स्लिमिंग मेकअपने चेहरा दिसतो स्लिम व आकर्षक

* प्रिती जैन

करीना कपूर, विद्या बालन, कतरिना कैफ, अँजेलिना जोली, अमिषा पटेल, सोनाक्षी सिन्हा, प्रिती झिंटा, जरीन खान, समीरा रेड्डी अशा कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्या सुंदर शरीराबरोबरच रेखीव चेहऱ्याच्या सौंदर्यवती आहेत. पण तुम्ही कधी हे पाहिले आहे की त्यांचा चेहरा त्यांच्या सडपातळ देहापेक्षा किती वजनदार आहे? नाही ना? कारण त्यांच्या चेहऱ्याचं सौंदर्य तुम्हाला वेड लावतं आणि त्याचं कारण आहे, स्लिमिंग मेकअप पद्धती, ज्यामध्ये कुठल्याही महागड्या सर्जरीशिवाय तुम्ही तुमचा चेहरा बारीक व सुंदर भासवू शकता.

परफेक्ट आइज

स्लिमिंग मेकअप पद्धतीमध्ये प्रामुख्याने चेहरा रेखीव केला जातो. जसे, जर तुमचे गाल गरगरीत असतील तर ते कमी दाखवण्यासाठी डोळ्यांचा मेकअप असा करावा ज्याने लहान डोळे मोठे दिसतील. यासाठी काही टीप्स वापरून पाहा :

* आर्टिफिशिअल आयलॅशेज वापरा. त्यासोबत नॅचरल लॅशेज एकत्रित करून मस्काराची डबल कोटिंग करा.

* आऊटर कॉर्नरवर लायनर स्मज करून लावा.

* ब्लॅक काजल ऐवजी व्हाइट पेन्सिलचा वापर करा.

* लायनर लावतेवेळी वरील पापणीवर लायनरची जाड रेघ आणि खालील पापणीवर पातळ रेघ ओढावी.

* कॅट आइज लुक तयार करा. पण जास्त काळा रंग वापरू नये तर ब्लॅक शेडला शेडिंग म्हणून वापरावं.

* डोळे मोठे दाखवण्यासाठी कलर ब्लास्ट किंवा कॉन्टॅ्रस्ट लायनरचा वापरसुद्धा करू शकता. हे बाजारात सहजतेने उपलब्ध आहे.

* लोअर लॅशेजवर ट्रान्सपरंट मस्कारा लावावा.

* डोळे बोल्ड दिसण्यासाठी कलर कॉन्टक्ट लेंसचा वापर करा.

* आयशेडचे २-३ रंग मॅच करून आय मेकअप केल्याने डोळे जास्त उठून दिसतात.

ज्यूसी लिप्स

स्लिमिंग मेकअप पद्धतीमध्ये गोबरे गाल कमी दाखवण्यासाठी ओठांना उठाव दिला जातो. मेकअप आर्टिस्ट स्लिमिंग मेकअप पद्धतींचा वापर करून स्किनटोननुसार अशा सेन्शुअल लिपस्टिक शेडचा उपयोग करतात, जी ओठांचे सौंदर्य अधिक वाढवते.

* लिपस्टिक नेहमी ओठांच्या कोपऱ्यापासून मधल्या भागात लावा.

* लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर हलकेसे लिपग्लॉस किंवा हायग्लॉस जरूर लावावे.

* लिपस्टिक लावल्यानंतर मॅट इफेक्टसाठी टिशू पेपर ठेवून ओठांवर पावडर लावा.

* ग्लॅमर लुकसाठी रेग्युलर लिपस्टिकमध्ये गोल्ड पिगमेंट मिक्स करा.

* मॅक क्रेमस्टिक लिप लायनरने ओठांना सेन्सुअल लुक द्या. यामध्ये पुन्हा पुन्हा टचअप करण्याची गरज भासत नाही.
* डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी ओठांवर लिपबाम लावून टूथब्रशने जेन्टली रबिंग करा. यामुळे ओठांची डेड स्किन रिमूव्ह होऊन ओठ मॉइश्चराईज होतील.

* फनलविंग लुकसाठी रूबी रेड, प्लम, पिंक, स्पॅनिश पिंक, पीच इ.ची निवड करा.

* नाइट पार्टीमध्ये डार्क कलरची लिपस्टिक लावावी.

* लिपस्टिक पॉलिशड, मॅटी, फोमी, निओन इ, असावी. पण स्किनटोननुसारच लावावी.

फेस बेस मेकअप

स्लिमिंग मेकअप पद्धतींमध्ये फेस कंटूरिंगचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. कंटूरिंगद्वारे तुमचे चीकबोन्स, व जॉलाइन उठावदार दिसते. गोबरे गाल, डबल चीन, मोठे नाक आणि पफी आइज असे प्रॉब्लेमही कव्हर करू शकता. यासाठी तुम्ही स्किन शेडहून २-३ डार्क शेड फाऊंडेशनचा वापर कंटूरिंग करण्यासाठी वापरू शकता. तसेच फाऊंडेशन स्किनहून २-३ लाइट शेडची निवड हायलायटिंगसाठी करा.

हायलायटिंग एरिआ

बेसिकली टी झोन (कपाळामध्ये, नाकामधील ब्रीज लाईन व चिन सेंटरमध्ये) आणि अंडर आय एरिआला हायलायटिंग पॉइंट म्हटले जाते.

डार्क शेंडिग एरिआ

आउटर पोर्शन फेस चीक बोन्सपासून आतल्या दिशेने नेक लाइन शेडिंग पाँइंट आहे, जिथे डार्क फाउंडेशनशेडचा वापर करा. लक्षात ठेवा नॅचुरल लुकसाठी ब्लेडिंग जरूर करा.

ब्लशर पद्धत

एकाच ब्लशर पॅलेटमधील ३ रंगांचे ब्लशटोन घ्या. डार्क शेडचे ब्लशर चीकबोन्सच्या खालच्या दिशेने लावावे. मग ब्लेन्ड करा. मिडिअम शेड चीकबोन्समध्ये आणि डार्क शेड मधल्या भागात ब्लेन्ड करा. परफेक्ट ब्लशर टोनसाठी लाइटशेड ब्लशर पुन्हा चीकबोन्सवर लावून ब्लेन्ड करा.

परफेक्ट आयब्रो

आयब्रोजनेसुद्धा चेहरा बारीक दिसू शकतो. यासाठी आयब्रोला आर्च शेपमध्ये करून घ्या. यामुळे डोळे जास्त मोठे आणि उठावदार दिसतील आणि चेहरा स्लिम दिसेल. आयब्रोज डिफाइन करण्यासाठी हायलायटर लावून बोटाने ब्लेन्ड करा. आयब्रो शेप थिक व लाँगलेन्थ बनवा.

बेस्ट हेअर कट-हेअरस्टाईल

मिडिअम लेन्थ हेअर विथ साइड बॅग्स कटची निवड करा किंवा मिक्स लाँग लेन्थ लेअर किंवा फेअर कटिंगची निवड करा. ज्यामुळे चेहरा स्लिम दिसतो. पण केस जर लहान असतील तर शार्प बॉब विथ स्टे्रट पाँइंटने न्यू कट देता येऊ शकतो. ज्यामुळे सौंदर्य उठून दिसेल. याशिवाय बोल्ड बँग्स, सिल्क विथ स्टे्रट कट, मल्टीलेअर्स, ए लाईन स्टे्रट कट, हाय बन विथ बॅग्स, वॉटर फॉल ट्व्सिट विथ कर्ल्स, हाफ अपडू फंकीबन, ओपन हेअरस्टाईल विथ कर्ल्स, टाइट कर्ल विथ फ्रिंज्स, साइट स्विस्ट कर्ल, वन साईड बँग्स, हाय पफ विथ लूज पोनीटेल, लूज फंकी ब्रोकन कर्ल्स, लेअर कर्ल विथ टेक्चर इ. हेअर कट व हेअरस्टाइल चेहऱ्याला स्लिम आणि तुम्हाला हॉट, गॉर्जिअस व आकर्षक लुक देऊ शकेल.

ब्रायडल मेकअपचे बारकावे

* तोषिनी राठोड

प्रत्येक नववधूला वाटत असतं की तिची स्टाइल आणि लुक असा पाहिजे, ज्याने ती फक्त तिच्या जीवनसाथीचंच नव्हे तर सासरच्यांचंही मन जिंकेल. मग असं काय करावं जेणेकरून नववधूचं सौंदर्य पतीचं मन मोहीत करेल?

सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ओजस राजानी सांगतात की सर्वात आधी नववधूचं व्यक्तिमत्त्व, स्किन टाइप, केसांचं टेक्सचर, कलर, आयब्रोजचा शेप आणि फेस कट पाहावा लागतो. जर यात कोणत्या प्रकारची कमतरता असेल तर नववधूला एक्सरसाइज आणि स्किन केअर रूटीनचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे मेकअपपूर्वी त्वचा अधिक टवटवीत आणि उजळलेली दिसावी

स्किन केअर रूटीन

स्किन केअर रूटीनबद्दल सांगताना ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आकांक्षा नाईकचं म्हणणं आहे की नववधूला आपला स्कीन टाईप माहिती असणं खूप गरजेचं आहे. लग्नाआधी तिने रोज क्लिंजिंग, टोनिंग आणि माइश्चरायिझंगचं रूटीन अवलंबलं पाहिजे. जर स्किन ड्राय असेल तर सोप फ्री कंसीलरचा वापर केला पाहिजे. त्वचेला दिवसातून दोन वेळा माइश्चरायझरही केलं पाहिजे.

जर स्किन टाईप ऑयली असेल, तर क्लिंजिंगसह दिवसातून २-३ वेळा चेहरा धुतला पाहिजे. ऑयली स्किन टाइपसाठी टोनिंग खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्याचे पोर्स बंद होतात आणि त्वचेतून तेल बाहेर येणं थांबतं. त्याचबरोबर त्वचेला माइश्चराइज्ड करण्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. ऑयली स्किनसाठी फेस मास्क लावणंही खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्यावरील डेड स्किनपासून सुटका मिळते आणि त्वचा श्वास घेऊ शकते.

वॉटर बेस्ड व क्रीम बेस्ड मेकअपमधील निवड

मेकअपमध्ये फाउंडेशन योग्य असणं खूप जरूरी आहे. जर बेस मेकअप चांगल्याप्रकारे लावलं गेलं आणि फाउंडेशनचा रंग स्किनच्या अनुरूप असेल, तर एक लायनर लावूनही नववधू सुंदर दिसू शकते.

अशाप्रकारे क्रीम बेस्ड मेकअप त्यांच्यासाठी उत्तम ठरतो. ज्यांच्या चेहऱ्यावर डाग, पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स नसतात. पण ऑयली स्किनसाठी क्रीम बेस्ड मेकअपचा वापर अजिबात करू नये, तर डाग असणाऱ्या स्किनसाठी वाटर बेस्ड मेकअप गरजेचा आहे.

कॉप्लेक्शननुसार मेकअप

आकांक्षाने सांगितलं की भारतीयांचे कॉप्लेक्शन ३ प्रकारचे कॉप्लेक्शन असतात. गोरा, गव्हाळ आणि सावळा कॉप्लेक्शननुसार मेकअपची निवड करा.

गोरी त्वचा : जर तुमचा रंग गोरा आहे तर तुमच्यावर रोजी टिंट बेस कलर आणि काही प्रसंगी सोनेरी रंगाचं फाऊंडेशन बेस सूट होईल. डोळ्यांचा मेकअप करताना लक्षात ठेवा की आयब्रोज ब्राउन कलरने रंगवा. गोऱ्या रंगावर पिंक आणि हलक्या लाल रंगांचं ब्लशर खूप सुंदर वाटतं. तिथेच ओठांवर हलक्या रंगाचीच लिपस्टिक चांगली वाटते.

गव्हाळ रंग : जर तुमचं कॉप्लेक्शन गव्हाळ असेल तर तुम्ही तुमच्या स्किन कलरला मॅच करणारं वॉटर बेस्ड फाऊंडेशन लावलं पाहिजे. त्वचेवर हलक्या रंगांचं फाऊंडेशन वापरू नये. डोळ्यांच्या मेकअपसाठी ब्राँज किंवा ब्राउन कलरचा वापर केला पाहिजे. गालांवर ब्राँज कलरच्या ब्लशरचा वापर केला पाहिजे. या स्किनटोननुसार तुमच्यावर डार्क रंगांची लिपस्टिक शोभून दिसेल.

सावळी त्वचा : सावळ्या त्वचेचा मेकअप करण्याआधी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. सावळ्या त्वचेसाठी वॉटर बेस्ड नॅचरल ब्राउन टोन फाऊंडेशनचा वापर केला पाहिजे. यासाठी फाऊंडेशनच्या ब्लेडिंगवरही चांगल्याप्रकारे लक्ष दिलं पाहिजे.

लक्षात ठेवा तुम्ही त्वचेच्या रंगापेक्षा गडद शेडच्या फाऊंडेशनचा वापर टाळा. डोळ्यांचा मेकअप करताना लाइट रंगांच्या आयब्रोज कलरचा वापर करू नये, पण आउटलाइनसाठी काजळचा वापर करा. ब्लशरसाठी प्लम आणि ब्राँज कलरचा वापर करा. लिप कलरसाठी पर्पल, रोज आणि पिंक ग्लासचा वापर करू शकता.

ओजसच्या म्हणण्यानुसार नववधूने मेकअप अधिक गडद होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. ती वयस्क दिसू लागते म्हणून आणि मेकअप टाळावा.

काळजीपूर्वक लिप कलर निवडा

ओजसच्या म्हणण्यानुसार आजकाल बॉलिवूडच्या तारकासुद्धा कमी मेकअप आणि लाइट शेडची लिपिस्टिक लावणं पसंत करतात. आता हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचे दिवस आहेत, जे तुमच्या मेकअपचे बारकावे अधोरेखित करतात. जर तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक लावली तर याने तुमच्या लग्नाच्या फोटोमध्ये तुम्ही भयानक दिसाल.

ट्रेंडनुसार आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट शेडच्या लिपस्टिक आल्या आहेत, ज्या लाइट असूनही तुम्हाला डार्क लिपस्टिकसारखा लुक देतात. यामुळे तुमच्या लिप्सला थोडा पाउट लुकही मिळेल. त्याऐवजी जर तुम्ही डार्क लिपस्टिकचा वापर केला, तर तुम्ही डोळ्यांचा मेकअप कमी केला पाहिजे. जर तुम्ही हेवी आय मेकअप करत असाल, तर तुम्ही लिप कलरमध्ये लाइड शेडच निवडली पाहिजे.

रंगीत लेन्सची निवड

ओजस सांगते की तुमचा रंग गोरा असो, गव्हाळ असो किंवा सावळा असो, तुम्ही आय लेंससाठी हलक्या तपकीरी रंगाचा वापर केला पाहिजे. आय लेंसमध्ये ग्रीन आणि ब्राउन मिश्रित एक नवीन कलर बनवला आहे, जे दिसायला खूप चांगला वाटतो.

मेकअपआधी फ्लॅश टेस्ट

नववधू असो किंवा कलाकार तुमचा मेकअप बेस किंवा फाऊंडेशन परफेक्ट असला पाहिजे. कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे मेकअप आधीच ग्रे दिसतो. अशात तुम्ही बेस लावल्यानंतर आपल्या फोनच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश ऑन करून एक फोटो काढायला हवा. यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही फाऊंडेशन चांगल्याप्रकारे लावलं आहे की नाही. याला मेकअप आर्टिस्ट फ्लॅश टेस्ट म्हणतात.

कमी बेससह गरजेच्या मेकअपकडे लक्ष दिलं पाहिजे. कमी फाऊंडेशन, लाइट कलर ब्लश आणि हलक्या रंगांची लिपस्टिक तुमच्या लुकला उभारी देईल. या सॉफ्ट स्टाइलिंगबरोबर नववधू खूप सुंदर दिसते. याव्यतिरिक्त नेहमी आपलं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन मेकअप केला पाहिजे.

ओठ फुटण्यापासून असे सांभाळा

* डॉ. भारत खुशालानी

बऱ्याचदा लोक ओठ फुटण्याच्या समस्येला फार गांभीर्याने घेत नाहीत. घरातील उष्ण कोरडया हवेमुळेही ओठ हलकेसे फुटतात, पण जेव्हा ओठ गंभीर प्रकारे फुटतात, तेव्हा ते एखादा रोग किंवा आजार असल्याचे दर्शवतात. असे कुपोषण किंवा निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन यामुळेही होऊ शकते. हे त्वचेच्या दाहामुळेही होऊ शकते.

त्वचेचा दाह ही कोरडया त्वचेची एक अशी स्थिती आहे जी उष्णतेमुळे कधीकधी उत्तेजित होते. त्वचेवर काही उत्पादनांचा वापर केल्यानेही त्वचा संवेदनशील होऊ शकते. खूप वेळपर्यंत सूर्याच्या प्रखर किरणांच्या संपर्कात आल्यामुळेही त्वचेचे नुकसान होते, ज्यामुळे ओठ सुकतात आणि फुटू लागतात.

समस्येचे कारण

हर्पीस व्हायरसमुळे त्वचा कोरडी होते. या व्हायरसने निर्माण केलेले हे ‘थंड घाव’ खूप संसर्गजन्य असतात. जर या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तिचा कप दुसऱ्या कोणा व्यक्तिने वापरला तर त्याला हा रोग होण्याची पुरेपुर शक्यता असते. जेव्हा ओठांवर अशा थंड घावांची स्थिती निर्माण होते, तेव्हा डॉक्टर त्यावर बेंजोकोन जेल लावायला सांगू शकतात.

हे एक लोकल अॅनेस्थेटिक असून सर्वसाधारणपणे कॉमन पेन रिलीफसाठी वापरले जाते. तोंडाच्या अल्सरसाठी मिळणाऱ्या अॅनेस्थेटिक उत्पादनांत आणि मलमांत हा घटक सक्रिय असतो. थंड घाव ठीक होईपर्यंत त्वचेचे रक्षण करण्यासाठी हे मलम वापरत राहणे योग्य ठरते.

नवीन उत्पादनांच्या वापरामुळे ओठांची जळजळ होऊ शकते. त्यामुळे अशी नवीन उत्पादने टाळली पाहिजेत. त्वचा विशेषज्ञांनुसार टूथपेस्ट हेसुद्धा ओठांच्या समस्येचे कारण होऊ शकते. त्यामुळे आपण असा फॉर्म्युला असलेली टूथपेस्ट वापरली पाहिजे ज्यात त्वचेला उत्तेजित करणारे घटक नसतील. ओठ ठीक होईपर्यंत बेकिंग सोडयाचा वापरही करू शकता. सूर्य प्रकाशात, हिवाळयात किंवा उन्हाळयात बाहेर पडताना नेहमी आपल्या ओठांना सनस्क्रीन लावून सुरक्षित ठेवा.

अशाप्रकारे करा देखभाल

ऑनलाइन मिळणाऱ्या मधमाशीच्या मेणाच्या डब्या गंभीररित्या फुटलेल्या ओठांवर उपचार करण्यासाठीही सर्वात जुन्या आणि प्रभावशाली पद्धतींपैकी एक आहेत. हे मेण ओठांना फुटण्यापासून रोखते आणि ओठांना आर्द्रता प्रदान करते.

आपल्या ओठांची त्वचा खूप पातळ असते, त्यामुळे शरीराच्या इतर भागांपेक्षा ती अधिक संवेदनशील असते. खरंतर ओठांवरील बाह्य स्तर हा इतका पातळ असतो की ओठ लाल दिसू लागतात, कारण ओठांचा पातळ थर हा त्वचेच्या खालील रक्तवाहिन्यांना दृश्यमान करतो आणि ओठांची त्वचा ही अतिशय पातळ असल्याने ती कोरडी आणि थंड हवा आणि प्रखर सूर्यप्रकाश यांपासून आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही.

