कशी हवी प्रेगनन्सीमध्ये सेक्स पोझिशन

– मिनी सिंह

प्रेगनन्सीवेळी महिला खूपच जागरूक होतात. गर्भातील बाळाला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्या पतिसोबतचे शारीरिक संबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांच्या मते, गर्भावस्थेतही संभोग करता येतो. हो, पण जर गर्भवती महिलेची प्रकृती नाजूक असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर शारीरिक संबंध ठेवू नये, पण पत्नीपासून खूप काळ दूर राहणे पतिसाठी अशक्य असते. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशावेळी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जाणून घेऊया की गर्भावस्थेत सेक्स संबंध कसे साधावेत :

गर्भावस्थेदरम्यान सेक्सवेळी या पोझिशनद्वारे सुरक्षित सेक्सचा आनंद घेता येऊ शकेल आणि यामुळे होणारे बाळ आणि आईलाही त्रास होणार नाही.

पहिली पोझिशन : पती आणि पत्नीने एकमेकांसमोर झोपावे. पत्नीने आपला डावा पाय पतिच्या शरीरावर ठेवावा. अशा पोझिशनमध्ये सेक्स केल्याने गर्भाला झटके बसत नाहीत.

दुसरी पोझिशन : पत्नीने पाठीवर टेकून आपली पावले दुमडून पाय पतिच्या खांद्यावर ठेवावे. त्यानंतर सेक्स करावा. यामुळे पोटावर दाब येणार नाही.

तिसरी पोझिशन : पतिने खुर्चीवर बसावे आणि पत्नीने त्याच्यावर बसावे. सुरक्षित सेक्समध्ये हेदेखील येते.

काही व्यायामांद्वारेही सेक्स करता येतो. पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

खबरदारी

* गर्भावस्थेत सेक्सदरम्यान पतिने पत्नीची विशेष काळजी घ्यायला हवी. पतिने जास्त उत्तेजित होऊ नये आणि पत्नीवर दबाव आणू नये.

* गर्भावस्थेत सेक्स करावा, पण कोणताही नवा प्रयोग करू नये.

* सेक्स करताना पत्नीवर जास्त दबाव पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.

* गर्भावस्थेत प्रसूतीच्या कळांपूर्वीपर्यंत सेक्स करता येतो, पण गर्भवतीस याचा त्रास होऊ देऊ नये.

गर्भावस्थेत सेक्सचे फायदे

प्रेगनन्सीत सेक्स आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कसे ते माहीत करून घेऊया :

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे तुमच्या पेल्विक मांसपेशी आखडतात आणि प्रसूतीसाठी जास्त मजबूत होतात.

* प्रेगनन्सीदरम्यान लवकर लघवी होणे, हसल्यावर किंवा शिंकल्यास पाणी निघणे इत्यादी समस्या मूल मोठे होऊ लागल्यामुळे मूत्राशयावर पडणाऱ्या दाबामुळे निर्माण होतात. हे थोडे असुविधाजनक होऊ शकते, पण यामुळे तुमच्या मांसपेशी मजबूत होतात, ज्यामुळे प्रसूतीवेळी फायदा होतो.

* सेक्स केल्यामुळे महिला जास्त फिट राहतात. यादरम्यान त्या फक्त ३० मिनिटांत ५० कॅलरीज कमी करू शकतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे महिलांची सहनशक्ती ७८ टक्के वाढते. याचा फायदा तिला प्रसूतीवेळी होतो.

* सेक्सनंतर रक्तदाब कमी होतो. अधिक रक्तदाब आई आणि बाळ दोघांसाठीही नुकसानकारक असतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेच चांगले असते.

* ऑक्सिटोसीन हार्मोन संभोगावेळी शरीरातून बाहेर पडते, जे तणाव कमी करण्यासाठी उपयोगी असते. यामुळे चांगली झोप येते.

जेव्हा डॉक्टरांना काही जटिल समस्या जाणवतात, तेव्हा ते सेक्स न करण्याचा सल्ला देतात. समस्या अनेक प्रकारच्या असतात जसे की :

* पूर्वी कधी गर्भपात झाला असेल तर.

* पूर्वी कधी वेळेआधी बाळाचा जन्म झाला असेल तर.

* जर गर्भपाताची भीती असेल तर.

* योनीतून जास्त रक्तस्त्राव होणे किंवा तरल पदार्थ वाहत असेल तर.

* एकापेक्षा अधिक मुले झाल्यास.

प्रेगनन्सी सुलभ आणि सुरक्षित व्हावी असे वाटत असेल तर गर्भरक्षा कवच, गर्भाच्या सुरक्षेसाठी चमत्कारी जादूटोणा, पुत्रप्राप्तीसाठी तंत्रमंत्र इत्यादींपासून दूर राहा. कारण अशा वेळी जादूटोणा नाही तर पती-पत्नीमध्ये प्रेम आणि चांगले संबंध असणे जास्त गरजेचे आहे. या काळात स्वत:कडे आणि होणाऱ्या बाळाकडे संपूर्ण लक्ष द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा आणि पौष्टीक आहार घ्या, जेणेकरून तुमच्या शरीराला पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळतील, जी तुमच्या होणाऱ्या बाळाच्या विकासासाठी गरजेची आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें