* सोमा घोष
अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारी आणि सगळ्या प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरलेली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, आता पुन्हा चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. २० सप्टेंबरपासून आता हसण्याचे वार होणार आहेत चार आणि सगळ्यांची लाडकी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोमवार ते गुरुवार असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यानिमित्ताने एक धमाल रॅप सॉंग रोहित राऊत यांनी गायलं असून आता चार वार हास्यजत्रेचा चौकार असं म्हणतं सगळे कलाकार बिनधास्त डान्स करताना दिसत आहेत. प्रेक्षकांनादेखील हे गाणं आवडलं असून लाडकी हास्यजत्रा चार दिवस येणार असल्याचा आनंद त्यांना झाल्याचं दिसत आहे.
समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. प्रसाद-नम्रता यांची जोडी नेहमीच सरस ठरते, गौरव आणि ओंकार यांचे विनोद प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. हास्यजत्रा पाहून आनंद आणि मनोरंजन मिळाल्याच्या कित्येक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या.
रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस हास्यजत्राची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता विनोदवीर आठवड्यातून चार दिवस यायला सज्ज झाले आहेत.
आता सगळ्यांची लाडकी हास्यजत्रा २० सप्टेंबरपासून आठवड्यातले चार दिवस प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.
पाहायला विसरू नका, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, २० सप्टेंबरपासून सोम.-गुरू. रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.