ब्रँडेड उत्पादने वापरा

जीभ ही ओठांच्या नजीक असल्याने, ती नकळतच स्वयं आपले कार्य करते. जेव्हा आपले ओठ सुकतात, तेव्हा आपोआपच आपली जीभ ओठांवरून फिरली जाते. जेव्हा जीभ ओठांना लागते, तेव्हा लाळेमुळे ओठ ओले होतात. पण काही वेळानंतर या लाळेचे बाष्प होऊन ती उडून जाते आणि मग ओठ पहिल्याहून अधिकच सुकतात. अशावेळी सुगंधी लीप बामचा वापर टाळा, कारण ते ओठांना अधिकच त्रासदायक ठरू शकतात.

ओठांना फुटण्यापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पावले उचलता येतील, उदाहरणार्थ :

* सर्वप्रथम आपल्या ओठांना मॉइश्चराइझ करा, कारण कोरडेपणा राहिला नाही तर ओठ फुटणारच नाहीत.

* चुकूनसुद्धा ओठांवरून जीभ फिरवू नका.

* निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन हे पाण्याच्या कमतरतेमुळे होते आणि हेसुद्धा ओठ फुटण्याचे एक संभावित कारण आहे. त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. शक्य होईल तेवढे मसालेदार आणि चिवडा-फरसाण अशा पदार्थांपासून दूर रहा. याशिवाय तोंडाने श्वास घेण्याचा जास्त प्रयत्न करू नका.

तर मेकअप खुलेल आणि टिकेलही

– सोमा घोष

उत्सवाचा काळ जवळ आला की महिला आपला चेहरा आणि स्किनचा ग्लो याबाबत सतर्क होतात, पण या मोसमात त्वचेला ताजेतवाने ठेवणे हे आव्हानात्मक असते. योग्य आहार आणि दिनचर्येमुळे हे शक्य होऊ शकते. याविषयी क्यूटिस स्किन स्टुडिओच्या तज्ज्ञ डॉक्टर अप्रतिम गोयल सांगतात की या मोसमात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते, ज्यामुळे मेकअप चेहऱ्यावर खुलून दिसेल. खालील टीप्स आजमावल्यास योग्य मेकअप केला जाऊ शकतो.

शरीरातून निघालेले टॉक्सिन्स आणि वातावरणातील प्रदूषणामुळे यामुळे त्वचा

निस्तेज होऊन जाते. अशात फक्त फेस वॉश याला नवचैतन्य देऊ शकत नाही. यासाठी पाण्यात भिजवलेले ओट्स आणि मूग डाळ यांनी दिवसातून एकदा चेहऱ्याचे स्क्रबिंग जरूर करा.

मेकअप रिमूव्हर

मेकअप योग्य प्रकारे चेहऱ्यावरून हटवणे अतिशय आवश्यक असते. यासाठी ऑइल, क्रीम किंवा फेस वॉश पुरेसा नाही, कारण यामुळे चेहऱ्याची आर्द्रता कमी होऊन त्वचा रुक्ष होते. यासाठी ड्राय कॉटन बॉलवर मिस्लर वॉटर घेऊन त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेले मेकअपचे छोटे छोटे पार्टिकल्स चांगल्याप्रकारे साफ करावेत.

मॉइश्चराइजिंग

वेगवेगळया त्वचेसाठी वेगवेगळया मॉश्चराइझरची गरज भासते. म्हणजे ड्राय स्किनसाठी क्रीम, नॉर्मल स्किनसाठी लोशन आणि ऑइली त्वचेसाठी जेल वापरणे योग्य असते. आपली त्वचा कोणत्याही प्रकारची असो, रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चराइझर जरूर लावावे.

मास्क

या ऋतूत चेहऱ्यावर फ्रुट मास्क लावल्याने खूप छान रिझल्ट मिळतो. पपई आणि केळयाचा मास्क त्वचेवरील प्रदूषण काढून ग्लो आणतो. ऑइली स्किनसाठी मुलतानी आणि क्लेचा पॅक योग्य असतो. याशिवाय मल्टीस्टेप फेशिअल मास्क आणि शीट मास्क यामुळेही त्वचेवर उभारी येते.

