* पारुल भटनागर
पावसाळयात प्रत्येकाला पावसात भिजणे आवडते. पण हा पाऊस आपले केस डल, निर्जीव आणि कोरडेदेखील करतो. अशा परिस्थितीत आम्हाला केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आपल्या सर्वांना हे माहित आहे की सद्य स्थितीत सलूनकडे जाणे योग्य नाही. अशा परिस्थितीत जेव्हा आपल्या केसांची काळजी घेणे गरजेचे असते तेव्हा आपण घरीच सलूनसारखेच उपचार घेऊ शकता. याने केवळ आपले केसच सुंदर बनत नाहीत तर आपण सुरक्षितही असाल आणि पैशांची बचतदेखील होईल. तर मग घरी केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया :
जेव्हा असेल फ्रिगिनेसची समस्या
पावसाळयात हवेत जास्त आर्द्रता असल्यामुळे केसांमध्ये फ्रिगिनेसची समस्या सर्वाधिक असते, ज्यामुळे केसही अधिक तुटतात. अशा परिस्थितीत मनात फक्त हाच विचार येतो की आता पार्लरमध्ये यांच्या उपचारासाठी हजारो रुपये खर्च करावेच लागतील. तथापि, ते तसे नाही. आपल्याला फक्त हंगामानुसार केसांचा उपचार करण्याची आवश्यकता असेल. यासाठी आपण ऑलिव्ह ऑईलने आपल्या केसांची मालिश करा कारण ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, यामुळे ते केसांचे फ्रिगिनेस दूर करण्यासाठी कार्य करतात. ते केसांमधील नैसर्गिक मॉश्चरायझर राखण्यासाठीदेखील कार्य करतात. यासाठी आपण आठवडयातून ३-४ वेळा ऑलिव्ह तेल गरम करून त्यासह केसांची मालिश करा. आपली समस्या काही दिवसातच दूर होईल आणि आपल्याला आपल्या केसांमध्ये स्मार्टनेस आणि चमकदेखील पाहायला मिळेल.
प्रत्येक वॉशनंतर कंडीशनर आवश्यक
बहुतेकदा, जेव्हा टाळू नैसर्गिक तेल संपवते तेव्हा केस खरखरीत आणि कुरळे होऊ लागतात. अशा परिस्थितीत पावसाळयात प्रत्येक वॉशनंतर त्यांना कंडिशनर करणे फार महत्वाचे असते, कारण ते केसांचे मॉइश्चरायझर अबाधित राखून केसांना निरोगी बनवण्याचे काम जे करते. फक्त हे लक्षात ठेवावे की केसांना हायड्रेट करणारेच कंडिशनर वापरावे.
हे मास्क केस गळणे थांबवितात
पावसाळयात केस गळतीची समस्या सर्वाधिक दिसून येते. अशा परिस्थितीत आपण बाजारातून महागडे मास्क खरेदी करण्याऐवजी आम्ही तुम्हाला घरीच बनविल्या जाणाऱ्या हेअर मास्कविषयी सांगत आहोत, ज्यांचे अधिक फायदेही आहेत आणि आपण त्यांना घरी ठेवलेल्या वस्तूंपासून सहजपणे बनवूही शकता :
* दही आणि लिंबूचा हेयर मास्क केसांचे नैसर्गिक मॉइश्चरायझर टिकवून ठेवण्याचे कार्य करते. यासाठी तुम्ही एका वाडग्यात दही घ्या आणि त्यात अर्धा चमचे लिंबू घाला आणि ते केसांना लावा. १ तासानंतर केस धुवा. यामुळे केस अधिक मजबूत होतील. आठवडयातून एकदा असे अवश्य करा, विश्वास ठेवा याचा परिणाम पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
* ऑलिव्ह तेल केसांसाठी खूप फायदेशीर असते. कारण हे विशेषत: केसांचा निस्तेजपणा दूर करण्याचे कार्य करते आणि जर तुम्हालाही मऊ केस हवे असतील तर ऑलिव्ह तेलाने केसांची मालिश करा आणि थोडया वेळाने केस धुवा. यामुळे आपण हळूहळू आपल्या केसांमध्ये बदल पहाल.
* केस कोरडे असल्यास कोरफड जेलमध्ये दही मिसळा आणि आठवडयातून ३ वेळा केसांना लावा. केसांची हरवलेली चमक परतू लागेल.
केस सीरम केसांना देई पोषकता
ज्याप्रमाणे फेस सीरम त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे आणि चमकदार बनविण्याचे कार्य करते त्याचप्रमाणे हेअर सीरम केसांचे पोषण करण्याचेही कार्य करते, जी या हंगामाची एक महत्वाची मागणी असते, अन्यथा जर आपली टाळू हायड्रेट होणार नसेल तर केस निस्तेज होण्याबरोबरच तुटूही लागतील. म्हणून जर आपल्याला प्रत्येक हंगामात आपले केस सुंदर बनवायचे असतील तर हेयर सीरम अवश्य लावा, फक्त हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण केसांमध्ये सीरम लावाल तेव्हा आपले केस धुतलेले असावेत. तरच आपल्याला याचा उत्कृष्ट परिणाम दिसेल. होय, वारंवार एकाच ठिकाणी सीरम लावणे टाळा.
केसांसाठी बीयर उपचार
बीयर एक असा केसांचा उपाय आहे, जो आपल्या केसांचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी आहे, खासकरून जेव्हा आपण कोरडया केसांनी अस्वस्थ व्हाल. अशा परिस्थितीत आपण एकतर आपल्या केसांना बाजारामध्ये मिळणारे बियर शॅम्पू लावू शकता किंवा मग बीयरमध्ये समान प्रमाणात पाणी घालून त्याने केस धुऊ शकता. हे केवळ आपल्या केसांमध्ये चमकच आणत नाही तर यामुळे केसांची मुळेदेखील मजबूत होतील. केसांसाठी बीयर उपचार बऱ्याच वेळा पार्लरमध्येही दिले जातात.
केस गरम करणारी साधने वापरू नयेत
तसेही पावसाळयामध्ये केसांची स्थिती खराब होते आणि वरून आपण त्यांमध्ये गरम करणारी साधने वापरली तर ही समस्या अधिकच वाढू शकते. म्हणून या हंगामात केसांची साधने शक्य तितकी कमीत कमी वापरा.
निरोगी आहारदेखील आवश्यक
आपण आपले केस सजविण्यासाठी कितीही सौंदर्य उत्पादनांचा वापर करून पाहा, परंतु जोपर्यंत आपण आपले अंतर्गत आरोग्य सुधारत नाहीत तोपर्यंत हे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरतील. म्हणून आपल्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, फॅट, कार्बोहायड्रेट्स अवश्य समाविष्ट करा. ते आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करतात.
गरम पाणी नको
बऱ्याचदा पावसाळयात भिजल्यावर जेव्हा थंडी वाजू लागते तेव्हा आपल्याला वाटते की गरम पाण्याने अंघोळ का करू नये, परंतु असे करणे म्हणजे आपली सर्वात मोठी चूक असणे आहे, कारण गरम पाण्याने केसांचे मॉइश्चरायझेशन नष्ट होण्याबरोबरच त्यांचेही नुकसानही होऊ लागते. म्हणूनच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना सामान्य पाण्यानेच धुवा, अशा प्रकारे आपण पावसाळयात घरी बसून आपल्या केसांची चांगली निगा ठेऊ शकता.