बर्फाळ चहा प्रत्येक घोटात ताजेपणा

* प्राची भारद्वाज

मितालीच्या घरी तिच्या मैत्रिणी आल्या तेव्हा सर्वांचे स्वागत करत तिने नम्रपणे विचारले, ‘‘चहा घेणार की शीतपेय?’’

‘‘चहाची इतकी सवय आहे की, चहाशिवाय राहवत नाही आणि इतके गरम होतेय की, चहा पिण्याची इच्छा होत नाही.’’

त्यांच्या या उत्तरावर मितालीकडे पर्याय होता. ती सर्वांसाठी फ्रूटीच्या चवीचा बर्फ घातलेला चहा घेऊन आली. मग काय? त्यांच्या गप्पांची मैफल रंगली.

आईस्ड टीची सुरुवात १९०४ मध्ये मिसुरी (अमेरिका) येथील सेंट लुईस वर्ल्ड फेअर येथे झाली. जेव्हा घामाघूम करणाऱ्या ऊन्हापासून वाचवण्यासाठी एका चहाच्या बाग मालकाने चहाच्या पानांना बर्फाच्या पाईपमधून काढून थंड केले होते.

आईस्ड टीमधील ग्रीन अॅप्पल आणि पीचसारख्या चवीचा चहा सर्वांनाच माहीत आहे. आता तर बाजारात फ्रूटी, आंबा, पुदिना, तुळस, अशा विविध चवींचा चहा उपलब्ध आहे.

चहाच का?

चहा हे एक आरोग्यदायी पेय आहे, ज्यात मोठया प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. चहा आपली प्रतिकारशक्ती वाढवते. सोबतच शरीरातील मेटाबॉलिज्म अर्थात चयापचय सुधारण्यास मदत करते. चहा प्यायल्याने शरीरात नव्या ऊर्जेचा संचार होतो.

आवड ज्याची-त्याची

इंडिगो डेलिकॅटेसनच्या जयदीप मुखर्जी यांना बर्फाच्या चहात हर्ब्स घालायला आवडते तर मिंगल चहाचे मालक अमित आनंद यांना संत्र्याच्या आणि पुदिन्याच्या चवीची ग्रीन टी आवडते. संत्र्यातील भरपूर प्रमाणात असलेले सी जीवनसत्त्व तर पुदिन्यातील गारवा आणि तजेला गरमी पळवून लावतो.

हैदराबादच्या मुकेश शर्मा यांना लेमन आणि लॅव्हेंडर, गवती चहा आणि मध, ब्लॅक बेरी, तुळस अशा चवी आवडतात. गरजेनुसार सोडा, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि १ चमचा मध मिसळून चव आणखी वाढवता येते.

बर्फ घातलेल्या चहाची सर्वोत्तम कृती

सर्वात आधी एका भांडयात ९-१० कप पाणी उकळा. ते व्यवस्थित उकळल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर यात ७-८ टी बॅग्स घाला. तुम्हाला चहा साधा हवा की कडक हवा, हे ठरवून त्यानुसार टी बॅग्सचे प्रमाण ठरवा. त्या ९-१० मिनिटे पाण्यातच ठेवा. त्यानंतर त्या बाहेर काढून मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर चहा बर्फाने भरलेल्या ग्लासात ओतून प्यायला द्या.

योग्य पद्धत

तुम्हाला जर बर्फ घातलेली अप्रतिम चहा बनवायची असेल तर तुमच्याकडे उत्तम चहा पावडर असायला हवी. तुम्हाला जर चहा सजवून द्यायची असेल तर त्यासाठी साहित्य तयार ठेवा. चहाला उकळवण्यासाठी आणि आवडीनुसार गोड बनवण्यासाठीची सामग्रीही तयार ठेवा. मग काय? तुम्ही मॉकटेल बनवू शकता किंवा कॉकटेल.

आम्ही तुम्हाला आणखी काही चांगल्या कृती सांगतो :

घामाघूम करणाऱ्या ऋतूत व्हॅनिला आईस्ड टी हे ताजेपणा मिळवून देणारे पेय आहे. खासकरून तेव्हा ज्यावेळी तुम्ही यात लिंबाचे काही थेंब घालता. अशी चहा बनवणे अगदी सोपे आहे. कमी प्रमाणात चहा पावडर घ्या आणि ती पाण्यात उकळवा. त्यात आवडीनुसार साखर घाला. थंड झाल्यावर यात व्हॅनिला इसेन्सचे २ थेंब, लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. हे मिश्रण काचेच्या ग्लासात ओता. भरपूर बर्फ घाला.

फ्रूट टी बनवण्यासाठी ऋतूमानानुसार उपलब्ध असलेली फळे जसे की, आंबा, सफरचंद, द्राक्षे, काकडी, टरबूज इत्यादींचे तुकडे करून घ्या. पाणी उकळून झाल्यावर गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात टी बॅग्स घालून पाणी थंड होऊ द्या. जवळपास अर्ध्या तासानंतर हे मिश्रण मोठया काचेच्या भांडयात ओता. त्यात कापलेली फळे घाला. आवडीनुसार साखर किंवा मध घाला. फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. त्यानंतर बर्फ घालून प्यायला द्या.

फ्रूट टी बनवण्यासाठी तुम्ही रसदार फळे जसे की, जांभूळ, स्ट्रॉबेरी घालू शकता.

जिंजर म्हणजे आले आणि मधाच्या चहासाठी आल्याचे तुकडे पाण्यात उकळवा. त्यानंतर त्यात थोडे मध घाला. आता यात टी बॅग घालून मिश्रण थंड होऊ द्या. यामुळे तुम्हाला तजेला मिळेल. शिवाय हे मिश्रण तुमच्यासाठी अँटीऑक्सिडंटचे काम करेल. बर्फ घातलेली ही चहा शरीरासोबतच मन आणि मेंदूलाही शांत ठेवेल.

ऑरेंज आईस्ड टी बनवण्यासाठी आईस्ड टी बनवून त्यात थोडा संत्र्याचा रस घाला. याची चव अप्रतिम लागते, शिवाय उन्हाळयातील आळस घालवायलाही मदत होईल. तुम्ही यात चवीनुसार साखर आणि पुदिन्याची पाने घालू शकता.

ग्रीन आईस्ड टी बनवण्यासाठी तुम्हाला ग्रीन टीच्या बॅग्स लागतील. तुम्ही ग्रीन टी गरमागरम प्या किंवा थंड, ती आरोग्यदायी असते. फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित करायचे असेल तर तुम्ही ग्रीन टी बॅग्स या आईस्ड टीमध्ये घालून त्यात मध, लिंबाचा रस घालू शकता. तुळस, पुदिन्याची पाने वापरून तुम्ही हा कप सजवू शकता.

थाई आईस्ड टीसाठी २ चमचे नारळाचा रस आणि १ चमचा कंडेन्स मिल्क आईस्ड टीमध्ये घाला.

होम शेफ मालिनी साहनी असा सल्ला देतात की, कॉकटेल बनवण्यासाठी तुम्ही यात नारळाचा रस किंवा स्माईस्ड रमही घालू शकता. अमित आनंद यांनी सांगितले की, आईस्ड टीमध्ये तुम्ही २ चमचे बर्बन व्हिस्कीसह १ चमचा मेपल सिरपही घालू शकता. ती संत्र्याच्या फोडीनी सजवून प्यायला द्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें