ब्रायडल मेकअपचा ट्रेडिशनल ढंग

* ललिता गोयल

प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं की तिने आपल्या विवाहप्रसंगी सर्वात सुंदर अन् खास दिसावं. तिचा मेकअप ग्लोइंग, नॅचरल आणि लाँगलास्टिंग असावा असं तिला वाटत असतं.

दिल्ली प्रेस भवनमध्ये आयोजित मीटिंगमध्ये मेकअप आर्टिस्ट गर्वित खुरानाने ब्रायडलचा ट्रेडिशनल लुकचा मेकअप शिकवण्यासोबत टीका सेटिंग, हेअरस्टाइल व साडी ड्रेपिंगसुद्धा शिकवलं. येथे ट्रेडिशनल लुकच्या मेकअपचं तंत्र जाणून घेऊया…

्रेडिशनल ब्रायडल लुक

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याचं व्यवस्थित क्लिंजिंग करा. त्यानंतर एक अंडरबेस लावा जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकून राहिल. गर्वितने ट्रेडिशनल ब्राइडच्या मेकअपमध्ये एक प्रकारच्या पॅनकेक (लस्टर पॅनकेक)चा वापर केला. त्याने मेकअपच्या सुरुवातीला प्रायमर लावलं. त्यानंतर बेस लावला. मग टीएल पावडर लावली. त्यानंतर पॅनकेक लावला. चेहऱ्यावरील डागव्रण लपवण्यासाठी कन्सीलरचाही वापर केला.

गर्वितने सांगितलं की अलीकडे ब्रायडल मेकअपमध्ये शिमर लुक ट्रेण्डमध्ये आहे, त्यामुळे जर एखाद्या नववधूची इच्छा असेल तर ती आपल्या मेकअप आर्टिस्टला शिमर फाउंडेशनचा वापर करायलाही सांगू शकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. जर तुम्ही शाइनिंग पावडर लावणार असाल, तर लूज पावडरचा वापर करू नका; कारण यामुळे फाउंडेशनची चमक फिकी पडेल. फेसकटिंग व कंटूरिंगच्या माध्यमातून सामान्य चेहरासुद्धा नीटसा कोरीव दिसू लागतो.

हायलाइटरच्या मदतीने चेहऱ्यावरील आकर्षक भाग हायलाइट करा. ब्लशरमध्ये हलक्या शेडचा जसं की पिंक, पीच रंगाचा वापर करा.

डोळे : कोणत्याही वधूच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप खूप महत्त्वपूर्ण ठरतो. डोळ्यांवर आयशॅडो लावण्यापूर्वी आयलिडवर आयवॅक्स लावा. यामुळे आयशॅडो दीर्घकाळ टिकेल. अशाचप्रकारे लोअर आयलिडवर आयशॅडो आयसिलरसोबत लावा, मग ते पसरणार नाही. काजळ पेन्सिलने डोळे हायलाइट करा. काजळ लावल्यानंतर आयलायनर लावा. त्यानंतर मसकारा लावा. मसकारा आतील लॅशेजवर हलक्या रंगाचा आणि बाहेरच्या बाजूला थोड्या गडद रंगाचा वापरा. बाहेरच्या बाजूला थोडा अधिक गडद करा आणि भुवयांकडे थोडा हलका ठेवा. डोळे जर लहान असतील, तर ते मोठे दाखवण्यासाठी पापण्यांच्या बाहेरील कडेवर वरच्या बाजूस हलक्या रंगाची पावडर शॅडो छोट्या ब्लशरच्या मदतीने लावा. क्रीमजवळ गडद रंगाच्या शॅडोचा उपयोग करा परंतु नाकाकडे डोळ्यांच्या आतील भागावर कोणताही रंग वापरू नका. नाहीतर लहान डोळे अधिक लहान दिसतील. कडांवर शॅडो लावण्यासाठी ब्रशचा वापर करा.

ओठ : अलीकडे ग्लॉसी ओठांची फॅशन आहे. यासाठी आधी ओठांना लिपलायनरच्या सहाय्याने आकार द्या. मग ड्रेसला मॅच करणारी लिपस्टिक लावा. लिपस्टिक ब्रशने लावा. यानंतर लिपग्लॉस लावा. लक्षात घ्या की लिपस्टिकचा रंग ब्रायडल ड्रेसहून १वा २ नंबर गडद असावा.

बिंदी : बिंदी ट्रेडिशनल ब्रायडल मेकअपचा महत्त्वपूर्ण हिस्सा ठरते. ब्रायडल बिंदीची निवड चेहऱ्यानुसार करा. जर चेहरा गोल असेल तर लांबट बिंदीची निवड करा आणि लांबट असेल तर गोल बिंदीची आणि जर चौकोनी असेल तर डिझायनर बिंदी लावा.

हेअरस्टाइल : नववधूचा मेकअप खास असेल तर हेअरस्टाइलही डिफरण्ट व एलिगंट असली पाहिजे. ब्राइडला स्टायलिश हेअरस्टाइल देण्यासाठी सर्वप्रथम इयर टु इयर केसांचा एक भाग बनवा. मागच्या केसांचा एक पोनी बनवा. इयर टु इयर भागातून एक रेडियल सेक्शन घ्या आणि क्राउन एरियामध्ये आर्टिफिशिअल बन लावून पिनने सेट करा. मग रेडियल सेक्शनच्या केसांची एकेक बट घेऊन बॅककौंबिंग करून स्प्रे करा. या केसांचा उंच पफ बनवा आणि पिनने व्यवस्थित सेट करा. दोन्ही बाजूंच्या केसांमध्येही स्प्रे करून पोनी वरच्या बाजूला सेट करा.

आता पोनीवर आर्टिफिशिअल लांबट वेणी बनवा. पोनीवर गोल आर्टिफिशिअल मोठा बन लावा. आर्टिफिशिअल केसांमधून १-१ बट घेऊन बनच्यावर पिनने सेट करा. मग त्या केसांची नॉट बनवून बनवरच बॉब पिनने सेट करा. अशीच एक वेणी ३ नॉट अंबाड्यामध्ये गोलाकार तर दुसरीकडेही तशीच नॉट लावा. आता अंबाड्याच्या साइडला आणखीन एक वेणी लावा. अखेरीस केस बीड्सद्वारे अॅक्सेसराइज करा. पुढे समोरच्या बाजूलाही अॅक्सेसराइज करा.

मांगटीका सेटिंग

नववधूचा शृंगार मांगटीक्याविना अपूर्ण भासतो. नववधूच्या साजशृंगारातील हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा मानला जातो. सध्या चांदबाली स्टाइल व स्टोन पेंडेंट मांगटीका चलनात आहे. सेंटर पार्टिंग हेअरस्टाइल व सिंपल ब्रायडल बन हेअरस्टाइलसोबत मांगटीका नववधूचं सौंदर्य खुलवतो. जर कुणी ब्राइड मुगल लुक क्रिएट करू इच्छित असेल तर ते झुमर स्टाइल वा शैंडलियर स्टाइल मांगटीका लावू शकता.

मांगटिक्यासोबत अपडू, हेअर हाफ अप आणि साइड बॅगसारखी हेअरस्टाइल अतिशय सुंदर दिसते. या हेअरस्टाइलसोबत कपाळावर चमकणारा मांगटीका अतिशय आकर्षक दिसतो. गोल चेहऱ्याच्या तरुणींनी फ्रंट पफ हेअरस्टाइलसह मांगटीका कॅरी केला पाहिजे. दीपिका पादुकोण व आलिया भट्टसारख्या अभिनेत्री तर मोकळ्या केसांसोबतही टीका कॅरी करत आहेत आणि तरुणी त्यांची स्टाइल फॉलो करतात. जर नववधूचा चेहरा चौकोनी असेल तर ती झुमर स्टाइल टीका कॅरी करू शकते.

जर नववधूचं फोरहेड लहान असेल तर तिने लहान आकाराचा मांगटीका वापरावा. लक्षात घ्या की मांगटीका हेवी असेल तर नथ हलकी वापरा आणि जर मांगटीका हलका असेल तर नथ ठसठशीत वापरा. यामुळ लुक बॅलन्स दिसतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें