* पारुल भटनागर

लग्नाची धावपळ सुरू असेल आणि लेहंग्याचा विषय निघणार नाही, असे होऊच शकत नाही. पण ही गोष्टही नाकारता येत नाही की, एका दिवसासाठी खरेदी केलेला लेहंगा फक्त एका दिवसापूरताच राहून जातो. कारण लग्नानंतर एवढा वजनदार लेहंगा वापरता येत नाही.

अशावेळी मनाला फक्त एकच खंत असते की, उगाचच एवढा वजनदार, महागडा लेहंगा का घेतला? पण जर तुम्ही मनात आणले तर हा लेहंगा वेगवेगळया प्रकारे विविध प्रसंगी वापरू शकता आणि कोणाच्या लक्षातही येणार नाही, कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लेहंगा वेगवेगळया पद्धतीने कसा वापरायचा याचे ९ प्रकार after wedding fashion tip

लेहंगा वापरा बिनबाह्यच्या चोळीसह

बिनबाह्यच्या चोळीचा वापर केल्याने तुम्ही फॅशनेबल दिसाल, शिवाय या चोळीसह लेहंगा पुन्हा वापरण्याची तुम्हाला संधी मिळेल. वाटल्यास तुम्ही तुमच्या लग्नाच्या चोळीच्या बाह्या काढून तुमचे सुंदर हात सर्वांना दाखवू शकता, शिवाय यामुळे तुम्हाला वेगळा लुकही मिळेल. तुम्ही वेगळया रंगाची बिनबाह्यांची चोळीही शिवू शकता. विश्वास ठेवा की, जेव्हा तुम्ही असा पेहराव करून मैत्रिणीच्या लग्नाला किंवा कौटुंबिक  कार्यक्रमासाठी जाल तेव्हा तो तुमच्या लग्नातील लेहंगा आहे, हे कोणाच्या लक्षातही येणार नाही, कारण वेगळया प्रकारच्या चोळीमुळे तोही वेगळा दिसू लागेल. नंतर तुम्ही ही चोळी एखाद्या साडीवरही घालू शकता. यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी नवा लुक मिळेल.

प्लेन लेहंग्यासह घाला चोळी

वजनदार लेहेंगा एकदा घातल्यानंतर पुन्हा घालायची हिंमतच होत नाही. पण तुम्ही जर त्याच लेहेंग्यासह एखादा प्रयोग केल्यास तुमचा लेहेंगाही नवीन वाटू लागेल आणि तुम्हाला नवा लुकही मिळेल. नववधूच्या लेहंग्यावरील चोळीबाबत बोलायचे झाल्यास ती भरजरी, वजनदार असते. तिच्यासोबतचा लेहंगाही बराच वजनदार असतो. तुम्ही तुमची ही चोळी पुन्हा वापरू शकता. जर तुमची भरजरी, वजनदार चोळी हिरच्या रंगाची असेल तर तुम्ही प्लेन लाल रंगाचा लेहंगा शिवून त्यावर जाळी असलेला दुपट्टा घेऊ शकता. यामुळे तुमचा लेहंगा सुंदर दिसेल, तो वजनदारही वाटणार नाही आणि तुम्ही तो सहजपणे घालू शकाल. वाटल्यास तुम्ही चोळीच्याच रंगाचा लेहंगा शिवून घेऊन त्याच रंगाचा दुपट्टा घेऊ शकता. विश्वास ठेवा, यामुळे तुमचा लेहंगा तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळवून ठेवेल.

दुपट्टा घेण्याची पद्धत बदला

लेहेंगा असो किंवा मेकअप, प्रत्येक मुलगी किंवा महिलेला प्रत्येक कार्यक्रमात वेगळया प्रकारे सजायचे असते, जेणेकरून ती प्रत्येक वेळी नेहमीपेक्षा वेगळी आणि सुंदर दिसेल. अशा वेळी तुम्ही कल्पकतेने विचार केल्यास तुम्ही तुमच्या लग्नातील लेहंगा वेगवेगळया प्रकारे घालून तुमच्या आवडीचा लुक मिळवू शकता. जर तुम्हाला गुजराती लुक हवा असेल तर गुजराती पद्धतीने दुपट्टा घ्या. जर साधे पण आकर्षक दिसावे असे वाटत असेल तर एका खांद्यावर दुपट्टा घ्या. त्याला पिन लावा. बंगाली लुक हवा असल्यास दुपट्टा त्या पद्धतीने घ्या. इतकेच नाही तर लेहंगा साडीप्रमाणे दिसावा यासाठी दुपट्टा कमरेभोवती गुंडाळून साडीच्या पदराप्रमाणे तो खांद्यावर घेऊ शकता. जाळीचा दुपट्टा असेल तर तुम्ही तो दोन्ही खांद्यांवर घेऊन त्याला श्रगसारखा लुक देऊन लेहंग्याला जास्त आकर्षक बनवू शकता. फक्त तुम्हाला दुपट्टा घेण्याची पद्धत बदलायला हवी. मग पाहा, तुमचा लेहंगा नव्यासारखा दिसेल.

दुपट्टा विविध प्रकारे वापरा

असे म्हणतात की, लेहंग्यासोबत असलेला दुपट्टा फक्त त्या लेहंग्यासोबतच वापरता येतो, मात्र थोडा कल्पकतेने विचार केल्यास कितीतरी पर्याय मिळतील, ज्यामुळे तुम्ही पुन्हा लेहंगा घालू शकाल आणि पार्टीसाठी त्याच लेहंग्याचा वापर करून वेगळा ड्रेसही तयार करू शकाल. कारण लग्नाच्या दुपट्टयाला मुद्दामहून भारदस्त लुक दिला जातो, जेणेकरून लेहंगा उठावदार दिसेल. अशा भारदस्त दुपट्टयापासून तुम्ही स्वत:साठी डिझायनर कुर्ता किंवा वन पीस ड्रेस शिवून घेऊ शकता किंवा हा दुपट्टा प्लेन सलवार कमीजवर घेऊन ट्रेंडी लुक मिळवू शकता. वाटल्यास दुपट्टयापासून श्रग, पारदर्शक जाकीट शिवून ते छोटया किंवा लांबलचक कुरर्त्यांवर घालू शकता.

लांबलचक कुरत्यासोबत घाला

जर तुमचा कुर्ता बराच काळ कपाटातच पडून असेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्याकडे बघून असा विचार करत असाल की, तो पुन्हा घातल्यास सर्वांच्या ते सहज लक्षात येईल, सोबतच लुकही भारदस्त दिसेल तर तुम्ही थोडासा कल्पकतेने विचार करा. जर तुम्हाला चोळी घालणे कंटाळवाणे वाटत असेल तर लेहंग्यावर लांबलचक कुर्ता घाला. तुम्ही तुमच्या लेहंग्यावर शोभून दिसेल असा पुढील बाजूने डिझाईन असलेला शिफॉन किंवा शिमरी कपडयाचा कुर्ता शिवून घालू शकता. ही एक वेगळी स्टाईल आहे शिवाय फॅशनच्या जगतातही सध्या या स्टाईलने बराच धुमाकूळ घातला आहे.

लेहंग्यासोबत घाला लांब जाकिट

जर तुमचा लेहंगा खुलून दिसावा असे वाटत असेल तर तुमच्या लग्नातील लेहंगा जाळी असलेल्या लांब जाकिटसह घालून तुम्ही त्याचा संपूर्ण लुकच बदलू शकता, जो अगदी लांबलचक कुरत्यासारखाच लुक देईल. याच्यावर तुम्हाला तुमच्या लग्नाचा दुपट्टा घेण्याचीही गरज भासणार नाही. लेहंग्याला ग्लॅमरस लुक देण्यासाठी जाकिटचा रंग लेहंग्याच्या रंगाशी मिळताजुळता घ्या. तो घातल्यानंतर ड्रेस घातल्यासारखेच वाटत अल्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल.

ब्लाऊजसोबत मॅच करा

आजकाल प्लाजो बराच ट्रेंडमध्ये आहे. हा तुम्ही विविध कार्यक्रमात घालून प्रत्येक वेळी वेगळा लुक मिळवू शकता. जसे की, तुम्ही प्लाजो कुरत्यासोबत घातल्यास तुम्हाला पारंपरिक लुक मिळेल. तोच जर तुम्ही क्रॉप टॉपसह घातला तर तुम्हाला पार्टी लुक मिळेल. तुमच्या घरात एखादा सण-समारंभ असेल तर तुम्ही तुमच्या लग्नातील टॉप ट्राऊजरवर घालून फॅशनेबल दिसण्यासह स्वत:साठी वेगळाच ट्रेंडी आऊटफिट तयार करू शकता. बाजारात तुम्हाला शेकडो प्रकारचे डिझायनर प्लाजो मिळतील.

बॉर्डरचा करा पुर्नवापर

असे होऊ शकते की, लेहंग्याला असलेल्या वजनदार बॉर्डरमुळे तो घालण्याची इच्छा तुम्हाला होत नसेल. त्यामुळे तुम्ही लेहंग्याची बॉर्डर काढून घेऊन ती दुसऱ्या एखाद्या ड्रेसला लावू शकता. यामुळे तुमचा लेहंगा हलका व साधा दिसू लागेल. तो तुम्ही एखाद्या पार्टीत घालू शकाल, शिवाय बॉर्डर दुसऱ्या ड्रेसला लावल्यामुळे तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत.

लेहंग्यातील लेअर्स काढून टाका

नववधूचा लेहंगा जास्त उठावदार दिसावा यासाठी त्यावर नेट, फ्रिल लावली जाते. लेहंगा घोळदार दिसावा व त्यामुळे चांगला लुक मिळावा, हे यामागचे कारण असते. प्रत्येक नववधू लग्नासाठी लेहंगा घेताना तो जास्तीत जास्त घोळदार असलेलाच घेते. मात्र लग्नानंतर असा घोळदार लेहंगा बाहेर घालून जायला तिला आवडत नाही. त्यामुळेच तुमचा लेहंगा थोडासा हलका आणि वेगळा दिसावा असे वाटत असेल तर त्याच्या सर्व लेअर्स आणि कळया काढून टाका आणि त्यानंतर तो वेगळया पद्धतीने परिधान करून सुंदर दिसा.

 

 

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...