* सुधा गोयल 

कोणत्याही वयोगटातील स्त्रीपासून आनंद मिळेल असा कुठलाच क्षण कुठल्याच वयोगटातील पुरुषाला गमवायचा नसतो. तिच्याशी गप्पा मारुन, तिच्याकडून नकळत झालेल्या चुकीतून किंवा तिला स्पर्श करुन तो स्वत:चे भरपूर मनोरंजन करुन घेत असतो आणि असा समज करुन घेतो की, त्याने स्त्रीला मूर्ख बनवून आपले पुरुषत्व दाखवून दिले. स्त्री केवळ मनोरंजनासाठी किंवा मजा घेण्यासाठी आहे, असे त्याला वाटते. स्त्रीची असहायता पुरुषाच्या कथित मजेच्या संकल्पनेला प्रोत्साहन देते आणि तो अधिकच मजा घेऊ लागतो.

सुशिक्षित पुरुष सभ्यतेच्या वेषात स्वत:ला शांत ठेवण्याचा जीव तोडून प्रयत्न करतो. पण त्याला यश मिळत नाही. काही प्रसंगी, त्याच्या सभ्यतेचा मुखवटा गळून पडतोच. त्यामुळेच तर विनयभंग आणि बलात्काराच्या बऱ्याच घटना या तथाकथित सुशिक्षित समाजात घडलेल्या दिसतात. द्विअर्थी बोलण्यातून, डोळयांमधील अश्लील इशाऱ्यांतून, हावभावातून, अश्लील संवादातून हे सर्व घडत असते. अशावेळी त्यांच्यात आणि कमी शिकलेल्या, अशिक्षितांमध्ये काहीच फरक उरत नाही. प्रत्येक पुरुष केवळ आपली आई, बहीण, पत्नी आणि मुलीला सुरक्षित ठेवू इच्छितो, मात्र अन्य स्त्रियांना एखादी बाजारातील वस्तू समजतो.

घाणेरडी वृत्ती

स्त्रीच्या नजरेत जितकी असहायता दिसेल तितकीच तिची मजा घेण्याची वृत्ती पुरुषांमध्ये वाढते. प्रसंगी आई, बहीण आणि मुलीच्या शरीराचे लचके तोडायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. आता तर अशा घटना सर्वांसमोर येतही आहेत. मर्यादा आणि संस्कारांच्या नावाखाली स्त्री तग धरू शकत नाही. टिकतात ती केवळ नाती. म्हणूनच तर एखाद्याची आई, बहीण किंवा मुलगी ही कुणा दुसऱ्याच्या मनोरंजनाचे साधन ठरते.

कार्यालयात जिथे स्त्री-पुरुष एकत्र काम करतात तिथे अशी मजा घेणे सामान्य बाब आहे. पांढऱ्या केसांचे वृद्ध आणि प्रौढ पुरुषही लंपटपणा करताना दिसतात. बागेत अशा वृद्धांचे टोळके फिरायला आलेल्या महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी करताना दिसतात. त्यांना बारकाईने न्यहाळून मजा घेतात.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे द्वितीय श्रेणी महिला कर्मचाऱ्यांच्या असहायतेचा आनंद टाळीवर टाळी देवून, पान चावून किंवा पानाची पिचकारी उडवून सामूहिकरित्या लूटतात. उदाहरणार्थ ब्राचा हुक निघाला, साडी खांद्यावरुन सरकली, आंबाडा सुटला किंवा अचानक पर्स खाली पडून उघडली आणि ती उचलताना खाली वाकलेल्या तिच्या ब्लाउजमधून आत डोकवायला मिळाले की त्यांना आनंद होतो. कोणत्या स्त्रीला पीरियड आले आहेत आणि कोणाच्या पीरियडची तारीख काय आहे, यावरून तर ऑफिसमध्ये पैजही लावली जाते. जणू स्त्री त्यांच्या पुढयात विवस्त्रच फिरत असते.

कुप्रथांच्या नावाखाली शोषण

देशाच्या ग्रामीण भागात अजूनही तेथील प्रथेनुसार, मुलीचे लग्न मुलाच्या शर्टासोबत लावून दिले जाते. म्हणजेच मुलीचे महत्त्व शर्टा इतकेही नसते. किती क्रुर थट्टा आहे ही? राजपुतांच्या काळात, राजामहाराजांच्य वेळी युद्धावर गेलेल्या राजपूत राजाचे लग्न त्याच्या गैरहजेरीत त्याची कटयार किंवा तलवारीसोबत लावून दिले जात असे. त्यावेळीही एक हास्यास्पद परिस्थिती होती, ती म्हणजे हे लग्न पुजारी लावून देत असत, जे स्वत:ला विद्वान समजत.

हा कसला समाज आहे जो याच समाजाचा एक भाग असलेल्या स्त्रीसोबत इतक्या निष्ठूरपणे वागतो. नवरा गैरहजर असतानाही लग्न लावण्याची इतकी घाई कशासाठी? स्त्रीच्या स्त्रीत्वाला नेस्तानाबूत करुन नेमके काय सिद्ध होते? इतिहासात कधीच (मातृसत्ता असतानाही) एखाद्या पुरुषाचे लग्न मुलीच्या साडी किंवा चोळीशी लावून देण्यात आले नाही. पुरुषांसोबत असे निष्ठूरपणे कधीच वागण्यात आले नाही. परंतु महिला शिक्षणाच्या नावाखाली आजही अशा कुप्रथा मजा घेऊन वाचल्या जातात. आजही मुलीचा मृत्यू झाल्यास अश्रू ढाळले जात नाहीत.

माणूस ही जगातली सर्वश्रेष्ठ रचना म्हणून ओळखला जातो. कारण त्याच्याकडे सारासार विचार करण्याची क्षमता आहे, बुद्धी आणि विवेक आहे. तरीही यातील केवळ एका वर्गाच्या सुखासाठी, भोगविलासासाठी अगदी सहजपणे एखाद्या स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहिले जाते. विविध युक्त्या लढवून पुरुष स्त्रीला आपल्या जाळयात फसवतो, गुरफटून टाकतो. इतकी हीन प्रवृत्ती तर पशू समजल्या जाणाऱ्या जनावरांमध्येही नसते. प्राणी हे प्राण्यांना प्राणीच मानतात, मग तो नर असो की मादी. मग माणसाच्या या पाशवी प्रवृत्तीला काय म्हणायचे? हा प्रश्न त्या प्रत्येक माणसासाठी आहे, ज्याला खरे पुरुषत्व म्हणजे काय हे माहीत आहे.

कधी सुधारणार समाज?

एकटी राहणारी अविवाहित, घटस्फोटित, विधवा किंवा कुमारिका, जिचा कोणाशी काहीही संबंध नाही, ती समाजात केवळ खेळणे किंवा मनोरंजनाची वस्तू बनून जाते. तिचे दु:ख, अश्रू हे सर्व हरवून जाते. ती स्वत: मूल्यहिन ठरते. उरते ते फक्त शरीर आणि तसेही स्त्रीचे शरीर संवेदनशूल्य समजले जाते. त्याचा हवा तेव्हा वापर केला जातो.

जत्रा, सार्वजनिक जागी, गर्दीच्या ठिकाणी पुरुष स्त्रीची मजा घेतात. तिच्या छातीवर मारणे, नितंबावर चिमटा काढणे, स्कार्फ किंवा साडी ओढणे, अशी अश्लील कृत्ये सर्रास केली जातात. तरी बरे, आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्याची प्रथा नाही. नदी, कालवे किंवा तलावाच्या काठावर स्नान करून कपडे बदलणाऱ्या स्त्रियांना अनेक जण लपून पाहतात. अंधारात शौचास बसलेल्या महिलेवर वाहनाची लाईट मारून ट्रक किंवा बसचालक मजा घेताना अनेकदा दिसतात.

बसमध्ये अचानक ब्रेक लावून महिला प्रवाशाला पुरुष प्रवाशाच्या अंगावर पडायला भाग पाडणे, महिला प्रवाशाच्या सीटवर टेकून उभे राहून इतर प्रवाशांना तिकीट देणे, हे सर्व नित्याचेच झाले आहे.

संस्कृती आणि संस्कारांच्या नावाखाली महिलांसाठी वेगळे निकर्ष तयार करण्यात आले आहेत. जे काम केल्याने समाजाची गुन्हेगार आहे असे समजून त्या स्त्रीकडे पाहिले जाते तेच काम पुरुष मात्र ताठ मानेने करू शकतो. धुळीत पडल्याने स्त्री गलिच्छ होते, कारण तिच्या कपडयांना लागलेली धूळ झटकण्याची परवानगी समाज तिला देत नाही. अशा या दुतोंडी सामाजिक मर्यादांच्या पाशातून स्त्री कधी मुक्त होणार?

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...