मान्सून स्पेशल : रोपे ठेवतात घराला प्रदूषण मुक्त

* अमरजीत साहिवाल

बेडरूम ही अशी जागा आहे, जिथे आपण आपला दिवसभराचा क्षीण घालवितो. परंतु मऊ गादी, मखमली पडदे, मध्यम प्रकाश व आकर्षक फर्निचरबरोबरच, बेडरूमला मनपसंत पद्धतीने सजवूनही झोप येत नसेल तर समजून जा, बेडरूममधील हवा शुद्ध नाही.

नासा इंस्टिट्यूट ऑफ अमेरिकेला एका शोधात असे आढळून आले की, जे लोक दिवसभर व्यस्त राहातात, त्यांना तणावमुक्त होण्यासाठी आणि शांत झोपेसाठी इतरांपेक्षा जास्त शुद्ध आणि स्वच्छ हवेची गरज असते. म्हणूनच सल्ला दिला जातो की, काही अशी रोपे घरात ठेवली जावीत, जी बाथरूममधील निघणारा अमोनिया गॅस, कचऱ्यातून निघणारा फॉर्मेल्डहाइड गॅस, डिटर्जंटमधून बेंजॉन, फर्निचरमधून ट्राइक्लोरोइथिलिन, गॅस स्टोव्हमधून कार्बन मोनोऑक्साइड आणि लाँड्रीच्या कपडयांमधून निघणाऱ्या दुर्गंधीला निष्क्रिय करतात. काही विशेष रोपे घरात लावल्यास ती एअर प्युरिफायरचे काम करतात.

हे वाचताना तुमच्या मनात जरूर ही गोष्ट आली असेल की, रोपे रात्री कार्बन डायऑक्साइड गॅस सोडतात, आपल्याला तर ऑक्सिजन पाहिजे. हो खरे आहे, तुमच्या मनात आलेली शंका चुकीची नाही. कारण जेव्हा रोपांमध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते, तेव्हा ती कार्बन डाय ऑक्साइड गॅस शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात व ही प्रक्रिया प्रकाशात होते. मात्र, रात्रीच्या काळोखात ही प्रक्रिया अगदी याच्या विपरित घडते.

शास्त्रज्ञांच्या मते, काही अशी रोपे आहेत, जी रात्रीही आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ऑक्सिजन सोडतात. ही रोपे आपल्याला विषारी गॅसपासून मुक्त करण्यात प्रभावी आहेत.

परंतु आपल्याला हे माहीत नसते की, कोणते सजावटीचे रोप कुठे ठेवावे.

मग चला तर आम्ही आपल्याला अशाच काही एअर प्युरिफायर रोपांची माहिती देतो, जी वायुप्रदूषणाला नियंत्रित करण्यात सहायक ठरली आहेत.

स्नेक प्लांट

रात्रंदिवस ऑक्सिजन देणाऱ्या या रोपाला वनस्पती जगात सँसेविरीया ट्रीफॅसिया नावाने ओळखले जाते. बागकामाचे शौकिन याला स्नेक प्लांट म्हणून ओळखतात. हे रोप रात्रीही ऑक्सिजन देते. म्हणूनच रात्रंदिवस ऑक्सिजनची मात्रा वाढवून प्रदूषण रोखले जाते. अर्थात, बाथरूममधील अमोनिया गॅसचा प्रभाव कमी करण्यासाठी स्नेक प्लांट लावा. खाली फरशीवर किंवा खिडकीवर ठेवलेले हे रोप कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्ती देते. जर फुलांचा सुगंध हवा असेल, तर बाथरूममध्ये गुलदाउदीचे रोप ठेवा.

गोल्डन पोथोस

घराच्या सावलीत कमी सूर्यप्रकाशात वाढणारे हिरवट पिवळया रुंद पानांचे हे रोप वायुप्रदूषण रोखण्यात सहायक असते. एअर प्युरिफायर रोपांच्या रांगेतील सुमार स्वरूपाचे गोल्डन पोथोस हे रोप घरात बल्ब किंवा ट्यूब लाइटच्या प्रकाशात वाढते. हे रोप कितीही आर्द्रता असली, तरी जिवंत राहाते. हे मॉस स्टिकद्वारे कमी पाण्यात चांगले परिणाम देते. कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या गॅसच्या प्रभावाला अलोविराच्या रोपाप्रमाणे निष्क्रिय करण्यातही हे सहायक आहे. काळोखात ठेवल्यानंतरही हँगिंग पॉटमध्ये ठेवले जाणारे हे रोप हिरवेगार राहून एअर प्युरिफायरचे काम उत्तमप्रकारे बजावते. हे रोप सामान्य दुर्गंधीबरोबरच गॅस स्टोव्हमधून निघणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड गॅसला दूर करण्यात सक्षम असते.

वीपिंग फिग

घरातील खोल्यांमध्ये हेवी पडदे, गालिचे आणि फर्निचरमध्येही दुर्गंधी येते, जी हळूहळू वायूच्या शुद्धतेच्या लेव्हलला प्रभावित करते. अशा वेळी वीपिंग फिग नावाचे रोप सर्व प्रकारची दुर्गंधी हटविण्यात सहायक ठरते. जर फर्निचरमधून पेंट वगैरेचा गंध येत असेल, तर वार्नेक ड्रेसिनाचे रोपही हा गंध दूर करण्यात उपयुक्त ठरू शकतो. खोलीच्या खिडकीत ठेवलेले रोडडँड्रन सिमसी हे रोप प्लायवूड आणि फोमच्या गादीतून येणारी दुर्गंधीही शोषून घेते.

अशा प्रकारे बेडरूममध्ये अनेक वेळा पडदे किंवा ड्रायक्लीन केलेल्या कपडयांतून येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी जर गरबेरा डॅजीचे रोप ठेवले, तरी चांगला परिणाम दिसून येईल. मात्र, या रोपाला देखभालीची गरज असते. अर्थात, हे अलोविरा, स्नेक या रोपांप्रमाणेच रात्री उशिरापर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यात सक्षम आहे.

पीस लिली

जर तुम्हाला हिरवळीबरोबरच मंद मंद सुगंध हवा असेल, तर वसंत ऋतुमध्ये बहरणाऱ्या सफेद पीस लिली रोपाला घरात ठेवू शकता. कमी प्रकाश व आठवडयातून एकदा पाणी अशा साध्या पद्धतीने वाढणाऱ्या रोपामध्ये वायुप्रदूषण रोखण्याची अद्भूत क्षमता आहे. या रोपात ब्रिथिंग स्पेससाठी आपल्या घरातील साबण, डिटर्जंटमधून निघणारी बेंजिंनची, तसेच कचऱ्याची दुर्गंधी शोषून घेण्याची क्षमता असते. हे रोप एअर प्युरिफायरचा उत्तम स्त्रोत आहे.

आता आपण फुलांच्या रोपांबद्दल माहिती घेतच आहोत, तर बेडरूमच्या खिडकीमध्ये अँथूरिअमचे महागडे रोप अशा ठिकाणी ठेवू शकता, जिथे सरळ ऊन येत नाही.

रेड एज्ड ड्रेसिना

हे रोप घरात ठेवल्यामुळे वायुप्रदूषण नियंत्रणाचे कार्य सुगमतेने होते.

ग्रेप आयव्ही : मध्यम प्रकाश, कमी पाणी, थोडयाशा देखभालीत वाढणाऱ्या या रोपाला वायुप्रदूषण रोखण्याचा उत्तम स्त्रोत मानले आहे.

जर हिरवेगार ताजेतवाने ग्रेप आयव्हीचे रोप शयनकक्षात काउचसोबत ठेवल्यास, ते हवेला शुद्ध करते. रोप वाढत असेल, तर त्याला खूप पाणी द्या. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे किंवा त्यांना अॅलर्जी असेल, तर त्यांनी मात्र सावध राहा. अर्थात, हे रोप अनेक प्रकारच्या गॅसला निष्क्रिय करण्यात सक्षम असते.

किचनच्या कार्बन मोनोऑक्साइड गॅस किंवा घराबाहेर आग लावल्याने निर्माण झालेल्या दुर्गंधीच्या प्रभावाला रोखण्यासाठी रबर प्लांटचे हे रोप घरात किंवा घराबाहेर दोन्ही ठिकाणी काम करेल.

बँबू पाम : कोळयाच्या जाळयांना दूर ठेवणारे हे रोप आजही मॉडर्न सोसायटयांमधील पहिली पसंती आहे. भले हे सजावटीसाठी ठेवले असेल, परंतु हे खोलीतील आर्द्रता नियंत्रित करते. म्हणूनच हे सरळ ऊन येणाऱ्या ठिकाणी ठेवू नका. मात्र, ते मोकळया जागेत ठेवण्याची काळजी घ्या, जिथे हवा खेळती असेल. हे रोप किचन, कचरा, साबण इ.चे गंध नियंत्रित करते.

घरात जर लॉबी असेल, तर मंद मंद सुगंध देणारे, जीवजंतूंना पळवून लावणारे लव्हेंडरचे रोपही ठेवू शकतात.

ऐरक पामचे रोप ड्रॉइंगरूमची शोभा वाढविण्याबरोबरच बँजिन, कार्बन मोनोऑक्साइड, फॉर्मेल्डहाइड, तसेच लादी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामुग्रीतून निघणारा जाइलिन गंध रोखण्यासाठी ठेवले जाऊ शकते.

स्पायडर प्लांट : याला टोपलीत लटकवून ठेवा आणि घरातील व बाहेरील कचऱ्याची दुर्गंधी दूर करून, एक स्वच्छ वातावरण मिळवून घरात आरामात छान झोप घ्या. ही सर्व एअर प्युरिफायर रोपे घराची शोभा वाढविण्याबरोबरच ताजेतवाने वातावरणही देतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें