पहिल्यांदाच हास्यजत्रेच्या मंचावर अजयसाठी अतुलकडून सरप्राईज

* सोमा घोष

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घराघरांत अगदी आवडीनी पहिली जाते त्याचप्रमाणे अजय-अतुल हेसुद्धा हा कार्यक्रम न चुकता पाहतात. ‘इंडियन आयडल मराठी’ या सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने अजय-अतुल यांनी हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली. ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमामध्ये परीक्षक होण्याचं आम्ही यासाठी ठरवलं की, त्यानिमित्ताने आम्हांला हास्यजत्रेच्या मंचावर जाता येईल, असंही ते या वेळी गमतीने म्हणाले.

अजय-अतुल ही जोडी हास्यजत्रेत आली असताना एक दुग्धशर्करा योग जुळून आला आणि तो म्हणजे अतुल गोगावले यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलं. अजयसाठी हे सरप्राईज होतं. त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. आपल्या भावाला मंचावर पाहून अजयला आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

आम्हांला हसवणाऱ्या आणि आमचं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं, असं वाटल्याचं अतुल म्हणाला.

संगीतकार जेव्हा विनोदी भूमिका करतो, तेव्हा नक्की काय होतं, हे जाणून घेण्यासाठी या आठवड्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नक्की पाहा.

पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, सोम.-गुरु. रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अजय-अतुल करणार पहिल्या ‘Indian Idol – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षण

* सोमा घोष

कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘Indian Idol – मराठी’ ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षणही संगीत सृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत. पुण्यात नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली या वेळी पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्री. अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री. अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते.

आपल्या संगीताचं गारुड या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव ‘Indian Idol – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच आशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढलं आहे.

‘अजय-अतुल’ या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती  दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला ‘अजय-अतुल’ हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू झाल्या आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

‘Indian Idol – मराठी’ लवकरच पाहा, सोनी मराठी वाहिनीवर!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें