आरोग्य परामर्श

* डॉ. कपिल अग्रवाल, संचालक, हॅबिलिट सेंटर फॉर बॅरिएट्रिक आणि 

लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया

प्रश्न : मी ३२ वर्षांची आहे आणि माझे वजन १०८ किलो आहे. मी डायटिंग आणि व्यायामाद्वारे वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करते, पण फारसा फरक पडत नाही. बाजारात उपलब्ध असलेली वजन कमी करणारी औषधे आणि सप्लिमेंट्स घेणे सुरक्षित आहे का आणि ते प्रभावी आहेत का?

उत्तर : वजन कमी करण्यासाठी औषधे आणि पूरक आहारांचा वापर केला जाऊ शकतो. त्याचा प्रभाव असतो पण तो फार कमी काळ टिकतो. तुम्ही औषध घेणे बंद करताच, वजन पुन्हा वाढू लागते. दुसरे म्हणजे वजनात फक्त ५ ते १० टक्केच फरक पडतो.

ही औषधे आणि सप्लिमेंट्स फक्त काही जास्त वजन असलेल्या सामान्य लोकांवरच प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हे मेंदूतील सेरोटोनिन रिसेप्टर २ सक्रिय करते. या रिसेप्टरच्या सक्रियतेमुळे भूक कमी होते आणि थोडेसे अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. खूप लठ्ठ असलेल्या लोकांवर या औषधाचा कोणताही परिणाम होत नाही. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की जर तुम्हाला लठ्ठपणाची अनुवांशिक पूर्वस्थिती असेल, तर तुमच्याकडे शस्त्रक्रिया आणि नियमित संतुलित आहार व व्यायामच पर्याय आहे.

प्रश्न : मी ४० वर्षांचा आहे. बऱ्याच दिवसांपासून मला माझे ओटीपोट आणि मांडीच्यामध्ये सूज येत आहे. हळूहळू त्यात वाढ होत आहे. मी डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी हर्नियाची तक्रार सांगितली आणि ऑपरेशन करण्याचा सल्ल दिला. मला ऑपरेशनची भीती वाटते याला दुसरा पर्याय आहे का?

उत्तर : हर्निया रोगावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. इतर कोणत्याही औषधाने तो बरा होऊ शकत नाही. आजकाल हर्नियाची शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपीद्वारे ही केली जाते. यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही कारण शस्त्रक्रिया फक्त ३ छोटी छिद्र्रे करून केली जाते. रुग्णाला २४ तासांच्या आत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो. म्हणून कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता आपण एखाद्या सक्षम सर्जनकडून आपली शस्त्रक्रिया करून घ्यावी.

प्रश्न : मी ३८ वर्षांचा आहे आणि माझे वजन ११८ किलो आहे. मला गेल्या ८ वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. मला कोणीतरी सल्ला दिला आहे की बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेद्वारे अतिरिक्त चरबी काढून टाकून मधुमेहदेखील बरा होऊ शकतो. यात किती तथ्य आहे?

उत्तर : होय, बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेने मधुमेह पूर्णपणे नाहीसा होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी सर्वप्रथम शरीरातील इन्सुलिनची पातळी काही चाचणी करून आपल्याला तपासावी लागते. चाचणी अनुकूल असल्यास रुग्णाची चयापचय शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया केल्यावर तुमचा मधुमेहही बरा होतो.

प्रश्न मी ३० वर्षांची आहे. अलीकडेच माझ्या गाल ब्लॅडरमध्ये एक खडा आढळून आला आहे. यावर उपचार करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? औषधाने यावर उपचार करणे शक्य आहे का?

उत्तर : किडनी स्टोनप्रमाणे तोंडावाटे औषधे पित्ताशयातील खडे काढून टाकण्यासाठी फारशी प्रभावी ठरत नाहीत, कारण गाल ब्लॅडर हे आपल्या शरीरात अशा ठिकाणी आहे, जिथे औषधाचा फारसा परिणाम होत नाही. दुसरे म्हणजे ही अशी स्थिती असते ज्यामध्ये रुग्णाला खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे पित्ताशयातील खडयांवर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक डॉक्टर पारंपारिक शस्त्रक्रियेनुसार ४ छिद्र करून पित्ताशयातील खडा काढतात, परंतु आम्ही प्रगत तंत्राने नाभीला एक छिद्र करून यशस्वी शस्त्रक्रिया करतो, परिणामी रुग्णाच्या शरीरावर ऑपरेशनचे कोणतेही निशाण दिसत नाही आणि रिकव्हरीदेखील लवकर होते.

प्रश्न : माझा मुलगा १४ वर्षांचा आहे आणि त्याचे वजन ६६ किलो आहे. लठ्ठपणामुळे तो न्यूनगंडाचा बळी ठरत आहे. एवढया लहान वयात मधुमेह चाचणीत त्याला प्री-डायबेटिक स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे. मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटते. मी काय करावे?

उत्तर : बहुतेक मुलांमध्ये लठ्ठपणा हा आनुवंशिक कारणांमुळे आणि जंक फूड खाणे व शारीरिक हालचाली न करणे यामुळे होतो. जर तुमच्या कौटुंबिक इतिहासात लठ्ठपणाचा आजार असेल, तर मुलाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण जास्त बीएमआयमुळे मधुमेहाचा धोकाही दुप्पट होतो. पूर्व-मधुमेह असण्याचा अर्थ असा आहे की त्याची ग्लुकोज पातळी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे आणि मधुमेहाच्या पातळीपेक्षा थोडी कमी आहे. म्हणूनच तुमच्या मुलाच्या जीवनशैलीत सकस आहार आणि व्यायामाचा समावेश करणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, तरीही वजन नियंत्रणात न राहिल्यास आणि वाढतच असल्यास मुलाची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय देखील आहे, कारण नंतर लठ्ठपणामुळे इतर अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.

आरोग्य परामर्श

* प्रतिनिधी

प्रश्न – माझे वय २५ वर्षे आहे आणि मला कोणताही आजार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून मला खूप पांढरा स्त्राव होत आहे. हे का होत आहे हे मला समजत नाही. काळजी करण्यासारखे काही आहे का?

उत्तर- स्त्रियांमध्ये योनीतून स्त्राव होणे सामान्य आहे. यावरून असे दिसून येते की शरीराच्या आत असलेल्या ग्रंथी चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि हार्मोन्स तयार करण्याची प्रक्रिया देखील सामान्य पद्धतीने सुरू आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुषमा यांच्या मते, पांढर्‍या स्रावाची अनेक कारणे आहेत जसे की-

* शारीरिक बदल- कधी कधी शारीरिक बदलांमुळेही पांढरा स्त्राव होतो.

* मासिक पाळी येण्यापूर्वी – मासिक पाळी येण्यापूर्वी सतत पांढरा स्त्राव येणे सामान्य आहे.

* गर्भधारणा- गरोदरपणात किंचित गंध असलेले पांढरे पाणी येणे सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल होत राहतात, त्यामुळे कधीकधी पांढरा स्त्राव जास्त असू शकतो.

* टेन्शन घेणे- अनेक वेळा स्त्रिया तणावाच्या बळी ठरतात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे योनीतून स्त्राव सुरू होतो.

ही सर्व कारणे शरीरातील किंवा हार्मोनल बदलांमुळे आहेत जी लवकर बरी होतात. पण जास्त प्रमाणात असल्यास पांढरा स्राव हा चिंतेचा विषय बनतो. डॉक्टर सुषमा म्हणतात, “जेव्हा डिस्चार्जमध्ये बदल दिसून येतो तेव्हा योनीतून स्त्राव चिंतेचा विषय बनतो. बदल अनेक प्रकारचे असू शकतात जसे-

* डिस्चार्जच्या रंगात बदल – जर तुमच्या स्रावाचा रंग पांढर्‍याऐवजी हलका पिवळा किंवा लाल झाला असेल आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली असेल तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. डॉक्टर सुषमा सांगतात की हा संसर्ग बुरशीजन्य, बॅक्टेरिया किंवा लैंगिक संक्रमित रोगांमुळे देखील होऊ शकतो.

* जळजळ आणि खाज सुटणे – जर तुम्हाला जास्त स्त्राव सोबत जळजळ आणि खाज येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही काही संसर्गाचे बळी आहात, अशा परिस्थितीत तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

* कपडे खराब होतात – डिस्चार्ज झाल्यामुळे तुमचे कपडे खराब झाले असतील, तुम्हाला खूप ओले वाटत असेल, तर ही चिंतेची बाब आहे, अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे.

* प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना तुम्हाला पांढरा स्राव होत असेल तसेच प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जास्त प्रमाणात पांढरा डिस्चार्ज संसर्गामुळे होतो, त्यामुळे तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. प्रायव्हेट पार्टवर कधीही साबण किंवा शैम्पू वापरू नका कारण यामुळे त्वचेची पीएच पातळी बदलू शकते. प्रायव्हेट पार्ट धुण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा किंवा योनीमार्गाचा वापर करा.

आरोग्य परामर्श

* डॉ. आमोद मनोचा, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, दिल्ली

प्रश्न : माझे वय ६५ आहे. २०१० मध्ये मला माझ्या पाठीत आणि पायांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. उपचारासाठी ५ वेळा मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेने मला पायाच्या दुखण्यापासून आराम मिळाला असला तरी पाठदुखीचा त्रास अजूनही सतावत आहे. अगदी मला उठणे-बसणे ही अवघड झाले आहे. कृपया मला याचा उपाय सांगा?

उत्तर : योग्य उपचारांसाठी समस्येचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम हे तपासा. मणक्याच्या सांध्यातील वेदना दूर करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅब्लेशन आरएफए हा एक चांगला पर्याय मानला जातो. दिल्लीत अशी अनेक रुग्णालये आहेत, जिथे हे तंत्रज्ञान वापरले जाते. या उपचाराच्या मदतीने तुम्हाला १८ ते २४ महिन्यांत वेदनांपासून पूर्ण आराम मिळेल. मणक्याच्या ज्या नसांमध्ये वेदना होतात त्यांच्याजवळ विशिष्ट प्रकारच्या सुया लावल्या जातात. विशेष उपकरणांच्या साहाय्याने रेडिओ लहरींद्वारे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहाचा वापर करून या नसांजवळील एक छोटा भाग गरम केला जातो. हे मज्जातंतूं मधून मेंदूकडे जाणाऱ्या वेदना कमी करते, ज्यामुळे तुम्हाला वेदनापासून आराम मिळेल. या उपचाराचे अनेक फायदे आहेत जसे की तुम्हाला हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज मिळेल, तुमची रिकव्हरी जलद होईल आणि तुम्ही लवकरच काम सुरू करू शकाल.

प्रश्न : मी ३५ वर्षांचा आहे. गेल्या काही दिवसांपासून माझे खांदे अचानक दुखायला लागतात. मला औषधे घेणे अजिबात आवडत नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी कृपया दुसरा एखादा मार्ग सुचवा?

उत्तर : काळ बदलला आहे तसंच लोकांची जीवनशैलीही बदलली आहे, त्यामुळे तरुण आणि कमी वयाचे लोक ही शरीराच्या विविध भागातील वेदनेने त्रस्त आहेत. त्याचवेळी बहुतेक लोक या वेदनांकडे दुर्लक्ष करत राहतात, ज्यामुळे वेळोवेळी समस्या गंभीर होत जाते. तुम्ही ही म्हण तर ऐकली असेलच की उपचारापेक्षा रोगाचा प्रतिबंध करणे चांगले आहे. होय, जर तुम्ही प्रतिबंध करण्याच्या पद्धतींचे पालन केले तर आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाहीत. वाढत्या वयाबरोबर वाढत्या वेदना टाळण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचे अनुसरण करा. सकस आहार घ्या, दारू आणि धूम्रपानापासून दूर राहा, रोजच्या व्यायामासाठी वेळ काढा, तणावापासून दूर राहा, वजन नियंत्रणात ठेवा. असे केल्याने तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी शरीर मिळू शकेल.

प्रश्न : मी ७० वर्षांचा आहे. अनेकदा माझे सांधे दुखतात. उपचार चालू आहेत, पण विशेष फायदा होत नाही. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की या वयात वेदना होणे हे सामान्य आहे, मात्र मला हे दुखणे सहन करणे कठीण होत आहे. यातून सुटका मिळवण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे का?

उत्तर : या वयात शरीर अनेक आजारांना बळी पडते. या वयात प्रत्येकजण वेदनांची तक्रार करू लागतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. तुझा उपचार सुरू असल्याचे तू सांगितलेस. प्रत्येक उपचाराची एक प्रक्रिया असते, जिचा प्रभाव होण्यास वेळ लागतो. तथापि आज वेदना दूर करण्यासाठी अनेक नॉन-इनवेसिव्ह पर्याय उपलब्ध आहेत, जसे की रेडिओफ्रिक्वेन्सी उपचार, सांधे बदलणे, पुनरुत्पादक औषध इ. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकता. यासोबतच तुमची जीवनशैली आणि आहार सुधारा. चांगले अन्न खा, व्यायाम करा, आठवडयातून दोनदा सांध्यांची मसाज करा, मद्यपान आणि धुम्रपान टाळा, नियमित सांधे तपासणी करा.

प्रश्न : मी २५ वर्षांचा आहे. मी एक फोटोग्राफर आहे, त्यामुळे मला दिवसभर उभे राहून फोटोशूट करावे लागते. कधी-कधी बाहेरही जावं लागतं, जिथे विश्रांतीसाठी वेळ मिळत नसतो. अशा परिस्थितीत माझे शरीर दुखण्याने जणू मोडू लागते आणि डोकेदुखीही होते, त्यामुळे मला वेदनाशामक औषध घ्यावे लागते. वेदनाशामक औषधाने माझ्या तब्येतीवर परिणाम तर होणार नाही ना अशी मला भीती वाटते, कृपया मला या समस्येपासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगा?

उत्तर : अशा प्रकारच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणाई अनेकदा अशा समस्यांच्या गर्तेत सापडते. दिवसभर एकाच आसनात उभे राहिल्याने किंवा बसल्याने मज्जातंतूंवर दाब पडतो, त्यामुळे वेदना होण्याची तक्रार असते. थकवा, भूकेले राहणे, कमी पाणी पिणे आणि विश्रांती न मिळाल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवते. याला आपणच जबाबदार असतो. कामाला महत्त्व देण्याच्या प्रवुत्तीमुळे ते स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर सर्वप्रथम शरीराला विश्रांती द्यायला शिका. कामाच्या दरम्यान थोडा वेळ काढून शरीर  ताणून घ्या, वेळेवर अन्न खा, पुरेसे पाणी प्या आणि अधूनमधून बसून शरीराला विश्रांती द्या. याशिवाय व्यायाम, पौष्टिक आहार इत्यादींचा नित्यक्रमात समावेश करा. समस्या वाढत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ल घ्या. यास  लाइटली घेणे आपल्याला जड जाऊ शकते. कोणत्याही समस्येसाठी कधीही स्वत:च औषधोपचार करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें