* शकुंतला सिन्हा

वरणभात, भाजी, पोळी वा भाकरी, पुरी असो वा खिचडी, लोणचं नेहमीच आपलं खाणं अधिक चविष्ट करत. साधारणपणे जी पारंपरिक लोणची आपण खातो त्यामध्ये लाल तिखट आणि तेल अधिक प्रमाणात असतं, ज्यामुळे जेवण अधिक चवदार होत खरं परंतु आरोग्याचंदेखील नुकसान होत. परंतु काही लोणची चव वाढविण्याबरोबरच आरोग्यदेखील निरोगी ठेवतात.

भाज्यांचं लोणचं

लोणचं म्हणजे फक्त कैरी, मिरची, आवळा वा काही फळं वा भाज्यांच्या मसालेदार तेलात तरंगणार लोणचं नव्हे. जसे की ही लोणची पारंपरिक पद्धतीने केली जातात. भाज्यांची लोणची जसं फ्लॉवर, गाजर, काकडी, बीट, मुळा, नवलकोल, पांढरा कांदा, फरसबी, शिमला मिरची इत्यादींची फर्मेटेड लोणची खूप छान होतात. मात्र यांना गरम केल्यानंतर यातील क जीवनसत्व नष्ट होतं, परंतु ब जीवनसत्व मात्र मिळतं. याबरोबरच भाज्यांतील ए, क आणि फायबर सुरक्षित राहतं. फरमेटेंशनमुळे चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि खराब बॅक्टेरियांची संख्या कमी होते. या प्रक्रियेत प्रोबायोटेक बनत ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया होतात.

अशा फर्मेटेड भाज्यांचं लोणचं फक्त ब्राइन वा व्हिनेगरने बनतात, ज्यामध्ये भाज्याव्यतिरिक्त जीवनसत्व आणि प्रोबायोटिक्सदेखील मिळतात. चवीसाठी काही इतर मसाले, सोया, मोहरी, लसूण, काळीमिरी, तेजपत्ता इत्यादी मिसळले जातात.

यापासून फायदे

जेवणात भाज्याचा समावेश : हे फक्त लोणचंच नाही तर भाज्याच प्रमाणदेखील वाढवतं. या लोणच्याचे प्रमाण पावकप भाजी प्रमाणे आहे.

लाभदायक : फर्मेटेड लोणच्याच ज्यूस डीहायड्रेशन आणि मासपेशीच्या क्रैंपमध्ये फायदेशीर ठरतं.

अँटीओकसाइड : २०१४ साली जपानमध्ये उंदरावर केलेल्या संशोधनमध्ये आढळून आलं की लोणच्याचे प्रोबायोटिक्स स्पायनल कॅन्सरच्या उपचारासाठी मदतनीस ठरतात. संशोधकनां वाटतं की भविष्यात माणसांनादेखील याचा लाभ मिळेल.

रोगात लाभ : फर्मेटेड फूड वा लोणचं रक्तातलं शुगर स्पाइक रोखण्यात सहाय्यक ठरतं. ज्यामुळे शुगर लेव्हल मेंटेन ठेवण्यात मदत मिळते.

याव्यतिरिक्त लोणच्याचे बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स पचन, त्वचा, हाड, डोळे, स्ट्रोक आणि हृदयरोगातदेखील लाभदायक ठरतं.

थकलेल्या पायांना आराम : फर्मेटेड पीकल ज्यूस थकलेल्या पायांना आराम देतं.

भाज्याच्या लोणच्यामुळे तुम्हाला पौष्टिक तत्व मिळतात :

* दररोजच साधारण २३ टक्के जीवनसत्व मिळतात जे ब्लड क्लौंटिंग आणि हाडासाठी अनुरूप आहे.

* दररोजच साधारण २४ टक्के ए जीवनसत्व मिळतं, जे डोळे, इमून सिस्टम आणि गरोदरपणात फायदेशीर ठरतं.

* दररोजच साधारण ७ टक्के कॅल्शियम मिळतं, जे दात आणि हाडासाठी योग्य आहे.

* दररोजच साधारण ४ टक्के सी जीवनसत्व मिळतं, जे अँटीऑक्सीडेंट आहे.

* दररोजच साधारण ३ टक्के प्रोटेशिअम मिळतं जे ब्लड प्रेशर, स्ट्रेस आणि किडनीसाठी योग्य आहे.

लोणच्यामध्ये सोडीयमचं प्रमाण अधिक असल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं म्हणून हृदय, डायबिटीस आणि किडनीच्या रोगासाठी हे हानिकारक आहे. प्रोसैस्ड पिकल्सच्या सेवनाने गॅस तयार होतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...