रितु वर्मा

आज भूमीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि तिने पती कार्तिकच्या आग्रहाखातीर प्रथमच बिअरचा स्वाद घेतला. आता कधीकधी कार्तिकला सोबत देण्यासाठी ती ही सेवन करते आणि एक दिवस जेव्हा कार्तिक कुठेतरी घराबाहेर पडला, त्यावेळी भूमीने आपल्या मैत्रिणींसह पार्टी केली, परंतु त्यानंतर भूमी स्वत:ला रोखू शकली नाही आणि येत्या दिवसांत अशा मद्यपान पार्ट्या तिच्याकडे आयोजित होऊ लागल्या. भूमी आणि कार्तिक आपल्या या छंदाला उच्चवर्गीय समाजात उठण्या-बसण्यासाठी एक अत्यावश्यक भाग मानतात. ही वेगळी बाब आहे की, अत्यंत अल्कोहोल घेतल्यामुळे लहान वयातच कार्तिक उच्च रक्तदाबाचा बळी ठरला आहे, तर भूमीच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे आणि ती आई होऊ शकत नाही आहे.

आज राजेश खन्नाजी मोठया अस्वस्थतेने शतपावली करत होते, त्यांची मुलगी तन्वी अद्याप घरी परतली नव्हती. दाराची बेल वाजली आणि दारूच्या नशेत डोलणारी तन्वी दारात उभी होती, राजेशजींची तर भीतीने गाळण उडाली, त्यांना कळत नव्हते की त्यांच्या संगोपनात काय चूक झाली. दुसऱ्याच दिवशी जेव्हा तन्वीचे कोर्ट मार्शल झाले तेव्हा तन्वी तिच्या वडिलांना म्हणाली, ‘‘पापा, हे सर्व ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये चालते आणि तसे रोशन बंधूही तर मद्यपान करतातच ना.’’

राजेशजी रागाने म्हणाले, ‘‘जर त्याने विहिरीत उडी मारली तर तूही उडी घेशील; जर मुलांची बरोबरी करायचीच असेल तर मुली, चांगल्या सवयींची कर.’’

आजच्या धावपळीच्या जीवनात, सर्व लोक अत्यंत ताण-तणावाखाली आहेत, परंतु जेथे पूर्वी पुरुषच ताणतणावाशी लढण्यासाठी मद्यपान करत असत, तेथे आता स्त्रियादेखील पुरुषांसमवेत या मोर्चावर खंबीरपणे उभ्या आहेत. असं का न व्हावं शेवटी हे एकविसावे शतक आहे. महिला आणि पुरुष प्रत्येक कामात समान भागीदार आहेत. जेव्हापासून बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कॉलसेन्टरचा पूर भारतात आला आहे तेव्हापासून अल्कोहोल आणि सिगारेटच्या सेवनामध्येही आश्चर्यकारक वाढ झाली आहे. येथील कामकाजाचा कालावधी, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि कधीच न संपणाऱ्या कामांमुळे इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव व्याप्त असतो. त्याचे निवारण ते प्रामुख्याने अल्कोहोलच्या सेवनाने करतात.

विभक्त कुटुंबात वाढते व्यसन

पूर्वीच्या आयुष्यात तणाव नव्हता असे नाही, परंतु पूर्वी आम्ही कुटुंबियांसमवेत संध्याकाळी बसून आपले सुख-दु:ख सामायिक करायचो. मात्र आता विभक्त कुटुंबांच्या प्रथेमुळे ही भूमिका अल्कोहोलने घेतली आहे.

अखिल आणि प्रज्ञा मुंबईत राहतात. त्यांच्या घरात ना पैशांची कमतरता आहे आणि ना आधुनिक संस्कारांची. ते दोघेही आपल्या मुलीसमोर बसतात आणि मुलगी कायरावर काय परिणाम होईल याचा विचार न करता ते स्वत: मद्यपान करतात. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याच्या बाटलीत दारू बाळगल्यामुळे कायराला एक दिवस शाळेतून निलंबित करण्यात आले. त्यांना स्वत:ला समजत नव्हते की आपल्या मुलीला काय समजवावे. सध्या दोघेही मुलीच्या सामोरे जाणे टाळत आहेत आणि एकमेकांना दोष देत आहेत.

टपट युग

आजकालचा काळ हा झटपट मिळविण्याचा आहे. सर्व काही हवे आहे परंतु फार लवकर आणि कठोर परिश्रम न करता. जर तणाव असेल तर त्याशी लढण्यासाठी सर्वात सोपा पर्याय वाटतो तो म्हणजे मद्यपान करणे. याचे दोन फायदे आहेत: पहिला आपण थोडया काळासाठी का होईना तणावमुक्त रहाल आणि दुसरा म्हणजे आपल्याला मॉडर्नदेखील म्हटले जाईल.

त्याचवेळी जेव्हा घरातील वडीलधाऱ्यांना मुलांच्या या सवयीबद्दल कळते तेव्हा काही शेरेबाजी करूनच ते आपल्या कर्तव्याची समाप्ती करतात.

‘‘कसे युग आले आहे, पुरुषांची तर गोष्ट सोडा, आजकाल महिलादेखील मद्यपान करतात.’’

गीतिका ही २८ वर्षांची मुलगी असून ती आधुनिक कार्यालयात काम करते. याबद्दल मी तिच्याशी बोलले तेव्हा ती म्हणाली, ‘‘ताई, आजकाल ऑफिस पार्टयांमध्ये दारू पिणे ही एक अनिवार्य गोष्ट बनली आहे. नोकरी तर करायचीच आहे ना तर मग मद्यपान कसे टाळावे.’’

मला या लेखाद्वारे अल्कोहोल किंवा सिगारेटला उत्तेजन देण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु मला तुमच्या सर्वांचे लक्ष समाजातील बदलत्या मापदंडाकडे आकर्षित करायचे आहे.

चला आता काही कारणांवर प्रकाश टाकूया, ज्यामुळे आजकाल महिलांमध्ये मद्यपान करण्याची सवय वाढत आहे.

फॅशन स्टेटमेंट : आजकाल मद्य किंवा सिगारेटचे सेवनदेखील फॅशन स्टेटमेंट बनले आहे. जर तुम्ही मद्यपान न केल्यास तुम्ही बाबा आदमच्या काळातील आहात. जर आपल्याला आज कालच्या रीतीभाती माहित नसतील तर आपण आपल्या कारकीर्दीत कशी प्रगती कराल?

समानतेची इच्छा : आजकाल स्त्रिया आयुष्याच्या प्रत्येक आघाडयांवर पुरुषांसह खांद्याला खांदा लावून चालत आहेत. जर पुरुषवर्ग दारू पित असेल, तर मग आजची आधुनिक, श्रृंगारप्रिय स्त्री मागे कशी राहिल. बहुतेक स्त्रिया सर्व काही माहित असूनही केवळ समानतेच्या इच्छेने या मार्गाकडे वळतात.

तणावापासून दिलासा : एकीकडे करिअरचा दबाव, दुसरीकडे वृद्ध आई-वडिल, वाढत्या मुलांच्या गरजा, कधीच न संपणारे काम या सर्व गोष्टींपासून दिलासा मिळविण्यासाठीदेखील आजकाल स्त्रिया दारूच्या आहारी गेल्या आहेत. थोडया काळासाठी का होईना तिला असं वाटतं की ती एका वेगळया जगात गेली आहे.

स्वीकार होण्याची इच्छा : आजकाल बहुतेक मुली नोकरीमुळे आपले घर सोडतात आणि महानगरांमध्ये एकटयाच राहतात. नवीन ठिकाण, नवीन मित्र आणि त्या मित्रांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी इच्छा नसतानाही त्या मद्यपान करू लागतात. नवीन नातेसंबंध तयार होतात तेव्हा उत्सवांमध्ये मद्यपान केले जाते आणि नंतर जेव्हा संबंध तुटतात तेव्हा मग दु:ख कमी करण्यासाठी अल्कोहोलचे सेवन केले जाते.

मद्यपान केल्याने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांशी आपण सर्वजण चांगलेच परिचित आहोत. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनावर आपण दृष्टी टाकल्यास असे आढळते की पुरुषांपेक्षा महिलांच्या आरोग्यावर अल्कोहोलचा अधिक दुष्परिणाम होतो.

* अल्कोहोल पचवण्यासाठी यकृतमधून एक एंझइम सोडले जाते, जे अल्कोहोल पचायला मदत करते. स्त्रियांमध्ये हे एंझइम कमी सोडले जाते, ज्यामुळे त्यांच्या यकृताला पुरुषांच्या तुलनेत अधिक परिश्रम करावे लागतात.

* महिलांची शरीर रचना पुरुषांपेक्षा वेगळी आहे, म्हणून त्यांच्या आरोग्यावर अल्कोहोलचे दुष्परिणाम जलद आणि दीर्घकाळपर्यंत होतात.

* अल्कोहोलचे सेवन केल्याने स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो आणि जर स्त्रिया गरोदरपणात मद्यपान करत असतील तर त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावरही होतो.

घरातील प्रमुख किंवा वडील म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अस्वस्थ असाल तर तुम्ही त्यांना अवश्य समजावून सांगा, तसेच मद्यपान केल्याने होणाऱ्या नुकसानीबद्दलदेखील सांगा परंतु मुलगा, मुलगी किंवा सून सर्वांना एक समानच सल्ला द्या.

हे अवश्य लक्षात ठेवा, जी स्त्री दुर्बल आहे तीच प्रतिकूल परिस्थितीत दारूच्या वाटेवर घसरते. कोणत्याही प्रकारच्या नशेची आवश्यकता तेव्हाच पडते जर आपल्यात धाडसाची ठिणगी नसेल.

धुंद असेल जेव्हा आपणास धाडसाच्या उड्डाणाचे

तर मग काय कराल आपण मद्याच्या पेल्याचे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...