* पारुल भटनागर
प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की तिच्या घराचे स्वयंपाकघर तिच्या इच्छेनुसार पद्धतशीरपणे बनविले जावे. यासाठी मॉड्यूलर किंवा स्टायलिश किचनपेक्षा काहीही चांगले नाही, कारण यामुळे स्वयंपाकघर आकर्षक आणि स्टायलिश दिसते आणि तसेच ते अशा प्रकारे डिझाइन केले जाते की भले जागा कमी असो की जास्त गोष्टी सहज ठेवता येतात.
मॉड्यूलर किचनची विशेष गोष्ट म्हणजे ते सोयीस्कर आहे. जेव्हा तुम्ही हात पुढे करताच साहित्य आणि भांडी उपलब्ध होतात तेव्हा स्वयंपाक करणे किती मजेदार असेल याची कल्पना करा. अन्यथा सहसा असे घडते की मसाल्याच्या डब्यामध्ये तोच डबा तळाशी असतो ज्याची तातडीने गरज असते आणि त्याच वेळी पॅनमध्ये शिजत असलेल्या भाज्या तो डबा मिळविण्याच्या गडबडीत जळून जातात.
चला, मॉड्यूलर किचनच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया :
भांडी ठेवण्याची पद्धत बदलली
पूर्वी स्वयंपाकघराची रचना अत्यंत सोप्या पद्धतीने करण्यात येत असे, ज्यात भांडी ठेवण्यासाठी स्टीलचे रॅक लावण्यात येत असत, जे चांगले दिसत नव्हते आणि परत सामानही समोरच दिसून येत असे, पण आता स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्मखाली भांडयांच्या आकारानुसार, त्यांच्या वापरानुसार सोयीस्कर रॅक बनवले जातात. वेगवेगळया प्रकारच्या भांडीसाठी त्यांच्यानुसार जागा असते. या रॅकची फिनिशिंग इतकी अप्रतिम असते की प्रत्येक पाहुण्यांसमोर त्यांना प्रदर्शित करावेसे वाटते.
अधिक कामाची जागा
मॉड्यूलर किचनमध्ये जास्त जागा मिळाल्यानंतर कामाची जागाही चांगली असते. यामध्ये बाटली रॅक, प्लेट होल्डर, कटलरी कंपार्टमेंट, गारबेज होल्डर इत्यादी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र जागा असते, ज्यामुळे वस्तू इकडे-तिकडे विखुरल्या जात नाहीत आणि वेळेवर सापडतात.
आजकाल गृहिणींनी इंटरनेट आणि मासिकांद्वारे फ्यूजन, भाजलेल्या आणि तळलेल्या पाककृती बनवण्याचे नव-नवीन मार्ग शिकण्या-वाचण्यास सुरुवात केली आहे. नवीन पाककृती बनवण्यासाठी स्वयंपाकघरात नवीन उपकरणे ठेवण्याचा ट्रेंडही वाढत आहे.
कुकटॉपने पाककला शैली बदलली
ज्याप्रमाणे पुरुष कार्यालयामध्ये आपले वर्क स्टेशन सोयीस्कर आणि आधुनिक बनवण्याच्या प्रयत्नात असतात, त्याचप्रमाणे गृहिणी तिच्या कामाचे स्थान म्हणजेच स्वयंपाकघरदेखील आधुनिक बनवू इच्छिते. आजकाल मल्टीबर्नर कुकटॉप खूप ट्रेंडमध्ये आहेत. यांची कोटिंग इतकी अप्रतिम असते की एकदा साफ केल्यानेही ती चमकते. पारंपारिक स्टीलच्या कुकटॉपवर स्वयंपाक केल्यानंतर ते स्वच्छ करणेदेखील गृहिणीसाठी कुठल्या कामापेक्षा कमी नसते.
देखरेख करणे सोपे
एक स्टाइलिश स्वयंपाकघर दिसण्यास तर चांगले वाटतेच शिवाय ते देखरेख करणे देखील खूप सोपे आहे, कारण हलकी कॅबिनेट आणि काउंटर अतिशय गुळगुळीत असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचत नाही.
आकार आणि रंग पर्यायदेखील भरपूर. बऱ्याचदा जेव्हापण आपण मॉड्युलर किचन बनवण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की त्याचा आराखडा आपल्या किचनला शोभेल की नाही. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे विशेषत: लहान स्वयंपाकघर लक्षात घेऊनच डिझाइन केले जाते. यामध्ये स्वयंपाकघरात उंच युनिट, कॅबिनेट, ड्रॉवर इत्यादी बनवले जातात, ज्यात सामान सहज सेट होते. ते विखुरलेले राहत नाही.
तसेच यात अनेक रंग पर्याय आणि डिझाईन्सदेखील असतात, जसे की साधे आणि रंगीबेरंगी किंवा अगदी प्रिंट्सचेदेखील असतात आणि जर तुम्हाला याच्या बाह्य पृष्ठभागावर मॅट किंवा चमकदार स्पर्श हवा असेल तर तोदेखील तुमच्या आवडीवरच अवलंबून आहे.
पतीचे कार्यालयात आणि मुलांचे शाळेत जाण्यापूर्वी आणि नंतर गृहिणी तिचा बहुतेक वेळ स्वयंपाकघरात घालवते. अशा परिस्थितीत या जागेला म्हणजे आपल्या कार्य केंद्राला आधुनिक आणि सोयीस्कर अवश्य बनवा.