नेहमीच रहा प्रफुल्लीत

* रोचिका शर्मा

माया जेव्हा ५ वर्षांनी आपल्या मोठया बहिणीला, सियाला भेटली तेव्हा सिया तिला उदास भासली. तिने विचारलेच, ‘‘ताई, काय झाले, तुझ्या चेहऱ्यावरचे स्मित कुठे हरवले गं, काही प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘प्रॉब्लेम नाही माया बस आता उतरती कळा आहे, सांधे कुरकुरू लागले आहेत आणि त्यात भर म्हणून केस गळणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या. असे म्हण की वय आता आपला प्रभाव दाखवत आहे. चेहरा तर उदास दिसणारच,’’ सिया म्हणाली.

‘‘तू असा का विचार करतेस ताई. वयाने काय फरक पडतो. थोडी नटूनथटून, मजेत रहायला शीक.’’

‘‘कोणासाठी माया. आता या वयात मला कोण पाहणार आहे? मुले तर हॉस्टेलमध्ये आहेत. आणि मी तर एक विधवा आहे. नटूनथटून राहिले तर लोक काय म्हणतील? लोक माझ्याकडे संशयाने पाहू लागतील.’’ सिया म्हणाली.

‘‘अरे यात वाईट काय आहे? लोक का संशय घेतील? कोणी काही म्हणणार नाही आणि विधवा असणे हा काही तुझा दोष तर नाही. आपले आयुष्य आणि शरीर यांच्याप्रति उदासीन राहणे योग्य नाही. जेव्हा मुले त्यांच्या कुटुंबात व्यस्त होतील तेव्हा तुला कोण सांभाळणार. जर आज भावोजी असते तर त्यांनी तुझी काळजी घेतलीच असती. पण आता ते नसताना तुला स्वत:लाच तुझी काळजी घ्यावी लागेल, नाहीतर चाळीशीनंतर वाढत्या वयासोबत शरीराच्या तक्रारी वाढू लागतात.’’

‘‘खरंतर तू बरोबरच बोलत आहेस माया, पण एकटेपणा खायला उठतो. आधी मुलांमध्ये व्यस्त असायची, पण आता संपूर्ण दिवस घरातच एकटी बसून असते. वेळ जाता जात नाही, सिया म्हणाली.’’

चाळिशीनंतर काही कारणांनी एकल राहून जीवनाप्रति उदासीन बनलेली न जाणो अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आसपास असतील.

माझ्या शेजारी राहणारी स्मिता एका फार्मा कंपनीत काम करते. वडिलांच्या अकाली निधनानंतर आपल्या २ लहान बहिणींची जबाबदारी तिच्यावर आली. आई जास्त शिकलेली नव्हती. स्मिताने स्वत: नोकरी करून आपल्या दोन्ही बहिणींना स्वत:च्या पायांवर तर उभे केलेच, पण त्यांच्यासाठी योग्य वर शोधून त्यांची लग्नेही लावून दिली. बहिणींचे संसार तर थाटले, पण ती स्वत:मात्र आयुष्यभरासाठी एकटी राहिली. आधी ती आईसोबत राहत होती, पण २ वर्षांपूर्वी त्यांचेही निधन झाले. स्मिता आता ४५ वर्षांची आहे. नोकरी करतेय. आता तिला एकटेपणा आणि सांध्यांच्या तक्त्रारींनी पछाडले आहे. कालपर्यंत आपल्या कुटुंबाची धुरा समर्थपणे खांद्यावर पेलणारी स्मिता आज चेहरा आणि मनाने पार कोमेजून गेल्यासारखी दिसते आहे.

एक दिवस मी तिला सोसायटीत होणाऱ्या कार्निव्हलची आमंत्रण पत्रिका देत म्हटलं, ‘‘ नक्की ये, खूप मजा येईल.’’

‘‘तुझी मुले आहेत, मी तिथे येऊन काय करू?’’ स्मिता म्हणाली.

‘‘तू ये तर खरं. तुलापण थोडा बदल होईल.’’

माझ्या आग्रहाखातर ती कार्निव्हलला आली. आता ती सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहर्ष सहभागी होऊन महत्त्वाच्या भूमिका निभावतेही.

एकल व्यक्तीलाही आपले जीवन भरभरून जगण्याचा आणि आपल्या आरोग्याला जपण्याचा संपूर्ण हक्क आहे. कारण चाळिशीनंतर सिंगल असो की परिवारातील  प्रत्येकीचा मेनोपॉज येण्याचे वय जवळ आलेले असते. ४० ते ५० वर्षांत स्त्रिया मासिकपाळी संपण्याच्या सीमारेषेवर असतात, ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. काहीवेळा या समस्या फारच कष्टप्रद असतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही बदल घडू लागतात.

आपल्या आहाराकडे लक्ष द्या

आपल्या खाण्यात अशा गोष्टी समाविष्ट करा ज्यात भरपूर पोषक तत्त्वे असतील. कारण, ४० वर्षापर्यंत आपली पचनसंस्था कमजोर होऊ लागते. हेच कारण आहे की मसल मास ४५ टक्के पर्यंत कमी होतो, ज्यामुळे फॅट वाढू लागते.

वाढत्या वयासोबत तुमचा मेटाबॉलिज्म स्लो होऊ लागतो. अशात आपल्याला आधीच्या तुलनेत कमी कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही जे काही खाल ते कॅलरीजची काळजी घेऊनच.

व्यायामाला बनवा आपल्या दिनचर्येचा हिस्सा

व्यायाम केल्याने तुम्ही स्वस्थ आणि तरुण राहाल. यामुळे तुमच्या मांसपेशीना ताकद मिळेल, तुम्हाला चांगली झोप लागेल, शरीराला लवचीकपणा येईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

अनेकदा ४०नंतर सांधे दुखू लागतात. ज्यामुळे जिममध्ये व्यायाम करणे मुश्किल होते. इतकेच नाहीतर पायी चालायलाही त्रास होऊ लागतो. अशात वॉटर एक्सरसाइज लाभदायक ठरते. तुम्ही व्यायाम कोणत्याही स्वरूपात करू शकता, जसे मॉर्निंग वॉक, एरोबिक्स नृत्य, स्विमिंग इ. झुंबा डान्सही एक्सरसाइज म्हणून समूहात करू शकता. यामुळे न केवळ तुम्ही शारीरिकदृष्टया स्वस्थ राहाल तर म्युझिकसोबत आपल्या मैत्रिणींबरोबर नृत्याचा आनंदही घेऊ शकाल.

हार्मोन्समधील बदल

४०नंतर मेनोपॉजचा काळ सुरू होत असल्याने हार्मोन्समध्ये बदल घडू लागतात. ज्यामुळे वजन वाढू लागते. पण हार्मोन्सकडे लक्ष न देता तुम्ही आपल्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित करा ज्यामुळे तुमच्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलांचे तुम्ही संतुलन ठेवू शकाल.

प्रोटीनयुक्त आहार घ्या

वाढत्या वयासोबत नखेही खराब होऊ लागतात आणि त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. यासाठी आपल्या भोजनात प्रोटीन घेतल्याने शरीरासोबतच मांसपेशी, केस, त्वचा आणि कनेक्टीव्ह टिशूज चांगले राहतात. नवीन मांसपेशी तयार होऊ लागतात. तसेच बराचकाळपर्यंत आपल्याला भूकही लागत नाही. काही प्रोटीनयक्त आहार जो तुम्ही तुमच्या भोजनात समाविष्ट करू शकता त्यात मुख्यत्वे आहेत मटण, मासे, चिकन, अंडी, दूध, दही, डाळी, पालक, छोले, राजमा, अंकुरित कडधान्ये, सोयाबीन, शेंगदाणे, अंजीर, बदाम, अक्रोड इ.

थोडया सोशलही रहा

ज्या महिला आपल्या परिवारासोबत राहतात त्यांना कोणत्या न कोणत्या कारणांनी लोकांकडे येण्याजाण्याचे आमंत्रण असतेच, परंतु सिंगल महिलांसाठी ही एक समस्याच आहे की ती बोलणार कोणाशी कारण तिचे विषय इतरांशी मॅच होत नाहीत.

अशात तुम्ही तुमच्या सोसायटीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. ते यशस्वी होण्यासाठी आपले योगदान द्या. जेणेकरून तुमच्या वेळेचा सदुपयोग होईल आणि सोसायटीत तुमची एक स्वत:ची ओळखही निर्माण होईल. तुमचे हे सहकार्य पाहून लोक स्वत:हून तुम्हाला आमंत्रण देऊ लागतील आणि या निमित्ताने तुमच्या लोकांशी भेटीगाठी होऊ लागतील, ज्यामुळे तुमचा एकाकीपणा दूर होऊ लागेल.

अशाप्रकारे तुमचे टॅलेण्टही सर्वांसमोर येईल आणि तुम्ही सर्वांच्या आवडत्या व्हाल.

इथे एक गोष्ट खास आहे की ज्या महिलांना आपला परिवार आहे त्यांची वेळोवेळी आणि गरजेनुसार काळजी घेणारे कोणी ना कोणी असतेच, पण सिंगल असलेल्यांच्या  बाबतीत हे शक्य नसते. अशावेळी आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी आणि शेजाऱ्यांशी केलेली मैत्री अडीअडचणीच्या काळात कामी येते.

स्वत: स्वत:ची पुरेपूर काळजी घ्या. स्वत:ला जज करा की तुम्ही आपल्या आयुष्याप्रति उदासीन तर झाल्या नाहीत ना. आपल्या सोशल सर्कलमध्ये नेहमी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेत रहा की तुम्ही व्यवस्थित दिसत आहात ना. ज्यांच्या हृदयात तुम्हाला स्थान आहे त्यांना नक्कीच असे वाटणार नाही की तुम्ही कोणापेक्षाही दिसण्यात मागे रहावे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें