* नम्रता विजय पवार
- आमरस
साहित्य
- 3 हापूस वा रायवळ आंबे
- अर्धा कप घट्ट साईचं दूध
- वेलची पावडर.
कृती
3 हापूस आंब्यांचा रस काढून घ्यावा. रस मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप घट्ट साईचं दूध आणि वेलची पावडर एकत्रित करून घ्यावं. शक्यतो साखर वापरू नये. आवडतं असल्यास साखर आणि थोडंसं तूप घ्यावं. गरमागरम पुरीसोबत वा पुरणपोळी सोबत आस्वाद घ्यावा.