* दीपन्विता राय बॅनर्जी
व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवण्यात फॅशनचं वेगळंच महत्त्व आहे. जुन्या फॅशनमध्ये नव्याचं फ्यूजन आजकाल नवा ट्रेंड आहे, ज्याला इंडोवेस्टर्न आउटफिट नावानं ओळखलं जातं. या इंडोवेस्टर्न फ्यूजन ड्रेसेजला तुम्ही परिधान करू शकता. फॅशनच्या बाबतीत स्वीकारा हा नवा दृष्टीकोन आणि मग बना सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र.
गाउन साडी : साडीला गाउन फॉरमॅटमध्ये पदराबरोबर वापरू शकता. संध्याकाळच्या पार्टीमध्ये ही सुपरस्टायलिश लुक देईल.
स्लिट सिलौटी : हा गाउन आहे, पण धोती सलवार किंवा चुडीदारवरचा अर्धा भाग कापलेला. वरच्या भागात गाउनच्या वरच्या भागात खोलूनदेखील वापरू शकता.
कोरसेट टॉपबरोबर लहेंगा : स्कर्टसारख्या लहेंग्याचा लुक कोरसेट टॉप किंवा ब्लाऊजबरोबर खूपच फॅशनेबल होऊन जातो.
पंत साडी : ही साडी एका विशिष्ठ पद्धतीने नेसली जाते. जर बोहेमियन लुक आवडत असेल तर ही पार्टीमध्ये वापरली जाऊ शकते.
क्रॉप टॉप लहेंगा : प्रिंटेड टॉपबरोबर प्लेन रंगीत लहेंगा वापरा. लहेंग्यात हवं तर घेर जास्त द्या किंवा ए लाइन शिवा, पण मटेरिअल नक्कीच सिल्क बेस्ड असू द्या.
ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी
ड्रेस आकर्षक असेलही पण ज्वेलरी त्यावर मॅचिंग नसेल तर लुकवर फरक पडतो. जा जाणून घेऊया की कोणत्या ड्रेसवर कोणती ज्वेलरी वापरून तुम्ही ग्लॅमरस दिसाल :
* तुम्ही इंडोवेस्टर्न ड्रेसबरोबर वेस्टर्न लुकच इंडियन कुंदन ज्वेलरी सेट मॅच करू शकता, जो संध्याकाळपासून रात्रीपर्यंतच्या पार्टीमध्ये वगैरे घालता येईल.
* डार्क कलरच्या ड्रेसबरोबर डार्क शेडची हेवी एक्सेसरीज घातली जाऊ शकते.
* आपल्या व्यक्तिमत्त्वावर खुलून दिसणारा हलक्या रंगांचा इंडोवेस्टर्न ड्रेससोबत ब्लॅक मेटल किंवा सिल्वर कलरमध्येही एक्सेसरीज वापरू शकता.
* जर तुम्ही ट्यूनिक किंवा कुर्ती व चुडीदार घातला आहे आणि त्याला इंडोवेस्टर्न पॅटर्नमध्ये बदलू इच्छिता, तर कुर्ती आणि चुडिदारबरोबर गळ्यात स्कार्फ किंवा डेनिमच्या ट्यूनिकबरोबर छोटा फ्लोरल स्कार्फ तुम्हाला खूप स्टाइलिश लुक देईल.
* जर प्लाजो किंवा क्रॉप पॅन्ट घालणार असाल तर आईकट ट्यूनिक हाय कॉलरमध्ये फुल स्लीव्हबरोबर वापरा. त्याच्याबरोबर पैसले मोटिफचे इयररिंग्स उठावदार दिसतील.
* पेन्सिल स्कर्ट आणि कॉटन टॉपबरोबर गोल, त्रिकोण किंवा बाणाच्या शेपचे गोल्ड प्लेटेड ब्रासचे इअररिंग्स.
* पिवळा लाँग स्कर्ट आणि टॉपवर मोत्याची नेकलाइन असलेलं जॉकेट घाला आणि त्यावर षटकोनी आकाराचे कानातले इअररिंग्स.
ड्रेसवर मॅचिंग बॅग
ड्रेस आणि ज्वेलरीबरोबर बॅगेचं महत्त्व विसरू नका. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगी गरजेनुसार आणि ड्रेसला मॅचिंग बॅग वापरता, तर ते तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवेल.
सैरोल्स बॅग : या डबल हॅन्डलच्या असतात. या बॅगेत खूप जागा असते. लंचबॉक्स, मेकअपचं सामान, पैसे, मोबाइल, सर्व काही यात आरामात बसतं.
ही सिरियस टाइप फॉर्मल ड्रेसबरोबर शोभून दिसेल. हवं तर तुम्ही त्याला फ्लोर लेंथ स्टे्रटकट कुर्तीबरोबरही कॅरी करू शकता.
टोटे बॅग : याला बीच बॅगही बोलू शकता. ही पण खूप मोठी असते. म्हणजे यात खूप सामान राहू शकतं. समुद्र किनाऱ्यावर घेऊन जाण्यासाठी एकदम योग्य बॅग आहे.
या बॅगला तुम्ही प्लाजो स्टाइल कुर्ती आणि जॅकेटबरोबर कॅरी करू शकता.
बास्केट बॅग : नावावरूनच कळून येतं की ही खूप मोठी आणि स्टाइलसह कॅरी करण्यायोग्य असते.
होबो बॅग : कॅज्युअल आउटिंगसाठी एकदम परफेक्ट आहे ही बॅग.
बीच साइड पार्टीमध्ये काफ्तान स्टाइल कुर्ती आणि शॉटर्सबरोबरही तिला कॅरी करू शकता.
स्लिंग बॅग : तरूणींसाठी खूप उपयोगी आणि आकर्षक. खांद्यापासून गुडघ्यापर्यंत या बॅगची दोरी असते. ही बॅगफ्लेयर्ड टे्रडिशनल स्कर्ट आणि फ्लोरल टॉपसोबत शोभून दिसते.
इवनिंग बॅग : ही पार्टी आणि इवेंटसाठी उपयोगी आहे.
फॉर्मल हॅन्डबॅग आणि क्लच बॅग : जर अनारकली कुर्ती आणि रिअल लुकमध्ये असाल तर ही बॅग तुम्हाला एलिगंट लुक देईल.