वधूच्या त्वचेच्या काळजीसंदर्भातील टीप्स

* कॉस्मोटोलॉजिस्ट अधिरा जे. नायर

आपल्या खास दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी आपण खूप सुंदर दिसावे असे प्रत्येक वधूचे स्वप्न असते जेणेकरून प्रत्येकाची नजर तिच्यावरच खिळून राहील. म्हणूनच प्रत्येक वधूला त्या खास दिवशी सुंदर दिसण्यासाठी तिच्या मेकअपची चिंता असते, कारण हा दिवस आयुष्यात एकदाच येतो. चांगली त्वचा आणि इवन बेसशिवाय कोणताही मेकअप लुक चांगला दिसू शकत नाही, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुमच्या चेहऱ्यावर मुरुम किंवा इतर डाग असतील तर तुम्ही तुमच्या खास दिवशी उठून दिसणार नाही. तुम्हाला लग्नाच्या दिवशी उठून दिसायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या त्वचेची काळजी घ्या, त्यानंतर मेकअपकडे लक्ष द्या.

लग्न सोहळयाला जाताना आणि त्यासाठीची तयारी करताना तुम्ही स्वत:ला तणावापासून दूर ठेवा. सोबतच पुरेशी झोप घ्या. तुमच्याकडे सौंदर्य तज्ज्ञांना भेटायला वेळ नसेल किंवा तुम्हाला ते परवडत नसेल तर तुम्ही लग्नाच्या काही दिवस आधी चुकूनही तुमच्या त्वचेवर कोणताही प्रयोग करू नका.

येथे प्रत्येक वधूसाठी उपयोगी पडतील असे काही पर्याय सुचवले आहेत. ते खालीलप्रमाणे :

प्रोफेशनल ट्रीटमेंट

हाय फ्रिक्वन्सी मशीन : तुम्हाला मुरूम किंवा पुरळ, पुटकुळयांची समस्या असेल तर हाय फ्रिक्वन्सी मशीन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, कारण ती त्वचेला संसर्गविरहित ठेवते, पुळया दूर करून त्वचा निरोगी ठेवण्यासह त्वचेचे तापमान वाढवण्यासाठी आवश्यक असलेली उष्णता मिळवून देतो.

हाय फ्रिक्वन्सी मशीनचे फायदे पुढीलप्रमाणे :

* मुरूम किंवा पुळया कमी करून थंडावा मिळवून देते.

* त्वचेवरील मोठया रंध्रांना छोटे करते.

* त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरते.

* लिम्फेटिक ड्रेनेज म्हणजे लसिका संस्थेच्या कार्यास प्रोत्साहन देते.

* डोळयांची सूज आणि वर्तुळे कमी करते.

फेस वॅक्यूम

हे उपचार त्या महिलांसाठी सर्वोत्तम आहेत ज्या त्वचेला खराब होण्यापासून वाचवू इच्छितात. ही मशीन तुमच्यातील रक्ताभिसरण वाढवून तुम्हाला नितळ, चमकदार त्वचा मिळवून देण्याचे काम करते. त्वचा निरोगी बनवून लसिका आणि रक्ताभिसरण दोन्ही वाढवण्याचे काम करते.

गॅल्वेनिक

ही त्वचेच्या खोलवर जाऊन तिला स्वच्छ करणारी उपचार पद्धती आहे, जी फोलिकलमध्ये सिबम आणि केराटिनला मुलायम बनवते. तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांसाठी ही उत्तम उपचार पद्धती आहे. याचे फायदे पुढील   प्रमाणे :

* मुरूम तयार करणाऱ्या तेलाला नष्ट करते.

* त्वचेची खोलवर स्वच्छता करते.

* रुक्ष त्वचेला टवटवीत बनवते.

* रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते.

केमिकल पीलिंग

या उपचार पद्धतीत त्वचेला एक्सफॉलिएट करण्यासाठी अॅसिडचा वापर केला जातो. ते त्वचेच्या नुकसानग्रस्त पेशींना काढून टाकते. यामुळे त्वचेवरील डाग, पिगमेंटेशनची समस्या कमी होऊन त्वचा उजळते. याचे फायदे पुढीलप्रमाणे :

* चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

* यूव्ही म्हणजे अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण होते.

* त्वचेचा पोत सुधारतो.

मायक्रोडर्माबेशन

हीदेखील केमिकल पीलप्रमाणेच करण्यात येणारी एक्सफॉलिएट प्रक्रिया आहे. फरक एवढाच की, यात अॅसिड किंवा रसायने वापरली जात नाहीत. यात एका मशीनचा वापर केला जातो.

घरगुती उपचार पद्धती

* योग्य फेसवॉशची निवड करा.

* केमिकल एक्सफॉलिएटचा वापर करा.

* तुम्ही मेकअप केला असेल तर तोंड दोनदा स्वच्छ करा.

* तुमच्या त्वचेला सुयोग्य ठरत असेल तर रेटिनॉलचा अवश्य वापर करा.

* त्वचेच्या प्रकारानुसार आठवडयातून १-२ वेळा मास्क नक्की लावा.

२३ ब्रायडल मेकअप टीप्स

* श्रावणी

नववधू बनण्याची तयारी १-२ दिवसाचं काम नाही आहे तर लग्न ठरताच स्वत:चं शरीर तसंच सौंदर्याची काळजी घ्यायला सुरुवात करायला हवी.

१. नववधूच्या सौंदर्यात केवळ चेहराच नाही तर डोक्यापासून पाय तसंच हाताचंदेखील महत्त्व असतं. म्हणूनच संपूर्ण शरीराची योग्य प्रकारे काळजी घ्यायला सुरुवात करायला हवी.

२. लग्नाच्या खूप अगोदरपासूनच हात आणि पायाची योग्य निगा तसंच आहाराकडे लक्ष देण्याबरोबरच चेहऱ्याच्या त्वचेवर उपचार तसंच योग्य काळजीदेखील घ्यायला हवी.

३. नववधूचा मेकअप पार्लरमध्येच करायला हवा. ही इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे. कारण मेकअप आता एक नवीन आर्ट बनलं आहे.

४. बराच अगोदर त्वचेनुसार उठणं, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, मेहंदी, मसाज इत्यादी केलं जातं. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होतो आणि त्यावर चमकदेखील येते.

५. मेकअप करण्यापूर्वी ब्युटी ट्रीटमेंट घेणंदेखील गरजेचं आहे. जसं की त्वचेवर डाग असतील तर ४-५ आठवडयापूर्वीच त्यावर उपाय करायला हवे म्हणजे त्वचेतील मोकळी रंध्रे बंद होतील आणि त्वचेवर डागदेखील कमी होतील.

६. तुमच्या त्वचेचा पोत तुम्हाला माहित असायला हवा.

७. त्वचा खूप कोरडी असेल तर मेकअप केल्यावरती सुरकुत्या दिसू लागल्यावर चेहरा खूपच वाईट दिसतो आणि यामुळे मेकअपचा गेटअपदेखील जातो म्हणून लग्नाच्या काही आठवडे अगोदर त्वचेवर उपचार करा, फेशियल करा, त्वचेला टोन अप करा यामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचादेखील चमकू लागेल.

८. वाढत्या प्रदूषणामुळे चेहऱ्यावरती बरीच मृत त्वचा एकत्रित होते. ती काढावी.

९. मृत त्वचेमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते आणि चेहऱ्यावर चमक येत नाही. यासाठी मृत त्वचा काढण्यासाठी उपचार केल्याने ती अधिक ताजी तवानी दिसते.

१०. नववधूचा शृंगार सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची त्वचा कशीही असो तेलकट, कोरडी वा सामान्य. त्वचेनुसारच नववधूचा शृंगार करायला हवा. निष्काळजीपणा आणि चुकीच्या मेकअपने वाईट परिणाम दिसू शकतात.

खास तयारी

११. मेकअप आणि पेहेरावाचा रंग यांचा ताळमेळ साधणं गरजेचं आहे. जसं गव्हाळ रंगाच्या नववधूवर पीच रंग, गव्हाळ रंगावर मरून वा सोनेरी रंग छान दिसतो तर गोऱ्या रंगावरती प्रत्येक रंगाचा पेहराव खुलून दिसतो.

१२. ब्रायडल बुकिंग चार ते आठ आठवडयापूर्वी करा म्हणजे सौंदर्यतज्ज्ञ तुमच्या त्वचेनुसार संबंधित माहिती देतील.

१३. मेकअपन सौंदर्य उजळण्यासाठी करा. तुमची वास्तविकता लपविण्यासाठी नाही.

१४. मेकअप करतेवेळी शरीराच्या प्रत्येक भागाकडे लक्ष द्या. मलीन हातपाय तुमचं सौंदर्य खराब करू शकतं.

१५. मेकअप चेहऱ्याची ठेवण आणि रंग लक्षात घेऊन करा.

१६. मेकअप आणि दागिन्यांचा ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे.

लग्नाच्या दिवशीचा मेकअप

१७. मेकअपपूर्वी त्वचेचं ग्रुमींग होणं गरजेचं आहे. यामुळे नववधूचा सर्व थकवा दूर होतो. म्हणून लग्नाच्या दिवशी मेकअप सुरू करण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास अगोदर त्वचेला ग्रुमींग केलं जातं.

१८. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावरती कोणतेही डाग नाहीत ना हे पाहणं गरजेचं आहे.

१९. भुवयांचा आकार योग्य असावा. एक केस जरी दिसला तरी त्याच वेळी तो काढून टाका. त्यानंतर कोल्ड कम्प्रेसर देऊन पॅक लावून मेकअप सुरू करा.

२०. सर्वप्रथम त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता बेस लावा. जर त्वचा खूपच कोरडी असेल तर एक दोन थेंब मॉइश्चरायजर वा टोनर लावा.

२१. यानंतर डोळयांना आकार आणि पेहरावशी मॅच करणार आयशाडो आणि टफर लावा. त्यानंतर लाइनर व मस्कारा लावा. नंतर आयब्रोजला हलक्या पेन्सिलने योग्य आकार द्या.

२२. चेहऱ्याची ठेवण आणि त्वचेच्या रंगानुसार लिप पेन्सिलने ओठांना योग्य आकार देत त्यावर पेहेरावाच्या रंगाच्या एक व दोन नंबर गडद रंगाची लिपस्टिक लावा.

२३. शेवटी डोळयाजवळ कपाळावरच्या भागात डिझायनर बिंदी लावा.

नववधूच्या मेकअपसाठी ९ टीप्स

* डॉक्टर भारती तनेजा, संचालक, एलप्स ब्युटी क्लिनिक अँड अकॅडमी

लग्नसोहळा म्हटले म्हणजे स्वाभाविकपणे तुमच्या डोळयासमोर सिल्क, जरी, मोती, काचांच्या टिकल्या, चंदेरी आणि सोनेरी कलाकुसरीचा लेहेंगा परिधान केलेली नववधू उभी राहते. या पोशाखात ती एखाद्या अप्सरेलाही लाजवेल अशीच दिसत असते. जरदोसीने सजवलेल्या पोशाखात तुमचेही रूप खुलून दिसावे यासाठी मेकअप कसा करायला हवा, हे डॉ. भारती तनेजा यांच्याकडून माहिती करून घेऊया :

सर्वप्रथम हे ठरवा की, तुम्हाला नैसर्गिक रुप हवे आहे की जास्त उठावदार मेकअप करायचा आहे. आजकाल अनेक नववधूंना नैसर्गिक वाटेल असाच मेकअपच जास्त आवडतो. तुम्हालाही जर असे नैसर्गिक रूप हवे असेल तर त्यासाठी तुमच्या मेकअपच्या स्टेप्स पूर्णपणे उठावदार मेकअपसारख्याच असतील, पण मेकअपसाठी वापरलेले रंग सौम्य असतील. अन्य मेकअपचा अगदी थोडासाच वापर करून त्यावर पावडर लावून ती चेहऱ्यावर सर्वत्र व्यवस्थित पसरवली जाते, जेणेकरून संपूर्ण त्वचा एकसमान दिसेल.

नैसर्गिक मेकअप

आपले रूप नैसर्गिक वाटावे यासाठी आयशॅडो ब्लशर, लिपस्टिक आणि हायलायटरचे रंग सौम्य ठेवले जातात. या मेकअपमध्ये विंग्ड आयलायनर लावले जात नाही, फक्त डोळयांची आऊटलायनिंग केली जाते. याच्या मदतीने तुम्ही कपाळावर छोटी टिकलीही काढू शकता.

उठावदार मेकअप

* वधूचा मेकअप तासनतास कायम टिकून रहावा यासाठी वॉटरप्रुफ मेकअपचा वापर करावा, जेणेकरुन सासरी पाठवणीच्या वेळेपर्यंत चेहऱ्याची चमक कायम राहील. याशिवाय लग्नाच्या हॉलमधील झगमगत्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावरील लाली झाकोळली जाणार नाही.

* फक्त डोळे आणि ओठ या दोन ठिकाणीच गडद मेकअप करणे, ही आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. आता एकतर लिपस्टिक सौम्य रंगाची लावा आणि जर डोळयांचा मेकअप सौम्य केला असेल तर लिपस्टिक गडद रंगाची लावा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, मेकअप तुमचा लेहेंगा किंवा लग्नाच्या पेहरावाशी जुळणारा किंवा त्याला पूरक दिसेल असाच हवा.

* डोळे मादक दिसावेत यासाठी बनावट मिळणारे पापण्यांचे केस तुम्ही तुमच्या पापण्यांवर लावू शकता. त्यांना पापण्यांच्या रंगाने कर्ल करा आणि मस्कराचा कोट लावा जेणेकरून ते तुमच्या पापण्यांसारखेच नैसर्गिक वाटतील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या लग्नाच्या २ दिवस आधी बनावट मिळणाऱ्या पापण्या या कायमस्वरूपी लावून घेऊ शकता.

* डोळयांचा आकार व्यवस्थित दिसण्यासाठी विरोधाभासी रंगांचे दोन प्रकारचे लायनर वापरू शकता. उदाहरणार्थ, पापणीच्या आतील कोपऱ्यावर इलेक्ट्रिक ब्लू आणि बाहेरील कोपऱ्यावर हिरव्या रंगाने विंग्ड लायनर लावा. डोळयांखालीही सौम्य हिरवा रंग लावा, सोबतच डोळयांखालील कडांना गडद जेल काजळ लावा.

* आजकाल कपाळावर मोठी टिकली व भांग भरण्याचा ट्रेंड आहे, अशा परिस्थितीत जर तुमच्या कपाळाचा निम्म्यापेक्षा जास्त भाग हा भांग भरल्यामुळे झाकला गेला असेल, तर लेहेंग्याच्या रंगाशी मिळतीजुळती बिंदी लावा. भांगेत कमी कुंकू लावले असेल तर कपाळाच्या मध्यभागी मोठी बिंदीही लावता येते.

* अशा प्रसंगी, वधू सतत मेकअप नीटनेटका करू शकत नाही, म्हणून आधीच ओठांवर आपल्या लेहेंग्याशी जुळणारी किंवा त्याला शोभेल अशी ओठांवर दीर्घकाळ टिकणारी लिपस्टिक लावा.

* केस म्हणजे जणू डोक्याचा मुकुट असतो. तो सजवण्यासाठी हेअरस्टाईलमध्ये डिझायनर नेक पीस, खडयांनी सजवलेली बनावट वेणी, त्यावर लावलेला कुंदनजडित पट्टा, सुंदर सजवलेली कृत्रिम फुले वापरता येतील. मात्र आजकाल फुलांचा ट्रेंड आहे, त्यामुळे केसांसाठी फक्त फुलांचाच वापर केला जात आहे.

ब्रायडल मेकअप डे अँड नाइट वेडिंगसाठी

* पारुल भटनागर

मेकअपमध्ये स्किनटोन आणि ड्रेसबरोबरच हेही महत्वाचे असते की ते दिवसाला अनुसरून केले आहे की रात्रीला आणि जेव्हा गोष्ट ब्राइडल मेकअपची असते तेव्हा तर या गोष्टीची अधिक काळजी घेणे जरूरी ठरते.

प्रस्तुत आहे, भारती तनेजा डायरेक्टर ऑफ ऐल्प्स ब्युटी क्लिनिक अॅन्ड अॅकेडमीद्वारे दिल्या गेलेल्या काही विशेष टीप्स :

डे ब्राइडल मेकअप

दिवसाच्या ब्रायडल मेकअपसाठी सगळयात आवश्यक आहे मेकअपचा बेस बनवणे. मेकअपचा बेस जेवढा चांगला असेल, मेकअप तेवढाच सुंदर आणि नैसर्गिक दिसेल. बरेच ब्रायडल बेस बनवतानाही चुका करतात, जो मेकअपचा सर्वात महत्वाचा भाग आहे.

मेकअपची सुरूवात प्रायमरने करा. पूर्ण चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे प्रायमर अप्लाय करा. यामुळे चेहऱ्याचा मेकअप करणे सोपे होईल आणि त्वचा एकसारखी दिसेल. नंतर चेहऱ्याच्या डागांवर कंसीलर लावून त्यांना लपवा. डोळयांच्या खाली, आईब्रोजच्यामध्येही कंसीलर अप्लाय करा. असे केल्याने चेहरा डागरहीत दिसेल.

आता पाळी आहे फाउंडेशनची. त्वचेवर ब्रशच्या साहाय्याने फाउंडेशन असे अप्लाय करा जसे आपण पेंट करत आहात. यानंतर अंडाकार स्पंजच्या साहाय्याने याला ब्लैंड करा. ब्रशच्या साहाय्याने अतिरिक्त फाउंडेशन हटवून लुज पावडरच्या मदतीने बेसला सेट करा.

आता कंटूरिंगसाठी चिकबोन्सवर हलक्या शेडची लेयर, मध्ये त्यापेक्षा डार्क आणि शेवटी डार्क लेयर बनवून ब्लेंड करा. चांगल्याप्रकारे ब्लेंड झाल्यावर आपल्या चेहऱ्याचे फीचर्स उठून दिसतील. यानंतर आई मेकअप, लिप मेकअप आणि हेयरस्टाईल करू शकता.

नाइट ब्रायडल मेकअप

रात्रीच्यावेळी ब्रायडल मेकअप दिवसाच्या तुलनेत डार्क केला जातो. यासाठी मेकअपचा कलर बोल्ड असायला हवा. ३-४ रंग मिक्स करूनही मेकअप केला जाऊ शकतो. लग्नाच्या दिवशी चांगले दिसण्यासाठी डोळयांचे खूप जास्त महत्व असते. अशा स्थितीत जर यांची नीट देखरेख केली नाही तर हे आपल्या सर्व मेहनतीवर पाणी फेरू शकतात.

डोळयांसाठी स्मोकिंग कलरचा वापर केला जाऊ शकतो. आपल्या डोळयांकडे लक्ष्य आकर्षित करण्यासाठी आपण ब्राऊन, ग्रे आणि ग्रीन कलरच्या आयलाइनरचा उपयोग डोळयांच्या वरच्या आणि खालच्या भागात करू शकता.

जर आपले डोळे घारे असतील तर आपण पर्पल आणि ग्रे कलरचा आयलाइनर लावू शकता आणि जर डोळे हिरवे आणि निळे असतील तर आपल्यासाठी ब्रौंज शेड आणि डार्क ब्राऊन चांगला पर्याय आहे.

जर ऑयली स्किन असेल

जर ऑयली स्किन असेल आणि घाम खूप येत असेल तर टू वे केकचा उपयोग आपल्यासाठी योग्य ठरेल. कारण हा एक वॉटरप्रुफ बेस आहे. याशिवाय आपण आपल्या स्किनसाठी पॅन स्टिक आणि मूजचाही उपयोग करू शकता. मूज चेहऱ्यावर लावताच पावडर फॉर्ममध्ये रूपांतरित होते. ज्यामुळे घाम येत नाही. हे अतिरिक्त ऑइल रिमूव्ह करून चेहऱ्याला मॅट फिनिश आणि लाइट लुक देते.

जर त्वचा खूप जास्त ऑयली असेल किंवा उन्हाळयाच्या दिवसांत मेकअप करत असाल तर फाउंडेशनच्या अगोदर चेहऱ्यावर बर्फाचा मसाज घ्या.

ऑयली त्वचेवर डाग दिसून येतात. यापासून वाचण्यासाठी कंसीलर लावावे. कंसीलर आणि फाउंडेशन लावल्यानंतर मेकअपला ट्रांसलूसेंट पावडरने सेट करा. यामुळे मेकअप जास्त वेळेपर्यंत टिकून राहील आणि पसरणारही नाही.

कोरडी त्वचा असेल

जर आपली त्वचा कोरडी असेल तर आपण मेकअपच्या दरम्यान पावडरचा उपयोग करू नका. असे केल्याने आपली त्वचा अजून जास्त कोरडी होऊ शकते. त्वचा कोरडी झाल्यावर आपण रिंटीड मॉइश्चरायजर, क्रीम बेस्ड फाउंडेशनचा उपयोग करू शकता आणि जर नॉर्मल त्वचा असेल तर आपल्यासाठी फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट चांगले विकल्प आहेत.

असे निवडा योग्य पॅकेज

* प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट शोधत असाल तर बजेट १५ हजार पासून २ लाखापर्यंतही जाऊ शकतं.

* काही ब्रायडल पॅकेजेसमध्ये नवऱ्या मुलीबरोबर तिच्या जवळच्यांचा मेकअपही सामील असतो. वेडिंग सीजन सुरु होताच आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाईन बऱ्याच स्पेशल ऑफर्स दिसतील.

* बरेच पॅकेजेस लग्नाच्या वेगवेगळया रीती-रिवाजांच्या दरम्यानही सर्र्व्हिस देतात. जसे मेहंदी, संगीत, विवाह आणि नंतर रिसेप्शन.

लग्नाच्या काही दिवस आधी मेकअप ट्रायल अवश्य करा. यामुळे तुम्हाला व मेकअप आर्टिस्टला आयडिया मिळते की आपल्या स्किनटोनवर कोणता मेकअप चांगला वाटेल आणि कोणत्या लुकमध्ये आपण जास्त कम्फर्टेबल राहाल.

ब्रायडल मेकअपचा ट्रेडिशनल ढंग

* ललिता गोयल

प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं की तिने आपल्या विवाहप्रसंगी सर्वात सुंदर अन् खास दिसावं. तिचा मेकअप ग्लोइंग, नॅचरल आणि लाँगलास्टिंग असावा असं तिला वाटत असतं.

दिल्ली प्रेस भवनमध्ये आयोजित मीटिंगमध्ये मेकअप आर्टिस्ट गर्वित खुरानाने ब्रायडलचा ट्रेडिशनल लुकचा मेकअप शिकवण्यासोबत टीका सेटिंग, हेअरस्टाइल व साडी ड्रेपिंगसुद्धा शिकवलं. येथे ट्रेडिशनल लुकच्या मेकअपचं तंत्र जाणून घेऊया…

्रेडिशनल ब्रायडल लुक

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याचं व्यवस्थित क्लिंजिंग करा. त्यानंतर एक अंडरबेस लावा जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकून राहिल. गर्वितने ट्रेडिशनल ब्राइडच्या मेकअपमध्ये एक प्रकारच्या पॅनकेक (लस्टर पॅनकेक)चा वापर केला. त्याने मेकअपच्या सुरुवातीला प्रायमर लावलं. त्यानंतर बेस लावला. मग टीएल पावडर लावली. त्यानंतर पॅनकेक लावला. चेहऱ्यावरील डागव्रण लपवण्यासाठी कन्सीलरचाही वापर केला.

गर्वितने सांगितलं की अलीकडे ब्रायडल मेकअपमध्ये शिमर लुक ट्रेण्डमध्ये आहे, त्यामुळे जर एखाद्या नववधूची इच्छा असेल तर ती आपल्या मेकअप आर्टिस्टला शिमर फाउंडेशनचा वापर करायलाही सांगू शकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. जर तुम्ही शाइनिंग पावडर लावणार असाल, तर लूज पावडरचा वापर करू नका; कारण यामुळे फाउंडेशनची चमक फिकी पडेल. फेसकटिंग व कंटूरिंगच्या माध्यमातून सामान्य चेहरासुद्धा नीटसा कोरीव दिसू लागतो.

हायलाइटरच्या मदतीने चेहऱ्यावरील आकर्षक भाग हायलाइट करा. ब्लशरमध्ये हलक्या शेडचा जसं की पिंक, पीच रंगाचा वापर करा.

डोळे : कोणत्याही वधूच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप खूप महत्त्वपूर्ण ठरतो. डोळ्यांवर आयशॅडो लावण्यापूर्वी आयलिडवर आयवॅक्स लावा. यामुळे आयशॅडो दीर्घकाळ टिकेल. अशाचप्रकारे लोअर आयलिडवर आयशॅडो आयसिलरसोबत लावा, मग ते पसरणार नाही. काजळ पेन्सिलने डोळे हायलाइट करा. काजळ लावल्यानंतर आयलायनर लावा. त्यानंतर मसकारा लावा. मसकारा आतील लॅशेजवर हलक्या रंगाचा आणि बाहेरच्या बाजूला थोड्या गडद रंगाचा वापरा. बाहेरच्या बाजूला थोडा अधिक गडद करा आणि भुवयांकडे थोडा हलका ठेवा. डोळे जर लहान असतील, तर ते मोठे दाखवण्यासाठी पापण्यांच्या बाहेरील कडेवर वरच्या बाजूस हलक्या रंगाची पावडर शॅडो छोट्या ब्लशरच्या मदतीने लावा. क्रीमजवळ गडद रंगाच्या शॅडोचा उपयोग करा परंतु नाकाकडे डोळ्यांच्या आतील भागावर कोणताही रंग वापरू नका. नाहीतर लहान डोळे अधिक लहान दिसतील. कडांवर शॅडो लावण्यासाठी ब्रशचा वापर करा.

ओठ : अलीकडे ग्लॉसी ओठांची फॅशन आहे. यासाठी आधी ओठांना लिपलायनरच्या सहाय्याने आकार द्या. मग ड्रेसला मॅच करणारी लिपस्टिक लावा. लिपस्टिक ब्रशने लावा. यानंतर लिपग्लॉस लावा. लक्षात घ्या की लिपस्टिकचा रंग ब्रायडल ड्रेसहून १वा २ नंबर गडद असावा.

बिंदी : बिंदी ट्रेडिशनल ब्रायडल मेकअपचा महत्त्वपूर्ण हिस्सा ठरते. ब्रायडल बिंदीची निवड चेहऱ्यानुसार करा. जर चेहरा गोल असेल तर लांबट बिंदीची निवड करा आणि लांबट असेल तर गोल बिंदीची आणि जर चौकोनी असेल तर डिझायनर बिंदी लावा.

हेअरस्टाइल : नववधूचा मेकअप खास असेल तर हेअरस्टाइलही डिफरण्ट व एलिगंट असली पाहिजे. ब्राइडला स्टायलिश हेअरस्टाइल देण्यासाठी सर्वप्रथम इयर टु इयर केसांचा एक भाग बनवा. मागच्या केसांचा एक पोनी बनवा. इयर टु इयर भागातून एक रेडियल सेक्शन घ्या आणि क्राउन एरियामध्ये आर्टिफिशिअल बन लावून पिनने सेट करा. मग रेडियल सेक्शनच्या केसांची एकेक बट घेऊन बॅककौंबिंग करून स्प्रे करा. या केसांचा उंच पफ बनवा आणि पिनने व्यवस्थित सेट करा. दोन्ही बाजूंच्या केसांमध्येही स्प्रे करून पोनी वरच्या बाजूला सेट करा.

आता पोनीवर आर्टिफिशिअल लांबट वेणी बनवा. पोनीवर गोल आर्टिफिशिअल मोठा बन लावा. आर्टिफिशिअल केसांमधून १-१ बट घेऊन बनच्यावर पिनने सेट करा. मग त्या केसांची नॉट बनवून बनवरच बॉब पिनने सेट करा. अशीच एक वेणी ३ नॉट अंबाड्यामध्ये गोलाकार तर दुसरीकडेही तशीच नॉट लावा. आता अंबाड्याच्या साइडला आणखीन एक वेणी लावा. अखेरीस केस बीड्सद्वारे अॅक्सेसराइज करा. पुढे समोरच्या बाजूलाही अॅक्सेसराइज करा.

मांगटीका सेटिंग

नववधूचा शृंगार मांगटीक्याविना अपूर्ण भासतो. नववधूच्या साजशृंगारातील हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा मानला जातो. सध्या चांदबाली स्टाइल व स्टोन पेंडेंट मांगटीका चलनात आहे. सेंटर पार्टिंग हेअरस्टाइल व सिंपल ब्रायडल बन हेअरस्टाइलसोबत मांगटीका नववधूचं सौंदर्य खुलवतो. जर कुणी ब्राइड मुगल लुक क्रिएट करू इच्छित असेल तर ते झुमर स्टाइल वा शैंडलियर स्टाइल मांगटीका लावू शकता.

मांगटिक्यासोबत अपडू, हेअर हाफ अप आणि साइड बॅगसारखी हेअरस्टाइल अतिशय सुंदर दिसते. या हेअरस्टाइलसोबत कपाळावर चमकणारा मांगटीका अतिशय आकर्षक दिसतो. गोल चेहऱ्याच्या तरुणींनी फ्रंट पफ हेअरस्टाइलसह मांगटीका कॅरी केला पाहिजे. दीपिका पादुकोण व आलिया भट्टसारख्या अभिनेत्री तर मोकळ्या केसांसोबतही टीका कॅरी करत आहेत आणि तरुणी त्यांची स्टाइल फॉलो करतात. जर नववधूचा चेहरा चौकोनी असेल तर ती झुमर स्टाइल टीका कॅरी करू शकते.

जर नववधूचं फोरहेड लहान असेल तर तिने लहान आकाराचा मांगटीका वापरावा. लक्षात घ्या की मांगटीका हेवी असेल तर नथ हलकी वापरा आणि जर मांगटीका हलका असेल तर नथ ठसठशीत वापरा. यामुळ लुक बॅलन्स दिसतो.

असा असावा नववधूचा श्रुंगार

* गरिमा पंकज

आपल्या लग्नात प्रत्येकीलाच सुंदर दिसावं वाटतं आणि सुंदरता वाढविण्यामध्ये वस्त्र आणि अलंकारांसह मेकअपचंदेखील तितकंच मोठं योगदान असतं. वेगवेगळ्या भागात मेकअपच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात.

‘गृहशोभिके’च्या फेब सेमिनारमध्ये मेकअप आर्टिस्ट शिवानी गौडने इंडियन आणि पाकिस्तानी ब्रायडल मेकअपच्या टीप्स दिल्या :

इंडियन ब्रायडल मेकअप

आय मेकअप : मेकअपची सुरूवात डोळ्यांपासून करावी, कारण चेहऱ्याचं पहिलं आकर्षण डोळेच असतात. डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यासाठी सर्वप्रथम हलकी लाइन ड्रॉ करा आणि मग तीला ब्लेन्ड करा. लाइट कलरने सुरूवात करून डार्क कलरकडे जा आणि तो ब्लेन्ड करत जा. आउटर कॉर्नर्सला थोडा स्मोकी लुक देण्यासाठी डार्क ब्राऊन कलरचा वापर करू शकता.

ब्रायडल मेकअपमध्ये गोल्डन ग्लिटरचा वापर चांगला वाटतो. पण तुम्ही अन्य कोणताही आवडीचा रंग वापरू शकता. आता मसकारा लावून आर्टिफिशिअल आईलॅशेज लावा. त्यामुळे डोळे मोठे दिसतात. मग डोळ्यांच्या कडांना काजळ लावून थोडंसं स्मज करून घ्या. त्यामुळे डोळे सुंदर दिसतील.

बेस तयार करा : प्रथम त्वचेला मॉइश्चराइज करा. त्वचा ऑयली असेल तर जास्त मॉइश्चराइझरचा वापर करू नका. जरूरी असेल तर ऑईल फ्री मॉइश्चरायझर लावा. मग प्रायमर लावा. त्यानंतर इफेक्टेड भागावर कंसील लावा. डाग अजिबात दिसणार नाहीत. आता लिक्किड क्रिम बेस्ड फाऊंडेशन चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावा. यानंतर ट्रान्सल्यूशन पावडर लावा. जेणेकरून काजळ पसरणार नाही आणि मेकअप अधिक काळापर्यंत टिकून राहिल. आता फेस कंटूरिंग करा जेणेकरून चेहऱ्याला सुंदर शेप देता येईल आणि फिचर्स उठून दिसतील. मग ब्लशर अप्लाय करा आणि त्यानंतर पीकबोन्स एरियावर हाईलाइट करा.

लिप मेकअप : प्रथम आपल्या ओठांवर लिपबाम लावून ते मुलायम बनवा. त्यानंतर लिप पेन्सिलने शेप द्या आणि त्याच रंगाची लिपस्टिक लावा. मेकअपनंतर फिक्सिंग स्प्रे वापरा, जेणेकरून मेकअप अधिक काळपर्यंत टिकून राहिल.

पाकिस्तानी ब्रायडल मेकअप

पाकिस्तानी ब्रायडल मेकअपमध्ये काही गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व इंडियन ब्रायडल मेकअपसारखीच पद्धत असते. पाकिस्तानी ब्रायडल मेकअपमध्ये या गोष्टींची काळजी घ्या.

* पाकिस्तानी ब्रायडल मेकअप दरम्यान लायनर जाड लावलं जातं.

* यात कट एन्ड क्रीज आय मेकअप असतो.

* हेवी आयलॅशेजचा वापर केला जातो.

* डोळ्यांवर ग्लिटर आणि पिगमेंट्सचा वापर होतो.

* फेस कंटूरिंग थोडी जास्त गडद असते.

* हेअरस्टायलिंगही हेवी असते. हाय पफ बनवला जातो. मोठमोठ्या स्टफिंग आणि एक्सटेंशन्सचा वापर होतो.

हेअर बन

हेअर स्टायलिस्ट सिल्की बालीने एक सुंदर हेअर बन बनवायची पद्धत सांगितली. आधी केसात हेअरमूज लावा. याने सिल्की स्मूद केस थोडे रफ होतील आणि त्यांची पकड सोप्या पद्धतीने होईल. यानंतर केसांना क्रिपिंग मशीनने क्रिप करा, जेणेकरून केसांत वॉल्यूम येईल.

आता पुन्हा ‘ए टु ए’ सेक्शन काढा आणि क्राऊन एरियातल्या केसांना बॅक कोंब करून पफ बनवा. मागील केसांना एकत्र करून पोनी बांधा. पोनीमध्ये कर्ल्स करा. आता एक राऊंड स्टफिंग लावा आणि कर्ल केलेल्या केसांना थोडं डिझाईन करून स्टफिंग कव्हर करा. आता फ्रंट सेक्शन स्टार्ट करा. सेंटर पार्टींग करा. मग अनेक पातळ सेक्शन घेऊन चांगल्या प्रकारे बॅक कोंब करा. आपल्या फेसनुसार फॉल देऊन पिन लावा. एक्सेसरीज लावून आणखीन जास्त आकर्षक बनवू शकता.

ब्रायडल मेकअपचे बारकावे

* तोषिनी राठोड

प्रत्येक नववधूला वाटत असतं की तिची स्टाइल आणि लुक असा पाहिजे, ज्याने ती फक्त तिच्या जीवनसाथीचंच नव्हे तर सासरच्यांचंही मन जिंकेल. मग असं काय करावं जेणेकरून नववधूचं सौंदर्य पतीचं मन मोहीत करेल?

सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ओजस राजानी सांगतात की सर्वात आधी नववधूचं व्यक्तिमत्त्व, स्किन टाइप, केसांचं टेक्सचर, कलर, आयब्रोजचा शेप आणि फेस कट पाहावा लागतो. जर यात कोणत्या प्रकारची कमतरता असेल तर नववधूला एक्सरसाइज आणि स्किन केअर रूटीनचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे मेकअपपूर्वी त्वचा अधिक टवटवीत आणि उजळलेली दिसावी

स्किन केअर रूटीन

स्किन केअर रूटीनबद्दल सांगताना ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आकांक्षा नाईकचं म्हणणं आहे की नववधूला आपला स्कीन टाईप माहिती असणं खूप गरजेचं आहे. लग्नाआधी तिने रोज क्लिंजिंग, टोनिंग आणि माइश्चरायिझंगचं रूटीन अवलंबलं पाहिजे. जर स्किन ड्राय असेल तर सोप फ्री कंसीलरचा वापर केला पाहिजे. त्वचेला दिवसातून दोन वेळा माइश्चरायझरही केलं पाहिजे.

जर स्किन टाईप ऑयली असेल, तर क्लिंजिंगसह दिवसातून २-३ वेळा चेहरा धुतला पाहिजे. ऑयली स्किन टाइपसाठी टोनिंग खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्याचे पोर्स बंद होतात आणि त्वचेतून तेल बाहेर येणं थांबतं. त्याचबरोबर त्वचेला माइश्चराइज्ड करण्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. ऑयली स्किनसाठी फेस मास्क लावणंही खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्यावरील डेड स्किनपासून सुटका मिळते आणि त्वचा श्वास घेऊ शकते.

वॉटर बेस्ड व क्रीम बेस्ड मेकअपमधील निवड

मेकअपमध्ये फाउंडेशन योग्य असणं खूप जरूरी आहे. जर बेस मेकअप चांगल्याप्रकारे लावलं गेलं आणि फाउंडेशनचा रंग स्किनच्या अनुरूप असेल, तर एक लायनर लावूनही नववधू सुंदर दिसू शकते.

अशाप्रकारे क्रीम बेस्ड मेकअप त्यांच्यासाठी उत्तम ठरतो. ज्यांच्या चेहऱ्यावर डाग, पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स नसतात. पण ऑयली स्किनसाठी क्रीम बेस्ड मेकअपचा वापर अजिबात करू नये, तर डाग असणाऱ्या स्किनसाठी वाटर बेस्ड मेकअप गरजेचा आहे.

कॉप्लेक्शननुसार मेकअप

आकांक्षाने सांगितलं की भारतीयांचे कॉप्लेक्शन ३ प्रकारचे कॉप्लेक्शन असतात. गोरा, गव्हाळ आणि सावळा कॉप्लेक्शननुसार मेकअपची निवड करा.

गोरी त्वचा : जर तुमचा रंग गोरा आहे तर तुमच्यावर रोजी टिंट बेस कलर आणि काही प्रसंगी सोनेरी रंगाचं फाऊंडेशन बेस सूट होईल. डोळ्यांचा मेकअप करताना लक्षात ठेवा की आयब्रोज ब्राउन कलरने रंगवा. गोऱ्या रंगावर पिंक आणि हलक्या लाल रंगांचं ब्लशर खूप सुंदर वाटतं. तिथेच ओठांवर हलक्या रंगाचीच लिपस्टिक चांगली वाटते.

गव्हाळ रंग : जर तुमचं कॉप्लेक्शन गव्हाळ असेल तर तुम्ही तुमच्या स्किन कलरला मॅच करणारं वॉटर बेस्ड फाऊंडेशन लावलं पाहिजे. त्वचेवर हलक्या रंगांचं फाऊंडेशन वापरू नये. डोळ्यांच्या मेकअपसाठी ब्राँज किंवा ब्राउन कलरचा वापर केला पाहिजे. गालांवर ब्राँज कलरच्या ब्लशरचा वापर केला पाहिजे. या स्किनटोननुसार तुमच्यावर डार्क रंगांची लिपस्टिक शोभून दिसेल.

सावळी त्वचा : सावळ्या त्वचेचा मेकअप करण्याआधी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. सावळ्या त्वचेसाठी वॉटर बेस्ड नॅचरल ब्राउन टोन फाऊंडेशनचा वापर केला पाहिजे. यासाठी फाऊंडेशनच्या ब्लेडिंगवरही चांगल्याप्रकारे लक्ष दिलं पाहिजे.

लक्षात ठेवा तुम्ही त्वचेच्या रंगापेक्षा गडद शेडच्या फाऊंडेशनचा वापर टाळा. डोळ्यांचा मेकअप करताना लाइट रंगांच्या आयब्रोज कलरचा वापर करू नये, पण आउटलाइनसाठी काजळचा वापर करा. ब्लशरसाठी प्लम आणि ब्राँज कलरचा वापर करा. लिप कलरसाठी पर्पल, रोज आणि पिंक ग्लासचा वापर करू शकता.

ओजसच्या म्हणण्यानुसार नववधूने मेकअप अधिक गडद होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. ती वयस्क दिसू लागते म्हणून आणि मेकअप टाळावा.

काळजीपूर्वक लिप कलर निवडा

ओजसच्या म्हणण्यानुसार आजकाल बॉलिवूडच्या तारकासुद्धा कमी मेकअप आणि लाइट शेडची लिपिस्टिक लावणं पसंत करतात. आता हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचे दिवस आहेत, जे तुमच्या मेकअपचे बारकावे अधोरेखित करतात. जर तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक लावली तर याने तुमच्या लग्नाच्या फोटोमध्ये तुम्ही भयानक दिसाल.

ट्रेंडनुसार आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट शेडच्या लिपस्टिक आल्या आहेत, ज्या लाइट असूनही तुम्हाला डार्क लिपस्टिकसारखा लुक देतात. यामुळे तुमच्या लिप्सला थोडा पाउट लुकही मिळेल. त्याऐवजी जर तुम्ही डार्क लिपस्टिकचा वापर केला, तर तुम्ही डोळ्यांचा मेकअप कमी केला पाहिजे. जर तुम्ही हेवी आय मेकअप करत असाल, तर तुम्ही लिप कलरमध्ये लाइड शेडच निवडली पाहिजे.

रंगीत लेन्सची निवड

ओजस सांगते की तुमचा रंग गोरा असो, गव्हाळ असो किंवा सावळा असो, तुम्ही आय लेंससाठी हलक्या तपकीरी रंगाचा वापर केला पाहिजे. आय लेंसमध्ये ग्रीन आणि ब्राउन मिश्रित एक नवीन कलर बनवला आहे, जे दिसायला खूप चांगला वाटतो.

मेकअपआधी फ्लॅश टेस्ट

नववधू असो किंवा कलाकार तुमचा मेकअप बेस किंवा फाऊंडेशन परफेक्ट असला पाहिजे. कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे मेकअप आधीच ग्रे दिसतो. अशात तुम्ही बेस लावल्यानंतर आपल्या फोनच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश ऑन करून एक फोटो काढायला हवा. यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही फाऊंडेशन चांगल्याप्रकारे लावलं आहे की नाही. याला मेकअप आर्टिस्ट फ्लॅश टेस्ट म्हणतात.

कमी बेससह गरजेच्या मेकअपकडे लक्ष दिलं पाहिजे. कमी फाऊंडेशन, लाइट कलर ब्लश आणि हलक्या रंगांची लिपस्टिक तुमच्या लुकला उभारी देईल. या सॉफ्ट स्टाइलिंगबरोबर नववधू खूप सुंदर दिसते. याव्यतिरिक्त नेहमी आपलं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन मेकअप केला पाहिजे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें