* गरिमा पंकज
मेट्रो स्टेशनवर असो वा गजबजलेल्या रस्त्यावर असो, बसमध्ये असो वा बाईकवर किंवा रिक्षावर असो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मुली नेहमी दुपट्टा किंवा स्टोलने आपला संपूर्ण चेहरा आणि केस झाकून ठेवतात. त्यांचे फक्त डोळे दिसतात. कधीकधी तर त्यावरही गॉगल असतो. या मुलींचे वय १५ ते ३५ असते. आता तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहत असेल की शेवटी या मुली डाकूप्रमाणे आपला चेहरा का लपवत असतात? अखेरीस प्रदूषण, धूळमातीचा पुरुषांना आणि जास्त वयाच्या महिलांनाही त्रास होतो, मग या मुली कोणापासून बचावाचा प्रयत्न करत असतात?
तशा तर, या मुली वाईट नजरांपासून बचाव करू पाहतात. पुरुष जात तशी तर महिलांना अतिशय सहयोग देत असते पण अनेकदा गर्दीत मुलींचा सामना अशा नजरांशीसुद्धा होतो, ज्या कपडयांसोबत शरीराचाही पूर्ण एक्सरे घेत असतात. अशा नजरांमध्ये वासनेच्या ज्वाला स्पष्ट दिसून येतात. संधी मिळताच अशा नजरेची माणसं या मुलींना पकडून त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नांचे पंख उध्वस्त करून फेकून देतात.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या २०१४च्या अहवालानुसार आपल्या देशात दर तासाला ४ बलात्कार म्हणजे दर १४ मिनिटात एक बलात्कार होतो. अशा परिस्थितीत मुलींनी स्वत:च आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या नजरांपासून स्वत:ला सोडवणे ज्या त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारतात. त्यांच्या धैर्याला मुळापासून नाहीसे करतात. हेच कारण आहे की आता मुली जुडोकराटे शिकत आहेत. लाजाळू बनण्यापेक्षा कुस्तीत मुलांना पराभूत करणे त्यांना आवडू लागले आहे. पायलट बनून आपल्या स्वप्नांना पंख देणे शिकू लागल्या आहेत, नेता बनून संपूर्ण समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत.
पण सत्य हे आहे की उदाहरण बनणाऱ्या अशा महिला आता जास्त नाहीत. आजही अशा महिलांची संख्या अधिक आहे, ज्यांच्यासोबत भेदभाव आणि क्रुरतेचा भयानक खेळ खेळला जात आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते आणि हे काम केवळ पुरुषच करत नाही, अनेकदा महिलासुद्धा महिलांशी असे वर्तन करतात. सुरक्षेच्या नावावर त्यांच्या आयुष्याशी खेळत राहतात.
अशीच एक मनाचा थरकाप उडवणारी प्रथा आहे, पुरुषांच्या वाईट नजरांपासून बचाव करण्यासाठी ब्रेस्ट आयर्निंग.
ब्रेस्ट आयर्निंग
ब्रेस्ट आयर्निंग म्हणजे छाती गरम इस्त्रीने दाबणे. या परंपरेत मुलींच्या छातीला एखाद्या गरम वस्तूने दाबून टाकले जाते, जेणेकरून त्यांच्यावर आलेल्या वक्षांची वाढ थांबवली जाईल आणि त्यांना पुरुषांच्या वाईट नजरांपासून सुरक्षित ठेवता येईल.
आफ्रिका महाद्वीपातील कॅमरून, नायजेरिया आणि साऊथ आफ्रिकेतील अनेक समुदायात असे मानले जाते की महिलांची छाती जाळल्यास त्याची वाढ खुंटते. तेव्हा पुरुषाचे लक्ष मुलींकडे जाणार नाही. यामुळे बलात्कारासारख्या घटना कमी होतील. किशोरवयीन मुलींचे पालकच त्यांच्यासोबत असे घृणास्पद वर्तन करतात. ब्रेस्ट आयर्निंगच्या ५८ टक्के घटनांमध्ये मुलींच्या आयाच हे दुष्कृत्य करतात. दगड, हातोडा व चिमटयाला गरम करून मुलींच्या छातीवर लावले जाते, जेणेकरून त्यांच्या छातीतील पेशी कायमस्वरूपी नष्ट होतील.
ही वेदनादायी प्रक्रिया केवळ यासाठी की मुलींना तरुण दिसण्यापासून दूर ठेवले जावे. जास्तीतजास्त काळ ती मुलगी लहान दिसावी आणि अशा पुरुषांच्या दृष्टीआड राहावी जे त्यांना पळवून नेतात. त्यांचे लैंगिकशोषण करतात किंवा त्याच्यावर अश्लील शेरे मारतात. म्हणजे हा संरक्षणाचा एक मार्ग मानला जातो. यौनशोषणापासून रक्षण, बलात्कारापासून रक्षण, पुरूषांच्या मुलींप्रति आकर्षणापासूनन रक्षण.
कॅमरूनमधील बहुतांश मुली ९-१० वर्षांच्या वयातच ब्रेस्ट आयर्निंगच्या प्रक्रियेतून जातात. ब्रेस्ट आयर्निंगची ही बीभत्स प्रक्रिया मुलींसोबत सतत २-३ महिने सुरु असते.
आफ्रिकेच्या गिनियन गल्फची लोकसंख्या जवळपास दीड कोटी आहे आणि इथे साधारण २५० जमाती राहतात. टोगो, बेनिन आणि इक्काटोरियल गुनियाला लागून असलेल्या या देशाला ‘मिनिएचर आफ्रिका’सुद्धा म्हटले जाते. या विचित्र प्रथेमुळे गेल्या काही काळापासून कॅमरून चर्चेत आहे.
मुळात पश्चिमी आफ्रिकेत सुरु झालेली ही परंपरा आता ब्रिटनसहीत अन्य युरोपियन देशांपर्यंत पोहोचली आहे. एका अनुमानानुसार ब्रिटनमध्येसुद्धा जवळपास १,००० मुलींना अशा प्रक्रियेतून जावे लागते.
या प्रथेचा मुलींच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो, केवळ शारीरिकच नाही तर मानसिकसुद्धा. ब्रेस्ट आयर्निंगमुळे त्यांना इन्फेक्शन, खाज, ब्रेस्ट कॅन्सर यासारखे आजार होतात. भविष्यात स्तनपान करण्यातसुद्धा त्रास सहन करावा लागतो.
महत्वाचे हे की इतर आफ्रिकी देशांच्या तुलनेत कॅमरून ह्या देशात साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे. लैंगिक आकर्षण आणि प्रदर्शनापासून दूर राहण्यासाठी केली जाणारी ही प्रक्रिया असूनही येथील मुली अल्प वयातच गर्भवती होण्याच्या घटनांमध्ये पुढे येत असतात.
स्पष्टच आहे, ब्रेस्ट आयर्निंगमुळे या धारणेला बळकटी येते की मुलींच्या शरीराचे आकर्षणच पुरुषांना लाचार करते की ते अशा प्रकारचे दुष्कृत्य करतात, लैंगिक अत्याचार वा बलात्कार यासारख्या घटनांमध्ये पुरुषांची काही चूक नसते.
ही प्रथा व्हॉयलेन्स या अंतर्गत येते. एक असा हिंसाचार जो सुरक्षेच्या नावावर घरातील लोकच करतात आणि आपल्याच मुलीचे जीवन बरबाद करतात.
जगभरात मुलींना अशा वेदनादा प्रथांमधून जावे लागते, जेणेकरून त्यांचे चारित्र्य चांगले राहावे. जणूकाही चारित्र्य अशी गोष्ट आहे जिला अशा निरर्थक प्रथांद्वारे चोरण्यापासून वाचवले जाऊ शकते.
कुप्रथांचा काळा इतिहास
महिलांवर अत्याचार होण्याचा इतिहास खूप प्राचीन आहे आणि मार्गही अनेक आहेत. निरनिराळया प्रकारच्या प्रथा आणि परंपरा यांच्या नावावर त्यांच्यासोबत जबरदस्ती केली जाते, त्यांना त्रास देण्यात येतो आणि वेदना दिल्या जातात. त्यांच्या शरीरासोबतच त्यांच्या मनाला पायदळी तुडवले जाते. काही अशाच कुप्रथांबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्यांचा उद्देश कधी महिलांची पवित्रता तपासून पाहणे असतो तर कधी त्याची सुरक्षा, तर कधी त्यांचे सौंदर्य वाढवणे तर कधी कुरूप बनवणे. म्हणजे कारण काहीही असो पण मुळात उद्देश त्यांची प्रतारणा करणे आणि त्यांना पुरुषांच्या अधीन ठेवणे हा असतो :
* स्त्रियांना खतना यासारख्या कुप्रथेचे शिकार व्हावे लागते. यात स्त्रीचे क्लायटोरिस कापले जाते, जेणेकरून त्यांना सेक्स करण्याची इच्छा होणार नाही. भारतात या प्रथेचे चलन बोहरा मुसलमान समाजात आहे. भारतात बोहरा समाजाची लोकसंख्या साधारण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आढळते. १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा समाज खूप समृद्ध आहे आणि दाऊदी बोहरा समाज भारतातील सर्वात जास्त सुशिक्षित समाजापैकी एक आहे. शिकलेसवरलेले असूनही ते यासारख्या शेंडा ना बुडखा यासारख्या प्रथांवर विश्वास ठेवतात. मुलींचा खतनाच्या किशोरवयाच्या आधी करण्यात येतो. यात अनेक प्रकार जसे ब्लेड वा चाकूचा वापर करून क्लायटोरिसच्या बाहेरील भागाला कट देणे वा बाहेरच्या भागाची त्वचा काढून टाकणे. खातनामुळे पूर्वी अॅनेस्थेशियासुद्धा दिला जात नाही. मुली संपूर्णत: शुद्धीत असतात आणि वेदनेने किंचाळत असतात.
खतना उरकल्यावर हळद, गरम पाणी आणि किरकोळ मलम लावू वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी समजूत आहे की क्लायटोरीस काढल्याने मुलीची लैंगिक इच्छा कमी होते आणि ती लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवत नाही.
खतनामुळे स्त्रीला शारीरिक त्रास तर सहन करावाच लागतो, शिवाय निरनिराळया मानसिक त्रासांमधून जावे लागते. त्यांच्या लैंगिक जीवनावरसुद्धा परिणाम होतो आणि त्या भविष्यात लैंगिक सुखाचा आनंद उपभोगू शकत नाहीत.
* थायलंडच्या केरन जमातीत लांब मान असणे हे स्त्रीच्या सौंदर्याचे लक्षण मानले जाते. म्हणून त्यांची मान लांब करण्याकरिता त्यांना एका प्रक्रियेतून जावे लागते. ५ वर्षांच्या वयात त्यांच्या गळयात रिंग घातली जाते. याने मान भले लांब होत असेल, पण ज्या वेदनेतून आणि त्रासातून त्यांना जावे लागते हे तर ती पीडित मुलगीच जाणू शकते. ती तिची मान पूर्णपणे फिरवू शकत नाही आणि ही रिंग त्यांना आयुष्यभर घालावी लागते.
* रोमानिया, इटलीने, यूएसए शिवाय इतर अनेक देशांमध्ये जिप्सी समुदायाचे लोक राहतात. या समुदायात एखाद्या मुलीशी लग्न करायची इच्छा झाली तर मुलाला तिचे अपहरण करावे लागते. जर ३-४ दिवसात मुलगा तिच्या आईवडिलांच्या नकळत तिला लपवून ठेवण्यात यशस्वी झाला तर ती मुलगी त्याची संपत्ती मानली जाते आणि मग दोघांचे लग्न करून दिले जाते.
* भारतात दीर्घ काळ बहुविवाहाची प्रथा कायम होती, यात पुरुषांना हे स्वातंत्र्य होते की ते हवे तेव्हा पाहिजे तेवढया स्त्रियांना आपली पत्नी बनवू शकत होते. यामुळे स्त्रिया आपल्या पतिसाठी भोगदासी बनून राहिल्या. अशाच प्रकारे केरळ आणि हिमाचल प्रदेशात बहुपतित्वाची परंपरा कायम आहे, ज्यात एक स्त्री अनेक पतिची पत्नी बनणे मान्य करते. या व्यवस्थेत आधी निश्चित केले जाते की स्त्री किती दिवस कोणत्या पतिसोबत राहील.
* दक्षिण भारतातील आदिवासी टोडा, उत्तर भारतातील जौनसर भंवरमध्ये, त्रावणकोर आणि मलबारमधील नायर, हिमाचलमधील किन्नोर व पंजाबच्या मालवा क्षेत्रातसुद्धा अशा प्रथा आढळतात. जशी पूर्वीची बहूपतित्वाची परंपरा स्त्रीला भावनिक दृष्टया कमकुवत करायची, तशीच शारीरिक दृष्ट्याही धक्कादायक असायची.
* केनिया, घाना आणि युगांडा यासारख्या देशात एखाद्या विधवा स्त्रीला हे सिद्ध करावे लागते की तिच्या पतिचा मृत्यू तिच्यामुळे झाला नाही अशा वेळी त्या विधवेला क्लिनजरसोबत झोपावे लागते. कुठेकुठे तर विधवेला आपल्या मृत पतिच्या शरीरासोबत ३ दिवस झोपावे लागते. परंपरेच्या नावावर तिला पतिच्या भावांसोबत सेक्स करण्यास जबरदस्ती केली जाते.
* सुमात्रामध्ये मैनताईवान जमातीत स्त्रियांचे दात ब्लेडने टोकदार बनवले जातात. इथे अशी समजूत आहे की टोकदार दात असलेली स्त्री जास्त सुंदर दिसते.
अशाच प्रकारे आफ्रिकेच्या मुर्सी आणि सुरमा जमातीत महिला जेव्हा प्युबर्टीच्या वयात येतात, तेव्हा त्यांचे खालचे समोरचे २ दात काढून खालच्या ओठाला छिद्र करून तो ओढला जातो आणि त्याला एक पट्टी लावली जाते. वेदना सहन करण्याकरिता कोणतेही औषध देण्यात येत नाही. दर वर्षी या लिप प्लेटचा आकार वाढवला जातो. अशी समजूत आहे की जितकी मोठी प्लेट आणि जाड ओठ असतील तेवढी महिला सुंदर असेल.
* सोमालिया आणि इजिप्तच्या काही भागात मागास जमातीत खूपच विचित्र कारणासाठी क्लिटोरल विकृत केले जाते. किशोरवयीन मुलींचे कौमार्य विना औषध सुरक्षित राहावे म्हणून व्हजायना सील केला जातो. हे आजही सुरु आहे, तसे थोडे कमी झाले आहे.
* इस्लामिक गणराज्य मॉरिटानियाच्या काही भागात अशी धारणा आहे की जास्त वजन असलेली पत्नी आनंद आणि समृद्धी घेऊन येते. त्यामुळे लग्नाआधी तरुणींना जबरदस्तीने साधारण १६,००० कॅलरीचा डाएट दिला जातो, जेणेकरून त्यांचे वजन वाढेल.
*अरुणाचल प्रदेशमधील जिरो व्हॅलीच्या अपातनी जमातीच्या स्त्रियांच्या नाकाच्या छिद्रात वूडन प्लग्स घुसवतात. असे त्या कुरूप दिसाव्या म्हणून केले जाते, जेणेकरून इतर कोणत्या जमातिने त्यांना पळवून नेऊ नये. तसे तर आता यावर बऱ्याच प्रमाणात बंदी आणण्यात आली आहे.
पुरुष धुतल्या तांदळासारखे असतात का?
भारतीय इतिहासात चाणाक्य आणि त्याच्या अर्थशास्त्राचे खूपच नाव आहे. जरा त्याचे स्त्रियांबाबत विचार बघा :
स्त्रिया एकाशी बोलत असतात आणि दुसऱ्याकडे पाहात असतात आणि तिसऱ्याचे चिंतन करत असतात. या कोणा एकावर प्रेम करत नाही.
सांगायचा अर्थ हा की स्त्रीसारखी पापी आणि व्यभिचारी कोणी नसते. पण चाणाक्याला हे विचारायला नको होते का की पुरुष काय धुतल्या तांदळासारखे असतात का?
कामवासना तर मानवी प्रवृत्तीचे एक नैसर्गिक अंग आहे आणि मर्यादेचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती स्त्री आणि पुरुष दोघांनाही सामान प्रमाणात मिळते. परंतु धर्मशास्त्रात नेहमी व्यभिचारासाठी स्त्रीच्या चारित्र्यालाच दोषी मानले आहे. पुरुष आपले अवगुण सहज झाकू शकतो. समाजात त्याचे स्थान मजबूत असते, म्हणून तो निर्दोष असतो, उलट स्त्रीला नेहमीच शोषण सहन करावे लागते.
आपण शतकांपूर्वीची मानसिकता बदलवायला हवी. जर डोळे उघडून पाहिले तर शारीरिक दृष्टया वेगळे असूनही स्त्री आणि पुरुष निसर्गाच्या २ एकसारख्या रचना आहेत. दोघांनी मिळून आणि एका स्तरावर पुढे जाण्यातच समाजाची प्रगती शक्य आहे. स्त्री असो वा पुरुष दोघांनाही समान संधी व दर्जा देणे काळाची गरज आहे.