* मिनी सिंह
या जगात कोणासाठीही प्रेम ही सर्वात गोड अनुभूती आहे. तुमचं कोणावर मनापासून प्रेम असेल आणि तोदेखील तेवढयाच निष्ठेने तुमच्यावर प्रेम करत असेल तर यापेक्षा निर्मळ भावना असूच शकत नाही. प्रेम करणारा फक्त प्रेमाचीच अपेक्षा करतो. परंतु प्रेमात सगळेच काही निष्ठावान नसतात. विश्वासघात, फसवणूक, धोका, चीटिंग हे केवळ एकाच शब्दाचे अर्थ नाहीएत, तर घट्ट नात्यांचा पाया निखळून टाकण्यासाठी पुरेसे आहेत. काही लोक त्यांच्या जोडीदाराला फसवतात. एका संशोधनानुसार, काही वर्षात अशा केसेस समोर आल्या आहेत, ज्यामध्ये लग्नानंतर जोडीदार फसवतात आणि अलीकडच्या काळात ही समस्या सर्वसामान्य झालीय.
तुमचा जोडीदार खरोखरच फसवणूक करतोय की नाही हे जाणून घेणं तसं कठीणच आहे. स्वभावात एकदम बदल होणं, अलिप्त राहणं ही थोडीफार नात्यात अडचण ठरते. तुमचा जोडीदार विश्वासू आहे की नाही आणि तो तुम्हाला धोका देतोय का? जाणून घेऊया असे काही संकेत ज्यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का हे समजेल.
स्वभावात बदल : सर्वात मोठी ओळख म्हणजे जोडीदाराच्या स्वभावात बदल होऊ लागतो. ‘मी कंटाळलोय’ सारख्या शब्दांनी काहीतरी गडबड असल्याचं जाणवू लागतं. दीप्ती माकाने सांगतात, जोडीदार जेव्हा फसवणूक करू लागतो तेव्हा आपोआप काही क्लू वा काही गोष्टी समोर येऊ लागतात, त्या फक्त समजून घेता यायला हव्यात, जसं की, ‘तुला कसं बोलायचं तेच समजत नाही, तुझं वजन कमी कर किती जाडी झाली आहेस.’ त्याबरोबरच आपल्या जोडीदाराची तुलना इतरशी करू लागतात. विनाकारण तुमची चूक दाखवू लागतात, एखाद्या चुकीसाठी तुम्हाला बेजबाबदार ठरवू लागले, तर तुम्ही सचित व्हायला हवं. खासकरून असं पूर्वी कधीही झालं नसेल, तर तुम्ही समजून जा की आता ते तुम्हाला अपमानित करण्यासाठी बोलत आहेत. एखादी व्यक्ती जेव्हा त्याच जुनं नात तोडून दुसऱ्यासोबत संबंध ठेवते तेव्हाच या गोष्टी घडतात.
दिनचर्येत बदल : दैनंदिन दिनचर्येत सतत होणाऱ्या बदलामुळेदेखील जोडीदार तुम्हाला धोका देण्याचा संकेत असू शकतो. जसं, अचानक वॉर्डरोबमधले कपडे बदलणं, स्वत:वर अधिक लक्ष देणं, आरशात सतत न्याहाळत राहणं, तुम्ही येताच सतर्क होणं वगैरे होत असेल तर समजून जा की काहीतरी गडबड आहे. पूर्वीसारखं तुमच्यात रुची न दाखवणं, कारण पूर्वी तुम्ही दोघे एकमेकांजवळ जाण्याचे बहाणे शोधात असायचे आणि आता जोडीदार दूर जाण्याचे बहाणे शोधू लागलाय. कमिटमेंटला घाबरू लागला की समजून जा तो तुम्हाला धोका देतोय. याशिवाय विनाकारण भांडण उकरून काढणं. प्रत्येक कामात दोष शोधणं. पूर्वीसारखं मनातल्या गुजगोष्टी, करिअर संबंधित गोष्टी न करणं, तेव्हा समजून जा की तो दूर जाण्याचा प्रयत्न करतोय.
तुमच्यावरच प्रेम कमी होणं : पूर्वी तुमची प्रत्येक गोष्ट त्यांना आवडायची, परंतु आता ते प्रत्येक गोष्टीत चिडचिड करतात. सिनेमा पहायला वा तुमच्यासोबत बाहेर जायला नकार देणं. जास्तीत जास्त वे ऑफिसमध्ये राहणं. या गोष्टींमुळे स्पष्टपणे समजतं की तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय. कदाचित तो एखाद्या दुसऱ्या गोष्टींमुळे अडचणीत असेल वा अजून काही दुसरं कारण असेलही. परंतु यासाठी तो तुमचा सल्ला घेत नसेल वा तुम्हाला तेवढं महत्वाचं समजत नसेल.
फोनशी संबंधित प्रश्न : तुम्ही जर तुमच्या जोडीदाराच्या फोनशी संबंधित कामांमध्ये बदल नोटीस करत असाल, तर नक्कीच बदल दिसेल. जसं की जोडीदार सतत फोनवर व्यस्त राहत असेल. ऑफिसमध्ये तासनतास फोन बिझी येत असेल, तुमच्यापासून मेसेज वा फोन लपवत असतील, फोनचा पासवर्ड बदलला असेल आणि तो सांगत नसतील आणि फोनला हात लावण्यास नकार देत असतील तर नक्कीच धोक्याची सूचना आहे. याशिवाय त्यांच सोशल मीडियावरच्या वागणुकीतदेखील बदल दिसू शकतो, जसं सतत फोटो अपलोड करणं वा वारंवार प्रोफाइल बदलत राहणं, वारंवार मेसेज चेक करत राहणं, सारखे छोटेछोटेबदल धोक्याचे संकेत असू शकतात.
छोटयाछोटया गोष्टींसाठी खोटं बोलणं : तुमचा जोडीदार जर प्रत्येक छोटयाछोटया गोष्टींसाठी खोटं बोलू लागला, गोष्टी लपवू लागला, तर समजून जा की नक्कीच काहीतरी गडबड आहे.
नजर न मिळवणे : तुमचा जोडीदार जर तुमच्याकडे न पाहता बोलत असेल, तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमच बोलण गांभीर्याने घेत नसेल, जे तुम्हाला आवडत नसेल नेमकं तेच करत असेल, स्वत:ची चूक कबूल करण्याऐवजी तुमचीच चूक दाखवत असेल, तुमचा फोन घेत नसेल आणि ना ही तुमचा मेसेजला उत्तर देत असेल, तर समजून जा की तुमचा जोडीदार तुम्हाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतोय.
धोका देणारे नेहमी जवळचेच असतात आणि कदाचित यामुळेच जेव्हा फसवणूक होते तेव्हा खूप मोठा धक्का बसतो. खासकरून जेव्हा तो आपला जोडीदार असतो.
जोडीदार फसवणूक करतोय हे समजल्यावर काय करायचं ते पाहूया :
पूर्ण वेळ घ्या : तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या फसवणूकमुळे चिंतीत असाल तर त्वरित निर्णय घेऊ नका. पूर्ण वेळ घ्या. कोणाशीही याबाबत चर्चा करू नका. जोडीदाराशी तर अजिबातच नाही. तुम्हाला राग जरी येत असला तरी रागाच्या भरात बोललेले शब्द अधिक नुकसानदायक ठरतात.
वाद वा भांडण करू नका : विरोध करणं गरजेचे आहे आणि समोरच्याला काहीतरी असं घडलंय ज्यामुळे तुम्ही चिंतीत आहात हे समजणंदेखील गरजेचं आहे. परंतु तुम्ही तुमचा आवाज आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला काय वाटतंय हे जोडीदाराला नक्की समजू द्या.
‘तो’ वा ‘ती’ला दोष देऊ नका : अनेकदा धोका देणाऱ्या जोडीदारा ऐवजी त्या मुलाला वा मुलीला दोष दिला जातो. असं करणं चुकीचं आहे. कारण जी व्यक्ती तुमचं प्रेम धुडकावून पुढे गेली, चूक त्याची अधिक आहे.
तुमच्या गोष्टीत दुसऱ्या कोणाला बोलू देऊ नका : तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये सगळं आलबेल हवं असेल तर यागोष्टीची चर्चा कोणाशीही करू नका. कोणा तिसऱ्याचा यामध्ये समावेश करणं धोकादायक ठरू शकतं.
अजून एक संधी द्या : तुमच्या जोडीदाराला त्याच्या चुकीची जाणीव झालीय आणि त्याला सगळं पूर्वीसारखं होऊ द्यायचं असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की वेळ द्या. कदाचित सगळं पूर्वीसारखं होईल. यासाठी तुम्ही दोघ सोबत राहणं आणि वेळ देण गरजेचं आहे, यामुळे तुमच्यातील गैरसमज दूर होतील.