प्रोटेक्शन

सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे चेहऱ्याला उन्हापासून वाचवणे. घरातून बाहेर पडताना त्वचेचे धूळ आणि माती यांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन मॉइश्चराइझर, कॉम्पक्ट पावडर आणि फाउंडेशनचा जरूर वापर करा. याशिवाय फटाके फोडण्याआधी बॅरियर क्रीम लावायला विसरू नका.

सणावारी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वर्कआउट, फिरणे, जिमला जाणे हे आधीपासूनच सुरू ठेवायला हवे. म्हणजे सणाच्या धावपळीनंतरही तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुमची त्वचाही तजेलदार राहील. स्वत:ला हायड्रेट करण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थांचे जास्त सेवन करावे.

स्किनवर वॉटर बेस्ड मॉइश्चराइझर लावावे, त्याचबरोबर ज्यांना डार्क सर्कल्स आहेत, त्यांनी व्हिटॅमिन सी असलेल्या सीरमने डोळयांच्या खाली हलक्या हाताने ३-५ मिनिटे मसाज करावा. काकडी आणि बटाटयाचे काप डोळयांखालील डार्क सर्कल्सवर ठेवल्याने पफीनेस आणि काळसरपणा कमी होतो.

मेकअप टीप्स

अप्रतिम सांगतात की जवळजवळ प्रत्येक महिलेला मेकअप करता येतोच, पण तो आकर्षक करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही सर्वांपेक्षा हटके आणि सुंदर दिसाल :

* आपल्या स्किन टोननुसार योग्य मेकअप निवडणे सोपे नसते. याबाबतीत थोडे प्रयोगशील राहावे लागते, कारण कोणीही तुमच्या स्किन टोनसाठी योग्य उत्पादन कोणते हे सांगू शकत नाही. तुम्हाला जो ब्रँड आवडतो त्याचे अनेक शेड्स घेऊन ते चेहऱ्यावर लावून योग्य उत्पादन निवडा.

* मेकअपच्या आधी त्वचेला जरूर मॉइश्चराइझ करा.

* मेकअपच्या आधी प्रायमर बेसच्या रूपात लावा. यात इस्टाफिल जेल भरपूर असते, जे काही वेळाकरता तुमच्या चेहऱ्याची रोमछिद्रे बंद करते. ज्यामुळे मेकअप एकसारखा त्वचेवर बसतो आणि स्किनला सुरक्षाही मिळते.

* हल्ली बाजारात अनेक प्रकारचे कंसीलर उपलब्ध असतात. ग्रीन कलरचा कंसीलर चेहऱ्यावरील पातळ कोशिकांना लपवण्यासाठी कामी येतो, तर ब्राउन कलरचा कंसीलर ब्राउन पिगमेंटेशन आणि वांग यांना लपवतो. तर नॉर्मल स्किन कंसीलर डोळयांभोवतीचे डार्क सर्कल्स लपवतो. ऑइली स्किन करता मॅट फिनिश कंसीलर चांगला असतो.

* फाउंडेशनने चेहऱ्याचे कंटूरिंग करणे हाही एक चांगला मेकअप ट्रेंड आहे. यात ३ वेगवेगळया प्रकारच्या फाउंडेशन स्टिक्स मिसळून एका स्टिकमध्ये केले जाते.    ज्यात १ स्टिक ही स्किन टोननुसार असून २ स्टिक्स स्किन टोनपेक्षा २     शेड्स गडद लावल्याने एक वेगळा कलर मिळतो, जो कंटूरिंगसाठी चांगला पर्याय असतो.

* स्टिक आयशॅडोचा वापर डोळयांसाठी करा. हा चेहऱ्यावर सहज लावता येतो आणि याला कलर आयपेन्सिलच्या रूपातही वापरू शकता.

* काजळ आणि स्मज ब्रशचासुद्धा डोळयांसाठी वापर करा. स्मोकी लुकसाठी आयलॅशेसच्या खाली वर सजवा.

* लुकला नवेपण देण्यासाठी गालांवर फेस टींट लावा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें