बदाम तेलाचे ११ फायदे

* गरिमा पंकज

बदाम आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर असतं. बदामाचं तेलदेखील विविध प्रकारे फायदे देत असतं. बदामाच्या तेलात ४४ टक्के तेल असतं, जे कोल्ड प्रेस करून काढलं जातं. बदामाच्या तेलामध्ये अँटीइनप्लॅमेटरी, इम्युनिटी बुस्टिंगसहित अनेक गुण असतात. यामध्ये विटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाण असतं. पोषक तत्त्वांनी पुरेपूर बदामाचे तेल अनेक आजारांपासून दूर ठेवतं. बदामाच्या तेलाने मुलांना मालिश केल्यास त्यांचा शारीरिक विकास वेगाने होतो.

बदाम तेलाच्या काही अशा खास गुणांबद्दल जाणूया जे सौंदर्य कायम ठेवण्यासोबतच तुम्हाला निरोगी ठेवण्यात देखील मदत करतं :

त्वचेसाठी फायदेशीर : बदामाच्या तेलाने सौंदर्य उजळतं. हे चेहऱ्याचा रंग उजळण्याबरोबरच त्याला ग्लो देण्यातदेखील खूप परिणामकारक असतं. यामुळे त्वचेला योग्य प्रमाणात पोषण मिळतं. ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा अधिक चमकदार आणि मुलायम बनते. बदाम तेलामध्ये ग्लायकोसाईड एमीगडेलीन असतं, जे कोरडी त्वचा, सुरकुत्या, अल्ट्राव्हाईट किरणांपासून त्वचेचं नुकसान इत्यादीमध्ये फायदेशीर असतं. ज्या मुलींना सतत बाहेर राहावं लागतं आणि त्वचा सावळी वा काळी झली असेल तर त्यांच्यासाठी बदाम तेलाचे निर्माता अधिक फायदेशीर सांगतात.

डार्क सर्कलसाठी फायदेशीर : डार्क सर्कल्ससारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बदाम तेलाचा वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी डोळयांखाली या तेलाने मालिश करा. या तेलाच्या हलक्या मालिशने खूप फायदा मिळतो.

जेव्हा होईल टॅनिंग : विविध गुणांनी पुरेपूर हे तेल नैसर्गिक सनस्क्रीमप्रमाणे देखील काम करतं. टॅनिंगपासून व टॅनिंग रिमुव्ह करण्यासाठी बदाम तेलाचा वापर करू शकता. हे सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यास मदत करतं. सेल्स गर्ल्स, फिजिकल क्लासेस घेणाऱ्या क्रीडा टीचर्स, खेळांमध्ये काम करणाऱ्या मुलींनी या तेलाचा वापर करणे फायदेशीर होऊ शकतं.

कोंडापासून सुटका : बदाम तेल डेड सेल्सला हटवून कोंडयापासून सुटका देतो. केसांना डँड्रफ फ्री आणि हेल्दी ठेवण्यासाठी या तेलाच्या मालिश नंतर हेअर स्टीम आवर्जून घ्या. यामुळे केसांचा मुलायमपणा आणि व्हॉल्युममध्ये फरक दिसून येईल.

हृदयरोगांपासून सुरक्षा : बदाम तेलामध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅट एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रलच काम करतं आणि एचडीएल म्हणजेच चांगल्या कॉलेस्ट्रोलला वाढवतं.

डायबिटीज : बदाम तेलामुळे ब्लड शुगर कमी करण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यास मदतनीस : बदामाच्या तेलाच्या फायद्यांमध्ये वजन कमी करण्याचादेखील समावेश आहे. बदामामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट वजन कमी करण्यास मदत करतात.

डोळयांसाठी फायदेशीर : बदाम तेलामध्ये असणारा विटामिन ई डोळयांना निरोगी करण्याचं काम करतं. बदाम तेलामध्ये असलेलं अल्फाटोकोफेरोल नावाचं विटामिन ई जे वृद्ध डोळयांची रोशनीदेखील वाढवतं.

पाचन समस्यामध्ये लाभकारी : बदाम तेल हे अपचन, ड्रायरिया, पोटदुखी इत्यादी दूर करतं.

मुलांसाठी फायदेशीर : नवजात शिशुच्या त्वचेसाठी बदाम तेल खूपच फायदेशीर असतं कारण यामध्ये विटामिन ए, बी-१, बी-२, बी-६, विटामिन ई आणि आवश्यक फॅटी अॅसिड असतं, जे नवजात शिशुच्या त्वचेला पोषित करण्याबरोबरच त्यांचा रंग उजळण्यातदेखील मदत करतं. यामुळे नवजात शिशुची त्वचा मुलायम राहते. नवजात शिशुच्या आर्थिक विकासासाठी बदाम तेलाने नियमित मसाज करा. यामुळे बाळाच्या शरीराच्या मासपेशी मजबूत होतात.

बदाम तेलातील ओमेगा-६ फाटी अॅसिड फायदेशीर आहे. यामध्ये तुम्ही दूध मिसळून बाळाला देऊ शकता.

गर्भवती स्त्रियांसाठी : गर्भावस्थेत बदाम तेलाचे सेवन करणे खूपच फायदेशीर असतं. गर्भावस्थेत बदाम तेलाच्या सेवनाने प्रसूतीच्यावेळी प्रसुती नॉर्मल होण्याची शक्यता वाढते. यामधील फॉलिक अॅसिड, आयरन, कॅल्शियम आणि इतर दुसरे पोषक तत्व आई आणि बाळ दोघांना फायदा पोहोचवतात. यामध्ये पुरेपूर प्रमाणात आयरन असतं, जे हिमोग्लोबिनचा स्तर वाढविण्याचं काम करतं. यामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही शरीराच्या अनेक आवश्यकता पूर्ण करतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें