* प्राची माहेश्वरी

उन्हाळ्यानंतर पावसाचे आगमन तनामनाला प्रफुल्लित करते. अशावेळी कडक उन्हापासून आपली सुटका तर होते, परंतु पावसाळयाचे हे दिवस आपल्यासोबत अनेक आरोग्यासंबंधी समस्या घेऊन येतात. खासकरून घरातल्या लहानग्यांसाठी.

अर्थात, लहान मुले स्वत:ची काळजी स्वत: घेण्यास असमर्थ असतात. त्यामुळे त्यांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांवर असते. म्हणूनच पावसाळा सुरू होताच, आईवडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्यांनी मुलांच्या आरोग्याबाबत जराही बेफिकीर राहू नये.

स्वच्छता : पावसाळयाच्या दिवसांत घराच्या आजूबाजूच्या सफाईबरोबरच घराच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. कुठेही पाणी साचू देऊ नका. कारण जमा झालेल्या पाण्यात डास-माश्या, किडे-जंतू निर्माण होतात. त्यामुळे डायरिया, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया व त्वचेसंबंधी आजार पसरण्याची भीती असते. परंतु लहान मुले जर यांच्या विळख्यात सापडली, तर त्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण होऊन बसते.

आहाराची काळजी

पावसाळयाच्या दिवसांत मुलांच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांना हलके, ताजे व सुपाच्य पदार्थ द्यावेत. मोसमी फळांचे सेवनही जरूर करायला लावा. हिरव्या भाज्या व ताजी फळं स्वच्छ पाण्याने चांगल्याप्रकारे धुऊनच मुलांना खायला द्या.

स्वच्छ पाणी : दूषित पाणी पावसाळयाच्या दिवसांतील आजाराचे मुख्य कारण बनते. म्हणूनच मुलांना स्वच्छ पाणीच प्यायला द्या. पिण्याचे पाणी १०-१५ मिनिटे उकळून स्वच्छ भांडयात झाकून ठेवा. जेव्हा घराबाहेर जाल, तेव्हा पाण्याची बाटली जरूर आपल्यासोबत ठेवा.

विशेष देखभाल : मुलांना आंघोळ घालतानाही स्वच्छ पाण्याचा वापर करा. घाणेरडया पाण्याने अंघोळ घातल्याने त्वचेसंबंधी आजार होतात. अंघोळ घातल्यानंतर त्यांना व्यवस्थित कोरडे करून सुके कपडे घाला. ओले कपडे चुकूनही घालू नका. केसही चांगल्याप्रकारे पुसा. मुले जेव्हाही पावसात भिजतील, तेव्हा त्यांना लगेच स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून कोरडे कपडे घाला.

पावसाळयात मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही विशेष गोष्टींची काळजी घेणे फायदेशीर ठरते. जसे की :

बालरोगतज्ज्ञा डॉ. सुप्रिया शर्मांच्या मतानुसार, मुलांना व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, आयर्न तिन्ही गोष्टी समान प्रमाणात अवश्य द्या. कारण या तीन गोष्टींच्या सेवनामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, जी त्यांचे पावसाळयातील डायरिया, व्हायरल, आय फ्लू यांसारख्या आजारांपासून संरक्षण करते.

* मुलांना आधीच सांगून ठेवा की, बाहेरून येताच, सर्वप्रथम आपला चेहरा स्वच्छ पाण्याने अवश्य धुवा. कारण विषाणू मुख्यत: डोळे, नाक, तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतात.

* रात्री मुलांसाठी मच्छरदाणीचा वापर करा. मुले जेव्हाही घराबाहेर जातील, तेव्हा त्यांचे डासांपासून संरक्षण होण्यासाठी मॉस्किटो स्ट्रिप लावूनच घराबाहेर पाठवा.

* मुलांना सूप, ज्यूस, कॉफी, चहा व हळद मिसळलेले दूध प्यायला द्या. बाहेरच्या पदार्थांऐवजी पापड, चिप्स, भजी इ. पदार्थ घरीच बनवून खायला द्या. त्यामुळे मुलांच्या चवीतही बदल होईल.

* मुले पावसात भिजल्यानंतर त्यांच्या छातीला यूकलिप्टस ऑइलने जरूर मालीश करा. त्यामुळे मुलांना मोकळा श्वास घेता येईल व छातीत कफ होणार नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...