आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या २० सवयी

* गरिमा पंकज

आपल्या जीवनशैलीचा आणि सवयींचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. चला, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निधी धवनकडून अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊया, ज्यातील काही अवलंबून आणि काही सोडून तुम्ही तंदुरुस्तही व्हाल आणि आनंदीदेखील रहाल :

जॉगिंग आणि व्यायाम

दररोज व्यायामाने आणि धावण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर पडतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. व्यायाम करणे आणि धावण्याने शरीराचे स्नायू भरीव आणि मजबूत बनतात. यामुळे त्वचेत घट्टपणा येतो, ज्यामुळे सुरकुत्यांची समस्या उद्भवत नाही.

कोमट पाण्याचा एक पेला

शरीरात ऊर्जा पातळी राखण्यासाठी दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा. हे पिण्याने शरीराचा चयापचय दर वाढतो आणि शरीरात संपूर्ण दिवस ताजेपणा कायम राहतो. अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्याने अन्न सहज पचते.

ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी

ग्रीन टीमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थांचे उत्सर्जन करतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबीदेखील कमी करतात. त्याचप्रमाणे, नॉन-शुगर ब्लॅक कॉफीमध्ये नगण्य कॅलरी असतात, तर कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात.

फिरणे

हे आवश्यक नाही की आपण सकाळी चालाल तरच आपल्याला फायदे मिळतील. चालणे हा एक असा व्यायाम आहे, जो दिवसा कोणत्याही वेळी केला जाऊ शकतो. दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास चालण्याने अन्न सहज पचते.

खाण्याची एक वेळ

खाण्यासाठी एक वेळ ठरवा आणि त्यानंतर त्याचे अनुसरण करा. सकाळी ८-९ च्या दरम्यान नाश्ता करा, दुपारी १-२ च्या दरम्यान लंच आणि सायंकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान डिनर. मधल्या लांब गॅपमुळे तुम्हाला स्वत:ला भूक जाणवेल. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्यात अंतर जास्त असल्यामुळे आपण संध्याकाळी  ४-५ दरम्यान थोडा हलका नाश्ता घेऊ शकता.

७-८ तास झो

आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप खूप महत्वाची आहे. जे लोक रात्री १० वाजता झोपतात आणि ६ वाजता उठतात त्यांना दिवसभर ताजेपणा जाणवतो, तसेच तणाव आणि चिंतेच्या समस्यादेखील अशा लोकांमध्ये कमी पाहायला मिळतात.

मैदानी खेळांना महत्त्व द्या

आजच्या काळात, लोक मॉलमध्ये उपलब्ध असलेल्या गेमिंग क्षेत्रात मुलांना घेऊन जातात, जेथे त्यांचे मनोरंजन तर केले जाते, परंतु त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही. पूर्वीच्या मुलांना घरात खेळण्याशिवाय बाहेर खेळणेही जास्त आवडायचे ज्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होत असे.

कुटुंबासमवेत वेळ घालवा

दिवसाला १ तास कुटुंबाला द्या. जेव्हा आपण कुटुंबातील सदस्यांसह वेळ घालवाल, तेव्हा आपण त्यांच्याशी मनातील गोष्टी बोलू शकता आणि त्यांच्याही बाबी समजून घेता.

३ लिटर पाण्याचे सेवन

पाणी केवळ आपली तहानच भागवते असे नाही, तर बऱ्याच आजारांवरील उपचारदेखील आहे. जे लोक दररोज किमान ३ लिटर पाण्याचे सेवन करतात, ते कमी आजारी पडतात, अशा लोकांना पोटाच्या समस्येवरुन कधीच त्रास होत नाही, त्यांची त्वचादेखील चमकत असते आणि त्यांना मुरुमांचा त्रासही होत नाही.

हसणे-हसवणे

हसणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. हसण्याने एखाद्याचा ताण तर कमी होतोच, शिवाय बरेच आजारही त्याने बरे होतात. स्वत: तर हसाच तसेच इतरांनाही हसवा. मनमोकळे हसण्याने रक्त परिसंचरण योग्य राहते. हसण्यादरम्यान ऑक्सिजनदेखील मोठया प्रमाणात शरीरात पोहोचतो.

भाज्या आणि फळांचे सेवन

फळे आणि भाज्या खाल्ल्याने कर्करोगाचा प्रतिबंध होतो, तर दुसरीकडे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही कमी होतो. यांमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन ए, सी, अँटिऑक्सिडेंट्स आणि खनिजे असतात, ज्यामुळे आपल्याला फिट आणि सक्रिय असल्याचे जाणवते.

धूम्रपान करू नका

सिगरेटमध्ये असलेल्या विषारी घटकांमुळे त्वचेला सुरकुती येऊ लागतात आणि ती व्यक्ती वयापूर्वीच म्हातारी दिसू लागते. धूम्रपान केल्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होऊ लागते, ज्यामुळे त्वचा निर्जीव होते. इतकेच नाही तर धूम्रपानाने जननक्षमतेवरदेखील परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर आजपासून धूम्रपान सोडा.

थोडा वेळ एकांतात घालवा

दररोज अर्धा तास एकांतात घालवल्याने व्यक्तीला स्वत:ला समजून घेण्याची संधी मिळते. इतकेच नाही तर लोक खासगी गोष्टींवर विचार करू शकतात, ज्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्यात मदत होईल. जे एकांतात वेळ घालवत नाहीत त्यांच्या तुलनेत जे एकांतात वेळ घालवतात ते अधिक शांत आणि आनंदी असतात.

आपली मुद्र्रा सरळ ठेवा

ऑफिसचे काम असो वा घरचे, आपल्या शरीराची मुद्र्रा योग्य ठेवण्यासाठी सरळ उठावे-बसावे. शरीराची मुद्र्रा सरळ न ठेवल्यामुळे अनेकदा पाठीचा त्रास, खांदा दुखणे, मान दुखणे, कंबर दुखणे इत्यादी समस्या होतात.

सोडयाचे सेवन थांबवा

सोडयामुळे केवळ दातच किडत नाहीत तर त्यात अत्याधिक प्रमाणात असलेली रिफाईंड साखर, कॅलरीचे प्रमाण वाढवून लठ्ठपणा वाढविण्याचे कार्य करते. जर आपल्याला कॅलरी कमी करण्याच्या मोहात डाएट सोडा घेणे आवडत असेल तर आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की यामुळे आपल्या मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते.

निरोगी आहार

जर आपण आपले वजन कमी करण्याची योजना बनवित असाल तर उपाशी पोटी राहण्याची चूक करू नका. आपल्या आहारात प्रॉपर प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे समाविष्ट करा.

शरीर आणि घराची साफसफाई

आपले आरोग्य आपल्या शरीराच्या स्वच्छतेबरोबरच घर आणि आजूबाजूच्या स्वच्छतेवरदेखील अवलंबून असते. उन्हाळा असो वा हिवाळा, दररोज आंघोळ केली पाहिजे आणि आंघोळ केल्यावर उन्हात बसून कोमट तेलाने शरीराची मालिश केली पाहिजे.

आठवडयातून एक दिवस उपवास करा

उपवासादरम्यान चरबी वेगाने विरघळने सुरू होते. चरबीयक्त पेशी लॅप्टीन नावाचा हार्मोन सोडतात. यादरम्यान, कमी कॅलरी मिळण्याने लॅप्टिनच्या सक्रियतेवर परिणाम होतो आणि वजन कमी होते. शरीरात पोषण टिकवून ठेवण्यासाठी उपवासादरम्यान ताजी फळे आणि उकडलेल्या हिरव्या भाज्यांचे सेवन केले जाऊ शकते.

खाण्यापूर्वी हात धुवा

दिवसभर माहित नाही आपण किती गोष्टींना स्पर्श करतो, ज्यामुळे असंख्य जिवाणू आपल्या हाताला चिपकतात. जर आपण हात न धुता अन्न खाल्ले तर जीवाणू आपल्या शरीरात अन्नासह प्रवेश करतात जे आपल्याला आजारी करतात.

झोपायच्या आधी दात स्वच्छ करणे

दात निरोगी राखण्यासाठी रात्री ब्रश करायला विसरू नका. यामुळे पट्टिका काढून टाकण्यासदेखील मदद होते, ज्यामुळे दातांत विषाणू तयार होतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें