमक होऊन उठतो. कधीकधी ही समस्या वाढत जाऊन आत्महत्येच्या स्थितीपर्यंतदेखील पोहोचते. जीवनात तणाव वेगवेगळया कारणांमुळे होऊ शकतो, उदाहरणार्थ वैवाहिक, प्रेम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये कटुता येणे, करियरमध्ये योग्य ग्रोथ न करू शकणे, कार्यभार आणि जबाबदाऱ्यांचे अधिक्य, आर्थिक अडचणी इत्यादी. परंतु जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. जर समस्या आहे तर कुठे ना कुठे त्याचे उपायदेखील असतील. आपली इच्छा असेल तर या तणावातून मुक्तीचा उपायदेखील आपण शोधू शकतो.
जर तुम्ही देखील चिंता आणि तणावासारख्या स्थितीशी झगडत असाल, तर काही सोपे उपाय वापरून यातून बाहेर निघू शकता.
सकारात्मक विचार : हे तर नक्की आहे की नैसर्गिकरीत्याच कुणीही जीवनाच्या संघर्षापासून वाचलेला नाहीए. कधी यश आपली झोळी आनंदाने भरून देते, तर कधी अपयशातून आलेले नैराश्य आपल्यावर खोलपर्यंत आघात करते. सांगण्याचा अर्थ हा की जेव्हा परिस्थिती सदैव एकसारखी राहत नाही, तेव्हा जीवनात एकसारखेपणा कसा राहू शकतो. त्यामुळे कधीही जीवनात येणाऱ्या अडचणीपासून घाबरून पळू नका. उलट त्यांचा धीराने सामना करण्याची युक्ती शोधा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये समोर येत असलेल्या अडचणींशी दोन हात करण्याचा धीर ठेवा. मोठयात मोठा तणावदेखील गायब होऊन जाईल. फक्त तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा.
तुलना करू नका : सर्वांचे आपापले जीवन सर्वांच्या आपापल्या प्रवासावर आधारित आहे हे ज्ञान. आपले जीवन वेगळे आहे तर स्वाभाविक आहे की अडचणीदेखील वेगळया असणार. इतरांशी तुलना करून स्वत:ला विनाकरण तणावात टाकू नका. इतरांच्या सुखामुळे दु:खी होऊ नका, ना कुणाच्या दु:खामध्ये आपल्या आपला आनंद शोधा. अनावश्यक स्वरूपातील कोणा इतरांशी केले गेलेली तुलना आपला मानसिक ताण आणखीच वाढवते.
अडचण नाही, उपायांवर फोकस करा : जास्त नाही तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की समस्येविषयी सदैव विचार करत राहू नका आणि त्याच्या भीतीलादेखील स्वत:वर हावी होऊ देऊ नका. त्याच्या उपायांच्या सर्व पर्यायांवर विषयी शांतपणे विचार करा आणि ते अंमलात आणा. विश्वास ठेवा तुम्ही असे करण्याने समस्या कधी दूर झाली तुम्हाला कळणारदेखील नाही.
व्यस्ततेत मस्त राहा : तणावापासून दूर राहण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे व्यस्त राहणे. मोठयातली मोठी समस्या असली, तरी मस्त राहून जीवन आधीसारखे जगत रहा आणि छोटया छोटया क्षणांमधील आनंद वेचत चला. सदैव पाहिले गेले आहे की एखादा मोठा आनंद मिळवण्यासाठी किंवा लक्ष्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आपण जीवनातील छोटया छोटया गोष्टी आणि आनंद दुर्लक्षित करत जातो.
परिणामी आपण त्या आनंददायी क्षणांना तर हरवून टाकतोच, त्या आनंदामुळे मिळणाऱ्या आपल्या ऊर्जा अर्थात एनर्जीलादेखील हरवतो, जी कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे व्यस्त आणि मस्त राहून तणाव रुपी राक्षसालाच मात द्या.
जिम किंवा एक्सरसाइज : एक्सरसाइजद्वारेदेखील तुम्ही तुमच्या आतील पूर्ण तणाव, चिडचिडेपणा आणि राग दूर करू शकता. नियमित वर्क आऊटमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्याससोबतच आपली शारीरिक आणि मानसिक थकावटदेखील दूर होते आणि स्वाभाविकच आपण स्वत:ला अधिक ऊर्जावान आणि स्फूर्तीदायक बनलेले जाणवतो. व्यायाम स्नायूंना गतिशीलता प्रदान करतो आणि वर्कआऊटमुळे मानसिक आणि शारीरिक स्तरावर आपण फिट राहतो.
आपले छंद किंवा आवडी जगणे : तुम्ही तुमचे छंद किंवा आवडीदेखील तणाव मुक्त होण्याचा उपाय म्हणून वापरू शकता, जसे आपल्या आवडीचे संगीत ऐकणे, लाँग ड्राईव्हवर जाणे, डान्स करणे, कुकींग करणे किंवा अन्य एखाद्या आवडत्या क्रिएटिविटीमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवणे, जेणेकरून जीवनातील अडचणी आणि समस्यापासून काही वेळ दूर राहिले जाईल आणि शांत चित्त होऊन त्यांचा उपाय शोधला जाईल.
हे छोटे-छोटे उपायदेखील स्ट्रेस बस्टरचे काम करू शकतात :
* सदाबहार आणि आनंदी लोकांची सोबत तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. त्यामुळे त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा आपली चिंता आणि तणाव त्या कौटुंबिक मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, ज्यांना तुमची काळजी आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी कमी होऊ शकतात.
* पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या, जेणेकरून शारीरिक स्तरावर फिट राहू शकाल. म्हणजे तणावाच्या स्थितीत जंक फूड किंवा अत्यधिक मसालेदार जेवणापासून अंतर ठेवायला हवे.
* यावेळी पुष्कळ झोपेची आवश्यकता असते. हो, गरजेपेक्षा जास्त विचार करू नका. अन्यथा डोक्यामध्ये जडपणा आणि आळसाची समस्या निर्माण होऊ शकते.
* शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याचा प्रयत्नदेखील करू नका, कारण अशा स्थितीत मानसिक तणावा सोबतच फिजिकल प्रॉब्लेमशीदेखील लढावे लागू शकते.
* तणावातून मुक्त होऊ शकत नसाल तर डॉक्टरांशी संपर्क करा, कारण अधिक काळ तणावाची स्थिती गंभीर परिणाम देऊ शकते.