रहा नेहमीच युवायुवा

* गरिमा पंकज

तुम्ही तुमचे वय वाढणे तर थांबवू शकत नाही, मात्र वाढणाऱ्या वयाच्या प्रभावाला तर जरूर कमी करू शकता. सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सीनियर डायटिशिअन निधी धवन यांच्या मते आपण काय खातो आणि कसे खातो याच्याशी आपले आरोग्य आणि सक्रियता यांचा थेट संबंध असतो.

काय खाल

* अँटीऑक्सिडंट्स पदार्थ जसे सुका मेवा, अख्खे धान्य, चिकन, अंडी, भाज्या आणि फळे खा. अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि वृद्धत्वाची   लक्षणे कमी करतात. हे इम्यून सिस्टीम मजबूत करून इन्फेक्शन पासूनही   वाचवतात.

* दिवसातून कमीतकमी एक कप ग्रीन टी प्यायल्याने वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती चांगली राहते.

* ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट्सयक्त भरपूर पदार्थ जसे मासे, सुके मेवे, ऑलिव्ह ऑइल वापरा. ओमेगा ३ तुम्हाला तरुण आणि सुंदर    राखते.

* व्हिटॅमिन सी शरीरासाठी नॅचरल बोटॉक्स समान काम करते. यामुळे स्किन टिशूज हेल्दी राहतात आणि त्यावर सुरकुत्या पडत नाहीत. यासाठी संत्री, मोसंबी, पानकोबी इ. खा.

* जर काही गोड खावेसे वाटले तर डार्क चॉकलेट खा. यात भरपूर फ्लॅवेनॉल असते. ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

* दुपारच्या जेवणासोबत एक वाटी दही जरूर घ्या. यात कॅल्शियम असते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराचा प्रतिबंध करता येतो.

* तरुण आणि सक्रिय दिसू इच्छिता तर ओव्हर इटिंग टाळा. तुम्हाला जितकी भूक आहे त्याच्या ८० टक्केच खा.

काय खाऊ नका

* असे पदार्थ ज्यांच्यामुळे रक्तातील साखर वाढते जसे गोड फळे, ज्यूस, साखर कमी खा.

* सोयाबीन, कॉर्न, कॅनोला ऑइल टाळा, कारण यांत पॉलीसॅच्युरेटेड मेद जास्त प्रमाणात असते. ऑलिव्ह ऑइल वापरा.

* रेड मीट, पनीर, फुल फॅट दूध, आणि क्रीम यांत अत्यधिक मात्रेत सॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होऊ शकतात.

* सफेद ब्रेड, पास्ता, पिझ्झा इ. कमी खावे.

डॉ. निधी म्हणतात, ‘‘लठ्ठपणा आणि कॅलरी इनटेक यांच्यात थेट संबंध आहे. लठ्ठपणा वाढल्याने न केवळ आरोग्य बिघडते तर शारीरिक सक्रियतासुद्धा कमी होते.’’

जीवनशैलीतील बदल

जेपी हॉस्पिटल, नोएडा येथील डॉ. करुणा चतुर्वेदी यांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींमध्ये छोटे छोटे बदल केल्यास आपण दीर्घ काळापर्यंत तरुण आणि सक्रिय राहू शकतो :

* आपले मन नेहमी व्यस्त ठेवा. काहीतरी नवीन शिकत रहा म्हणजे आपला मेंदू सक्रिय राहील.

* आपल्या हार्मोन्सच्या स्तरावर नियंत्रण ठेवा जेणेकरून तुम्ही एजिंगच्या लक्षणांपासून दूर रहाल.

* कमीतकमी ६-७ तास जरूर झोपा. जेव्हा तुम्ही झोप घेत असता तेव्हा त्वचेच्या कोशिका आपली झिज भरून काढत असतात. यामुळे त्वचेच्या सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दूर होतात.

* तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता हेही महत्त्वाचे असते. प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पहा. स्वत:ला खुश आणि मोटिव्हेटेड ठेवा.

त्वचेला तरुण आणि सुरक्षित ठेवा

* उन्हात गेल्याने त्वचा काळवंडते आणि काळया झालेल्या भागावर सुरकुत्या लवकर पडतात. म्हणून बाहेर जाण्याआधी सनस्क्रीन अवश्य लावा.

* त्वचेला स्वस्थ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार नॉन टॉक्सिक मॉइश्चरायझर निवडा. झोपण्याआधी तो जरूर लावा.

फेशिअल एक्सरसाइ

चेहऱ्याच्या पेशींना दिलेल्या मसाजमुळे चेहऱ्याचे सुरकुत्यांपासून रक्षण होते. आपल्या कपाळावरील सुरकुत्या रोखण्यासाठी आपले दोन्ही हात कपाळावर ठेवा आणि बोटांना हेअरलाइन आणि भुवयांच्यामध्ये पसरवून हळूहळू हलकासा दाब देत बोटे बाहेरच्या दिशेने सरकवा.

काही फेशिअल एक्सरसाइ

चीकू लिफ्ट : आपले ओठ हलकेसे बंद करा आणि गालांना डोळयांनी बंद करा आणि गालांना डोळयांच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. रुंद अशा स्मितासह आपल्या ओठांचे बाहेरील कोन उचला. काही वेळ याच मुद्रेत रहा. स्मित करणे हा गालांसाठी चांगला व्यायाम आहे.

फिश फेस : हा गालांसाठी आणि जबडयासाठी उत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमचे ओठ योग्य शेपमध्ये येतात. हलकेसे ओठ बंद करा. गाल जितके शक्य होतील तितके आत खेचण्याचा प्रयत्न करा. याच मुद्रेत हसण्याचा प्रयत्न करा आणि १५ सेकंद याच अवस्थेत रहा. असे ५ वेळा करा.

पपेट फेस : हा व्यायाम पूर्ण चेहऱ्यासाठी आहे. यामुळे गालांच्या पेशी मजबूत होऊन त्या सैल पडत नाहीत. आपल्या बोटांची पेरे गालांवर ठेवा आणि स्मित करा. गाल वरच्या दिशेने खेचा आणि स्मित मुद्रेत काही वेळ रहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें