* पारुल भटनागर

केस सुंदर असल्यास चेहऱ्याचा रंग बदलतो. आजचे युग स्टाईलचे आहे आणि याच स्टाईलच्या मोहात महिला कधी केस रंगवतात, कधी हायलाइट करतात, कधी रिबॉन्डिंग करतात तर कधी हेअरस्टायलिंग उत्पादनांचा वापर करतात. काळासोबत ताळमेळ राखणे ही चांगली गोष्ट आहे, पण कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करून स्वत:चे नुकसान करून घेणे शहाणपणाचे नाही.

काहीवेळा सर्वकाही ठीक असते, परंतु जेव्हा तुम्ही स्टाईलच्या नावाखाली केसांवर जास्त प्रमाणात रसायने आणि उष्ण उत्पादने वापरण्यास सुरुवात करता किंवा केसांची काळजी घेत नाही तेव्हा केस खराब होतात. ही उत्पादने केसांतील नैसर्गिक ओलावा चोरून केस निर्जीव बनवतात.

इतकेच नाही तर केस गळती सुरू होते, केसांच्या दुभंगलेल्या टोकांची समस्या सुरू होते आणि केस रुक्ष होतात, जे तुमचे सौंदर्य कमी करण्याचे काम करतात.

अशा परिस्थितीत, खराब केसांवर विशेष उपचार करणे आवश्यक असते, जेणेकरून तुमच्या निर्जीव केसांना पुन्हा चमक मिळेल. याबद्दल जाणून घेऊया कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव यांच्याकडून :

सीरमने केस मॉइश्चराय करा

केसांतील आर्द्रता निघून गेल्यानंतरच केस खराब, निस्तेज होऊ लागतात.

परंतु जर खराब झालेले केस सीरमने हायड्रेटेड ठेवले तर हळूहळू ते पूर्ववत होऊ लागतात, कारण सीरम हे प्रदूषण आणि सूर्यप्रकाश यांच्यातील संरक्षणात्मक थर म्हणून काम करते. मात्र त्यासाठी तुमचे हेअर सीरम केसांच्या प्रकारानुसार असणे आवश्यक असते आणि ते लावण्याची पद्धत योग्य असावी लागते, तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही ते केसांना लावाल तेव्हा तुमचे केस थोडेसे ओलसर असायला हवेत. तुम्ही तुमच्या हातांवर सीरमचे काही थेंब घ्या, त्यांना दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून केसांना लावा आणि तसेच राहू द्या. यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या केसांवर चमक राहून ते मुलायम होतील. जेव्हा कधी तुम्हाला कोरडेपणा, रुक्षपणामुळे केस निर्जीव वाटतील त्यावेळी सीरम नक्की लावा. याला स्मूदनिंग ट्रीटमेंट असेही म्हणतात.

सीरममधील सामग्री

बाजारात तुम्हाला शेकडो सीरम मिळतील, पण तुम्ही तेच सीरम निवडा जे तुमच्या केसांना जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल. त्यासाठी सीरममध्ये कोणती सामग्री किंवा घटक वापरले आहेत, याची माहिती तुम्हाला असायला हवी.

* हलक्या वजनाचे सीरम सर्वोत्तम ठरते. यात ऑर्गन ऑईल, जोजोबा ऑइल आणि सनफ्लॉवर ऑईलचे गुणधर्म असतात. हे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करून केसांना निरोगी, मुलायम आणि चमकदार बनवते.

* कोकोनट मिल्क अँटीब्रेकेज सीरम हे कमी वेळेत केसांना चमकदार आणि निरोगी बनवते.

* सीरममधील ह्यालुरोनिक अॅसिड केसांना ओलावा मिळवून देते. केस घनदाट होण्यास मदत करते.

* यातील पॉलिफिनोल्स केसांना अँटीऑक्सिडंट्सचे संरक्षणात्मक कवच मिळवून देते.

* व्हिटॅमिन बी-१२ केसांना अतिशय मुलायम बनवते.

या सामग्रीपासून दूर राहा

* पीइजी, पॉलिक्वार्टेनियम, कृत्रिम रंग, डीसोडियम इडीटीए, सुगंध यासारख्या नुकसानदायी रसायनांपासून दूर राहा. सीरममध्ये सिंथेटिक सिलिकॉनचाही वापर केला जातो. तो केसांवर एक संरक्षणात्मक थर तयार करण्यासोबतच केसांमधील ओलावा पुरेशा प्रमाणात टिकवून ठेवण्याचे काम करतो. केसांचे नुकसान करणाऱ्या घटकांना केसांपर्यंत पोहोचू न देण्यासाठीही तो उपयोगी ठरतो.

हेअर कंडिशनर

कंडिशनर केसांना आवश्यक पोषक द्रव्ये देऊन त्यांना निरोगी, मुलायम बनवते. बहुतांश महिला असा विचार करतात की, केसांना रुक्ष होण्यापासून वाचवून मुलायम बनवण्यासाठी आम्ही कंडिशनरचा वापर केला होता, मात्र कंडिशनरचा वापर करून १ दिवस उलटताच केस जैसे थे होतात. कंडिशनरचा मात्र असा दावा असतो की, याच्या वापरामुळे केस अनेक दिवसांपर्यंत मुलायम राहतील.

असे होते कारण तुमच्या कंडिशनरमध्ये गरजेपेक्षा जास्त रसायनांचा वापर केलेला असतो ज्यामुळे केस कोरडे होतात.

त्यामुळेच जर तुमचे केस खराब झाले असतील तर कंडिशनर खरेदी करताना त्यात कोणती सामग्री वापरली आहे, हे माहीत करून घ्या तरच तुम्हाला कंडिशनरचा फायदा होईल.

कंडिशनरमधील सामग्री

* अवाकाडो ऑइलमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऑइल केसांना मजबूत बनवून अतिनील सूर्यकिरणांपासून त्यांचे रक्षण करते.

* वीट प्रोटीन तुमच्या केसांना मजबूत बनवून त्यांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्याचे काम करते.

* कंडिशनरमधील केराटिनचा वापर केसांसाठी उपयोगी ठरतो. यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते. ते केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देते.

* ऑर्गन ऑइलमध्ये ओलिक आणि लिनोलेइक नावाचे फॅटी अॅसिड असते, जे तुमचे केस आणि केसांवरील त्वचेला फॅटी लेअर मिळवून देऊन केसांमधील कोरडेपणा दूर करते. केसांना नरम, मुलायम बनवते.

* पँथेनॉल म्हणजे व्हिटॅमिन बी ५ खूपच परिणामकारक असते जे केसांमधील मॉइश्चर वाढवण्याचे काम करते.

* शिया बटरमध्ये व्हिटॅमिन ए, इ आणि इसेन्शिअल फॅटी अॅसिड असते जे उष्ण उत्पादनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांना वाचवते. केसांमधील कोरडेपणा दूर करून त्यांची चमक वाढवण्यासाठी मदत करते.

या सामग्रीपासून दूर राहा

* पेरबेन्स, सल्फेट्स, ट्रिक्लोसन, सिंथेटिकचे रंग, सुगंध, रॅटीनील पल्मीटेड हे हळूहळू केसांमधील मॉइश्चर संपवण्यासह त्वचेच्या अॅलर्जीसही कारणीभूत ठरतात. म्हणूनच यांचा वापर करून बनवण्यात आलेल्या कंडिशनरचा वापर करू नका, अन्यथा खराब झालेले केस आणखी खराब होतील.

शाम्पू

धूळमाती आणि प्रदूषणामुळे केस खराब, रुक्ष होतात. यावर उपाय म्हणून आपण सतत शाम्पू करतो, पण कुठलीही माहिती न घेता ज्या शाम्पूचा वापर तुम्ही केसांना पोषण मिळवून देण्यासाठी करता त्याच शाम्पूमुळे तुमचे केस अधिक खराब होतात, याची तुम्हाला कल्पना आहे का? त्यामुळे आठवडयातून किती दिवस शाम्पू करावा आणि कोणता शाम्पू वापरावा ज्यामुळे केसांना पोषण मिळून ते निरोगी राहतील, हे माहिती करून घेणे गरजेचे असते.

शाम्पूमधील घटक

* केसांच्या मुळापर्यंत जाऊन स्वच्छता करणारा शाम्पू सर्वोत्तम असतो. यात वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे केसांना पोषण मिळते. केसांमधील कोरडेपणा दूर होऊन केस मऊ, चमकदार दिसू लागतात.

* शाम्पूमध्ये फर्नेटेड राईस वॉटर, प्रो व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसिडसारखे घटक असतात जे काही दिवसांमध्येच निर्जीव झालेल्या केसांना दुरुस्त करण्याचे काम करतात.

* शाम्पूमधील सोया प्रोटीन केसांना पोषण देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेते, कारण यामुळे केसांची मुळे मजबूत होऊन केस चमकदार होतात.

* हनी मॉइश्चर शाम्पू कोरडया आणि खराब झालेल्या केसांना हायड्रेट करून त्यांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्याचे काम करतो. केसांची मुळे मजबूत करून केस गळती रोखण्यास मदत करतो.

या सामग्रीपासून दूर राहा

शाम्पूमध्ये सोडियम लॉरेयल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट असते. ते केसांना कोरडे बनवते. यामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.

* पेराबेन्स आणि ऐथिल पेराबेन्स हे केसांच्या उत्पादनांचा टिकाऊपणा वाढवतात, मात्र ते महिलांमधील हार्मोन्सला प्रभावित करून कर्करोग होण्याचा धोका वाढवतात.

* शाम्पूला घट्ट बनवण्यासाठी सोडियम क्लोराईडचा वापर केला जातो, मात्र यामुळे केसांची त्वचा कोरडी होणे, जळजळ, केस गळतीची समस्या निर्माण होते.

* यात वापरण्यात आलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांची त्वचा खराब होते. अस्थमा, कर्करोगासारखे घातक आजार होऊ शकतात.

* शाम्पूमधील सेलिनियम सल्फाईड कर्करोगाचे कारण बनू शकते.

* शाम्पूमध्ये वापरले जाणारे रंग रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याचे काम करतात.

द्य रॅटिनील पल्मिटेटमुळे त्वचा पिवळसर पडते. लाल चट्टे, जळजळ अशा समस्या निर्माण होतात.

हेअर मास्क

हेअर मास्कमुळे केसांना पोषण मिळते, कारण यात केसांना मॉइश्चर मिळवून देणारी तत्त्वे असतात. हे कंडिशनरच्या तुलनेत केसांना खूप जास्त पोषण मिळवून देते, पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा हेअर मास्क नैसर्गिक गोष्टींनी बनवलेले असते.

येथे आम्ही तुम्हाला काही अशा हेअर मास्कची माहिती देणार आहोत जे खराब झालेल्या केसांना पोषण मिळवून देण्यासोबतच केस मूलायम बनवण्याचेही काम करतात.

* केराटिन आणि ऑर्गन ऑइल हेअर मास्क केस गळती रोखून केसांना हायड्रेट, मॉइश्चर मिळवून देते. केसांना दुरुस्त करण्याचे काम करते. केराटिन हे आपल्या केसांमध्ये असलेले नैसर्गिक प्रोटीन असते, पण प्रदूषण, धूळमाती आणि उन्हामुळे ते केसांमधून गायब होते. ते पुन्हा केसांमध्ये परत येण्यासाठी कृत्रिम केराटिन उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळे केस पुन्हा मुलायम होतात, तर ऑर्गन ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन ई केसांना मुलायम आणि सिल्की बनवण्याचे काम करते. विशेष म्हणजे हे सर्व प्रकारच्या केसांसाठी परिणामकारक असते. मार्केटमध्ये २०० मिलिलीटर हेअर मास्कची किंमत  सुमारे ५०० रुपये असते.

* रेड ओनियन ब्लॅक सीड ऑइलपासून बनवलेला हेअर मास्क केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देते. हे पातळ, कमकुवत आणि केस गळतीची समस्या दूर करते. यात पेराबिन, सल्फेट, सिलिकॉस आणि कोणतेही रंग नसतात. याचा अर्थ हे पूर्णपणे नैसर्गिक असते. यात व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंन्ट्स असल्यामुळे ते केसांची पीएच पातळी नियंत्रित ठेवते, तर ब्लॅक सीड ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंन्ट्स आणि नॅरिशमेंट प्रॉपर्टीज असल्यामुळे ते फ्री रेडिकल्समुळे केसांच्या होणाऱ्या नुकसनापासून केसांचे रक्षण करून त्यांना सुदृढ बनवते.

* कोलेजन हेअर मास्क ब्लॅक सीड ऑइल आणि शिया बटरने बनवलेला असतो. यात रुक्ष, खराब झालेले केस पूर्ववत करण्याची क्षमता असते, कारण यात व्हिटॅमिन्स आणि आवश्यक फॅटी अॅसिड असल्यामुळे ते उष्णता आणि रसायनांमुळे केसांच्या होणाऱ्या नुकसनापासून केसांचे रक्षण करते. त्याच्या १०० ग्रॅम पाकिटाची किंमत सुमारे २५० रुपये असते.

* राईस वॉटर हेअर मास्क यासाठी खास आहे कारण यात उपलब्ध असलेले इनोसिटोल हे तत्त्व खराब झालेल्या केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केसांना दुरुस्त करते. हे सल्फेट, सिलिकॉन आणि पेराबिन फ्री प्रोडक्ट आहे. याच्या २०० मिलिलीटर पाकिटाची किंमत सुमारे ५३० रुपये आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...