* अपूर्ण अग्रवाल
घर सजवण्यासाठी व सुंदर बनविण्यासाठी भिंतीचा रंग कसा असावा, फर्निचर कसे असावे हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. घर सजवण्यासाठी फर्निचरच खरेदी करणे आवश्यक नाही. आपण आपले जुने फर्निचर आणि लाकडी वस्तू रंगवून त्यास अगदी नवीन रूप देऊ शकता. आपल्या शयनकक्षाची गोष्ट असो किंवा मग आपल्या आधुनिक स्वयंपाकघराची असो, लाकडी फर्निचर प्रत्येक घराचा अभिमान बनला आहे. अशा परिस्थितीत याचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
अशी निवडा पॉलिश
कोणत्याही प्रकारचे फर्निचर असो, त्यावर लागलेले डाग आणि ओरखडे त्यास खराब करतात. बऱ्याच वेळा आपण फर्निचर साफ करण्यासाठी फर्निचर वॅक्सचा वापर करतो, परंतु याच्या गुळगुळीतपणामुळे फर्निचरला धूळमाती चिकटते, ज्यामुळे ते खराब होऊ लागते.
आपण आपल्या घराचे फर्निचर जसे की सोफे, पलंग, लाकडी कपाटे, टेबल्स किंवा साइड टेबल्स, खुर्च्या, संगणक टेबल्स, स्टूल इत्यादी पेंट किंवा पॉलिश करून घेऊन त्यांना पुन्हा नवीन बनवू शकता. होय, हे लक्षात ठेवा की जर फर्निचर यापूर्वी पेंट केले गेले असेल तर ते पुन्हा पेंटच करा आणि जर ते पॉलिश केले गेले असेल तर ते पुन्हा पॉलिशच करा. आधुनिक कोटिंग पेंट रासायनिक प्रतिरोधक असतात. ते केवळ फर्निचरचे आर्द्रतेपासूनच संरक्षण करत नाहीत तर कुजण्यापासून आणि वाळवीपासूनदेखील संरक्षण करतात.
रंगांची पुनरावृत्ती करू नका
आपल्या घरास नवीन रूप देण्यासाठी रंगांची पुनरावृत्ती करू नका. जर आपल्याला एखादा रंग अधिक आवडत असेल तर याचा अर्थ असा नाही की आपण केवळ तोच रंग पुन्हा- पुन्हा वापरावा. आपण नवीन आकर्षक रंगाचे पेंट वापरावे. नवीन रंग आपल्या घरात आणि आपल्यात नवीन ऊर्जा मिसळण्यास मदत करतील आणि घर आतून सुंदरही बनवतील.
जर आपल्या लाकडी फर्निचरवर ओरखडे आले असतील किंवा त्यावर खिळयांचे खड्डे असतील तर पेंट करण्यापूर्वी ते ओरखडे आणि खड्डे वुड फिलरने भरा. वुड फिलर लाकडासाठी पुट्टी आणि त्यास गुळगुळीत पृष्ठभाग देण्यासाठी कार्य करते.
फिलरचा रंग नेहमी फर्निचरच्या रंगापेक्षा किंचित गडद असावा. प्रथम लाकडात असलेली छिद्रे स्वच्छ करा. नंतर फिलर भरा आणि ते ६-७ तास तसेच सोडा. फिलर पृष्ठभागाच्या वरपर्यंत असल्यास सॅण्ड पेपरच्या सहाय्याने ते स्वच्छ करा. मग ते रंगवा.
एक पेंट असा निवडा, जो पाण्याला लाकडी फर्निचरमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करेल आणि त्याच वेळी तो पाण्याने खराब होणारा नसावा. बऱ्याच वेळा पेंट काही दिवस पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर निघून जातो, जो केवळ वाईटच दिसत नाही तर आपल्या घराचे सौंदर्यही खराब करतो.
लाकडी कोटिंग महत्वाचे आहे
आजकाल बाजारात आधुनिक लाकूड कोटिंग पेंट्स उपलब्ध आहेत, जे वॉटरबेसड फॉर्म्युल्यांवर बनवलेले आहेत आणि ते दीर्घकाळ टिकणारेदेखील आहेत. असे लाकडी कोटिंग पेंटस केवळ फर्निचरला पाण्यापासूनच वाचवित नाहीत, तर त्यांच्यावर जर धूळमातीही जमलेली असेल तर आपण ते देखील कापडाच्या सहाय्याने सहजपणे साफ करू शकता. आजकाल अशा लाकडी कोटिंगदेखील उपलब्ध आहेत, ज्या फर्निचरचे स्क्रॅचपासून संरक्षण करतात. आपण इच्छित असल्यास, वॉटरबेस्ड मैट टॉपकोटदेखील वापरू शकता. हे पेंट पिवळसरपणा येऊ देत नाही आणि फर्निचरला एक चमकदार देखावा देते.
आपण फर्निचरला त्याच्या वास्तविक रंगात पाहू इच्छित असल्यास आपण वार्निश वापरू शकता. वार्निश फर्निचरच्या लाकडाचा रंग चमकविण्यात मदत करते आणि ते अगदी नवीनसारखे बनवते. हे देखील फर्निचरला आर्द्रता, धूळ, पाणी आणि सूर्यप्रकाशापासून खराब होण्यास प्रतिबंधित करते.