सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मला माझे कर्ली केस सांभाळायला खूप त्रास होतो. कारण ते खूप गुंततात. त्याबरोबर निर्जीव व कोरडेही झाले आहेत? आणि गळुही लागले आहेत. कृपया काही उपाय सांगा.

कर्ली केसांना कोमट तेलाने मालीश केल्याने केसांना फायदा होतो. असे नियमितपणे केल्यास आपले कर्ली केस खूप सुंदर होतात. कोकोनट ऑइल, ऑलिव्ह किंवा मग आल्मंड ऑइलने आपण केसांना मसाज करू शकता. दररोज शाम्पू केल्याने केस खराब होऊ शकतात, त्यामुळे केस गळती सुरू होते आणि केस डिहायड्रेट होऊ लागतात. त्यामुळे हा सल्ला दिला जातो की केस जास्त धुऊ नका.

कर्ली केस जास्त घट्ट बांधू नयेत. असं केल्यास कुरळे केस मुळातून कमजोर होऊन तुटू लागतात. जर आपले केस कुरळे असतील, तर ते हलके ओले असताना विंचरा. त्यामुळे केस कमी गुंततील. कुरळ्या केसांवर ड्रायरचा वापर कमी करा. कारण याच्या जास्त वापराने केस कमजोर होतात.

  • माझे वय ३५ वर्षे आहे. मी माझ्या कपाळावर मोठी टिकली लावते. त्यामुळे त्या ठिकाणी कायमचा स्पॉट पडला आहे. या स्पॉटला घरगुती उपायाने दूर केले जाऊ शकते का?

घरगुती उपचारांवर वेळ न घालवता जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर स्किन स्पेशालिस्टला दाखवा. आपल्या मर्जीने कोणतेही औषध किंवा क्रीम वापरू नका. खरे तर खराब क्वालिटीच्या टिकलीमध्ये मोनोबँजॉइल इस्टस ऑफ हाइड्रोक्यूनोन पदार्थ आढळतो. त्यामुळे त्वचेला डाग पडतात. त्यामुळे ब्रँडेड टिकलीच लावा.

  • पेन्सिल आयलाइनर आणि लिक्विड आयलाइनरमध्ये कोण चांगला रिल्ट देतं?

लिक्विड आयलाइनरने डोळे जेवढे मोठे आणि आकर्षक दिसतात, तेवढे पेन्सिल आयलाइनरने दिसत नाही. लिक्विड आयलाइनर खूप वेळपर्यंत टिकून राहतो. ज्या लोकांची त्वचा ऑइली असते, त्यांच्यासाठी लिक्विड आयलाइनर एका जॅकपॉटप्रमाणे असतो. लिक्विड लाइनर दीर्घकाळपर्यंत त्याच शेपमध्ये राहतो. सोबतच हा अगदी स्वच्छही दिसतो. तर दुसऱ्या बाजूला पेन्सिल किंवा पावडर आयलाइनर डोळ्यांच्या आजूबाजूला ऑइल प्रोड्यूस झाल्यामुळे दिवसभर त्याचा शेप खराब करू शकतं किंवा मग संपूर्ण पुसूनही जाऊ शकतं. लिक्विड आय लाइनरचा एक सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण याच्या मदतीने आपली काहीही क्रिएटिव्हिटी करू शकता.

माझे वय २० वर्ष आहे. माझी नखं खूप खरखरीत आणि कडक आहेत. ती सॉफ्ट करता येतील का?

नखे केवळ ती नाहीत, जी दिसतात. नखांच्या दिसणाऱ्या भागाला नेल प्लेट म्हणतात. त्याच्याखाली नेल बॅड असतो. तो सामान्य त्वचेसारखा असतो. नेल मॅट्रिक्सला मिळणारे पोषक तत्त्वच नखे हेल्दी किंवा कमजोर होण्यास जबाबदार असतात. कोरडी व निर्जीव नखे व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, हृदयरोग किंवा रोगप्रतिकार क्षमतेच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी १०० ग्रॅम बिटाचे सेवन रोज जरूर करा. त्याचबरोबर आयर्न, व्हिटॅमिन डी व कॅल्शियमयुक्त भोजन नियमितपणे घ्या.

  • माझे वय २६ वर्षे आहे. मला नखे वाढविण्याचा खूप शौक आहे. पण माझ्या नखांचा रंग पिवळा आहे, जो दिसायला चांगला दिसत नाही. काही घरगुती उपाय आहेत का, जेणेकरून माझ्या नखांवर चमक येईल व ती पिवळी दिसणार नाहीत?

ऑलिव्ह ऑइल नखांसाठी खूप चांगले असते. त्यामुळे नखांना पोषण मिळते आणि त्यात चमक येते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलला हलके गरम करून बोटे आणि नखांवर मसाज करा. काही दिवसांतच उत्तम परिणाम दिसू लागतील. प्रत्येक ती गोष्ट ज्यात व्हिटॅमिन ई आहे, नखांसाठी खूप चांगली असते. याबरोबरच व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण आहार घेतल्यानेही नखांचे आरोग्य चांगले राहते.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची क्रीम लावते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर व्हाइट हेड्स येतात. आपण ते दूर करण्यावर उपाय सांगाल का?

व्हाइट हेड्स अॅक्नेचा एक प्रकार आहे, जे त्वचेची रंध्रे तेलाच्या पाझारण्याबरोबरच घाण जमा झाल्यामुळे उत्पन्न होतात. व्हाइट हेड्स त्वचेच्या अंतर्गत पातळीवर तयार होतात. त्यांना प्रकाश वगैरे मिळत नाही आणि त्यांचा रंग सफेद राहतो.

आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरीत्या तेल असते. जे आपल्या त्वचेमध्ये ओलावा आणि मॉइश्चरायजर टिकवून ठेवते. जर आपल्या त्वचेवर जास्त तेल तसेच राहील, तर त्यामुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम अशा असतात, ज्या आपल्या त्वचेला अजून चिकट बनवतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर मुरमे येऊ लागतात. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर आपण ऑइल फ्री क्रीमच लावा

व्हाइट हेड्स दूर करण्यासाठी मेथीच्या पानात पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर चोळा. विशेषत: जिथे व्हाइट हेड्स असतील, तिथे चोळा. या प्रक्रियेमुळे व्हाइट हेड्स निघून जातात. पेस्ट सुकल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें