* पारूल भटनागर
ऋतुजाचा देहबांधा अगदी परफेक्ट होता, परंतु त्वचा तितकी चार्मिग नव्हती. ती विचार करायची की बाजारात येणारं प्रत्येक महागडं उत्पादन मी आपल्या त्वचेसाठी वापरते, तरीसुद्धा माझी त्वचा तरूण व चमकदार का बरं दिसत नाही. मग याविषयी तिने आपल्या मैत्रिणींशी शिखाशी संवाद साधला, तेव्हा तिने सांगितले की आपण आपल्या त्वचेचं सौंदर्य केवळ महागड्या क्रिम्सच्या वापराशी जोडून बघतो, याउलट त्वचेचं सौंदर्य हे दररोज योग्य देखभाल केल्याने उजळतं.
जर तुम्हीही आपली त्वचा सुंदर बनवू पाहत असाल तर या टीप्सचा जरूर अवंलब करा.
स्किन टाइप व क्लिंजिंग
जाहिराती पाहून उत्पादनं खरेदी करण्याचं वेड महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं, याउलट ती खरेदी करण्यापूर्वी आपण आपली स्किन टाइप लक्षात घ्यायला हवा, कारण स्किन टाइप जाणून न घेता उत्पादनाचा वापर केल्यास योग्य परिणाम साधता येणार नाही. त्यामुळे स्किन टाइप जाणून घेणं जरूरी आहे.
जर तुमची त्वचा रफ असेल तर याचा अर्थ तुमची त्वचा कोरडी आहे आणि अशा त्वचेवर सुगंधित क्लिंजरचा चुकूनही वापर करू नये. सॉफ्ट क्लिंजरचाच वापर करावा. तेलकट त्वचेमध्ये मोठ्या रोमछिद्रांसह त्वचेवर तेलकटपणाही दिसून येतो. यामुळे ऑइलफ्री फेसवॉशचा वापर करा.
संवदेनशील त्वचेची समस्या ही असते की काहीही ट्राय केल्यास जळजळ व लालसरपणा त्वचेवर दिसू लागतो. यासाठी माइल्ड क्लिंजर वापरावे व त्वचा टॉवेलने घासू नये. नाहीतर त्वचा लाल होऊ शकते. नॉर्मल स्किन क्लीअर असते, ज्यावर साधारणपणे प्रत्येक प्रकारचं ब्रँडेड उत्पादन ट्राय करता येतं. म्हणजे क्लिंजिंगच्या वापराने घाम, तेलकटपणा व मलीनताही दूर करता येते.
टोनिंग
कधीकधी क्लिजिंगनंतरही त्वचेमध्ये थोडाफार मळ राहून जातो, जो टोनरच्या मदतीने स्वच्छ करता येतो. यासाठी कापूस टोनरमध्ये बुडवून चेहऱ्यावर लावावा. हा एस्क्ट्रा क्लिंजिंग इफेक्ट तुमच्या त्वचेमध्ये मॉइश्चर कायम राखण्याचं काम करतो. म्हणून क्लिंजिंगनंतर टोनिंग करायला विसरू नका.
एक्सफॉलिएशनद्वारे मृत पेशी काढा
दररोज लाखो स्किन सेल्स बनतात, पण कधीकधी हे सेल्स त्वचेच्या थरावर बनतात, जे हटवण्याची गरज भासते. एक्सफॉलिएट प्रक्रियेने मृत त्वचा पेशी काढता येतात. यामुळे अॅक्ने, ब्लॅकहेड्सच्या समस्येपासूनही सुटका होते. उत्तम परिणामांसाठी ही प्रक्रिया टोनिंगनंतर आणि मॉइश्चरायझिंगपूर्वी केली पाहिजे.
पौष्टिक भोजन व पुरेशी झोप
तुम्ही आपल्या डाएटमध्ये फळं, डाळी व भाज्या अधिकाधिक समावेशित करा. चिकन, अंडी, मासे वगैरेंचंही सेवन करा. पूर्ण झोप घेऊन रूक्ष त्वचा, काळी वर्तुळंसारख्या समस्यांपासून दूर राहा. अशाप्रकारे दररोज आपल्या त्वचेची देखभाल केल्यास आपले सौंदर्य अधिक खुलून दिसेल.
मॉइश्चरायझिंग
प्रत्येक त्वचेला सुदृढ राखण्यासाठी आर्द्रतेची गरज असते. बदलत्या मोसमासह त्वचेची गरजही बदलत राहते. अशावेळी त्वचेला प्रत्येक मोसमात वेगवेगळ्या प्रकारच्या मॉइश्चराझारने मॉइश्चराइज करण्याची गरज असते, कारण रूक्ष त्वचेमुळे खाजेची समस्या निर्माण होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही केवळ ऑइल फ्री मॉइश्चरायझरच वापरा. यामुळे रोमछिद्र ब्लॉक न झाल्याने अॅक्ने वगैरेची समस्याही निर्माण होणार नाही.
सनस्क्रिनपासून अतिरिक्त देखभाल
सुर्याची अल्ट्राव्हॉयलेट किरणं आपल्या त्वचेला डॅमेज करू लागतात. अशावेळी सनस्क्रिनपासून त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी २५-३० एसपीएफचे सनस्क्रिन वापरावे. असा विचार करू नये की हे केवळ उन्हाळ्याच्या दिवसातच वापरले पाहिजे, याउलट हे थंडीच्या मोसमातही वापरावे कारण त्वचेची देखभाल प्रत्येक मोसमात जरूरी आहे.
पायांची काळजी
जर तुमच्या पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील किंवा नखं स्वच्छ नसतील तर कितीही सुंदर फुटवेअर असो, तुमच्यावर ते शोभून दिसणार नाहीत. महिन्यातून कमीत कमी २ वेळा मॅनीक्योर व पॅडिक्योर जरूर करावे.
याव्यतिरिक्त जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिंबाने पायाचे पंजे व नखं स्वच्छ करावी आणि रात्री झोपण्यापूर्वी फिट केअर क्रिमचा वापर जरूर करावा.